Wednesday, 31 December 2014

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"


हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"

सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली.


माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर
छायचित्र स्त्रोत :- Internet

Saturday, 27 December 2014

Tuesday, 23 December 2014

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार


हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार
"सम्राट चंद्रगुप्त" व "ग्रीक राजा सेल्युकस" ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र "बिंदुसार". ई.स.पू. २९८ ला "चंद्रगुप्त" मरण पावला व "बिंदुसार" त्या गादीवर बसला. "बिंदूसार" हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने "चंद्र्गुप्ताचे" अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला "अमित्रघात" म्हणजेच "शत्रूंचा कर्दनकाळ" हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या "मौर्य साम्राज्यात" सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. "सम्राट बिंदुसारने" आपले ;सैन्यबळ इतके वाढविले होते कि त्या काळी संपूर्ण विश्वात प्रबळ सैन्य असणारे राष्ट्र होते "हिंदुस्थान"….

"चाणक्य" च्या प्रबळ बुद्धी च्या जोरावर व चंद्रगुप्ता अतुलनीय शौर्याच्या बळावर उभे केलेले अखंड भारताचे "शिवधनुष्य" बिंदुसार ने लीलया पेलेले होते किंबहुना अल्पायुष्यामूळे अर्धवट राहिले पित्याचे स्वप्न "बिंदुसार" ने शतश: पूर्ण केले होते.प्रथम चंद्गुप्ताचा पायाभरणी आणि त्यावर बिंदुसारने ने उभारलेला कळस यामुळे जे "हिंदुस्थान" एक प्रबळ राज्य म्हणून उदयास आले होते त्याही दहशत इतकी होती कि चंद्रगुप्त, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांच्या मृत्युनंतर काही काळ म्हणजे अंदाजे १०० वर्षे तरी कुणी परकीय आक्रमक हिंदुस्थानावर आक्रमण करण्याची हिम्मत करू शकले नाहीत.
असा हा महान राजा ई.स.पु. २७३ साली वारला आणि एका तेजपुंज राजा पित्याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत झटला…

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर

Saturday, 20 December 2014

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?


संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर "शालीवाहन शके 1936" किंवा "विक्रम संवत् 2071" वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच - 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, "गुढिपाडवा" "31 मार्च 2014" रोजी "शालीवाहन शके 1936 प्रारंभ" असे आहे. "दिपावाली पाडवा" "24 ऑक्टोबर 2014" रोजी "विक्रम संवत् 2071 प्रारंभ" असे आहे. म्हणजे "शालिवाहन शक" "येशु ख्रिस्त" च्या नंतर सुरू झाले व "विक्रम संवत्" हे "येशु ख्रिस्ताच्या" अगोदर सुरू झाले.

संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम "शक" हा शब्द "संवत् / संवस्तर" यासाठी पर्यायी "परकिय शब्द" आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :-

1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन

> ई.स. पूर्व 57 च्या आसपास मालवांनी परकिय शकराजा "नहपानचा" पराभव केला, तेव्हा "मालवगणांनी" "शक" सुरू केला तो "कृत" होय.

> "मालव संवत" पुढे "उज्जइनिच्या" "विक्रम" राजाच्या विजयाप्रित्यर्थ "विक्रम संवत्" म्हणून प्रसिध्द झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे.

> काहि इतिहासकारांच्या मते "मालव संवत" हा सुरूवातीपासुन "विक्रम(विजयाचा) संवत्" होता.

> काहि इतिहासकारांच्या मते "विक्रम संवत्" चा संबंध "मालवगण" संवत्‌शी नाहि. परकिय शकांचा राजा "ओझोझ" ने ई.स.पु. 58 ला एक "शक" सुरू केले ते विक्रमाच्या विजयानंतर ते "विक्रम संवत्" म्हणून प्रचलीत झाले.

> काहि इतिहासकारांच्या मते ई.स.पु. 58 ला "विक्रम" अगोदरपासुन राज्य करत होता त्याने त्यानंतर "कुशाण-शकांवर" विजय मिळवीला म्हणून "विक्रम संवत्" सुरू केला त्याचा "मालवांशी" किंवा "ओझोझ" शी काहिहि संबंध नाही.

> यापैकि कोणत्याही मतास कोणताही ठोस पुरावा अजुनही उपलब्ध नाहि.

> "शालिवाहन शक (संवत्)" याबाबतीतही अशी मतभिन्नता आहे.

> काहिंच्या मते कुशाणांचा पहिला राजा "क्याड्फोइसेस" ने इ.स. 78 मध्ये हा शक चालु केला तर..

> काहिंच्या मते ई.स. 78 मध्ये "क्याड्फोइसेस" नाही तर त्याचा पुढचा राजा "कनिष्क" याने त्याच्या राज्यरोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शक चालु केले व पुढे "पैठणच्या शालिवाहकांनी" परकिय शकांवर विजय मिळवून त्याला "शालिवाहन शक" हे नाव दिले.

> काहिंच्या मते ई.स. 78 च आसपास शलिवाहनातील "गाथा शप्तशती" लिहीणाऱ्या "हाल" नावाच्या राजाने स्वत: गुजरात, सौराष्ट्रातील परकिय शकांवर विजय मिळविला त्याचे स्मारक म्हणून "शालिवाहल शक" सुरू केले.

> यातील सर्व मते विचारात घेतल्यावर एक बाब समोर येते ती म्हणजे कोणतेही मत ग्राह्य धरायचे तर ते वादादित ठरू शकते.

> यातुन एक मत स्पष्ट जाणवते की, "विक्रम संवत् (संवस्तर)" असो किंवा "शालिवाहन संवत्  (संवस्तर)" हे सर्व भारतीयांनी रणांगणात "शक-कुशाण" या "परकिय व क्रुर आक्रमकांवर" मिळविलल्या विजयाचे द्योतक आहे.

खास सुचना :- आपल्या मराठि कॅलेंडरमध्ये "शालिवाहन शक" असा शब्द असल्यास "शालिवाहन संवत्" किंवा "शालिवाहन संवस्तर" असा वाचावा कारण "शक" हा शब्द परकिय आक्रमकांसाठी वापरला गेला आहे.


माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वा. सावरकर

Tuesday, 16 December 2014

एक अतूट नाते :- शिवप्रेमींचे


तुम्ही एखादे चांगले कार्य करता तेव्हा तुमच्या सोबत येणारी माणसे हि चांगलीच असतात, त्यांचा तुमच्यासोबत येण्याचा उद्देशहि स्वच्छ असतो. याचाच प्रत्यय आज "दुर्गवीर" च्या शस्त्र प्रदर्शन व गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनात आला. "दुर्गवीर" च्या कार्याने प्रभावित होऊन पंजाब बॉर्डर वरून शिर्डी आणि शिर्डी वरून मुंबई असा प्रवास करून आलेल्या "सोमनाथ ढवळे" यांची भेट घेताना जाणीव झाली आम्ही काय कमावलाय. फेसबुक वरून माझे दुर्गवीर श्रमदानाचे फोटो पाहून दुर्गवीर बद्दल त्यांना आदर निर्माण झाला आणि त्यांच्या १० दिवसाच्या सुट्टीचा पहिला दिवस दुर्गवीरांसोबत घालविण्यासाठी "सोमनाथ ढवळे" मुंबईत हजर झाले. मुंबईतील काहीही माहिती नाही. दादर ला उतरल्यावर त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणी सांगितले काळाचौकी ३ ठिकाणी आहे परंतु शिवकृपेने एका व्यक्तीने त्यांना Taxi करून प्रदर्शनाच्या जागी आणून सोडले.
ह्या घटनेतून एक मात्र नक्की माझी आणि त्यांची ओळख,व "त्या "अनोळखी व्यक्तीने" त्यांना मुंबईत मदत करण, आणि दुर्गवीरांची भेट हे सर्व विधिलिखित होत. या सर्व भेटी शिवरायांनीच घडवून आणल्या. आज जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलो असू पण गतजन्मी नक्कीच आम्ही सर्व मावळे होतो.

मी सुट्टी मिळाली कि दुर्गवीर सोबत जातो त्यामुळे माझे नातेवाईक, मित्र मंडळी कदाचित दुखावत असतील कारण मी त्यांच्याकडे जात नाही, त्यांना वेळ देत नाही. परंतु दुर्गवीर च्या कार्यामुळे "सोमनाथ ढवळे" यांच्या सारख्या शिवप्रेमींशी जे अतूट नात निर्माण होत आहे आणि समाजात आम्हा दुर्गवीरां बद्दल जो आदर आहे तो पाहून त्यांचा राग थोडा तरी कमी होत असेल.

दुर्गवीर च्या कार्यामुळे मला लिखाण करायची प्रेरणा मिळाली आणि
माझे अंतरंग हे पेज http://dhiruloke.blogspot.in/ ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करायला लागलो आणि त्यामुळे आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील, देश आणि देशाबाहेरील वाचक निर्माण झाले. हे वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा प्रत्येक वेळी मला "पुरस्कार" मिळत असतो आणि हा "पुरस्कार" मला लिखाणासाठी आणि दुर्गवीर च्या गडसंवर्धनाच्या कार्यासाठी नवीन प्रेरणा देत असतो.

ह्या प्रसंगातून आनंद तर मिळतो आणि सोबत जाणीव होते जबाबदारीची या कार्यातून ज्या ओळखी झाल्या आहेत त्या जपणे आणि हे कार्य निरंतर चालू ठेवणे हे माझे आणि प्रत्येक दुर्गवीराचे हे कर्तव्य आहे.
जय शिवराय !!

Monday, 15 December 2014

"शिवराय" म्हणजेच "गडकिल्ले" आणि "गडकिल्ले" म्हणजेच "स्वराज्य" !!!काय। करतोय "हा" "दादा" !! असाच प्रश्न या मुलाला पडला !! वेळ होती दुर्गवीर च्या गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनाची..... या मुलाला "गडसंवर्धन" हा शब्द सुद्धा निट बोलता येत नव्हता त्याला जेव्हा विचारलं हे शिवाजी महाराज कोण होते? आणि हे गड-किल्ले म्हणजे काय रे!! तेव्हा त्याचे उत्तर मोठमोठ्यांना अव्वाक करुन जाते!! "शिवाजी महाराज हे मोठे राजे होते आणि त्यांनी तलवारीने मोठमोठ्या लढाया केल्या!! आणि या किल्ल्यांवर ते राहिले".....

शिवरायांनी स्वतासाठि राजवाडे नाहि बांधले तर आयुष्यभर या गड-किल्ल्यांच्या साथीने  ते  लढले... जे या निरागस मुलाला समजलं ते आपल्यालाहि समजायला हवं... शिवराय म्हणजेच गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हणजेच आपले स्वराज्य !!!
जय शिवराय
छायचित्र सौजन्य "दुर्गवीर सचिन रेडेकर"
www.durgveer.com

Saturday, 6 December 2014

"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"


"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"
"अलेक्झांडर" हा ग्रिकांचा महान राजा ज्याला त्याच्या पित्याकडुन (राजा फिलिप) 'प्रचंड पैसा व सैन्य बळ' मिळाले त्याच्या बळावर तो ग्रिक मधील सर्व छोट्या मोठ्या गणराज्यांना गिळंकृत करत आला. परंतु "हिन्दुस्तानी" जनतेने त्याच "स्वामित्व" कधीच मानले नाहि उलट तो जो प्रदेश जिंकुन पुढे जायचा तिथली जनता त्याची पाठ फिरताच दंड ठोकुन उभे राहायचे जेव्हा त्याला जाणवलं आपला येथे निभाव लागण अशक्य आहे तेव्हा त्याने परतायचा निर्णय घेतला परंतु जाता जाता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसु देत नव्हती व तो सैन्याच्या मनाविरुध्द लढाया लढत होता...परंतु पाश्चात्य लेखक अलेक्झांडर च वर्णन करताना त्याला "जिंकायला प्रदेश न उरल्याने हताश होऊन परत गेला" असं करतात हे खुपच अतिशयोक्तिपूर्ण आहे.

दुस-या बाजुला "चंद्रगुप्त राजा" जो अलेक्झांडर च्या स्वारि अगोदरपासुन "अखंड हिंदुस्थान" चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठि धडपडत होता त्याचा इतिहास जाणुनबुजून दडपला जातो. जेव्हा "चंद्रगुप्त" "अखंड हिंदुस्थान" स्वप्न पाहत होता त्याच्याकडचे सैन्यबळ होते "शुन्य" आणि जेव्हा "अखंड भारताचे राज्य" उभारले तेव्हा ते होते तब्बल :-
>सहा लक्ष पायदळ
>तीन सहस्त्र घोडेस्वार
>दोन सहस्त्र लढाउ हत्ती
> चार सहस्त्र रथ
स्वताच्या पित्याने राज्यातुन बाहेर काढले होते…. पाठिशी फक्त एकच आधार होता "चाणक्य"... अलेक्झांडरच्या मृत्युनंतर अवघ्या दोन वर्षात "राजा चंद्रगुप्तने" उभारलेल्या अखंड "भारतवर्षावर" आक्रमण करण्याची हिम्मत पुढिल हजारो वर्ष कुणी केली नाहि... याउलट "अलेक्झांडर" च्या मृत्युनंतर "हिंदुस्थानावर" आक्रमण करायला आलेले "अलेक्झांडर" वारसदार "होत - नव्हत" राज्यही गमावून बसले.  

