Posts

Showing posts from 2016

विशाखा विश्वनाथ

Image
एक विश्वनाथ आनंद आणि दुसरी विशाखा विश्वनाथ या दोघांचा जन्मदिन एकत्रच. एक बुद्धीबळातील “चाली” करतो तर दुसरी लिखाणातल्या. वयाच्या मानाने जरा जास्तच प्रगल्भता आलेले हे दोघेही. मला बुद्धीबळ तस फारस जमलच नाहि तस कधी कधी विशाखा ताईंचे चे मेसेजही झेपत नाही, कदाचित मला तितक प्रगल्भ व्हायला वेळ लागेल.

तेव्हा विश्वनाथ आनंद जसा बुद्धीबळातील क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे त्याचप्रमाणे तुमची लेखणीही उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल करो ही सदिच्छा

तळटीप:- हे विशाखा नावापुढे “विश्वनाथ” हे नाव लावलय ते “विश्वनाथ आनंद” चा फॅन म्हणुन लावलय की काय? असा बाळबोध प्रश्न मला पडलाय 😀
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

वापरणं आणि उपयोगी पडणं

तुम्हाला वापरणं,
तुम्ही उपयोगी पडणं
दोन्ही एकच फक्त दृष्टिकोन वेगवेगळादुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

FOLLOW

तुम्ही कुणाला FOLLOW करता यापेक्षा किती FOLLOW करता याला महत्व आहेदुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

गैरसमज आणि समजून घेणं म्हणजे काय ??

"मनातून" "गैर" झाल्यावर होतो "गैरसमज"
"मनं" "सम" असल्यावर "समजून" घेतात


दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

अच्छी" "बुराई" आणि “बुरी" "अच्छाई"

“अच्छी" "बुराई" से नहीं 
“बुरी" "अच्छाई" से डर लगता है साहब….दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

आयुष्याचे बुद्धिबळ

समोरच्या नंतर तुमची "चाल" हा "आयुष्याच्या बुद्धिबळाचा" अलिखीत नियमच आहेदुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

कपाळमोक्ष

मुंब्रा स्थानकात एक २२-२४ वयाचा चा एक तरुण चढला
गोवा-गुटखा सारख काहितरी खावुन कागद ट्रेन मध्येच टाकला...
मी तोच कागद उचलुन त्याच्या हातात दिला. त्याच्या कानात हेडफोन होते त्यामुळे बोलण्यात अर्थ नव्हता...
त्याने माझ्याकडे “येडा हाय का हा” असा "लुक" दिला आणि पुन्हा तो कागद ट्रेन मध्येच टाकला
पुन्हा मी तो उचलुन त्याच्या हातात दिला आता काहितरी बोलायला हव म्हणुन बोललो “हा डस्टबिन नाहिय मित्रा” यावेळी एकतर त्याला “मी समजलो नाहि” किंवा “माझी भाषा समजली नाहि”......... त्याने तो "कागद" चालत्या ट्रेन मधुन बाहेर फेकला आणि “दगडावर” डोक आपटल्यावर कसा “कपाळमोक्ष” होतो याचा "जिवंत अनुभव" मला आला दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

"कल्पना" उर्फ "कल्पू"

Image
"धीरु" + "सर" ही विरुद्धार्थी आणि दुर्मिळ "विशेषण" वापरून हाक मारणारी "कल्पना" उर्फ "कल्पू" मोकळं व्यक्तिमत्व. "जे" आहे "ते" समोर..... "आत" एक "बाहेर" एक असं अजिबात नाही. कित्येकदा वाटत ही मुलगी सकाळी हसते, दुपारी हसते, संध्याकाळी हसते ही काय एकटीच "दात घासते" :P:P पण विनोदाचा भाग वगळता असंच आयुष्यभर हसत रहा. उगाच विचार करून मेंदूची "शकलं" पाडायची काम आम्ही करतो उगाच "ते" करून तुझं "हसू" आटवू नकोस.
लोहगड वरील माझे अंतरंग चा लेख वाचून दुर्गवीर संपर्कात आलेल्या या मुलीचे नेहमी इतिहासापासून अगदी वर्तमानापर्यंत सर्व प्रश्न असतात ! "धीरु सर" "इतिहासात ही लढाई कुठे झाली??" इथपासुन "तुम्ही एवढे शांत का राहता?" अशा हिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी न "रागावता" दिलीत...माझ्या ७ वर्षाच्या शिक्षकाच्या कारकिर्दीत मी ओरडलो नाही असा एकही विद्यार्थी आढळणार नाही हे रोख रु.१०००/- नवीन करकरीत नोटेच्या पैजेवर सांगू शकतो !! माझ्या शाळेची …

नात्यांचा हिशेब मांडला की बाकी “शुन्य”च राहते.

