Saturday, 28 November 2015

सुरमयी कट्यार....
"वा !! हे तर सुंदर गाणं आहे... या पेक्षा सुंदर गाणं या चित्रपटात असुच शकत नाही".... अस वाटत न वाटत तोच दुसर एक अप्रतिम गाणं कानांना सुखावुन जात !! अशीच काहिशी अवस्था "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहताना होते. एक गाणं कानात गुंजत असत तोवर अजुन एक सुरमयी गाणं कानावर पडत. चित्रपटाच्या सुरुवातीला गणेशास्तुती नंतर प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध करणारा होता. चित्रपटाच्या शेवटी काय होणार हे अगोदरच माहिती होत तरीही प्रत्येक क्षणाला खिळवुन ठेवणारा हा चित्रपट खरच खुप अप्रतिम... शंकर महादेवनची अभिनयातील entry तर अप्रतिमच होती. त्यांच गाण तर सुरमयी असतच यात शंका नाही. सचिन पिळगांवर खुप शायनिंग मारत भुमिका करतात अस अनेकांकडुन मी ऐकल होत पण मला तर खांसाहेबांच्या भुमिकेत ते अगदी Perfect वाटले. कदाचित खांसाहेब हे पात्र "अहंकारी" असावं म्हणुन त्या भुमीकेत ते योग्य वाटले. सुबोध भावे तर माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अमृता आणि मृण्मयी  दोघीही आपापल्या जागी "Perfect" वाटल्या चित्रपट पाहताना सर्वात जास्त भाव खावुन गेल ते चित्रपटाचे संगीत !! गाण्याचे शब्द असो की आवाज दोन्ही मनात जागा करुन राहतात!! ज्याला संगीतातल काहीही कळत नाही तो सुद्धा गाण्यातल्या एखाद्या जागेला नकळत हात उचलुन दाद देईल इतक अप्रतिम संगीत होत !! मुळात मराठी चित्रपट हे टॅाकिज मध्येच जावुन पहावेत यासाठी मी नेहमी आग्रही असतो ! याच आग्रहाखातर हा चित्रपट पाहिला आणि मलाच माझ्या निर्णयाच कौतुक वाटल. चित्रपट पाहायला माझ्या वयाचे फारसे प्रेक्षक नव्हते हे थोडे खटकले पण चित्रपट संपल्यानंतर "मराठिला चांगले दिवस आलेत आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांनाही चांगले दिवस आलेत" हे वाक्य अगदी सुखावुन जात !!!

Thursday, 26 November 2015

"असहिष्णू" 'हिंदुस्थानातील' "गरीब" 'अमीर'ज्या अमिर खानच्या पत्निला देश असुरक्षित वाटतो त्या दोघांसाठी एक पत्र