तसे या महान योद्ध्यांची तुलना करणे योग्य नाही. परंतु एक गोष्ट मात्र नमूद करावीशी वाटते की सिकंदर नक्किच एक चांगला योध्दा होता पण तो जगज्जेता नव्हता याउलट दासि चा पुत्र म्हणुन हिनवला गेलेला चंद्रगुप्त व त्याचा गुरु चाणक्य किती दुरदर्षी व महत्वाकांक्षी होता हे मात्र खर

माहिती स्त्रोत:- सहा सोनेरी पाने -स्वातंत्र्यवीर सावरकर

Wednesday, 3 December 2014

"जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"


कित्येक लोक आम्हा "दुर्गवीरांना" विचारतात हे एवढ हात-पाय तोडून, एवढी किल्ल्यांवर कामं करता… काय मिळत तुम्हाला हे सर्व करून….… या प्रश्नाच उत्तर एकच आहे, "आम्हाला तेच मिळत जे बाजीप्रभूंना घोडखिंडीत प्राण देऊन मिळाले" "आम्हाला तेच मिळत जे कोंढाणा जिंकताना हौतात्म्य पत्करणा-या तानाजी मालुसरेंना मिळाले" "आम्हाला तेच मिळत महाराजांच्या एक शब्दावर शरीराची चाळण होइपर्यत लढणा-या प्रतापराव(कुड्तोजी) गुजर यांना मिळाल…

आज आम्हाला शंभरी पार करणारे आमचे पूर्वज कदाचित आठवणार नाहीत पण ऐन पन्नाशीत देवाज्ञा घेणारे शिवराय आणि ऐन तिशीत बलिदान देणारे शंभूराजे आपण विसरणे अशक्य आहे. म्हणून जन्माला येउन किड्या मुंग्याच आयुष्य जगणं आम्हाला मान्य नाही म्हणूनच आम्ही दुर्गवीर या कार्यसाठी झटतोय…… तुम्हीसुद्धा "जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"
जय शिवराय
www.durgveer.com
दुर्गवीर चा धीरु

Sunday, 30 November 2014

झोकात पुनरागमन:- ३०/११/२०१४ :- सुरगड श्रमदान मोहीम


"झोकात पुनरागमन" अगदी असच वर्णन करायच दुर्गवीर च्या आजच्या "सुरगड श्रमदान मोहीम ३०/११/२०१४" च्या मोहिमेचे. "महिन्यातील १ रविवार १ श्रमदान" पण अगदी झोकात… प्रदीप पाटलांचे झोकात पुनरागमन, नवीन दुर्गवीरांचे झोकात आगमन, प्रज्वल पाटील आणि पनवेलच्या दुर्गवीरांचे दणकट आगमन, तुषार चित्ते आणि अनिकेत कस्तुरे यांचे झोकात आगमन या आणि अनेक गोष्टीनी परिपूर्ण अशी आजची दुर्गवीर ची मोहीम…तबल २५-३० दगडी पाय-या बांधून काढल्या त्याही त्यावर "Disco Dance" केला तरी तुटणार नाहीत अश्या. प्रदीप पाटील बंधूच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पाय-या अक्षरशा बांधून काढल्या फक्त सिमेंट वापरल नाही इतकच….

अगोदरच मी लेट झालो त्यामुळे मला दिवा- रोहा ट्रेन चुकली तरीही प्रज्वल बंधू आणि त्यांच्या पनवेल मित्रमंडळ परिवाराने "मोठ्या मनाने" "माझ छोटस" शरीर Adjust करून घेतलं(कोंबून म्हटलं तरी चालेल…. ) कंपनी जी गाडी ४ माणसांसाठी बनवली त्यात आम्ही ७ जण Adjust झालो होतो. रात्री मी डबा घेऊन येणार म्हणून अर्धपोटी आणि क्वचित उपाशी झोपी गेलेल्या दुर्गवीरांचे शाप अंगावर झेलत मी रात्री झोपी गेलो. सकाळी सर्व काही आटोपल्यावर श्रादानास सुरुवात केली. तेव्हा संतोष दादांनी वेगवेगळ्या टीम मध्ये विभागणी केली आमच्या टीम मध्ये "पुनरागमन" करणारे प्रदीप पाटील, अजित दादा, आतिश शिर्के (लोणावळा), राज दादा आणि मी असल्याने फार चर्चा न होता आमचे काम चालू होते. प्रदीप दादांनी "दगडाकडे" बोट दाखवावे "मी" आणि राज दादांनी तो "दगड" आणून द्यावा. प्रदीप पाटलांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पाय-या अक्षरशा बांधून काढल्या. अजित दादांच्या दूरदृष्टीने या पाय-यांचे मजबुतीकरण होत होते. दुस-या तुकडीत प्रज्वल पाटील आणि त्यांची पनवेल टीम तुटून पडली होती. तिस-या तुकडीत सचिन जगताप आशिष आणि इतर दुर्गवीर होते. आकाश खोराटे एकटेच "कोयत्याने" झाडींची "खांडोळी" करत होते. अगदी मोजक्या वेळात ठरलेल काम पार पडत होत. प्रत्येकजन आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होता त्यामुळेच कदाचित ठरलेली कामे वेळेत पूर्ण होत होती.

आजच्या मोहिमेत सर्वानीच अगदी झोकात पुनरागमन केल…. पण इंजिनिअर डोक प्रशांत वाघरे, अष्टपैलू नितीन पाटोळे आणि बाकी दुर्गवीराना "मिस"का काय म्हणतात ते केल…. तेव्हा पुढच्या मोहिमेला नक्की या नाहीतर रोज रोज तुम्हाला "मिस" करायची इच्छा नाहीय आमची….

Saturday, 29 November 2014

विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४ :- Timeless Management :- श्री निनाद बेडेकर


विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४

आजचा विषय "Timeless Management" वक्ते होते श्री निनाद बेडेकर... खर तर हा विषय इतका अफाट आहे की १-२ तासात हा विषय समजावुन सांगता येणार नाही. या व्याख्यानमालेतील दुग्ध-शर्करा योग म्हणजे शिवरायांच्या Management ची तत्वे आणि त्यात श्री निनाद बेडेकर यांच वक्तृत्व. ३५० वर्षापूर्वी शिवरायांनी राज्यकारभार करताना जी तत्व वापरली तीच तत्व आता आचरणात आणता येतील आणि अजून ३५० वर्षानंतरहि हिच तत्वे आचरणात आणता येतील फक्त त्याची माध्यमे बदलतील. अफजल खान वध, शाहिस्तेखान स्वारी,पन्हाळ्याहुन सुटका,आग्र्याहुन सुटका,पुरंदरचा तह, या आणि अनेक घटना, किंबहुना शिवरायांचे संपूर्ण आयुष्यच Management च्या विविध तत्वांप्रमाणे संपूर्ण जगाला आज आणि यापुढिल हजारों लाखो वर्षे मार्गदर्शन करीत राहिल.