नात्यांचा हिशेब मांडला की बाकी “शुन्य”च राहते.दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

मालवणी_खरीखुरी_गजाली

Image
स्थळ:- कोकण रेल्वे

सिट क्र. ७८ = मी

सिट क्र. ७९ रिकामी (?)


सिट क्र. ८० एक "अनोळखी मुलगी"

सिट क्र. ८०: - (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) माझी बॅग वरुन काढुन देता का? जरा जड आहे.

सिट क्र. ७८ बॅग काढुन देतो... बॅगच वज़न ७-८ किलो. सिट क्र. ८० बॅगेतली वस्तु काढुन घेते

सिट क्र. ८०: - (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) बॅग परत वरती ठेवाल का ??

सिट क्र.७८ बॅग उचलुन ठेवतो.

सिट क्र. ७८ ची मागची दुसरी "अनोळखी मुलगी" सिट क्र ८६ सर्व निट पाहतेय आणि साधारण अर्ध्या तासानंतर (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) प्लिज जरा बॅग काढुन द्याल का ?

सिट क्र. ७८ शांतपणे बॅग काढुन देतो बॅगच च वज़न साधारण १०-१५ किलो !!
.
.
.
.
.
आता सिट क्र. ९२(अजून एक "अनोळखी मुलगी") ने मोठ्या अपेक्षेने "माझ्याकडे"(सीट क्र.७८) पाहिल मी शांतपणे ट्रेन च्या वरती "रॅक" कडे पाहिल “सर्वात मोठी गोणी” कोणती दिसतेय ???
आणि ती खाली उतरावयची “मानसिकता” तयार केली. #मालवणी_खरीखुरी_गजाली दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

"लाटांना" आणि "संकटांना" "भिडण्यातच" मजा असते

Image
"लाटांना" आणि "संकटांना" "भिडण्यातच" मजा असतेदुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://dhiruloke.blogspot.in/

चक्रव्युहातला अभिमन्यु

Image
चक्रव्युहातला अभिमन्यु

पैसा नाही म्हणुन शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणुन पैसा नाही या दृष्टचक्रात अडकलेले हे लोक पाहिले की आठवण येते ती महाभारतातल्या "अभिमन्युची" ज्याला चक्रव्युहात कस शिरायच ते माहित होत पण त्यातुन बाहेर कस पडायच हे माहित नव्हत. तसच "आयुष्याच्या चक्रव्युहात" घुसणा-या या "अभिमन्युरुपी लोकांना" आपला अंत माहित असताना आयुष्याच्या चक्रव्यूहात घुसल्यावर फक्त काही काळ लढत "मरण पुढे ढकलताना" पाहुन मन सुन्न होत

दगडांतल काम करणा-यांच्या आयुष्यात शेवटि दगड यावेत यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणत. अगदि हेच “दगडांतल आयुष्य” जगणा-यांना आम्ही पाहिल “लातुर” जिल्ह्यातील निलंगे तालुक्यातील पारधी आणि वडार समाजाच्या पाड्यात. एक उच्चभ्रु समाज जाणीवपुर्वक यांना दुर्लक्षीत करतो आणि आपण दुर्लक्षीतच करायच्या पात्रतेचे आहोत असा "न्युनगंड" घेवुन जगतात हे लोक.

या "अभिमन्युंना" आज या "आयुष्याच्या चक्रव्यूहात" किती काळ "मरण ढकलता" येईल यासाठी सहकार्य करण्यापेक्षा हे "चक्रव्यूह तोडुन" नव्या उमेदिने "आयुष्य ज…

नियम

Image
माझे "नियम" "तुमच्यासाठी" नाहीत...
कि तुम्ही "माझ्याशी" कसं वागावं ??
ते "माझ्यासाठी" आहेत.....
की मी "तुमच्याशी" कसं वागावं

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

रानभुली ची राणी....

Image
रानभुली ची राणी....


