Posts

Showing posts from September, 2012

खुप दिवसांनी..............

खुप दिवसांनी.............. खुप दिवसांनी..............
खुप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत, मनातल्या भावानांना आज प्रस्थान करावस वाटत, ती ऐकेल म्हणून, खुप बोलावस वाटत, ती वाचेल म्हणून, खुप लिहावस वाटत.
खुप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत, कुणाच्यातरी आठवनीत रमावस वाटत, सहजच ती आठवल्यावर गालात हसावस वाटत, छानस लाल गुलाब तिला दयावस वाटत, त्यावेळच तीच हास्य पाहावस वाटत.
खुप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत, सर्व काही विसरून तिला आठवावस वाटत, तिच्या आठवनिंमध्ये बावळट व्हावस वाटत, तिची वाट पाहत उभ राहावास वाटत, तिला येताना पाहून तिच्याकडेच पाहावास वाटत.
खुप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत, तिने माझी आठवन काढावी अस वाटत, याच विचाराने बहरलेल मन पहावस वाटत, सहजच ती समोर आली तर, तिला ते मन दाखवावस वाटत. धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/

मी........... माझे जीवन

मी........... माझे जीवन
काय माझे जीवन हे असे, ज्याला प्रेमात पड़ने जमत नाही मैत्रीची कास धरतोय मी, पण प्रेमाशिवाय करमत नाही..
मैत्रीच्या शोधातिल हे मन, प्रेमाताही कधी पडले होते, कुणाच्या तरी दुखाविण्याने , चार हात दूर राहिले उभे....
मैत्रीचे शंखशिंपले, कर्तव्याच्या जाळ्यात कधी अडकले, कधी मैत्रीलाच प्रेम समजून, अजाणतेपणी हे पाप केले......
कुणीतरी वाचावी, म्हणून नव्हती कविता रचलेली, "जी" ने ती वाचली, ती मैत्रीपासून दूर गेली......
ती सुद्धा अशीच आलेली, न बोलताच निघून गेली, मी फ़क्त कविता रचली, ना नंतर मात्र कधी आठवण काढली........
आताही जीवनाने असाच खेळ केला, शांत बसलेल्या माझ्या मनाला, जाणून बुजून त्रास दिला, खुप दिवसांनी हृदयात दुखाचा हुंकार आला......
बस! थांबवायचय या चक्राला, ज्यात दुखाची किनार हर सुखाला, माझ्या मनात जो गैरसमज झाला, तो तिच्याही मनात असेल का भला....
तिच्या गैरसमजाने मी का रागावालो, नंतर मीच का तिच्यात गुन्तलो, मी आयुष्यात पुन्हा चुकलो, स्वताच्या नजरेतून पुन्हा उतरलो....
का मी असा चुकलो, कर्तव्यापासून दूर गेलो, शुद्ध मैत्रिला सोडून कुठेतरी वाहत गेलो.....
माफ कर तू मला, चुक झाली एक क्षणाला, मी समजाव…

जगण कसतरिच होत,

जगणकसतरिचहोत, जेव्हाआपलंचअसकोणीमनदुखावत, तूमाझातूमाझाम्हणून, अलगदचदूरजात.....
जगणकसतरिचहोत, जेव्हास्वार्थासाठीकोणीफसवत, मनगुंतलयअसदाखवून, सहजचमनातलकाढूनघेत....
जगणकसतरिचहोत, जेव्हाजीवनाचाअर्थकोणीबदलत, अगोदरमैत्रीचाअर्थसांगुन, नंतरमैत्रिलाचनीरर्थकबनवत.....
जगणकसतरिचहोत, जेव्हामैत्रितचस्वार्थदिसतो, स्वार्थानेमाखलेलेहेजग, आणित्यातआपलामित्रदिसतो...
जगणकसतरिचहोत जेव्हाआपलचमनरडतअसत, आणिआपलेम्हनवणारेत्यावेळी, बिनदिक्तपणेदूरजातात... जगणकसतरिचहोत, जगणकसतरिचहोत.........
धिरजलोके (दुर्गवीरचाधीरु) Dhiraj Loke

आज तुला मनसोक्त रडायचय.............

आज तुला मनसोक्त रडायचय.............
आज तुला मनसोक्त
रडायचय,रडून घे.......
सुदैवावर कि दुर्दैवावर,
याचा विचार सोडून दे.
जवा एवढ्या सुखाने,
दुःख पर्वता तोडून दे,
नियतीच्या या अजब खेळास,
जिद्धिने जिंकुन घे.....
जवाएवढया सुखावर,