विवेकानंद व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन व नियोजन करणारया विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु

Thursday, 27 November 2014

विवेकानंद व्याख्यानमाला - २०१४


माझ थोडसं Timing चुकल म्हणून मी श्री नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेउ शकलो नाही याची सल कायम मनात राहील पण त्यांचे विचार जगणा-या श्री. शरद पोंक्षे यांना आज जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली हे सुख मला आयुष्यभर पुरेस आहे…

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ तर्फे आज सावरकरांचे विचार या विषयावर श्री शरद पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकले. आज ख-या अर्थाने समजलं सावरकर हे लोकांना "समजायला" "काही वर्ष" जातात आणि जेव्हा ते "समजतात" तेव्हा "ज्याला ते समजतात" ते "चांगलेच समजून जातात" कि आपल्या देशाची "गुलाबाने" काय आणि कशी वाट लावली (हे "गुलाब" म्हणजे काय हे शरद पोंक्षेच आजच व्याख्यान ऐकना-यांना चांगलच माहित आहे)

आजवर मी शरद पोंक्षे ना अभिनेता म्हणून ओळखत होतो पण कणखर, ज्वलंत, परखड वक्ता हि नवीन ओळख मी आज अनुभवली. खर तर मी सावरकर आणि नथुराम गोडसे यांची पुस्तके घेऊन गेलेलो ज्यावर मला "वक्ते शरद पोंक्षे" यांची स्वाक्षरी हवी होती.पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाल नाही … बघू पुन्हा कधी योग येतो.  (https://www.facebook.com/sharad.ponkshe.9)

या व्याख्यानमालेच आयोजन करणा-या श्री अभिजित घाडी व उत्कर्ष विद्यार्थी मंडळ च्या कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार…। खर मी अभिजित घाडी यांना फेसबुक वरून २०१० पासून ओळखतो पण ते इतक्या चांगल्या संस्थेत कार्यरत असतील अस वाटलं नव्हत. अभिजित दादा तुमच्या कार्याला प्रणाम !! आणि आम्हाला सुद्धा तुमचे सभासद बनवून या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी हि विनंती
पुढील व्याख्यान :-
27 नोव्हेंबर 2014
निळू दामले
विषय: आरक्षण

स्थळ : सदगुरू भालचंद्र महाराज किंडागण (लालमैदान),
गणेश टॉकीजच्या मागे ,
लालबाग, मुंबई - 400 012.

जय शिवराय

Wednesday, 22 October 2014

शिवमय दिवाळी पहाट - २००१४शिवमय दिवाळी पहाट - २००१४

कोण म्हणत ४ चांगली माणस एकत्र येत नाहीत… त्याला जाउन सांगा कोणीतरी !! ४ चांगली माणस एकत्र येतात जर त्यांच धेय्य आणि हेतू स्वच्छ असेल तर ते निस्वार्थीपणे एकत्र येतात.

काल रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान अजित दादांचा फोन आला उद्या सकाळी बाजीप्रभू चौक डोंबिवली (पूर्व) येथे आपल्या जायचंय. तिथे आपल्या छोटासा "दीपोत्सव" साजरा करायचा आहे. पण इतक्या उशिरा पोस्ट टाकली तर कोण येईल का?? मुख्य म्हणजे कोणी ती पोस्ट वाचेल का? हा प्रश्न उभा राहिला पण नंतर त्या प्रश्नाच उत्तर शोधण्याच्या फंदात न पडता पहिली फेसबुक ला पोस्ट टाकली नंतर मिळेल ते सामान bag मध्ये भरून घेतले. आता मुख्य मुद्दा होता सकाळी ४ वाजता उठायचा. मी एकदा झोपलो को "कुंभकर्ण" पण "फिका" पडेल माझ्या समोर म्हणून फारशी रिस्क न घेता रात्रभर जाग राहायचं ठरवलं. सकाळी अजित दादांशी फोना-फोनी करून निघालो थेट भेट झाली ती बाजी प्रभू चौकात तिथे अजित दादांनी अगोदरच कामाला सुरुवात केली होती. मी हि त्यांच्या सोबत सुरुवात केली तोवर हळू हळू एक एकजण जमा होऊ लागले जो तो मिळेल ते काम करत होता. कोणी कोणाला फारसं ओळखत नव्हत पण सर्व एकत्र येउन काम करत होते. मध्येच "अनिकेत कस्तुरे" बंधू आपल्या "शॉट गन" ने फायरिंग करत होते.(Camera हो) . थोड्या वेळात मानसी पाठक (सह्याद्री प्रतिष्ठान) आपल्या कन्येसोबत तिथे आल्या त्यांनी रांगोळी ची मोहीम हाती घेतली. काही वेळातच "दुर्गसखा" चे चेतन रमेश राजगुरू (कसलं भारदस्त नाव आहे राव) हे सुद्धा आमच्यात सामील झाले. कुणी साफसफाई करत होता तर कुणी पणत्या च्या वाती बनवीत होता तर कुणी त्या योग्य जागी लावून पेटवत होता. प्रत्येकजण स्वयंस्फुर्तीने काम करीत होत. कुणी कुणाला सांगत नव्हत कि "तू हे काम कर" प्रत्येकाला माहित होत मला काय करायचं ते.……

सर्व पणत्या पेटवून झाल्यावर मानसी पाठक यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर "चेतन रमेश राजगुरू" यांच्या पहाडी आवाजात "बिरुदावली" झाली. त्यांच्या आवाजात इतकी जरब होती कि माझ्या अंगावर काटा येत होता. अस वाटत होत मी कुठल्यातरी लढाईवर चाललोय. बिरुदावली झाली मग "फोटूसेशन" करून आम्ही आपापल्या वाटेने निघणार होतो. मानसी ताईंनी निघाल्यावर आमची सर्वाची ओळख परेड व छोटेखानी चर्चा सत्र झाल.

बोलताना (मी एक शब्द पण बोललो नाही हे गोष्ट वेगळी) एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे प्रत्येकाला या शिवकार्यात सहभाग घ्यायचाय पण योग्य मार्ग सापडत नाहीय. त्यांना दुर्गवीर च्या मोहिमांमध्ये सहभागी व्हायचंय पण योग्य वेळी त्यांच्यापर्यंत ती मोहीम पोहोचत नाही किंवा ते दुर्गवीर पर्यंत पोहोचत नाहीत.