कधी कधी खुप “महान” असलेल व्यक्तिमत्व अगदि “साधेपणाने” तुमच्या समोर येत आणि आपल्यातला बडेजावपण, अहंकार नष्ट होवुन त्या व्यकतीच्या चरणांवर डोक ठेवावस वाटत..... छायचित्रात दिसणा-या आज्जी या कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाहिय. या आहेत "मनू आज्जी" म्हणजे गो. नि. दांडेकर यांना रायगड दाखवणारी याच त्या "रानभुली च्या नायिका" या आज्जींवर गो. नि. दांडेकरांनी "रानभुली" सारखी कादंबरी लिहिली.


दि.२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुर्गवीर रामजी कदम यांनी या आज्जींच घर दाखवल लागलीच आम्ही त्यांच्याकडे गेलो पण काहि कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरच्यांशी बोलतोय इतक्यात आजी तिथे आल्या. झपझप पडणारी पावलं आणि अंधारात चमकणारे तेजस्वी डोळे असं हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि क्षणभराचा विलंब न लावता आम्ही एक एक करुन आज्जींच्या पाया पडलो. अक्षरशः मन शहारुन आल एखाद्या पिक्चर च्या हिरोला पाहिल्यावर एक वेळ काहिच वाटणार नाही पण त्या क्षणाला त्या आज्जींना पाहिल आणि नकळतच पायावर डोक ठेवायची इच्छा झाली. जी पावल अगदि १० एक वर्षाची असताना गो. नि. दांडेकर, बा…

सहानभूती नको सहाय्य....

Image
सहानभूती नको सहाय्य.....

कुणी नोटा बदलण्यासाठी धडपडतंय तर कुणी काळा पैसा गोरा करण्यात पण फक्त एकदा या गरिबांच्या आयुष्यात डोकावुन पाहिल की स्वतःचीच किव येते. ज्यांनी आयुष्यात कधी ५००-१००० ची नोट पाहिलीच नसेल त्यांना काय करायच काळा पैसा आणि गोरा पैसा... इकडे आम्ही नोटा मिळवायला रांगा लावतोय तर तिकडे “काहीतरी” मिळेल या अपेक्षेने हे सर्व घोळका करुन आले होते. पण यांना जे काही दिल ते इतक “अपुर” होत की काहितरी दिल्याच सुख मिळण्याऐवजी मन नुसत "चरफडत" होत आपण किती “स्वार्थी” आहोत.


“मदत तुमची आनंद त्यांचा” या आवाहनाला प्रतिसाद देत जमा केलेले जुने कपडे वाटप यांना करताना मन स्वतःलाच दोष देत होत. “बस इतकच” स्वतः रोज मॅचिंग कपड्याचा अट्टाहास करणारे आपण काय देवु शकलो यांना फक्त जुने कपडे. माझी तब्येत ठिक नाहीय म्हणुन दोन दिवस अंगावर स्वेटर घालुन फिरत होतो गडावर जात नव्हतो म्हणुन मला “सहानभुती”(?) मिळत होती मग आयुष्यभर फाटके कपडे अंगावर घेवुन वावणा-यांच काय त्यांना कोण “सहानभुती” देणार ?? बर नुसती "सहानभुती" नकोय त्यांना त्यापुढेही "सहाय्य" हवय !! नाहितर आजकाल “सोशल देश…

खरा श्रीमंत....

Image
खरा श्रीमंत....

छायचित्रातला मुलगा तुम्हाला अगदि "सामान्य" वाटेल पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा आहे “खरा श्रीमंत”..... होय खरच हा मुलगा सर्वात “श्रीमंत” आहे. मु. पो. वडाखेल, ता. बागलान, जिल्हा:- नाशिक. दुर्गवीर तर्फे या गावात कपडे वाटप व Joy Of Happiness तर्फे वॅाटर फिल्टर वाटप करताना प्रशांत वाघरे बंधुंनी जवळच्या दुकानात जावुन बिस्किट पुडे आणि चॅाकलेट आणले.  वाटता वाटता एका क्षणाला आईच्या कडेवर असलेल्या छोट्या मुलाने बिस्किट मिळवायचा हट्ट केला पण त्याच्यापर्यंत पोचेस्तोवर प्रशांत बंधुंकडील सर्व बिस्किड पुडे संपले आणि तो छोटा मुलगा रडु लागला. आता काय करायच सुचत नव्हत जवळपास दुकानही नव्हत आणि गाडिकडे जाण शक्य नव्हत मग प्रशांत बंधुनी या छायचित्रात दिसणा-या मुलाला विनंती केली की त्याला दिलेला बिस्किट पुडा त्या लहान मुलाला द्यावा वाटल्यास तुला दुसरा पुडा गाडिजवळ पोचल्यावर देतो. आणि या मुलाने अजिबात विचार न करता स्वतः कडचा बिस्किट पुडा त्या लहान मुलाला दिला.

