सामानगड दुर्गसंवर्धन.....


तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो सक्रिय सहभाग आणि सहकार्य ..... महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे. साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती. याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा..... संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले. आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत. वन विभागाचे अधिकारी काटकर सर आणि पुरातत्व विभाग आणि स्थानिक शासकीय अधिकारी अगदी आपलेपणाने दुर्गवीर च सहकार्य करू लागले. आपल्याकडे एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब अशी काहीशी पण या सर्व अधिकाऱ्यांनी मात्र ते या म्हणीला अपवाद असल्याचे दाखवून दिले. अगदी मोठ्या भावाने लहान भावाला समजावून सांगावे इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य केले. मी कोणी मोठा सरकारी अधिकारी आहे मग मी का या गोष्टी सांगू??? असा कोणताही उद्धेश त्यांचा नव्हता. स्थानिक तरुण तरुणी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने आज समानगडाचे काम नियमितपणे सुरु आहे. मूळ गाव जवळ असले तरी स्वतःच्या गावी जितक्या फेऱ्या होत नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा सामानगड परिसरात ये जा करून संतोष हसूरकर तिथल्या कामाचा आढावा घेत असतात. दुर्गवीर प्रतिष्ठान हे कार्य वाढत असताना त्यात अजून एक दुग्धशर्करा योग्य जुळून आला. गेल्या काही महिन्यांपूर्वी "छत्रपती संभाजी महाराज"(कोल्हापूर) यांनी दुर्गवीर च्या कार्याची माहिती घेतली आणि राज्यभिषेकाप्रसंगी सामानगडावर काम करणाऱ्या प्रत्येक दुर्गवीराचा सत्कार करण्यात आला. गेल्या महिन्यात "छत्रपती संभाजी महाराज" यांनी समानगडाला प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि कामाची पाहणी केली. सामानगडाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. "छत्रपती संभाजी महाराज" यांची साथ हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.


स्थानिक दुर्गवीर, स्थानिक लोक, सरकारी अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने सामानगडाला शिवकालीन वैभव परत मिळवून देण्यात दुर्गवीर प्रतिष्ठान नक्कीच यशस्वी ठरेल हा मला विश्वास आहे......

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….