आजच्या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना माझ एक "आवाहन" आहे तुम्ही जरी प्रत्येक वेळी आमच्या सारख सुरगड, मानगड, भीमगड अश्या सलग मोहिमा करू शकत नसाल पण असे काही उपक्रम जे आपल्याला आपल्या डोंबिवलीत राहून करता येतील जशी कि हि दिवाळी पहाट, गुढीपाडवा, एखाद्या योध्यांची जयंती वगैरे हे आणि अनेक धार्मिक / सांस्कृतिक सणांच औचित्य साधून आपण शिवप्रेमी म्हणून एकत्र येउन असे काही कार्यक्रम आयोजित करू कि लोकांमध्ये / शालेय -महाविद्यालयीन मुलां-मुलींमध्ये आपले गड-किल्ले, इतिहास, संस्कृती याबद्दल जनजागृती होईल.

एक शिवप्रेमी म्हणून मी आशा करतो या आणि अश्या अनेक शिवप्रेमींच्या साथीने आपण आपला इतिहास वाचवू शकतो व नवा इतिहास घडवू शकतो.


जय शिवराय

Tuesday, 21 October 2014

दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !!


राजमुद्रेसम झळकू दे,
भविष्य तुमचे !!
दिव्यांसम उजळू दे,
आयुष्य तुमचे !!

दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !!!

Wednesday, 8 October 2014

Control & Smile


काय गंम्मत आहे ना !!!
जेव्हा माझा राग
"Control" मध्ये असतो….
तेव्हा माझ्या "विरोधकांचा"
राग "Out of Control" असतो…

Saturday, 27 September 2014

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….अजित दादा आपलं रक्ताच अस नात काहीच नाही पण गतजन्मीच नात नक्कीच असणार…. ह्या अभेद्य अफाट सह्याद्रीच्या काताळांशी भिडत त्यांच्याशी अतूट नात निर्माण करायला लावणा-या या आमच्या अजित दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….

समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर कसं द्याव हे अजित दादांकडून शिकावं….
कट्टरता म्हणजे काय ते अजित दादांकडून शिकावं…. (मग ती हिंदुत्व आणि शिवसेनेबाबत असो कि दुर्गवीर च्या गड्संवर्धनाबाबत…. )

मी "धीरज विजय लोके" वरून "दुर्गवीर चा धीरु" असा नामांतरित (कार्यांतरित) झालो त्यात सर्वात महत्वाचा वाटा दादा तुमचा आहे…

दादा आपण दुर्गवीर म्हणून एकत्र आलो हा काही योगायोग नाही ती "नियती" होती….
पण आपण कायम "दुर्गवीर" म्हणून एकत्र राहू हा माझा "शब्द" आहे….

पुन्हा एकदा जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….
जय शिवराय !!
जय हिंद !!
 

Thursday, 25 September 2014

सलाम स्त्री शक्तीला…


सलाम स्त्री शक्तीला…
"स्त्री" नवरात्रीत "देवी" म्हणून पूजले जाते पण दुस-या बाजूला "काही ठिकाणी" स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. मी एक स्त्री आहे म्हणून मी "हे करू शकत नाही" हे सांगायचे दिवस गेलेत आता…. आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते इतकी ती स्वावलंबी आहे. काही ठिकाणी अजूनही जुन्या विचारांची धारणा असल्याने स्त्री ला कमी लेखले जाते. त्याच्यावर प्रहार करणारा हा Video नक्की पहा. आणि शेअर करा…
सलाम स्त्री शक्तीला
Video Right Reserve @ Official: Chulein Aasman - Salim-Sulaiman & Farhan Akhtar. MARD - HWGO Initiative. 2014

Wednesday, 24 September 2014

विजय....माझा स्पर्धक "हरला पाहिजे"
यापेक्षा
मी "जिंकलो पाहिजे" हा विचार केला
तर "विजय" तुमचाच आहे…

Sunday, 21 September 2014

मी एक "सामान्य नागरिक"मी कोणी कट्टर शिवसैनिक नाही कि
"मोदी समर्थक" नाही आहे.
तुम्ही "युती करा अगर करू नका"…
"निवडणुकीपूर्वी एकत्र या किंवा निवडणुकीनंतर"
पण एकच करा या "भ्रष्ट काँग्रेस - राष्ट्रवादीला"
पुन्हा महाराष्ट्राची सत्ता देऊन नका…
जय शिवराय….
मी एक "सामान्य नागरिक" 

Saturday, 20 September 2014

"विश्वास" = "प्रेम"कुणाच्या "चांगल्यासाठी" 
"खोट" बोललेलं चालतं……
पण,
हा "नियम" "प्रेमात" लागू होत नसतो…
कारण,
प्रेमात "चांगल" "वाईट"
अस काही नसतं….
असतो तो फक्त
"विश्वास"

Saturday, 13 September 2014

Facebook Attitude...


आयुष्यात एवढे "मोठे" व्हा की,
ज्यांनी तुमची "Friend Request" नाकारली,
ते स्वत:हुन तुम्हाला "Friend Request" पाठवतील…

Wednesday, 10 September 2014

जय जवान…
जय जवान… 
भारतीय जवान!! आपल्या हिंदुस्थानची शान…. युद्धभूमीवर प्रत्येक शत्रूशी प्राणपणाने लढणारे आपले जवान. आज काश्मीर मधील पूर परिस्थितीत पुरग्रस्थाना वाचविण्यासाठी जात, धर्म याच्या पलीकडे जाउन जे 
मदतकार्य सुरु आहे ते विलक्षण आहे. ज्या काश्मिरी जनतेने नेहमी आपल्या जवानांची अवहेलना केली 
त्यांच्याच मदतीला हे जवान आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. एका बाजूला आपले जवान हे मदत कार्य 
करीत असताना दुसरीकडे "अतिरेकी" कारवाया चालूच आहेत. श्रीनगर येथे तब्बल ४ अतिरेक्यांना भारतीय 
जवानांनी कंठस्थान घातले


या दोन्ही गोष्टींचा नीट विचार केला तर असे आढळते कि आपली "सहिष्णुता" हि "षंढपणा" समजून "आपले 
शत्रू" (मानवतेचे शत्रू) आपल्याला नेहमी लक्ष्य करतात. पण आपले जवान नेहमीच याचा बिमोड करतात.
आजवर प्रत्येक संकटाला धीराने तोंड देऊन आपला "हिंदुस्थान" सुरक्षित ठेवणा-या जवानांना माझा सलाम …

Friday, 5 September 2014

सुसंवादतुम्ही कसं वागावं,
हे जसं तुम्ही ठरविता. 
तसच दुस-यांनी कसं वागाव
हे त्यांना ठरवू द्या….
सुसंवाद नक्की होईल

दुर्गवीर धीरु

Saturday, 30 August 2014

ताकद....तुमच्यात इतकी ताकद असू द्या कि,
जे आजवर हात धुवून तुमच्या मागे लागले होते
ते यापुढे तुमच्या मागे पुढे फिरतील…

Monday, 18 August 2014

जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…


जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…

आज दादर च्या शिवाजी नाट्य मंदिरात नितीन पाटोळे, प्रशांत बंधूंच्या कृपेने एक नाटक पाहिलं "जस्ट हलकं फुलकं" निर्माती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शन तर्फे ऋषिकेश परांजपे लिखीत, गणेश पंडित दिग्दर्शित हे नाटक त्यात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अप्रतिम जोडीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला अनिता दाते यांची अवखळ साथ….

