आज तुला मनसोक्त रडायचय.............

आज तुला मनसोक्त रडायचय.............
आज तुला मनसोक्त
रडायचय,रडून घे.......
सुदैवावर कि दुर्दैवावर,
याचा विचार सोडून दे.
जवा एवढ्या सुखाने,
दुःख पर्वता तोडून दे,
नियतीच्या या अजब खेळास,
जिद्धिने जिंकुन घे.....
जवाएवढया सुखावर,

नसतो आनंद मानायचा,
दुखाला सामोरे जा,
सुख हे येतच राहत.
कमजोर कधी समजू नकोस,
तुझ्या या खंबीर मनास,
पड़ती बाजू घेण्यापेक्षा,
चिकटून रहा थोड्याश्या स्वाभिमानास.
कर्म आपले करत राहायच,
दुखाचा भागाकार होत राहतो,
शेवटी जी बाकी राहील,
त्यातच सुखाचा वाटा असतो.
एका मागुन एक दुःख आली,
म्हणून का ही तुझी अवस्था झाली,
अश्रुना गाळन्याने आता,
ती कुठे कमी झाली.
जीवन जरी दुखी असल,
दुस-यावरती जगणार,
तरी ते बांडगुळ नसत,
दुस-यावरती जगणार अन् मरणार,
तुझ जीवन तू जगत जा,
कोणावरही अवलंबुन राहू नकोस,
आतल्या आत कुढन्यापेक्षा,
रागाने तू पेठुन उठ.
देवाने देताना सुख दिल,
तितकच वाटुन दुःख दिल,
फ़क्त तुझ्या नशिबाने त्याला वाटताना,
मन थोड कंजुष केल,
भावना जर दिल्या नसत्या,
तर भावनिक होता आल नसत,
पण भावनां शिवाय असनारयाला,
मानुस म्हणन कस जमल असत......

धिरज लोके (दुर्गवीर चा धीरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)