Friday, 28 June 2013

ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा


ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा  
या फोटोत दिसणा-या दोन व्यक्ती आजवरच्या माझ्या आयुष्यातील २ वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय / आदर्श व्यक्ती. 
प्रथम दोन्ही व्यक्तींची ओळख डावीकडील संतोष दादा दुर्गवीर प्रतिष्ठान (परिवार) चे अध्यक्ष पण ते आमच्या सर्व दुर्गवीर आणि वीरांगणांसाठी "संतोष दादा" आणि उजवीकडील श्री. धन्वी सर घेरासुरगड च्या पायथ्याशी असलेल्या खांब गावातील "नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री रामचंद्र गणपत पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब"  या शाळेतील एक शिक्षक 

प्रथम संतोष दादा बद्दल, माझी आणि संतोष दादाची पहिली भेट २६ फेब्रुवारी २०१२  सुरगड मोहिमेच्या वेळी.  आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री संतोष दादा मारुती मंदिरात दुस-या दिवशीच्या मोहिमेत काय काय काम करायचं हे सांगत होता.  ते ऐकताना मला स्वताला जाणवत होत कि, बस हेचे ते शिवकार्य  जे आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे.  दादाचा एक एक शब्द मी मन लावून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात अस कुठे जाणवत नव्हत कि आपल्याला संस्था मोठी करायचीय; त्याच धेय्य स्पष्ट होत "गडसंवर्धन आणि शिवकार्य" त्यात  कुठेही खोटेपणा जाणवत नव्हता.  प्रत्येक मोहिमेनंतर दादाने प्रत्येक दुर्गवीर शिलेदाराला दिलेली कौतुकाची थाप एका योग्य "प्रमुखाच" लक्षण होत. प्रत्येक मोहिमेत दादा असतोच. मोहिमेअगोदर प्रत्येक गोष्टीची आखणी करणे आणि मोहिमेवेळी त्या गोष्टी अमलात आणणे हि दादाची तारेवरची कसरत दुर्गवीर चा प्रत्येक शिलेदार पाहत असतो.  कधी कधी प्रकृती संतोष दादा ला हे कार्य करण्यापासून थोपावते, पण थांबेल तो शिवरायांचा मावळा कसला हा विचार करून दादा जोमाने कामाला लागतो.  आजवर दादासोबत कितीतरी "शिवप्रेमी" या कार्यात येउन गेले सुद्धा असतील, पण दादा कधी थांबला नाही कोणी नाही तर "एकाला चलो रे" या पक्तीनुसार दादा चालत राहिला.  कोणालातरी वाटेल यात संतोष दादा ला काहीतरी फायदा असणार!! बरोबर आहेत ते……  आहे ना दादाला खूप मोठा फायदा आहे!  तो म्हणजे "शिवकार्य केल्याचा आनंद" "हे गड राखण्यासाठी उचलेल्या आपल्या खारीच्या वाट्याचा आनंद" हा फायदा जर एखाद्या Balance Sheet मध्ये घेतला तर Assets च जास्त होतील त्या पण Fix Assets (Commerce च्या लोकांना समजलेच असेल) दादा सोबत काम करताना एक जाणवलं दादा ला एखाद्या व्यक्तीचा राग आला तरी तो बोलून दाखवत नाही कारण त्याला माहित असते "जर एखाद्या व्यक्तीचे एक गोष्ट चुकत असेल तरी त्याने बरोबर केलेल्या गोष्टीनां नाकारता येत नाही" (मी दादाची शिवरायांशी तुलना नाही करत) पण "शिवरायांनी प्रत्येक मावळ्याच्या चागल्या गुणांचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला त्याच्या दोषांवर पांघरून घालत" पण त्यासोबतच शिवराय अक्षम्य चुका करणा-याला दंडही करत हे लक्षात घ्यायला हवे.  कदाचित दादा एखाद्याच्या दोषांवर पांघरून घालतोय याचा अर्थ त्याला काही समजत नाही अस नाहीय ना!  खर तर माझ्याकडूनही खुपश्या चुका झाल्या तेव्हा मलाही वाटायचं माझ्या या चुकीमुळे माझा दुर्गवीर परिवारातील मधील प्रवास संपतोय कि काय? पण दुस-याच दिवशी संतोष दादाच फोन येतो आणि दादाचा आवाज येतो "काय धिरु काय चाललय?" आणि माझा जीव भांड्यात पडतो.  असा आमचा दादा कितीही काही झाल तरी शिवकार्यात कुठेही कमीपणा पडू देत नाही. आज दुर्गवीर परिवार तर्फे गडसंवर्धन करताना अनेक आर्थिक अडचणी येतात पण दादा त्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कुठल्याही चुकीच्या मार्गाचा वापर करत नाही आणि हेच त्याच्या यशाच रहस्य आहे.  आज दुर्गवीर परिवाराची धुरा सर्व दुर्गवीर शिलेदारांवर आहे परंतु या सर्व शिलेदारांना एकत्र ठेवण्याच कठीण कार्य संतोष दादा करतोय. मी तर आयुष्याच्या शेवटपर्यंत हे शिवकार्य करणार आहे. आणि तुम्हीहि हे शिवकार्य करून बघाच!!  कुठल्या तरी फालतू गोष्टींसाठी वेळ वाया घालविण्यापेक्षा खूप जास्त आनंद मिळेल या शिवकार्यात