नाटकाची सुरुवात झाली तेव्हा अंदाज आलाच होता कि नाटक जातिव्यवस्थेवर टीका करणार आहे. ("जातीव्यवस्थेवर" हा !! "जातीवर" नाही !!.). डॉक्टर चा प्रसंग पाहून नाटक थोड वेगळ वळण घेतय कि काय असं वाटू लागल. पण नंतर मात्र नाटकाने जी काही पकड घेतली ती शेवटपर्यंत सोडली नाही. तिन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय देत अगदी हसत हसत नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. तिन्ही कलाकारांसोबत एका पडद्यामागच्या कलाकाराचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे वेशभूषाकार अगदी क्षणात जादूची कांडी फिरवावी तसे हे कलाकार आपला वेश बदलत होते. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी तर फु बाई फु या मालिकेतून लोकांना अक्षरशा वेड केलय आणि या नाटकातूनहि त्यांनी तेच केल.

सागर कारंडे हे तर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. अगदी सहजतेन पोट दुखेपर्यंत लोकांना हसायला लावणे यात सागर कारंडे यांचा हातखंडा आहे. सागर कारंडे जेव्हा बोलतात तेव्हा विनोद होतो, जेव्हा चालतात तेव्हा विनोद होतो. जेव्हा न बोलता गप्प बसतात तेव्हाही विनोद होतो.

भारत गणेशपुरे हे तर कोणत्याही परीस्थितिचा विनोद करू शकतात. म्हणजे मध्येच साउंड सिस्टम चा प्रोब्लेम झाला त्यावरहि ते विनोद करून टाळ्या मिळवत होते. स्टेज वरून नाट्यरसिकांशी मिळून मिसळून आपला अभिनय करणं हे हि नाटकाची खासियत आहे, ती मजा चित्रपटात नाही. आणि हिच मजा भारत गणेशपुरे घेत होते आणि नाट्यरसिकांना देत होते.

अनिता दाते ह्यांचा अभिनय तर अगदी अवखळ होताच पण त्यांच प्रत्येकभूमिकेसाठीच वेशभूषा करणं आणि लीलया ते सांभाळण याच कौतुक वाटत. सलाम तुमच्या मेहनतीला…. अगदी शालेय तरुणी असो वा वृद्ध स्त्री प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देत होत्या

थोडक्यात काय तर अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने "जातीव्यवस्थेला"( "जातीव्यवस्थेला""जातीला" नाही) एक सणसणीत चपराक या नाटकाच्या निमित्ताने मिळाली. प्रत्येक नाट्यरसिकाने जाउन पहावे असे नाटक होते.

"जस्ट हलकं फुलकं" च्या टीम ला माझ्या करून खूप सा-या शुभेच्छा
जय शिवराय !!

"जस्ट हलकं फुलकं" च्या सबंधित काही पेज ची लिक :-

https://www.facebook.com/pages/Just-Halka-Fulka/729945237043544

https://www.facebook.com/bhadrakaliproductions

https://www.facebook.com/anitaforfans

https://twitter.com/anitadate31

https://www.facebook.com/bharat.ganeshpure


Saturday, 16 August 2014

खचून जाऊ नका - Be Braveतुम्हाला सतत "संकटांना"
सामोर जाव लागतंय….
खचून जाऊ नका !!!
लक्षात ठेवा…. 
"हुशार विद्यार्थीच" 

Friday, 15 August 2014

चांगल कोण?


चांगल्याशी "चांगल"
वाईटाशी "वाईट" 
वागायचं म्हटलं तर…. 
"चांगल कोण?"
हा विचार करावा लागतो…

Monday, 11 August 2014

होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"
होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"  

जिथे "शिवप्रेम" "मनात" नाही,
"रक्तात" भिनवल जात....  .

जिथे "संकटाला" "पाठीवर" नाही,
"छाताडावर" झेललं जात....

जिथे "गडांना" वास्तूपेक्षा, 
"मंदिर" मानलं जात....

जिथे "संस्कृतीला", 
"विकृतीपासून" जपल जात.....

जिथे "मनगटांना", 
"अजस्त्र काताळांशी" भिडवल जात.....

जिथे "बाहुंना" "शिवप्रेमाच",
"बळ" दिल जात....

जिथे हातांना "बडवीण्यापेक्षा", 
"घडविण्यासाठी" राबवील जात.....

जिथे फक्त "मनात" "संस्कार" नाही,
"संस्कारात" "मन रमविल" जात....
  
होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"

विश्वास..
पक्ष्याचा पंखावर असतो तो
मोराचा काळ्या ढगांवर असतो तो               वि

झाडांचा मुळांवर असतो तो
तान्ह्या बाळाचा आईवर असतो तो             श्वा
लंगड्याचा त्याच्या काठीवर असतो तो
डोळ्यांचा पापणीवर असतो तो                    
भक्ताचा देवावर असतो तो
कर्तृत्ववानाचा त्याच्या क्षमतेवर असतो तो 

Monday, 4 August 2014

सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक

सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक

महाराष्ट्र सदनात या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही असा फतवाच जाहीर केलाय महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलीक या महान व्यक्तीमत्वाने. हे तेच आहेत जे काही दिवसांपूर्वी चपाती प्रकरणात गाजत होते. अगोदर निकृष्ट जेवण देण्याचा आरोप त्यात पुन्हा हे धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकरण. काय तर म्हणे गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमावर खर्च करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही आहे. हे निवासी आयुक्त इतक बरळेपर्यंत महाराष्ट्र सदनातील सांस्कृतीक विभाग मूग गिळून गप्प का बसले आहे. या मलिक महाशयांनी गेल्या वर्षी पण गणेश उत्सवास विरोध केला होता परंतु कनिष्ट अधिकारी नंदिनी आव्हाडे यांनी कडाडून विरोध करून नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा केला. अशी महाराष्ट्रद्वेशी / हिंदू द्वेशी भूमीका मांडताना लाज का वाटत नाही या महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या चमच्यांना. जर महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्या आम्ही धुमधड्याक्यात साजरा करू आमचा गणेशोत्सव तुम्ही फक्त इफ्तार पार्ट्या साजऱ्या करा. तसेही आणि काही दिवसातच या महाराष्ट्राची जनता तुमचे विसर्जन करणार आहे त्यामूळे काय भुंकायचे ते भुंकून घ्या

Saturday, 2 August 2014

"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"
मला एका व्यक्तीने विचारलं काय रे तू सतत…

"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर" 

चा विचार करत असतोस… मी त्याला म्हटलं…

तू कसा तुझ्या "घर" आणि "कुटुंब" यांचा विचार करतोस तसा मी माझ्या… 

"घर"(गड-किल्ले) आणू "कुटुंब" (दुर्गवीर) 

यांचा विचार करत असतो…  

Thursday, 31 July 2014

विरोधक = मरणारा मासा


तुमचे 
"विरोधक"
तुम्हाला 
"त्रास" 
देण्यासाठी 
"धडपडतायत"
काळजी करू नका…
"मरणारा मासा" 
नेहमी जास्त धडपडतो….

