Posts

Showing posts from August, 2016

माझे नाव आदिती शरद शिंदे.....

Image
माझे नाव आदिती शरद शिंदे..... माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनकाईबारी तालुका येवला, जिल्हा नाशिक मी इयत्ता ४ थी मध्ये शिकते. हे असे चुणचुणीत बोल बोलणारी ही मुलगी! बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास! वागण्यात हरीणीची चपळता आणि चेह-यावर निरागस हास्य !! अश्या ह्या चुणचुणीत रणरागीणीची ओळख झाली दुर्गवीर च्या शालेय वस्तु वाटपाच्या नाशिक दौ-यात ! अगदि तळागाळातल्या गावच्या मुलीमध्ये असलेला आत्मविश्वास पाहता मला नाहि वाटत की खेड्यातल्या या मुलीला उंच भरारी घ्यायला कोणी रोखु शकेल ! कदाचित अडथळा असेल तर “परिस्थितिचा”….. घरची हलाखीची परिस्थिति या मुलीला अभ्यासात आणि आयुष्यात भरारी घेण्यापासुन "कदाचित" रोखु शकेल ! आई-वडिल “पाथरवट” त्यामुळे कामानिमीत्त मोलमजुरी करत गावोगावी फिरतात. ही मुल त्यांच्या आजी आजोबांकडे.... मग काय शाळेतुन मुल घरी गेल्यावर घरचे हे विचारत नाहित की "बाळा आज शाळेत काय शिकवल" तर तर एका हाताने शाळेची पुस्तकांची पिशवी (हो पिशवीच कारण दप्तर घेण्याइतकी परिस्थिति नसते) ठेवली, की दुस-या हातात विहिरीवरुन पाणी भरायला कळशी दिली जाते. अभ्यास कर