आपण आपल्याकडच्या चलनात "नसलेली" एखादि नोट दुस-याला देताना शंभर वेळा विचार करु पण सर्व काही गमावलेल्या या मुलाने स्वत…

व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……

Image
व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……


बाप आणि मुलांच्या नात्यात ब-याच गोष्टी बोलायच्या राहुन जातात कदाचित त्या कधीच बोलल्या जात नाहीत पण असा एक क्षण असतो जिथे हे बोलायला एक संधी मिळते आणि त्या क्षणात सर्व व्यक्त व्हाव लागत अन्यथा ती संधी पुन्हा येत नाही.चित्रपटात वडिलांचा "व्हेंटिलेटर" का काढु नये याची जाणीव शेवटच्या क्षणाला मुलाला होते आणि लिफ्ट नाहीय म्हणून मुलगा पाय-यांनी धावत जातो तो क्षण डोळ्यात आसवं आणतो. आणि तिथेच जाणीव होते, आपण एकदातरी आपल्या आई वडिलांशी मोकळेपणाने बोलायल हव…..


दुस-या बाजूला "प्रेम" आणि "सवय" या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा समतोल साधला नाही तर गफलत होते आणि तुमच अतीप्रेम एखाद्याची सवय बनते आणि तिथेच घात होतो…….एका "व्यक्तीला" लावलेला "व्हेंटिलेटर" हा त्याच्या संबंधित सर्व "नात्यांना" असतो याची जाणीव करून देणारा सुरेख चित्रपट.....

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

दुस-याला देण्यातल सुख...

Image
दुस-याला देण्यातल सुख...

कधी कधी दुस-याला देण्यात जास्त सुख असं म्हणतात ते उगाच नाही....
ह्या छायाचित्रातील मुलगा अगदीच गरीब घरातील "मृगगड" परिसरातील अगदी छोट्याश्या गावातील. Joy Of Happiness या Nandu Chavan​  यांच्या उपक्रमाअंतर्गत दुर्गवीर तर्फे यांच्या शाळेला Water Purifier चे वाटप करण्यात आले म्हणून या पट्ठ्याने "स्वत:" बनविलेले "दिवाळी ग्रीटिंग कार्ड" दुर्गवीरांना भेट दिले. ते देताना त्याच्या चेह-यावरच "आनंदच" सर्व काही सांगून जात होता. साध्या कागदावर पेन्सिल आणि स्केच पेन ने "रेघा" ओढून बनविलेल्या या ग्रीटिंग कार्ड ने आणि या शाळेच्या "पापभिरू" मुलांनी सर्व दुर्गवीरांच्या "मनात घर केलय" एवढं नक्की !!


दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

सुरगड.....Nothing Is Impossible

Image
सुरगड.....Nothing Is Impossible

सुरगडाने आजवर खुप वेगवेगळे अनुभव दिले.. २०१२ साली दुर्गवीर मधला माझा प्रवास सुरु झाला तो याच सुरगडाच्या साथीने... गडावर भर पावसात रात्र काढण्याचा अनुभव याच सुरगडाने दिला.... गडावर अनवानी चालायच म्हणजे काय हा अनुभव तर मला सुरगडावर तब्बल ६ वेळा आलाय.......

याच सुरगडाने आज पुन्हा एक अनुभव दिला “Nothing Is Impossible” हा अनुभव मलाच नाहि आजच्या मोहिमेला असलेल्या प्रत्येकाला आला असेल.

सुरगड चढायला अत्यंत कठिन आहे अशा “अफवांना”“जवळपास” बळी पडलेल्या“कल्पना निगडे”यांना ही अनुभव आला असेल “Nothing Is Impossible”.

पायाच दुखन घेवुनसुद्धा गड चढुन आणि वर जावुन काम करणा-या गितु ताईने सुद्धा हा अनुभव घेतला असेल “Nothing Is Impossible”.