Monday, 28 July 2014

बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल….बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल….

सोबतचे छायचित्र पाहून अस वाटेल कि एखाद्या कैद्याला थर्ड डिग्री दिलीय पण तसं नाहीय हे छायचित्र आपल्या (आपल्याच) बेळगावातील मराठी बांधवाच आहे… काल कर्नाटक पोलिसांनी "येळ्ळुर" गावातील निशस्त्र मराठी बांधवाना मारहाण केली. कारण फक्त इतकच कि या गावक-यांनी एक बोर्ड लावला त्यावर लिहील होत "महाराष्ट्र राज्य येळ्ळुर". 

बेळगाव सीमा वाद गेली ५० वर्षाहून अधिक काळ धुमसतोय पण "तोडगा" मात्र शुन्य…. बेळगाव मधील कित्येक पिढ्या मी मराठी असल्याचे ठासून सांगतायत पण त्याबदल्यात त्यांना काय मिळतंय महाराष्ट्र सरकारची परकेपणाची वागणूक आणि कर्नाटक सरकारच्या लाठ्या….

तिथले आपले मराठी बांधव मराठी साठी भगव्या च्या रक्षणासाठी अक्षरश: हौताम्य पत्करत आहेत. देशातील असे एकमेव राज्य आहे जिथे सरकारी इमारतीवर तिरंग्या सोबत भगवा अभिमानाने फडकवला जातो. २००५ साली साली बेळगाव महाराष्ट्रात यावे असा ठराव करण्यात आली त्याचा राग म्हणून कर्नाटक सरकारने महापालिकाच बरखास्त केली.

बघा हे आपल्या मराठी बांधवांची हि अवस्था पाहून स्वताचीच आणि आपल्या नाकर्त्या सरकारची लाज वाटते का?

Wednesday, 23 July 2014

आयुष्य..."तांदळातील" आणि "आयुष्यातील" 
"खडे"
बाजूला करताना
"किती" 
कमी होतात 
याचा विचार करू नका
"जे" 
शिल्लक राहतात 
त्यांना सांभाळा……

Wednesday, 16 July 2014

संताप………….


संताप………….

आजवर दुर्गवीर सोबतच्या प्रत्येक मोहिमेत चांगलेच अनुभव आले. प्रत्येक गडदर्शन मोहिमेनंतर मन बहरून जायचं… निसर्गाचा आणि त्या काळातील आपल्या राजांच्या बौद्धिक क्षमतेचा हेवा वाटायचा. पण आजची विसापूर आणि लोहगड ची मोहीम अक्षरशा संताप देऊन गेली.…. एक वेळ अस वाटल बस झाल ते करिअर आणि कुटुंबाची काळजी करणं… सोडून सगळ सरळ तलवार हातात घ्यावी आणि एकेकाला कापून काढावा……

आम्ही दुर्गवीर सकाळची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून लोणावळा व तिथून मरोळ येथे पोचलो तिथून चालत विसापूर च्या पायथ्याशी पोचलो तेव्हा लोहगड च्या दिशेने जाणा-या गाड्या दिसल्या पण त्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी टवाळ मुल (मुल कसली कार्टी) दिसली. डोक्यात संतापाची ठिणगी पडली. गावक-याना या बाबतीत विचारल तर "आम्ही काय करणार??" "आम्ही विचारल तर दम-दाटी करतात??" अशी मुळमुळीत उत्तर मिळाली. तो राग तसाच डोक्यात ठेवून आम्ही विसापूर ची चढाई सुरु केली. काही ओळखीचे दुर्गप्रेमी भेटले त्यांची भेट घेऊन गडाच्या माथ्यावर पोचलो तर तिथे पण हेच. कुठे जोडप आडोश्याला बसलय तर कुठे मुल-मुलि त्यात विवाहित जोडपी हि सामील होती. मोठमोठ्याने गाणी (गाणी कसली बोंबाबोंबच करत होते)म्हणत पावसाचा आनंद घेत होती. नशीब आमच कि त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या नव्हत्या. अजित दादांनी त्यांना समजावचा प्रयत्न केला पण त्यात जास्त स्त्रियांचा भरणा असल्यामुळे आम्ही जास्त वाद घालू शकलो नाही. माझ्याही सहनशक्तीच्या पलीकडे सर्व असल्याने मी तिथून लांब जाउन उभा राहिलो. आपल्या गडांची होत असलेली विटम्बना पाहून भर पावसात रडायला येत होत आणि येणारे अश्रू त्या पावसाच्या पाण्यात विरून जात होते. तोच राग मनात ठेवत आम्ही पुढे निघालो. गर्द धुके आणि अधूनमधून मुसळधार पाउस झेलत आम्ही गडदर्शन केल आणि शेवटी बिरुदावली देत आम्ही पुन्हा गड उतरण्याच्या तयारीला लागलो. मुसळधार पाउस झेलत आम्ही गड उतरलो पण गडाच्या पायथ्याशी जे पाहिलं ते आम्ही झेलू शकलो नाही एका गाडीत मोठमोठ्यांनी DJ लावून मुल नाचत होते. ते अश्लील नाच-गाण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. त्यात मराठी मुला-मुलींचा भरणा जास्त होता. आम्ही पण हतबल झालो अजून तरी काय करणार "आपलेच दात आणि आपलेच ओठ" अशी अवघडलेली परिस्थिती झाली होती तरी मी त्या गाडीच्या नंबर प्लेट चा फोटो काढून घ्यावा म्हणून पुढे गेलो तर काचा गाडीच्या आता मला "भलतेच दृश्य" दिसले. ती मुल दारू पिऊन धिंगाणा करीत होती पण त्या "टवाळ्या" पोरी काय XXXX पिउन आलेल्या का? या पोरींचे आईबाप सोडतात कसे या पोरींना या अश्या अश्या "नालायक" मुलांबरोबर या पिकनिक ला जातात नको ते "अश्लील चाळे" करतात यांना लाजा कश्या वाटत नाहीत…. "स्त्री" या निसर्गाचा अद्भुत अविष्कार………. एक स्त्री प्रत्येक भूमिकेत जबाबदारीने वागते मग ती जबाबदारी "मुलीची" असो वा "बहिणीची"… "बायकोची" असो वा "आईची"… आमची आई आणि बहिण यांनी तर त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली… मग या लाज सोडलेल्या मोजक्या "टवळ्या"च काय करायचं तुम्हीच सांगा…. बर यांच्या कानाखाली खेचावी तर स्त्री वर हात उचलल्याचा गुन्हा दाखल होतो… एखादी दुर्गवीर ची रणरागिणी सोबत असती तर झिंज्या उपटायला लावल्या असत्या आणि त्या बेवड्यांची मग फेस येईपर्यंत धुलाई केली असती…पण या पैकी काहीही शक्य न झाल्याने निघालो लोहगड च्या दिशेने….

