रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)



इतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा.

रायगडाच्या हत्ती दरवाजाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते.

इतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना.... इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजत नाही........ हा इतिहास ऐकत आणि अभ्यासत, भूगोल ऐकण्याची संधी किरण दादांमुळे मिळाली. या मोहिमेत किरण दादांसोबत पडद्यामागचे कलाकार Kiran Khamkar यांचाही खास उल्लेख करावासा वाटतो. किरण शेलार दादा मोहिमेच्या सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे अगदी शेवटचा सहभागी व्यक्ती पोहोचेपर्यंत किरण खामकर दादा सोबत राहिले.

बऱ्याच वर्षांपासून मनात असलेली हि मोहिम आज पूर्ण झाली.  प्रत्येकाने एकदातरी ही मोहीम करून पहायला हवी. मी २ वर्षांपूर्वी केलेली उंबरखिंड मोहीम जी यावर्षी येत्या ४ फेब्रुवारी २०१८ ला आहे त्याप्रमाणे ही रायगड प्रदक्षिणा मोहीम खऱ्या अर्थाने रायगडाची अजून बाजू उलगडवणारी ठरली.


Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….