२-३ वर्षानंतर गडदर्शन करणा-या हिमगौरी कुर्वे असो किंवा रसिका म्हानगोरेअसो तुमची सुरगडची अवघड (?) घळ पार करुन वर जावुन काम करुन पुन्हा त्याच निसरड्या वाटेने गड उतरायची यांची जिद्ध आणि इच्छाशक्ती पाहुन मला हि आज अनुभव आला “Nothing Is Impossible”....

रायन डिसोजाआणि पंछी ह्या महाराष्ट्रीयन नसुन सुद्धा या गडांबद्दल असलेली "आस्था&quo…

पुस्तक काय करत ???

Image
पुस्तक काय करत ???

पुस्तक माणसाला शिकवत तुम्हाला काय करायचय! !

एखादा व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने मार्गक्रमण असेल तर तो एकतर "गौतम बुद्धांचे" विचार वाचेल

पण

कोणतीही गोष्ट लाढाईने साध्य होणारच ह्या विचारांचा एखादा व्यक्ती अर्थातच "अडॅाल्फ हिटलर" वाचेल !!

या दोन व्यक्तींची तुलना करण अशक्यच आहे

पण माझे कवी मित्र "विजय बेंद्रे" यांनी मार्च मधल्या माझ्या जन्मदिनाची भेट आज तब्बल आठ महिन्यानंतर माझ्याकडे सुपुर्द केली!!

आता सामान्यपणे विचार केला तर जर "गौतम बुद्धांच्या विचारांचे" अनुकरण केले तर "हिटलरचे विचार" "अडगळीत" पडतील

आणि

"हिटलरच्या विचारांवर चालायच" म्हटल तर "गौतम बुद्धांच्या अहिंसवादाच्या" छायेतुन बाहेर पडाव लागेल

पण............

"विजय बेंद्रे" नावाच्या “अवलीयाच्या” डोक्याने विचार करायच म्हटल तर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथले एकतर "गौतम बुद्ध" व्हा किंवा "हिटलर" व्हा पण जे कराल ते मुळापर्यंत जाऊन !!

जस गौतम बुद्धांनी अटितटिच्या काळातही अहिंसावाद सोडला नाहि

आणि

हिटलर ने मरेपर्यंत आपली आक्रम…

सीमारेषा....

Image
सकाळपासून WhatsApp ग्रुप, फेसबुकवर तुमच्यावॉर शुभेच्छचा वर्षाव होताना पाहतोय... लिहायला वेळ मिळत नव्हता मिळून इतक्या उशिरा काहीतरी खरडतोय....


संतोष दादा कुणासाठी देव, कुणासाठी दादा, प्रेरणास्थान, कुणासाठी वटवृक्ष, कुणासाठी मार्गदर्शक आहेत पण माझ्यासाठी माझ्या दुर्गवीर मधील "सीमारेषा" आहे हि मी कधी ओलांडू शकत नाही....


मी माझ्या आयुष्यात कुणालाच जुमानत नाही (असे माझे जवळचे लोक म्हणतात) मलाही तसच वाटत, कारण जॉबवर असो वा नात्यांमध्ये माझ्याबाबत कुणी "कुरापती" करायला लागलं कि मी त्याला आपटतो.... पण प्रत्येक क्षेत्रात मी अशी एक "सीमारेषा" ठेवलीय जी मला आवरू शकते ती पार केली तर मी "बाद" हा अलिखित करार मी स्वताशीच केलाय. दुर्गवीर मध्ये न बोलता अनेकांशी माझे "मतभेद" झाले असतील नंतर ते निवळले असतीलही. पण ते कितीवेळा आणि कुणाशी नीटसं आठवत नाही. पण संतोष दादांनी दिलेलं कुठलं काम मी "पूर्ण करू शकलो नाही" आणि त्यांना कधी मी "मला हे जमणार नाही" असं वाक्य नाईलाजास्तव बोलून दाखवलं तो प्रत्येक प्रसंग माझ्या लक्षात आहे. अगदी ४ व…

