Posts

Showing posts from January, 2017

शेवया आणि नारळाचा रस

Image
शेवया आणि नारळाचा रस कोकण म्हटल की विविध खायचे पदार्थ समोर येतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे "शेवया आणि नारळी रस" . " तांदुळ" किंवा "नाचणी" याच्या  पिठापासून या शेवया  बनवील्या जातात .  कोकणात तांदुळ मुबलक असल्याने मुख्यता तांदळाच्या पिठापासुनच या शेवया बनतात .  प्रथम तांदळाच पिठ उखळत्या पाण्यात टाकुन त्याच्या गुठळ्या फोडुन थोडस मिठ टाकुन, ते पिठ मळुन त्याचे छोटे छोटे गोळे   बनवुन घेवुन पुन्हा ते गरम पाण्यात टाकुन तसेच गरम गरम गोळे शेवया काढायच भांड(जस चकलीच असत तस) घेवुन शेवया काढाव्यात .  सोबत असणारा नारळाचा रस बनविण्यासाठी ओल खोबर किसुन घेवुन ते पिळुन त्याचा रस एका भांड्यात घ्यावा (जसा रस सोलकडीसाठी काढतात) या रसात चवीनुसार गुळ वेलची टाकावी जेणेकरुन एक गोडवा आणि चव येते .  यातील वेलची थोडिफार पचनासाठीही मदत करते .   या नारळी रसात शेवया टाकुन खाव्यात .  या शेवया पचनासाठी थोड्या जड असतात त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळीच खाव्यात माहिती व छायाचित्रासाठी खास आभार  :-  Shweta Sawant दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspo

लोकलच्या गजाली

ट्रेन मध्ये "हेडफोन" लावण्याचे दोन फायदे...... १)गाणी ऐकता येतात २)गेट वरच्या "टग्यांच्या" शिव्या ऐकू येत नाहीत #लोकलच्या_गजाली दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

देव्या चा Birthदिवस

Image
देवेश अरविंद सावंत उर्फ देव्या उर्फ AK47, अजून बरेच उर्फ असावेत. याच्याकडे चर्चा, प्रतिचर्चा, उपचर्चा, महाचर्चा अशी गुऱ्हाळ केली जात नाहीत. देव्या स्वतःच पोलीस आणि स्वतःच न्यायाधीश. एक घाव ५-५० तुकडे...... शरीर काटक दिसलं म्हणून त्यावर जाऊ नका "Confidence" पुरेसा आहे समोरच्याची बोलती बंद करायला. "धीरु भाय" म्हणून मला हाक मारणारा देव्या स्वतःच एक "भाई" म्हणून प्रसिद्ध आहे. असा हा ब्रिगेडींचा कर्दनकाळ देव्या भाई....... ह्या झाल्या देव्याच्या स्वभावातील "ओबड-धोबड" बाजू पण उत्तम फोटोग्राफर आणि Editor सुद्धा... संतोष दादांनी काही सांगितलं की दादा तू फक्त बोल म्हणून हाकेला ओ देणारा आणि "कट्टर शिवसैनिक" देवेशचा आज "तारखेनुसार" जन्मदिवस तेव्हा तिथी नुसार पुन्हा शुभेच्छा देऊ तोवर ह्या "गॉड" मानून घ्या ता.क. :- भाईंचे "गुण" थोडेफार या छोट्याने घेतलेत हे त्याच्या चेह-यावरून स्पष्ट दिसतय.... दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

#लोकलच्या_गजाली

लोकलच्या गेटवर उभे राहून तीन चतुर्थांश शरीर आत ठेवून "मुंडी" बाहेर काढणारे..... "आकाश पाळण्यात" बसायला हवं पण, "आकाश पाळणा" वर गेला की "टरकते" या "Catagory" मधले वाटतात....☺☺☺ #लोकलच्या_गजाली दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

अनोखी भेट.....

Image
दादा तुम्ही छान लिहिता..... मनाला भावत अगदी.... माझ्यासारख्या "तळातल्या मध्यमवर्गीय" लेखक (?) (लेखक कसला ?? काहीतरी खरडतो लोक त्याला "लेख" म्हणतात म्हणून लेखक) बर तर माझ्या सारख्या "तळातल्या" "मध्यमवर्गीय" लेखकाला इतकं बक्षीस पुरेस असत. भले माझा लेख कुठल्याश्या पेपरात किंवा मासिकात छापून न येवो, पण एवढं कौतुक पुरेस असत. पण या वेळी माझं कौतुक करताना " समीर शिंदे " यांनी एक वाक्य बोलून दाखवलं "मला अरविंद जगताप यांच्या नंतर जर कुणाचं लिखाण आवडत असेल तर तुमचं"...... आणि तेव्हाच डोक्यात भुंगा सुरु झाला कोण "अरविंद जगताप" मग समजलं झी मराठीच्या चला हवा येउद्या साठी लेखन करणारे "अरविंद जगताप" मग फेसबुक वर शोधलं तर त्यांच फेसबुक पेज   https://www.facebook.com/ArvindJagtapfansclub/ आणि वेबसाईट  http://www.arvindjagtap.com/ मिळाली  मग समजलं कित्येक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यातल "राजकारणाचं भूत" उतरवणा-या "झेंडा" या चित्रपटातील "कोणता झेंडा घेऊ हाती" हे गाणं "अरविंद जगताप"

समजून घ्या....

मला समजुन घेताना एक समजुन घ्या की मला समजुन घेण हे न समजणार आहे..... दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

ती सध्या काय करते?

"ती सध्या काय करते?" हा प्रश्न "पंचविशी-तिशीतल्या तरुणाला" पडणं समजू शकतो.... पण "इयत्ता ८ वीतल्या" मुलाला हा प्रश्न पडलेला पाहून आम्ही ८ वी मध्ये किती "अशिक्षीत-अडाणी" होतो हे जाणवतं दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

व्यर्थ जीवन

Image
अरे यार क्या बतावू तेरे को, दो दिन से इतना दारू पिया... इतना दारू पिया कि पूछ मत...... ट्रेन मध्ये एक तरुण ३१ डिसेंबर कशी साजरी केली ते "अभिमानाने" सांगत होता..... हे सांगताना त्याच्या चेह-यावरती एखादी "लढाई" जिंकल्याचे "भाव" होते...... . . . . . . . . त्याच्याकडे पाहून "दारू न पिल्यामुळे" माझं "आयुष्य" "व्यर्थ" असल्याचा भास झाला.... . . . . . . . मग मी विचार केला..... . . . . . . . . . जाऊदे "व्यर्थ तर व्यर्थ"....... तळटीप :- तुम्ही पण तुमच आयुष्य असंच "व्यर्थ" घालवा...... # मी_दारू_पित_नाही   :P   :P   :P   :P दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/