Posts

Showing posts from May, 2016

कोकणी भात बोकणी....

Image
कोकणी भात बोकणी....
हे वाक्य फार पुर्वीपासुन ऐकत आलो पण त्याचा अर्थ आता उमगतोय. महाराष्ट्रातील इतर प्रांतात जेवढा भात वर्षाला खातात तेवढा भात कोकणी माणुस महिण्याला खातो(ही अतिशयोक्ती नाही बरं...) पण भातच का ? चपाती, भाकरी, किंवा अजुन का नाही याला कारण अनेक आहेत
१. कोकणात तांदुळ हे उत्पादन सहजतेने येणारे उत्पादनआहे. त्याला पण मेहनत लागते हा. नाहितर सहजतेने म्हणजे अगदि रान उगवल्यासारख तांदुळ उगवत नाहि मळ्यात.
२. चपातीसाठी लागणारा गहु क्वचितच कोकणात पिकतो किंबहुना पिकतच नाहि. याला बरीच नैसर्गिक किंवा आर्थिक कारणे असु शकतात.
३. कोकणातील वातावरण हे समुद्रकिणा-यावरील उष्ण असे आहे ह्या वातावरणात चपाती किंवा भाकरी पेक्षा भात शरिरासासाठी हलका असतो. याच अजुन एक उदाहरण म्हणजे दक्षिण भारतात जास्त करुन तांदळाचे पदार्थ बनविले जातात कारण तिथल आणि कोकणातील हवामान जवळपास सारखच आहे. आणि हे स्पष्ट करणारा दुवा म्हणजे "समुद्रकिनारा"
४. पुर्वापार कोकणात बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ हे त्या भागात येणा-या उत्पादनावर अवलंबुन आहे. तांदळापासुन पोहे, घावणे अगदि कनीपासुन भाकरी सुद्धा बनविली जाते
तेव्ह…

Loading Kokan.......... खरप -कालवं...

Image
खरप- कालवं...
हा मच्छी चा असा प्रकार आहे जो मुख्यत्वे कोकणात समुद्रकिनारी किंवा खा-या नदीकिनारी आढळतो. साधारणता एखाद्या खडबडीत व टोकेरी दगडाप्रमाणे असणा-या या "खरप" मध्ये एक चविष्ट मांसल भाग असतो. एखाद्या शिंपल्याच्या आतल्या भागात असतो तसा भाग या खरपात असतो. हे शोधताना अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा या "खरप" वर पाय पडला तर पायाला जखम होण्याचा संभव असतो. या धारधार करपाने कापल्याने झालेली जखम एखाद्या चाकुच्या वाराप्रमाणे असते. त्या "मूक जीवाच्या" स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली ती एक रचना आहे. एकदा कोकणात भेट देवुन "कालवांची आमटि" किंवा "मसाला फ्राय" केलेली "कालव" हा एक चविष्ट खाद्यप्रकार नक्कीच चाखुन पहा.
खरप शोधण आणि ते फोडुन त्यातील मांसल भाग काढणे हे एक किचकट काम आहे तेव्हा हे खरप काढुन आणि फोडुन विकणा-यांचा नेहमी आदर करा कारण ज्या "कोकणी माणसाला" आपण "आळशी" मानतो तो "कोकणी माणुस" हात पाय कापुन घेवुन हे काम करत असतो. छायचित्रात दिसणा-या ढिगभर खरपातुन फक्त ३-४ पेले(Cup) कालव(मांस) निघ…

(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)

Image
(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)


ब-याच दिवसांपासुन कुणीतरी १ आण्याची किंमत नसलेल्या "अणे" नावाच्या विकृत माणसाची बडबड ऐकतोय!! काय तर म्हणे स्वतंत्र विदर्भ हवा यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक कापणे, स्वतंत्र विदर्भाचा नकाशा, झेंडा तयार करणे पासुन महाराष्ट्र दिनाच्या विरोधात घोषणा देणे वगैरेंसारखी नौटंकी करण्याइतपत यांची मजल गेलीय. आणि आपल सरकार का यांचा "माज" सहन करतय कुणास ठावुक !!

एका बाजुला बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी पिढ्यांच्या पिढ्या आपले सर्वस्व अर्पण करीत असताना दुसरीकडे ही स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी लांडग्यांची औलाद किती हा विरोधाभास !!

स्वतंत्र महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणारे ते १०६ आत्मे नक्कीच हळहळत असतील एक दिवस हेच दिवस पाहण्यासाठीच का हे बलिदान दिले होते असा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल !!

इकडे बेळगावात कर्नाटक सरकार करत असलेले अत्याचार सहन करुनही महाराष्ट्रातच येण्यासाठी धडपडणा-या गेल्या अनेक पिढ्या आणि सध्याची तरुणाई या सर्वांना नक्की प्रश्न पडला असेल ह्याच महार…