भगवान के घर में देर है अंधेर नहि :- मानगड मोहीम

Image
भगवान के घर में देर है अंधेर नहि
ब-याच महिण्यांनंतर माझी श्रमदान मोहिम त्यात कित्येक वर्षांपासुन फेसबुक वरुन भेट होत असलेल्या मकरंद केतकर आणि ओंकार ओक यांच्या भेटिमुळे भगवान के घर देर है अंधेर नहि असे “Feeling” आलेल.
फेसबुक वरुन सातत्याने सर्प, निसर्ग या विषयांवर ज्यांचे लेख वाचत आलो त्या मकरंद दादा आणि दुर्गस्थापत्य या विषयावरचे अभ्यासक ओंकार दादा यांची भेट झाली. मानगड उतरताना अवघ्या १५-२० मिनिटात निसर्ग, झाड, फुल यावर अविरतपणे आणि आम्हा पामरांना समजेल, झेपेल अश्या भाषेत(काहि इंग्लिश शब्द वगळता) बोलणा-या मकरंद दादांच बोलण ऐकतच रहावस वाटत होत. अगदि डोंगराचा हा आकार असा का, दगडांना गोलाकार नक्षी कशी येतो यावर अगदि थोडक्यात दादांनी समजावले. मुंग्यांच अगदि सामान्य वाटणार वारुळ याची एका दिशेची भिंत जाड व एका दिशेची भिंत पातळ अशी का असते या मागच विज्ञान ऐकुन तर निसर्ग आपल्यापेक्षा स्थापत्यकलेत किती प्रगत आहे हे जाणवते. १०-१२ किमी परिसरात पसरलेली वेल कोणतीहि मोटार पंप न वापरता, आवाज न करता एका पेशीतुन दुस-या पेशीत पाण्याचा थेंब पसरवत स्वत:ला जिवंत ठेवते. या सारखी अनेक उदाहरण देवुन मकरंद दादां…

जवळ जाणं.....जवळ राहणं

Image
एखाद्याच्या "जवळ जाणं"
जेवढं "सोप्प"
त्यापेक्षा त्याच्या "जवळ राहणं"
"कठीण"
http://dhiruloke.blogspot.in/

मदत...

Image
तुम्ही "एखाद्याला" मदत करीत असता....
तेव्हा परमेश्वर तुमच्या "मदतीसाठी"
"कुणालातरी" तयार करीत असतो....

http://dhiruloke.blogspot.in/

माझे नाव आदिती शरद शिंदे.....

Image
माझे नाव आदिती शरद शिंदे.....

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनकाईबारी

तालुका येवला, जिल्हा नाशिक

मी इयत्ता ४ थी मध्ये शिकते.

हे असे चुणचुणीत बोल बोलणारी ही मुलगी! बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास! वागण्यात हरीणीची चपळता आणि चेह-यावर निरागस हास्य !! अश्या ह्या चुणचुणीत रणरागीणीची ओळख झाली दुर्गवीर च्या शालेय वस्तु वाटपाच्या नाशिक दौ-यात !

अगदि तळागाळातल्या गावच्या मुलीमध्ये असलेला आत्मविश्वास पाहता मला नाहि वाटत की खेड्यातल्या या मुलीला उंच भरारी घ्यायला कोणी रोखु शकेल ! कदाचित अडथळा असेल तर “परिस्थितिचा”….. घरची हलाखीची परिस्थिति या मुलीला अभ्यासात आणि आयुष्यात भरारी घेण्यापासुन "कदाचित" रोखु शकेल !

आई-वडिल “पाथरवट” त्यामुळे कामानिमीत्त मोलमजुरी करत गावोगावी फिरतात. ही मुल त्यांच्या आजी आजोबांकडे.... मग काय शाळेतुन मुल घरी गेल्यावर घरचे हे विचारत नाहित की "बाळा आज शाळेत काय शिकवल" तर तर एका हाताने शाळेची पुस्तकांची पिशवी (हो पिशवीच कारण दप्तर घेण्याइतकी परिस्थिति नसते) ठेवली, की दुस-या हातात विहिरीवरुन पाणी भरायला कळशी दिली जाते. अभ्यास करण्याची आवड …

कोकणी भात बोकणी....

