मैत्री...............

मैत्री...............
जीवनाच्या वाटेवर,
कधीही कुनाशी हसलो नसतो,
तुला न भेटल्याने,
खरया मैत्रिला मुकलो असतो.

मैत्रिच्या या नंदनवनात,
ना कुनावरही बंधन असत,
हळूवारपणे जोड्लेल्या,
दोन मनांच स्पंदन असत.

मैत्रिच्या या कळीला,
स्वताहून फुलू द्यायच असत,
ओढून ताणून फुलविन्यापेक्षा,
वाट पाह्न्यातच खर धैर्य असत.

भरपुरश्या मित्र मैत्रिनिंपेक्षा,
खरया मैत्रित रहाव,
कुनाशितरी बोलन्यापेक्षा,
खरया मैत्रिला जपाव.

कुणाशितरी मैत्री होतेय,
तर दोन पावल पुढे जाव,
खरा मित्र मागे राह्तोय,
तर लगेचच मागे वळाव.

भले जरी जीवन संपले,
मैत्री कधी थान्बवु नये,
दोन खरया मित्रांच्या मनात,
गैरसमजाला थारा देऊ नये

धिरज लोके (दुर्गवीर चा धीरु )
Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)