शेवया आणि नारळाचा रस
शेवया आणि नारळाचा रस
कोकण म्हटल की विविध खायचे पदार्थ समोर येतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे "शेवया आणि नारळी रस". "तांदुळ" किंवा "नाचणी" याच्या पिठापासून या शेवया बनवील्या जातात. कोकणात तांदुळ मुबलक असल्याने मुख्यता तांदळाच्या पिठापासुनच या शेवया बनतात. प्रथम तांदळाच पिठ उखळत्या पाण्यात टाकुन त्याच्या गुठळ्या फोडुन थोडस मिठ टाकुन, ते पिठ मळुन त्याचे छोटे छोटे गोळे बनवुन घेवुन पुन्हा ते गरम पाण्यात टाकुन तसेच गरम गरम गोळे शेवया काढायच भांड(जस चकलीच असत तस) घेवुन शेवया काढाव्यात. सोबत असणारा नारळाचा रस बनविण्यासाठी ओल खोबर किसुन घेवुन ते पिळुन त्याचा रस एका भांड्यात घ्यावा (जसा रस सोलकडीसाठी काढतात) या रसात चवीनुसार गुळ वेलची टाकावी जेणेकरुन एक गोडवा आणि चव येते. यातील वेलची थोडिफार पचनासाठीही मदत करते. या नारळी रसात शेवया टाकुन खाव्यात. या शेवया पचनासाठी थोड्या जड असतात त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळीच खाव्यात
माहिती व छायाचित्रासाठी खास आभार :- Shweta Sawant
Comments
Post a Comment