Friday, 8 December 2017

गरजकुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय"
कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय" 

दुर्गवीर चा धीरु

Wednesday, 29 November 2017


होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल…..
#JoyOfHappiness
माझे अंतरंग
https://mazeantrang.wordpress.com/

Monday, 11 September 2017

उजेडाचे डोळे ओलेजगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “उमेश जाधव“.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत.
दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील विजय बेंद्रे जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि मेघांत प्रेम मांडत असेल तर उमेश दादा दुःख, व्यथा मांडतात किंबहुना तुम्हाला तुमच्या एखाद्या व्यथेशी, दुःखाशी समरस करून व्यक्त करायला भाग पाडतात. सूत्रसंचालक सौरभ नाईक यांनी आजच्या कार्यक्रमात उमेश दादांच्या माळीण दुर्घटनेबाबतच्या कवितेची एक आठवण सांगितली. माळीण दुर्घटनेबाबत उमेश दादांची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती त्यावेळी पुण्याच्या एका व्यक्तीचा उमेश दादांना फोन आला.  त्या व्यक्तीच्या नात्यातील ८-१० माणसं या दुर्घटनेत जागीच गेली. कामाच्या निमित्ताने ती व्यक्ती पुण्याला आल्याने या अपघातातून वाचली.  या दुर्घटनेनंतर ह्या व्यक्तीच्या जणू संवेदना नष्ट झाल्या होत्या की काय म्हणून तो मोकळेपणाने रडू शकला नाही.  पण उमेश दादांची कविता वाचल्यावर तो मोकळेपणाने रडला. यावरून उमेश दादांच्या कवितेचा दर्जा लक्षात येतो. बरं इतकं दर्जेदार असूनही साधं भोळं राहणं कसं जमत कुणास ठावूक ?? Social दुनियेतल्या Like, Comment च्या बाजारापासून अगदी दूर कुठेतरी हा “उमेश वामन जाधव” नावाचा तारा चमकतोय.  तुम्हाला Whatsapp, Facebook वर सामाजिक विषयावरील एखादी अनामिक कविता जर आली तर ती कदाचित उमेश दादांची असू शकते आणि “कवितेखाली माझे नाव का नाही” याचा दोन ओळींचा साधा निषेधही दादा कधी व्यक्त करीत नाहीत.कार्यक्रमात त्यांच्या मित्रानी सांगितल्याप्रमाणे दादा मैत्रीखातीर अश्या कितीतरी रचना विनामूल्य स्वतःच नाव न लावता देतात आणि आम्ही आमचा फेसबुकचा चार ओळींचा स्टेटस चोरला तर दोन पानांचा निषेधाचा लेख लिहितो.  खरंच दादा जमलं तर तुमच्यातला नम्रपणा थोडासा… अगदी एक टक्का जरी आम्हाला दिलात तर खूप बरं होईल.
आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात चंद्रशेखर सानेकर, संदीप माळवी, प्रशांत मोरे, उंच माझा झोका या गीताचे गीतकार आणि जेष्ठ कवी  अरुण म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांच्या सोबत उमेश दादांच्या आईवडिलांचा सत्कार होणं मला वाटतं उमेश दादांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असावा. दादांनी कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतच लिहिलंय की, “ज्यांच्या उजेडाच्या कष्टात, मी माझ्या आयुष्याची कविता वाचतो आहे त्या माझ्या आईवडिलांना सविनय अर्पण”….खरंच त्या माता पित्याला अभिमान वाटावा असं लेकरू आहे त्यांचं…..
उमेश दादांच्या पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना अमोल शिंदे बोलले की मला आनंद यासाठी वाटतोय की आमच्या पिढीच एक पुस्तक आलंय… खरंच आमच्या पिढीचं कवितेचं एक पुस्तक आलय याचा आम्हाला अभिमान वाटतोय. प्रत्येकाने कवितेचे नेमके काय प्रकार असतात नुसतं हे जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलं तरी डोक्यात प्रकाश पडेल.
याअगोदर ज्या माळीण दुर्घटनेवरील कवितेचा उल्लेख केला त्या कवितेतील मला भावलेल्या ओळी…..
निष्पाप गेले जीव,
काय त्यांचा गुन्हा,
वाचलेला बाळ आता,
आई म्हणेल कुणा…..
काव्यसंग्रहाचे नाव :- उजेडाचे डोळे ओले
कवी :- उमेश वामन जाधव (8879803162)
प्रकाशक:- सई प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ :- विष्णू थोरे
पृष्ठसंख्या :- ६७
मूल्य :- रु.८०/-

Friday, 8 September 2017

सामानगड दुर्गसंवर्धन.....


तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो सक्रिय सहभाग आणि सहकार्य ..... महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे. साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती. याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा..... संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले. आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत. वन विभागाचे अधिकारी काटकर सर आणि पुरातत्व विभाग आणि स्थानिक शासकीय अधिकारी अगदी आपलेपणाने दुर्गवीर च सहकार्य करू लागले. आपल्याकडे एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब अशी काहीशी पण या सर्व अधिकाऱ्यांनी मात्र ते या म्हणीला अपवाद असल्याचे दाखवून दिले. अगदी मोठ्या भावाने लहान भावाला समजावून सांगावे इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य केले. मी कोणी मोठा सरकारी अधिकारी आहे मग मी का या गोष्टी सांगू??? असा कोणताही उद्धेश त्यांचा नव्हता. स्थानिक तरुण तरुणी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने आज समानगडाचे काम नियमितपणे सुरु आहे. मूळ गाव जवळ असले तरी स्वतःच्या गावी जितक्या फेऱ्या होत नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा सामानगड परिसरात ये जा करून संतोष हसूरकर तिथल्या कामाचा आढावा घेत असतात. दुर्गवीर प्रतिष्ठान हे कार्य वाढत असताना त्यात अजून एक दुग्धशर्करा योग्य जुळून आला. गेल्या काही महिन्यांपूर्वी "छत्रपती संभाजी महाराज"(कोल्हापूर) यांनी दुर्गवीर च्या कार्याची माहिती घेतली आणि राज्यभिषेकाप्रसंगी सामानगडावर काम करणाऱ्या प्रत्येक दुर्गवीराचा सत्कार करण्यात आला. गेल्या महिन्यात "छत्रपती संभाजी महाराज" यांनी समानगडाला प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि कामाची पाहणी केली. सामानगडाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. "छत्रपती संभाजी महाराज" यांची साथ हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.


स्थानिक दुर्गवीर, स्थानिक लोक, सरकारी अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने सामानगडाला शिवकालीन वैभव परत मिळवून देण्यात दुर्गवीर प्रतिष्ठान नक्कीच यशस्वी ठरेल हा मला विश्वास आहे......

Friday, 18 August 2017

Joy Of Happiness


#JoyOfHappiness
माझ्या एका परिचयाच्या व्यक्ती ने मला विचारल “तुम्ही लातुर ला जे सोलार दिवे, भांड्यांचे किट, वाचनालय, शाळेची इमारत देणार, या एवढ्या मोठ्या उपक्रमात माझ्या २००-५०० रुपयाने काय फरक पडणार ?? पण निट विचार केला तर फरक पडतो एक सोलार दिवा रु.७००/-, एक भांड्यांच किट रु.२५०/-, एक वाचनालय रु.५०००/-(अंदाजे). यातुन स्वेच्छेने किती सोलार लॅंप किंवा भांड्यांच्या सेट ची किंमत तुम्ही देवु शकता हे तुम्ही ठरवा. तुमच्या छोट्यातली छोटी मदत एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश देवु शकतो. तुमच्या सहकार्यानेच उभ्या राहणा-या शाळा आणि वाचनालयातुन एक सुशिक्षीत पिढि घडणार आहे.
फरक पडतो फक्त तुमचा मदतीचा एक हात सर्व परिस्थिति सुधारु शकतो. लोकसहभागात एक ताकद असते जी एक पिढि घडवु शकते. तुम्ही सहकार्य तर कराच शिवाय तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंना नक्की आवाहन करा.
संपर्क:-
टीम : दुर्गवीर प्रतिष्ठान
संतोष हसुरकर 9833458151 अजित राणे 8097519700 नितीन पाटोळे 8655823748
टीम MSA
नितेश जाधव 9967070987 / प्रशांत टक्कर 9967500889 / नंदू चव्हाण 9892042704
मदत रोख स्वरुपात द्या किंवा चेक स्वरुपात किंवा बॅंक ट्रान्सफर करा.
बँक तपशील :-
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )
www.durgveer.com

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...