..... अमीर
खर तर तुला इतर वेळी पत्र लिहिल असत तर माझे अंतरंगातुन तुला "प्रिय अमीर" अस लिहिल असत पण तुझ्या "देश सोडण्याच्या " वक्तव्यानंतर तुला प्रिय म्हणायची अजिबात इच्छा नाही.
तुझा राजा हिंदुस्तानी (हिंदुस्तानी बर का!) असो वा तारे जमीन तुझा प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहिला. राजा हिंदुस्तानी मधील तुझा "कम कम मॅडम" जोक अजुनही मारावास वाटतो! मी स्वतः शिक्षक असताना तुझा तारे जमीन पर पाहिला आणि Every Child is Special अस म्हणत मुलांना शिकवताना मारणं सोडुन दिल!! तुझा रंग दे बसंती पाहिला की अंगावर आजही शहारे येतात ! तुझ्या थ्री इडियट मधल्या मैत्रीला आजही मानतो ! तुझा भुवन तर भेजे से निकलताही नही! सत्यमेव जयते आणि Increditable India असणारा हिंदुस्तान तुला आज परका असहिष्णु कसा काय वाटायला लागला ! तोही गेल्या ८-१० महिण्यात !! अनेक लेखकांनी,कवींनी पुरस्कार वापसी केली मी काहिच बोललो नाही कारण मी त्यांची पुस्तक किंवा लिखान पैसे देवुन वाचल नव्हत पण तुझे चित्रपट मी पैसे मोजुन पाहिले ते फक्त तुझ्या प्रेमापोटी !! तु देशातल्या समस्यांना वाचा फोडतोस म्हणुन... पण "देश असहिष्णु आहे मला देश सोडावासा वाटतोय" हे तुझ वाक्य "समस्या निर्माण करणार" वाटल मला ! सरफरोश मध्ये तर तु असही बोलला होतास.."मै ये इसलिये नही बोल रहा हु की ये मेरे घर का मामला है... नही ये मेरे मुल्क का मामला है" तसच "मी यासाठी नाही बोलत नाहिय की हा तुझ्या घरचा मामला नाही माझ्या देशाचा मामला आहे !"
आता तु उद्या उठुन स्पष्टीकरण देशील ये स्टेटमेंट मेरा नही मेरे पत्नी का है ! मग तीला समजव की या देशात ज्या बाईला हिंदू असुन एका मुसलमानाची दुसरी पत्नि व्हायचा हक्क दिला जातो तो देश असहिष्णु कसा काय असेल ???
बर देश सोडुन जाणार कुठे ती... पाकिस्थानात तर हिला बुरखा घालावा लागेल इतर ठिकाणी तु केलेले पिक्चर तुला हिंदित डब करुन इकडे पाठवावे लागतील. बर देश असहिष्णु असल्याने तु केलेला चित्रपट इकडे प्रदर्शित होईल कि नाही याबाबत शंकाच आहे !
कालपर्यंत मी Mr Prefect म्हणुन तुझा खुप आदर करायचो. अनेक जण सांगायचे तु मुस्लिम संघटनांना पैसा पुरवतोस,दोन हिंदू मुलींशी लग्न करुन लव जिहाद चा आदर्श ठेवतोस वगैरे वगैरे पण मी याकडे लक्ष दिल नाही पण तु तर माझा देश असहिष्णु आहे तुझ्या बायकांमुलांसाठी धोकादायक आहे अस म्हटल्यावर तुझा आदर करायचा की नाही हाच विचार करतोय. मी असही ऐकलय की तुझ्या "दंगल" या चित्रपटासाठी तुझा हा पब्लिसिटी स्टंट आहे अस असेल तर तुझा हा चित्रपट पाहु की नको हा प्रश्न माझे अंतरंग ला पडलाय !!
तुझा एक (माजी) फॅन

Wednesday, 18 November 2015

तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…
तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

छायचित्रातील जोडप्याच्या संसाराला ऐन "दिवाळीत" "प्रकाशमान" करणारी भेट मिळाल्यावर हे भाव त्यांच्या चेह-यावर तरळत होते.... तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

नेमके हेच भाव टिपण्याचे भाग्य आम्हाला लाभले ते नंदू चव्हाण यांच्या Joy Of Happiness च्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून साकारलेल्या उपक्रमातून… नंदू चव्हाण यांच्या सहकार्याने दुर्गवीर च्या माध्यमातून साल्हेर परिसरातील आदिवासी पाड्यात "सौर दिवे" म्हणजे Solar Lamp चे वाटप करण्यात आले.

संतोष दादा प्रत्येकाला नावानिशी बोलवून ह्या वस्तू द्यायला सांगत होते. अस करण्यामागे त्यांचा हेतू एकाच होता प्रत्येकाला ते समाधान लाभाव की मी "थोडस" तरी चांगल करू शकतो… यात प्रसिद्धी चा हव्यास कधीच कुणाला नव्हता. दोन संस्था दोन वेगवेगळे मार्ग असले तरी, धेय्य एकच म्हणून अनेक समविचारी माणसे एकत्र येउन हे कार्य करतात. यात कुणाला माझ नाव हव, माझा फोटो हवा हा हव्यास मुळीच नव्हता…. खर तर हा हव्यास नसावाच कारण तो हव्यास असेल तर हे कार्य कधीच पूर्णत्वास जाणार नाही.

ही मदत करण्याने ते आदिवासी " अपंग" होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. "कुणालाही "बोटांचा आधार" देताना त्याच्या "कुबड्या" होणार नाहीत याच भान असावं लागत" . हि मदत म्हणजे त्यांना "बोटांचा आधार" असतो त्या "कुबड्या" नक्कीच नसतात. मदत इतकीच करावी कि त्याचा "आधार" होईल ती इतकी असू नये कि त्याची "सवय" होईल…

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी चांगल करायचं असत पण त्यासाठी काही छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालाव लागत. ऐन दिवाळीत घरच्यांसोबत दिवाळी साजरी करावी अस प्रत्येकाला वाटत आणि ते स्वाभाविक आहे पण त्यातला थोडा वेळ या कार्यासाठी देण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली तर किती बर होईल ना !!!

मी तर तो आनंद मिळविला तुम्ही कधी मिळविणार????
दुर्गवीर चा धीरु

Tuesday, 17 November 2015

फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते

फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते......


