Posts

Showing posts from June, 2015

हे खरे समाधान…

Image
हे खरे समाधान…

अरे व्वा !!! पुन्हा नविन वर्ष!! पुन्हा नविन पुस्तके !! पुन्हा नविन कपडे !! मज्जाच मज्जा !। हे सर्व दिवस आपल्यातल्या ब-याच जणांनी अनुभवले आहेत पण अनेकजण या अनुभवापासुन वंचीत होते आणि आजहि असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना दरवर्षी नविन पुस्तक,वह्या,दप्तर क्वचितच मिळत असतील. काहींची अवस्था इतकी दयनिय आहे की त्यांना पुस्तक,वह्या दप्तर या वस्तु मिळतात की नाही अशी परिस्थिती असते. या अशा विद्यार्थांच्या मनात मात्र शिक्षणाची ओढ किंबहुना जिद्ध असते. अशा या गरिब व गरजु विद्यार्थ्यांच्या जिद्धिला सलाम करत सेवा सहयोग व दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे कोल्हापुर > गडहिंग्लज मधील नूल या गावात शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्या मुलांना हे वाटप करुन खुप काही मोठ कार्य करतोय असे अजिबात नव्हते पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न!!

यातुन आम्हाला काय मिळाले तर, मानसिक समाधान !! त्या मुलांना जेव्हा ते शालेय दप्तर मिळाले तेव्हा ती उघडुन पाहण्यासाठिची लगबग, दुस-याला आपल्या वस्तु दाखवताना त्यांच्या चेह-यावरचे कौतुक पाहताना जाणिव होते की चला कुणाच्यातरी चेह-यावर हस…

आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो...

Image
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो...

शाळेतल्या "त्या" "जुन्या बाकांवर" जुने दिवस अनुभवून आलो..
बाकांवरच्या "त्या" "जुन्या आठवणी" पुन्हा उजळवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II १ II

न झेपणा-या दप्तराच ओझ लिलया पेलवुन आलो.
परतताना त्या दप्तरात "दुनियादारीचे" संस्कार घेवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II २ II


कंटाळवाण्या तासाची एखादि डुलकी अनुभवुन आलो.
"शहरातल्या क्षणिक झोपेपेक्षा" परिक्षेच्या काळातील "गाढ झोप" अनुभवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II३ II


"Not Reachable वर्गात" आज पुन्हा सुख अनुभवून आलो
नोकरीतल्या ताण-तणावाला हळूच टपली मारून आलो
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II४ II
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

उलगडा… नऊ पुस्तकांचा…

Image
उलगडा… नऊ पुस्तकांचा… 
आज Books & U या ग्रुप च्या सभासदांना भेटलो (आजच नाव बदललं श SSSS वाचतोय आम्ही ) रोहिणीजीं च्या म्हणण्यानुसार खरच नऊ ववेगवेगळ्या पुस्तकांची भेट झाली काहि पुस्तक आज प्रथमच पाहिली व थोडी फार वाचली तर काही पुस्तक अगोदर पहिली होती आणि वाचली सुद्धा होती.

पाहिलं पुस्तक जे मी या अगोदर वाचलंय ते म्हणजे "विजय बेंद्रे" एक असा अवलिया ज्याने फक्त वाचन आणि लेखन यासाठी स्वताला वाहून घेतलय. कधीही पुस्तक, वाचन, कविता यावर भरभरून कार्य करणारी व्यक्ती. माझ्यासारख्या "चोच" मारून वाचन करणा-या वाचकाला (जसे पक्षी "चोच" मारतात तशी) या "मदारी" सारख वाचन साठवून ठेवणा-या (उंट जसा मादारीत पाणी साठवून ठेवतो तसं) वाचकाची भेट होण हेच माझ सौभाग्य

दुसर पुस्तक पंकज बांदकर उर्फ "छुपे रुस्तम" गेल्या काही दिवसांपासून कोकणी त्यात तळकोकणातील (म्हणजे देवगडचा) त्यामुळे संपर्कात होतो आज भेट झाली. "मला काहीही येत नाही" अस वाक्य पुन्हा पुन्हा बोलून आणि खूप काही करून जाणारा माणूस. त्यात कोकणातला असल्यामुळे जन्मताच हुशार . पंकज बंध…

माझो कोकण मी "Miss" करतय हो...

Image
माझो कोकण मी "Miss" करतय हो...

कौलांच्या घरट्यात "थंडावणारो" कोकण,
आज स्लॅपच्या घरात "तापताना" बघुन
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।१।।

हिरव्यागर्द झाडित "फुलणारो" कोकण
आज बोडक्या डोंगरात "सुकलेलो" बघुन
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।२।। 
गाई-गुरांच्या "घोळक्यात रमलेलो" कोकण
आज गाव गुंडांच्या "टोळक्यात फसलेलो" बघुन,
माझो कोकण मी "Miss"करतय हो....।।३।।

अखंड काताळात "विस्तारलेलो" कोकण
आज चिरे खाणिन "बोडको" केल्याचो बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।४।।

गगनचुंबी नारळ फोपळीन "नटलेलो" कोकण
आज सिंगापुरी माडात "खुंटलेलो" बघुन,
माझो कोकण मी मिस करतय हो....।।५।।

जुन्या "पुरातन मंदिरांनी" पावन झालेलो कोकण
आज "जीर्णोद्धाराच्या" फटक्यात गावलेलो बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।६।।

टाळ मृदुंगावर सणवार सजवणारो कोकण
आज डिजे च्या आवाजात गाजवताना बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो... ।।७।।

दुर्गवीर चा …

रुजवलेले शिवप्रेम…

Image
रुजवलेले शिवप्रेम… 
भगवं रक्त सळसळत ते मुळात कट्टर हिद्दुत्वाच्या धमन्यात…. आज आमच्या या चिमुकलीला सांगाव लागल नाही बाळ हि रायगडाची पायरी आहे यावर नतमस्तक हो… ज्या पित्याच्या खांद्यावर बसून भगकी पताका अभिमानाने मिरवीत आणली त्या पित्याच्या पावलावर पाउल ठेवून या चिमुकल्या रणरागिणीने रायगडाच्या पायरीवर येताच मस्तक टेकविले. आज काल शिवप्रेम मनात "भरवावे" लागते पण या पेक्षा लहानपणापासूनच जर शिवप्रेम मनात "रुजवले" तर पुढे ते "भरवावे" लागणार नाही. आज "सेल्फी" चा बाजार मांडणा-यांनी जरा या फोटोकडे पाहिले तर "फोटोत जीव ओतणे" म्हणजे काय ते कळेल.
स्थळ:- किल्ले रायगड
वेळ:- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (३१ मे २०१५) ३४२ वा राजाभिषेकची पूर्व संध्या
छायाचित्रकार :- प्रशांत वाघरे
अजित राणे व त्याची कन्या "पौर्णिमा"
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/