लोहगड च्या पायथ्याशी असणा-या हॉटेल मध्ये जेवलो तर तिथे पण कहर एक प्लेट जेवण रु.१६०/- म्हणजे तिथे येणा-या प्रत्येकाची फसवणूक होतेच आहे. पुढे हि फसवणूक सहन न झाल्याने हॉटेल मालकांना थोडे ज्ञानामृत पाजून आम्ही लोहगड चढायला सुरुवात केली.गड चढताना जोडपी आणि काही अतिउत्साही तरुण यांची चाललेली फालतूगिरी आता सहनशक्ती च्या पलीकडे चालली होती. प्रत्येक दुर्गवीर शांतपणे चालत होता पण सर्वांच्या मनात आग धुमसत होती. फक्त त्याच्या भडका उडायचा बाकी होता. काही तरुण काळ्या पिशवीतून काही वस्तू घेऊन जात होते मी त्यांना अडविले बॉटल चेक केली तेव्हा कळल Sprite आहे पण तिथून जाणा-या स्त्रियांची ते मस्करी करत होते त्याबाबत त्यांना समाज देऊन आम्ही पुन्हा गड चालू लागलो पुढे पहिल्या कि दुस-या दरवाजापाशी एक तरुण सिगारेट पीत उभा होता. ते पाहून आमच्या अजित दादाचं डोक सटकल आणि त्याची यथेच्छ धुलाई झाली. तो माफी मागून सिगारेट विझवून निघून गेला पण आमच्या मनातल्या आगीचा भडका उडाला होता पुढच्या दरवाजात असलेल्या सिक्युरिटी चा "दंडुका" घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे असणा-या एका गुहेत काही ७-८ तरुण दारू पीत बसले होते. अजित दादा, प्रशांत, राज, मी आम्ही सगळे आत घुसलो त्याबरोबर त्यांची पळापळ सुरु झाली. सर्वाना गुहेच्या बाहेर काढल अजित दादांनी मारायला सुरवात केलीच होती. त्यांनी आपला सगळ सामान घेऊन खाली जायची तयारी केली शिवाय आम्ही जाईपर्यंत हाता-पाया पडत होते. त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली ती सर्व मुल मराठी होती आणि जवळपासच्या गावातील एक मुलगा त्यांना मदत करत होता. त्याचा आवाज हळू हळू वाढत होता अजित दादांनी दंडुक्याच्या जोरावर त्याचा आवाज बंद केला. पुढे गड पाहून आम्ही उतरायला सुरुवात केली तिथेही एक "महाभाग" सिगारेट पिताना दिसला त्याचेहि कान चेक करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो

या मोहिमेत आम्ही काय मिळवलं……… फक्त आपल्या मराठी तरुण-तरुणींची बिघडलेली पिढी पाहिली. … आणि झाला तो फक्त मनस्ताप………………. खर तर आम्ही "दुर्गदर्शनासाठी" गेलो पण त्यासोबत "पावित्र्यरक्षण" मोहीम आटोपून आलो…. माझ सर्व हंदू बांधवाना आवाहन आहे कि अश्या लोहगड सारख्या अनेक गडांवर सुट्टीच्या किंवा इतर दिवसात खास "पावित्र्यरक्षण" मोहिमांचे आयोजन करावे. स्थानिक पोलिस अधिकारी व ग्रामस्थ यांनी सुद्धा सदर गोष्टीस आळा बसावा यासाठी प्रयत्न करावेत. आणि इतर गोष्टींचे "ढोल" वाजवणा-यांना माझ आवाहन(आव्हान समजा हव तर!!) आहे............. तुम्ही सुद्धा हि गोष्ट मनावर घ्या आणि थांबवा हे घाणेरडे प्रकार.

बाकी यापुढे कोणी अशी फालतू कृत्य करताना दिसलं तर…. मुलगी असो मुलगा चोप हा द्यायचाच हा विचार आमच्या सोबत तुम्ही सुद्धा मनात पक्का करा

Wednesday, 9 July 2014

"स्वार्थ" आणि "परमार्थ""श्रेय" मिळण्यासाठी 
"काम" करणे 
म्हणजे "स्वार्थ"
"कामाचे" "चीज" 
होण्यासाठी "झटणे" 
म्हणजे "परमार्थ"

Monday, 7 July 2014

माझी एक शाळा होती……


माझी एक शाळा होती……
जीच्या विषयी मनात हूरहूर होती,
जिथे गुरु शिष्याची अतूट नाती होती,
फटकळ असूनही आपुलकीची होती
म्हणून अजोडपणाच्या गाठीत होती - १

माझी एक शाळा होती……
जिथे सकाळी दोघांची हातघाई होती
तिथे दुपारला दिलजमाई होती
मैत्री अतूट रहावी म्हणून
मैत्रीत एक नरमाई होती - २

माझी एक शाळा होती……
जिथे बाईंच्या ओरडण्यावर,
गप्प बसण्याची शिष्टाई होती
जिथे गुरुजींच्या डोळे वटारण्यावर,
मान झुकाविण्याची नरमाई होती - ३

माझी एक शाळा होती……
जिथे परीक्षा आली तोंडावर,
कि अभ्यासाची घाई होती.
अखेरच्या मिनटात अभ्यास उरकून,
पास होण्याची कलाई होती. - ४

माझी एक शाळा होती……
जरी दूर असली घरापासून,
मनाच्या गाभा-यातील होती
संस्काराच्या कठोर घावांनी
मूर्ती घडविण्याची "ती"ची किर्ती होती - ५

माझी एक शाळा होती……
हरवलीय ती आज कुठेतरी
शोधून देईल का कुणीतरी
पैश्याच्या या नादापायी,
गमावून बसलोय तिला खरोखरी  - ६
माझी एक शाळा होती……
माझी एक शाळा होती……

Thursday, 3 July 2014

"हिरा""मी" एकटा आहे………….
कारण "हिरा" तोवर एकटा असतो
जोवर त्याला साजेशी "अंगठी" मिळत नाही

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...