या दिवाळीची स्पेशल मोहिम (सगळ्यात स्पेशल २०१३ ची राजगड- तोरणा मोहिम होती  नाशिक मोहिम पार पाडायची होती. मुंबईहुन निघालो सोलार लॅंप च वाटप केल आणि उरर्वरीत वेळेत काय करायचे हा गहण प्रश्न निर्माण झाला वेळ फार कमी होता आणि "अंतर्गत सुत्रांच्या" माहितीनुसार गड सर करण्यासाठी लागणारा वेळ जास्त होता. कमी वेळात संपुर्ण गड पाहता येईल पाहता येईल अस ठिकाण ठरत नव्हत. एक मारुतीरायाची मुर्ती पाहायच ठरल पण काही "अंतर्गत" आणि "बाह्य सुत्रांनी" सांगितले ते अंतर ५-७ कि. मी. चालुन जावे लागेल. त्यामुळे "प्लान A" जवळपास फिस्कटला होता. मग ठरल मांगी-तुंगी ला जायच पण त्याला तब्बल चार तास लागतात हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल्याने किंचीतसा ठरलेला "प्लान B" पण फिस्कटत चालला होता. त्यामुळे मांगी तुंगीच्या बाजुच्या डोंगरावरील जैन मुर्ती पाहुन परतीला निघायचे असा "प्लान C" ठरला. पण दुर्गवीर चे Engineers Choice प्रशांत बंधुंनी प्रवाहाच्या विरोधात जावुन "खात्रीलायक सुत्रांना" डावलुन एक "भयानक" प्लान रचला तो म्हणजे फिस्कटलेला "प्लान B" सत्यात उतरावयचा त्याला अजित दादा, नितीन दादांनी खतपाणी घातले. मग काय मी पण अफवा, अंधश्रद्धा झुगारुन त्यांच्या कटात सामील झालो. सुरुवातीला प्रशांत बंधु, अजित दादा यांनी ५:०५ मिनिटांनी गड चढायला सुरुवात केली मी आणि नितीन बंधुनी ५:१० मिनिटांनी त्यांच्या पावलावर पाउल ठेवले. आमच्या मागुन अमीत शिंदे नावाचा "चित्ता" येतच होता. मग मजल दरमजल करीत मी अजित दादा, प्रशांत बंधु, प्रफुल्ल बंधु, अमित बंधु, आणि नाशिकचे एक शिलेदार(राव नाव आठवत नाही तुमच समजुन घ्या) आम्ही एकदम "फ्रंट फुट" वर बॅटिंग करत निघालो मध्येच विवेक दादांची आणि स्नेहा ताईंची भेट घेवुन निघालो. जिकडे मांगी तुंगी ही मॅच पुर्ण करायला चार तास लागणार हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल त्याचा पहिला पॅावर प्ले आम्ही अवघ्या ५० मिनिटात पुर्ण केला. आम्ही सर्व (फक्त अमित नावाचा चित्ता सोडुन) ५० व्या मिनिटाला तुंगीला पोचलो. तोवर अमित नावाचा "चित्ता" तुंगीचा तो घेरा पुर्ण करुन पण आला म्हणजे आम्ही तुंगी ला ५० मिनिटात पोचलो तर तो ५ -१० मिनिट अगोदरच पोचला होता.पहिला "पॅावर प्ले" जोरात खेळल्यामुळे थोडासा आरामात मांगीच्या दिशेने निघालो आणि पुढच्या पंधरा मिनिटात तुंगी उतरुन मांगीच्या चढाईला सुरुवात केली. आणि दोन्हि गड मिळुन अवघ्या दोन तास चोवीस मिनिटात मोहिम संपवीली.मागुन आलेल्या शिलेदारांनी तुंगी पुर्ण केला(काहिंनी पुंगी पण वाजवली अस ऐकल)
गडावर गड अस्तित्वात नव्हताच त्याच एक "जैन तिर्थक्षेत्र" झाल्याच प्रकर्षाने जाणवलं. सगळीकडे लोखंडी जाळ्यांत बांधुन ठेवलेल्या मुर्त्या नजरेत येत होत्या. त्यात अजुन भर म्हणुन बाजुचा डोंगर "पोखरुन" त्यात अजुन एक मुर्ती कोरली जात होती. असो तो धार्मिक वाद नको !

पण या मोहिमेतुन एक मात्र शिकलो.....
अफवांवर विश्वास ठेवु नये 

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...