Image
कोकणी भात बोकणी....
हे वाक्य फार पुर्वीपासुन ऐकत आलो पण त्याचा अर्थ आता उमगतोय. महाराष्ट्रातील इतर प्रांतात जेवढा भात वर्षाला खातात तेवढा भात कोकणी माणुस महिण्याला खातो(ही अतिशयोक्ती नाही बरं...) पण भातच का ? चपाती, भाकरी, किंवा अजुन का नाही याला कारण अनेक आहेत
१. कोकणात तांदुळ हे उत्पादन सहजतेने येणारे उत्पादनआहे. त्याला पण मेहनत लागते हा. नाहितर सहजतेने म्हणजे अगदि रान उगवल्यासारख तांदुळ उगवत नाहि मळ्यात.
२. चपातीसाठी लागणारा गहु क्वचितच कोकणात पिकतो किंबहुना पिकतच नाहि. याला बरीच नैसर्गिक किंवा आर्थिक कारणे असु शकतात.
३. कोकणातील वातावरण हे समुद्रकिणा-यावरील उष्ण असे आहे ह्या वातावरणात चपाती किंवा भाकरी पेक्षा भात शरिरासासाठी हलका असतो. याच अजुन एक उदाहरण म्हणजे दक्षिण भारतात जास्त करुन तांदळाचे पदार्थ बनविले जातात कारण तिथल आणि कोकणातील हवामान जवळपास सारखच आहे. आणि हे स्पष्ट करणारा दुवा म्हणजे "समुद्रकिनारा"
४. पुर्वापार कोकणात बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ हे त्या भागात येणा-या उत्पादनावर अवलंबुन आहे. तांदळापासुन पोहे, घावणे अगदि कनीपासुन भाकरी सुद्धा बनविली जाते
तेव्ह…

Loading Kokan.......... खरप -कालवं...

Image
खरप- कालवं...
हा मच्छी चा असा प्रकार आहे जो मुख्यत्वे कोकणात समुद्रकिनारी किंवा खा-या नदीकिनारी आढळतो. साधारणता एखाद्या खडबडीत व टोकेरी दगडाप्रमाणे असणा-या या "खरप" मध्ये एक चविष्ट मांसल भाग असतो. एखाद्या शिंपल्याच्या आतल्या भागात असतो तसा भाग या खरपात असतो. हे शोधताना अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा या "खरप" वर पाय पडला तर पायाला जखम होण्याचा संभव असतो. या धारधार करपाने कापल्याने झालेली जखम एखाद्या चाकुच्या वाराप्रमाणे असते. त्या "मूक जीवाच्या" स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली ती एक रचना आहे. एकदा कोकणात भेट देवुन "कालवांची आमटि" किंवा "मसाला फ्राय" केलेली "कालव" हा एक चविष्ट खाद्यप्रकार नक्कीच चाखुन पहा.
खरप शोधण आणि ते फोडुन त्यातील मांसल भाग काढणे हे एक किचकट काम आहे तेव्हा हे खरप काढुन आणि फोडुन विकणा-यांचा नेहमी आदर करा कारण ज्या "कोकणी माणसाला" आपण "आळशी" मानतो तो "कोकणी माणुस" हात पाय कापुन घेवुन हे काम करत असतो. छायचित्रात दिसणा-या ढिगभर खरपातुन फक्त ३-४ पेले(Cup) कालव(मांस) निघ…

(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)

Image
(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)


ब-याच दिवसांपासुन कुणीतरी १ आण्याची किंमत नसलेल्या "अणे" नावाच्या विकृत माणसाची बडबड ऐकतोय!! काय तर म्हणे स्वतंत्र विदर्भ हवा यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक कापणे, स्वतंत्र विदर्भाचा नकाशा, झेंडा तयार करणे पासुन महाराष्ट्र दिनाच्या विरोधात घोषणा देणे वगैरेंसारखी नौटंकी करण्याइतपत यांची मजल गेलीय. आणि आपल सरकार का यांचा "माज" सहन करतय कुणास ठावुक !!

एका बाजुला बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी पिढ्यांच्या पिढ्या आपले सर्वस्व अर्पण करीत असताना दुसरीकडे ही स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी लांडग्यांची औलाद किती हा विरोधाभास !!

स्वतंत्र महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणारे ते १०६ आत्मे नक्कीच हळहळत असतील एक दिवस हेच दिवस पाहण्यासाठीच का हे बलिदान दिले होते असा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल !!

इकडे बेळगावात कर्नाटक सरकार करत असलेले अत्याचार सहन करुनही महाराष्ट्रातच येण्यासाठी धडपडणा-या गेल्या अनेक पिढ्या आणि सध्याची तरुणाई या सर्वांना नक्की प्रश्न पडला असेल ह्याच महार…