Wednesday, 30 April 2014

"१ मे महाराष्ट्र दिन "
"महाराष्ट्र" या अद्भुत सह्याद्रीचे एक रूप……… जितके सुंदर तितकेच रौद्र. या मातीत जितके संत-महात्मे जन्माला आले तितकेच जीव हातात घेऊन लढणारे वीर पहिले. महाराष्ट्राच्या "संयुक्त महाराष्ट्र" च्या चळवळीत उभ्या देशाने याची देही यांची डोळा पाहिली कि "मातीसाठी हुतात्मा" होणे म्हणजे काय? या महराष्ट्राच्या मातीतील १०६ वीरांनी आपले प्राण तळहातावर घेऊन महाराष्ट्र स्वतंत्र केला. १ मे १९६० हाच तो दिवस ज्या दिवशी या १०६ वीरांचे हौतात्म्य फळाला आले व आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला.
या १०६ हुताम्यांना भावपूर्ण आदरांजली…. व सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्रदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा….
जय महाराष्ट्र
जय शिवरायमुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे


२१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडवीन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नु गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरु

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर
-- नाशिक --

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)
-- बेळगांव --

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी
-- निपाणी --

१०५] कमलाबाई मोहिते
३ जून १९६५
-- मुंबई --

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

माहिती स्त्रोत:- http://www.marathimati.com/

Monday, 14 April 2014

Smile Please......
तोंडावरचा ताबा सुटला कि 
माणूस तुटतो 
आणि 
हातावरचा ताबा सुटला कि 
माणूस फुटतो

Saturday, 12 April 2014

Thursday, 10 April 2014

Wednesday, 9 April 2014

Tuesday, 8 April 2014

उत्तुंग तू... अफाट तू...

उत्तुंग तू... अफाट तू...
हे सुरगडा रायगडाचा रक्षक तू......
हे रूप देखणे भावे मना
दर्शनास तुझ्या उंचावती माना

Monday, 7 April 2014

श्री रामनवमीच्या शुभेच्छा…

एक वचनी……… 
एक बाणी……. 
मर्यादा पुरुषोत्तम 
श्री रामनवमीच्या शुभेच्छा

श्रीराम नवमी कशी आणि का साजरी करतात ...
संकलन: अमोल तावरे

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला म्हणजेट चैत्रातील नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा करतात. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला, असं मानलं जातं.

कशी साजरी करतात राम नवमी...
दुपारी १२.०० वाजता रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात. रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.

श्रीराम नवमीचं व्रत...
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. पाहुयात कसं करतात हे व्रत...

• व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.

• दुसऱ्याच दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.

• त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.

• `उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे|` या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.

• त्यानंतर, `मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये` हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.

• मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.

• घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.

• कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.

• त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

मंत्र आणि त्याचा अर्थ
`श्रीराम जय राम जय जय राम`

Thursday, 3 April 2014

राजे………का आम्हास सोडूनी गेलात??
डोईवरचे छत्र काढुनी,
का निराधार करुनी गेलात?? 
पितृत्वाचा हात काढुनी, 
का अनाथ आम्हा करुनी गेलात 
राजे………का आम्हास सोडूनी गेलात??

"हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……__/\__

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...