हे झाल दुर्गवीर च्या संतोष दादा बद्दल आता दुर्गवीरमुळेच मी ज्या सरांच्या संपर्कात आलो ते श्री. धन्वी सर त्यांच्याबद्दल……. यांच्या बद्दल सांगायचं तर राहणीमान नीटनेटके एखद्या शिक्षकाला शोभेल असे.  विचार स्पष्ट आणि भविष्य नजरेसमोर ठेवून विचार करणारे व्यक्तिमत्व.  यांचा ध्यास शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा.  खांब गावाजवळ असलेल्या एका आदिवासी पाड्यातील ५० - १०० मुलांना ज्ञानदानाचे कार्य हे सर करतात. फळाची अपेक्षा नाही आणि खूप मोठे कार्य गेल्याचा गर्व नाही. त्यांच्या बोलण्यात एक स्पष्ट जाणवत ते म्हणजे तेथील आदिवासी पाड्यातील मुलांनी किमान शिक्षण मिळायला हव जे त्यांना त्याच्या आयुष्यात उपयोगी पडेल.  आज त्या विभागात या संस्थेच्या दोन शाळा आहेत सरकारच अनुदान नाही त्यामुळे शाळा चालवायची कशी हा प्रश्न येतो तर काही माजी विद्यार्थ्याकडून येणारी देणगी तसेच प्रत्येक शिक्षक स्वताच्या पगारातून वर्षाला रु.१०००/- प्रमाणे देणगी काढतात.  इतर काही सामाजिक संस्था काही मदत करतात त्यावर हि शाळा चालते.  खरच त्यांची धडपड पाहून मन हेलावत.   त्या आदिवासी मुलांना "ज्ञानदान" करण्यासाठी किती ती धडपड.  त्यांच्या याच कार्याला मदत म्हणून आम्ही दुर्गवीर आणि सेवा सहयोग च्या माध्यमातून तिथे स्कूल कीट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांच्या कार्याबद्दल आम्हाला अजून जास्त माहिती मिळाली. आम्ही नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळा च्या दुस-या शाळेला भेट दिली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समजली येथे आदिवासी मुले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी किमान ११ - १२ कि. मी. चे अंतर पायी चालत जातात.  सलाम त्या मुलांना शिक्षणासाठी किती पायपीट नाहीतर आपण…….  खूप सुखी जीवन जगतोय आपण सर्वजण.  खरच जसे तिथले शिक्षक तशीच मुले.  अजून एक गोष्ट मला इथल्या शाळेत जाणवली तिथल्या शाळेच्या प्रत्येक वर्गाला एक नाव दिले होते १० वी चा वर्ग "कळसगिरी", ९ वी चा वर्ग "कळसूबाई",  ८वी चा वर्ग सह्याद्री,  अशी अगदी इतिहासाला हाक देणारी नाव बघून अगदी मन भरून आल.  हि कल्पना इथल्या मुंबईतल्या एका तरी शाळेला सुचली का नाही ?  तिथल्या मुलांचे मार्क अगदी ५० टक्यांपासून ८६ टक्यांपर्यंत ते कोणत्याहि क्लासला न जाता.  का घडते असे? कारण आहे त्यांची शिक्षणाबद्दल ची आत्मीयता आणि ओढ. मुलांची शिक्षणाबद्दल ची ओढ लक्षात घेऊनच श्री धन्वी सर हे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत आणि दुर्गवीर परिवार त्यांना सर्वोतपरी नक्की मदत करेल.  दुर्गवीर परिवारा तर्फे एक संगणक संच या शाळेस देण्याचा मानस आहे.  थोड्या आर्थिक बाबींची जुळवा जुळव झाली तर तर हे प्रत्यक्षात उतरू शकतो. माझा हा लेख वाचून जर तुम्हाला काही या शाळेसाठी, मुलांसाठी काही करावेसे वाटत असेल तर नक्की करा. कोणत्याही दानशूर व्यक्तीला काही मदत करावयाची असल्यास नक्की संपर्क करा. तुम्हाला या शाळेला , या मुलांना भेट द्यायची असल्यास वैयक्तिक किंवा दुर्गवीर च्या एखाद्या मोहिमेत सहभागी होऊन त्या ठिकाणास नक्की भेट द्या आणि श्री धन्वी सर या मुलांना करत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्यात त्यांची नक्की मदत करा.  
शेवटी मला सांगावस वाटत दोन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे हे दोन तारे एक संतोष हसुरकर जे गड किल्ले वाचविण्यासाठी गडसंवर्धन / श्रमदानाचे कार्य करतात आणि दुसरीकडे श्री धन्वी सर जे गरजू, गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य करतात.
माझा या दोन्ही व्यक्तींना मानाचा मुजरा……… 
जय शिवराय 

