सीमारेषा....




सकाळपासून WhatsApp ग्रुप, फेसबुकवर तुमच्यावॉर शुभेच्छचा वर्षाव होताना पाहतोय... लिहायला वेळ मिळत नव्हता मिळून इतक्या उशिरा काहीतरी खरडतोय....


संतोष दादा कुणासाठी देव, कुणासाठी दादा, प्रेरणास्थान, कुणासाठी वटवृक्ष, कुणासाठी मार्गदर्शक आहेत पण माझ्यासाठी माझ्या दुर्गवीर मधील "सीमारेषा" आहे हि मी कधी ओलांडू शकत नाही....


मी माझ्या आयुष्यात कुणालाच जुमानत नाही (असे माझे जवळचे लोक म्हणतात) मलाही तसच वाटत, कारण जॉबवर असो वा नात्यांमध्ये माझ्याबाबत कुणी "कुरापती" करायला लागलं कि मी त्याला आपटतो.... पण प्रत्येक क्षेत्रात मी अशी एक "सीमारेषा" ठेवलीय जी मला आवरू शकते ती पार केली तर मी "बाद" हा अलिखित करार मी स्वताशीच केलाय. दुर्गवीर मध्ये न बोलता अनेकांशी माझे "मतभेद" झाले असतील नंतर ते निवळले असतीलही. पण ते कितीवेळा आणि कुणाशी नीटसं आठवत नाही. पण संतोष दादांनी दिलेलं कुठलं काम मी "पूर्ण करू शकलो नाही" आणि त्यांना कधी मी "मला हे जमणार नाही" असं वाक्य नाईलाजास्तव बोलून दाखवलं तो प्रत्येक प्रसंग माझ्या लक्षात आहे. अगदी ४ वर्षांपूर्वी "मी तरी काय करू आता दादा" असं रागात दादाला बोललेलो वाक्य माझ्या लक्षात आहे. (मुळात तो दुस-या कुणावरच तरी राग होता).


रोज एक फोन न चुकता दादा करतो आणि काहीतरी चौकशी करतो तेव्हा बर वाटत पण जेव्हा १-२ दिवस फोन नाही आला तर "माझं काही चुकलंय का" हा प्रश्न मी स्वतःलाच विचारत राहतो... दादा अध्यक्ष म्हणून कधीच वागले नाहीत जेव्हा कधी संतोष दादांची ओळख नवीन माणसाला करून देतो तेव्हा "हे संतोष हसूरकर दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष" हे वाक्य खूप Odd वाटत त्यापेक्षा हे "संतोष दादा" हे वाक्य खूप जवळचे वाटते यातच दादाने आम्हाला जिंकलय...


मी आयुष्यात कुणाला जुमानत नसलो तरी "दुर्गवीर" मधील ह्या "सीमारेषेला" मी कधी पार करणार नाही एवढं नक्की


(एवढा जुना फोटो पोस्ट केला कारण या मोहिमेनंतरच "संतोष दादा" ह्या "सीमारेषे पलीकडे" जायचं नाही हा अलिखित करार मी स्वताशी केला होता..... )

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….