नसतो आनंद मानायचा,
दुखाला सामोरे जा,
सुख हे येतच राहत.
कमजोर कधी समजू नकोस,
तुझ्या या खंबीर मनास,
पड़ती बाजू घेण्यापेक्षा,
चिकटून रहा थोड्याश्या स्वाभिमानास.
कर्म आपले करत राहायच,
दुखाचा भागाकार होत राहतो,
शेवटी जी बाकी राहील,
त्यातच सुखाचा वाटा असतो.
एका मागुन एक दुःख आली,
म्हणून का ही तुझी अवस्था झाली,
अश्रुना गाळन्याने आता,
ती कुठे कमी झाली.
जीवन जरी दुखी असल,
दुस-यावरती जगणार,
तरी ते बांडगुळ नसत,
दुस-यावरती जगणार अन् मरणार,
तुझ जीवन तू जगत जा,
कोणावरही अवलंबुन राहू नकोस,
आतल्या आत कुढन्यापेक्षा,
रागाने तू पेठुन उठ.
देवाने देताना सुख दिल,
तितकच वाटुन दुःख दिल,
फ़क्त तुझ्या नशिबाने त्याला वाटताना,
मन थोड कंजुष केल,
भावना जर दिल्या नसत्या,
तर भावनिक होता आल नसत,
पण भावनां शिवाय असनारयाला,
मानुस म्हणन कस जमल असत......

धिरज लोके (दुर्गवीर चा धीरु) Dhiraj Loke

मैत्री...............

मैत्री...............
जीवनाच्या वाटेवर,
कधीही कुनाशी हसलो नसतो,
तुला न भेटल्याने,
खरया मैत्रिला मुकलो असतो.

मैत्रिच्या या नंदनवनात,
ना कुनावरही बंधन असत,
हळूवारपणे जोड्लेल्या,
दोन मनांच स्पंदन असत.

मैत्रिच्या या कळीला,
स्वताहून फुलू द्यायच असत,
ओढून ताणून फुलविन्यापेक्षा,
वाट पाह्न्यातच खर धैर्य असत.

भरपुरश्या मित्र मैत्रिनिंपेक्षा,
खरया मैत्रित रहाव,
कुनाशितरी बोलन्यापेक्षा,
खरया मैत्रिला जपाव.

कुणाशितरी मैत्री होतेय,
तर दोन पावल पुढे जाव,
खरा मित्र मागे राह्तोय,
तर लगेचच मागे वळाव.

भले जरी जीवन संपले,
मैत्री कधी थान्बवु नये,
दोन खरया मित्रांच्या मनात,
गैरसमजाला थारा देऊ नये

धिरज लोके (दुर्गवीर चा धीरु )
Dhiraj Loke

मी..............

मी..............
माझ हे असच असत.....................
कधी हसण असत,
तर कधी उगाचच रडण असत,
आनंदोस्तवातही तोंड रडव असत.

माझ हे असच असत.....................
समोरचा कितीही बोलो,
माझ गप्प बसन असत,
गंमतीवरही रागावन असत.

माझ हे असच असत.....................
खरया मैत्रिला न समजता,
मन दुश्मनाच्या मैत्रित असत,
अन् खरया मैत्रिचा अपमान करत असत.

माझ हे असच असत.....................
बसल्या बसल्या विचारत हरवन,
सहजच खिडकिबाहेर पाहन,
मान वळवून स्वताशिच हसन,

माझ हे असच असत.....................
ती पाहेल म्हणुन,
हळूच तिची नजर चुकवन,
जुन्या चुकिला पुन्हा घाबरण.

माझ हे असच असत.....................
कुणीतरी पाह्तय म्हणुन,
मान खाली घालून चालन,
पण नंतर हळूच प्रेमावर कविता करण.

माझ हे असच असत.....................
प्रथम खरी मैत्री शोधन,
नंतर खर प्रेम शोधन,
दोन्हींच्या भंगानंतर उगाचच रडन..

माझ हे असच असत.....................
माझ हे असच असत.....................

"माझे अंतरंग "

Image
नमस्कार मित्र मैत्रीनींनो हा माझा ब्लॉग..."माझे अंतरंग "या नावाने सुरु करतोय. खर तर "माझे अंतरंग " नाव ठेवण्यात खास असा हेतु होता.... "काही लोक" म्हणतात "मी फारसा बोलत नाही"...... म्हटल चला माझ्या मनातल लिहूनच त्यांना सांगतो..म्हणून हा प्रपंच.... असो तर यात माझ्या मनातून उमलेल्या, मला सुचलेल्या अश्या कविता मी  पोस्ट करणार आहे..... तश्या त्या जुन्याच आहेत पण शेवटी माझ्या भावना आहेत त्या कधी जुन्या होणार नाहीत.... मी तुम्हाला रोज एक नवीन कविता देण्याचा प्रयत्न करेन.... पण नाहीच जमल तर थोड समजुन घ्या या नवकविला.. यात माझा काय फायदा??? तुमचा प्रतिसाद हाच माझा फायदा!!!. तुम्ही मन भरून प्रतिसाद द्या माझी ओंझळ अगदी भरून जाईल...
चला पुन्हा भेटू मन माझे माझे च्या पुढच्या सदरात.. माझ्या एका नवीन कवितेसोबत..