Posts

Showing posts from March, 2016

आभार………

Image
आभार……… आभार त्यां माता-पित्यांचे ज्यांनी मला "माझ्या कर्तव्यपूर्ती" साठी "जन्म" दिला आभार त्यां "दुर्गवीर" चे ज्यांनी "माझे कर्तव्य" पूर्ण करण्यासाठी "हात" दिला. आभार त्यां "मित्रांचे" ज्यांनी "माझ्यातला मी" मला दाखवून दिला. आभार त्या "हित शत्रूंचे" ज्यांनी माझ्या "चुकांचा पाढा" मला वाचून दिला. आभार त्यांचे ज्यांनी "विश्वास" नसतानाही "सार्थ" ठरवून दिला. आभार त्यांचे ज्यांनी मला "विश्वासघात" काय तो दाखवून दिला. या जन्मदिना दिवशी अनपेक्षित शुभेच्छा… "माझा परिवार" " दुर्गवीर" चे स्नेहसंमेलन आणि नेमका माझा जन्मदिवस म्हणजे "दुग्धशर्करा" योग म्हणावा लागेल. अगदी माझ्या "बारसा" होता तेव्हाही एवढ्या लोकांनी गर्दी केली नसेल इतकी काल होती. गेल्या २८ वर्षातील सर्वात मोठा "वाढदिवस"म्हणावा लागेल. अजित दादा, प्रशांत दादा, दर्शना (प्रांजल) ताई, अर्जुन दादा, रवींद्र दादा, गौरांगी ताई, उदय दादा, अश्या दुर्गवीर च्या डोंबिवली च

दोस्त म्हणतो...

Image
दोस्त म्हणतो... विजय बेंद्रे, मेघांत आणि उमेश जाधव तीन दोस्त काय म्हणतात हे आज अनुभवल. समोर कोणता रसिकवर्ग आहे ओळखायच आणि असे काहि काव्याविष्कार सादर करायचे की अगदि अलगदपणे समोर बसलेल्यांच्या मनात जावुन बसायच. घाटकोपर पुर्व येथे महाशिवरात्री निमीत्त काव्यवाचनाचा कार्यक्रम हा विचारच मुळी भन्नाट होता. गेल्या २-३ वर्षापासुन विजय बेंद्रेंच्या Live कार्यक्रमाला जाईन म्हणत होतो पण अचानक "(मध)माशी" शिंकायची आणि माझ जाण टळायच आज योग आलाच. तसा हा माझ्यासाठि गेल्या ८-१० वर्षातला पहिलाच काव्यवाचनाचा कार्यक्रम असावा. कॅालेज मध्ये असताना "जाम" कवीता केल्या तो "जाम" अजुन चपातीला लावुन खातोय..    तर विजय बेंद्रे, उमेश जाधव आणि मेघांत या तिघांना आज कवीता सादर करताना करताना पाहिल आणि जाणवलं काव्य हे अस माध्यम आहे की तुम्ही क्षणात एखाद्याला आपल बनवु शकता. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी यांनी कार्यक्रम केले आजवर शेकडो लोकांना आपलस केल असेल. तरुणाईंच्या (तरुणींच्या   ) गळ्यातील ताईत बनले असतील पण तिघांच्याहि वागण्यात गर्व नव्हता. उमेश बंधुंना मी पहिल्यांदाच भेटलो पण त्

कन्हैया कुमार.... (Updated Version of Kejriwal & Hardik Patel)

Image
कन्हैया कुमार.... (Updated Version of Kejriwal & Hardik Patel) कन्हैया कुमारच जेल मधुन सुटका झाल्यावरच भाषण ऐकल ! छान वाटल अतिशय मुद्देसुद आणि शांतपणे भाषण केल किंबहुना आपल मत मांडल. भविष्यात एक चांगला राजकारणी होणार इतक नक्कि (भविष्यात कशाला आत्ताच) या मुलाचा फोकस क्लिअर आहे. त्याने जे ठरवलय तसच तो वागतोय. सध्या त्याच लक्ष्य ABVB, भाजप, संघ आणि मोदि हे आहे. त्याच्या संपुर्ण भाषणात त्याने आपला फोकस यावरच ठेवला होता. फक्त JNU पुरता विचार करायचा तर तिथे अगदि कमी फरकाने तिथल्या निवडणुकांचा निकाल लागला. त्याने घेतलेले मुद्दे कोणते ? तर रोहित वेमुल्ला ची आत्महत्या, भाजपाच हिंदूत्वाच राजकारण, परिणाम सरकारच अपयश. त्याच्या म्हणन्यानुसार त्याला देशातच आझादि हवीय म्हणजे ज्या देशात तो देशद्रोहाचा आरोप (खरा खोटा माहित नाही ) लागुनही पुन्हा कॅालेज कॅंपस मध्ये मुक्तपणे वावरतोय, घोषणा देतोय त्या देशात त्याला आझादि हवीय बर कशासाठी तर देशात सुधारणा घडवायचीय, जातीभेद नष्ट करायचाय. छान !! हे विचार ऐकुन प्रभावित व्हायला होत. पण लगेच एक मुद्दा लक्षात येतो जर जातीभेद नष्ट करायचाय तर लाल झेंडा, न