Posts

Showing posts from September, 2017

उजेडाचे डोळे ओले

Image
जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “ उमेश जाधव “.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत. दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील  विजय बेंद्रे  जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि  मेघांत  प्रेम मांडत अस

सामानगड दुर्गसंवर्धन.....

Image
तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो सक्रिय सहभाग आणि सहकार्य ..... महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे. साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती. याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा..... संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले. आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत. वन विभागाचे अधिकारी क