Thursday, 27 June 2013

प्रेमांकुर

(एक मुलगा पहिल्यांदाच एक मुलीच्या प्रेमात पडलाय न ओळख ना पाळख लांबूनच तिला पाहून आपल्या भावना व्यक्त करतोय त्या अश्या)


प्रेमांकुर..

प्रेमांकुर हा अचानक फुलू पाहतोय आज,
प्रेम झरोका बेधुंद उडू पाहतोय आज
मन माझे या प्रेमरंगात बुडू पाहतेय आज,
त्या रंगात प्रेमात तुला भिजवू पाहतेय आज.....

जागेपणी तुझ्या स्वप्नात हरवू पाहतोय आज,
स्वप्नातच तुझा कोमल स्पर्श अनभवू पाहतोय आज
स्पर्शाने तुझ्या बहरु पाहतोय आज,
बहरणारा हा स्पर्श तुला देऊ पाहतोय आज....

चोरून हळूच तुला मी पाहतोय आज,
पाह्ताना तुझ्यात हरवून जातोय आज
तुझ्याच रंगात रंगतोय आज, 
या प्रेमाची धुळवड खेळतोय आज

ठरवून पक्क्के अन रोखून श्वास आज,
प्रेमाचे मागणे तुला  घालीन आज
नाही मानलीस तर थांबेन आज,
उद्या पुन्हा तुझ्या प्रेमाच सजवेन साज 

(प्रकाशनाचे प्रथम हक्क http://www.premrang.com/ कडे) 

Monday, 3 June 2013

मैत्र जीवांचे... क्षण हास्याचे!!!
मैत्र जीवांचे
क्षण हास्याचे 
तुम्हा शिवाय ना 
लाभती मजसी
हे क्षण प्रेमाचे 
नाते नसले आपुले
जरी रक्ताचे 
धेय्य आम्हास असे 
फक्त शिवकार्याचे 
फक्त शिवकार्याचे

माझ्या दुर्गवीर बंधुसाठी…. 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...