उलगडा… नऊ पुस्तकांचा…


उलगडा… नऊ पुस्तकांचा… 

आज Books & U या ग्रुप च्या सभासदांना भेटलो (आजच नाव बदललं श SSSS वाचतोय आम्ही ) रोहिणीजीं च्या म्हणण्यानुसार खरच नऊ ववेगवेगळ्या पुस्तकांची भेट झाली काहि पुस्तक आज प्रथमच पाहिली व थोडी फार वाचली तर काही पुस्तक अगोदर पहिली होती आणि वाचली सुद्धा होती.

पाहिलं पुस्तक जे मी या अगोदर वाचलंय ते म्हणजे "विजय बेंद्रे" एक असा अवलिया ज्याने फक्त वाचन आणि लेखन यासाठी स्वताला वाहून घेतलय. कधीही पुस्तक, वाचन, कविता यावर भरभरून कार्य करणारी व्यक्ती. माझ्यासारख्या "चोच" मारून वाचन करणा-या वाचकाला (जसे पक्षी "चोच" मारतात तशी) या "मदारी" सारख वाचन साठवून ठेवणा-या (उंट जसा मादारीत पाणी साठवून ठेवतो तसं) वाचकाची भेट होण हेच माझ सौभाग्य

दुसर पुस्तक पंकज बांदकर उर्फ "छुपे रुस्तम" गेल्या काही दिवसांपासून कोकणी त्यात तळकोकणातील (म्हणजे देवगडचा) त्यामुळे संपर्कात होतो आज भेट झाली. "मला काहीही येत नाही" अस वाक्य पुन्हा पुन्हा बोलून आणि खूप काही करून जाणारा माणूस. त्यात कोकणातला असल्यामुळे जन्मताच हुशार . पंकज बंधूंच्या (दादा नाही हा ) पुस्तकांची लिस्ट बनविण्याच्या आणि शालेय मुलांसाठी काम करण्याच्या उपक्रमाशी सहमत आहे. त्यांच्या शाळेच्या उपक्रमात मी सोबत आहे. आणि पुस्तकांची लिस्ट सुद्धा लिस्ट मी लवकरच ग्रुपवर टाकेन (कपाट उलट करायला लागणार बहुतेक)

तिसर पुस्तक प्रवीण माझ्या बाजूला बसून त्यांनी कविता सादर केली कविता ऐकतान तर त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक चित्र डोळ्यासमोर दिसत होत. पहिल्यांदा भेटल्यावर विजय बंधूनी ओळख करून दिली "हे दुर्गवीर" तेव्हा प्रवीण बंधुंच वाक्य "हो ते लगेच समजल हे शिवाजी महाराजांचे भक्त" प्रवीण बंधुंच भाषेवर असो वा कवितेवर वर्चस्व वाखाणन्याजोग आहे. प्रवीणराव तुमच्या कवितांच्या मैफिली ऐकायची इच्छा आहे. आशा आहे आपण असेच सतत भेटत राहू.

चौथ पुस्तक आहे मनोज "गजलकार मनोज" गझल असो वा इतर विषय बोलताना अगदी कडक इस्री केल्यासारखं यांच बोलण. मुळात गझल हा माझ्यासाठी फक्त वाचून वाह !! वाह !! करण्याचा विषय आहे. त्यात हे राव थेट "काळजाला भिडणार" किंबहुना "काळजाला चिरणार" लिखाण करतात. आजवर मी गझल करायचा प्रयत्न केला पण त्याची चारोळीच झाली त्यामुळे माझ्याकडून मनोजरावांना मानाचा मुजरा…

पाचवं पुस्तक जयेश पवार काय माहित या बंधूना पाहिलं तेव्हा प्रथम दर्शनी मला ते "गुजराती" वाटले. मी एक क्षण विचार करत होतो "च्यायला गुजराती मा कविता करेछु (जाउंदे नाही जमत गुजराती) जयेश बंधू नुसत बोलले कि कविता व्हायची. त्यांच्या बोलण्यातच कविता होती (कविता म्हणजे काव्य हा !! उगाच गैरसमज नको") पण त्यांनी तीस दिवस घेऊन केलेलं काव्य तर बाहेर कडाडणा-या विजांपेक्षा जबरदस्त होत. काय अर्थ होता त्या एक एक शब्दांना ! ! या अश्या कविता ऐकल्या कि वाटत कि यार मी जाम उड्या मारतो या "माझे अंतरंग" या पेज वरून आणि ब्लॉग वरून. इथे तर माझे बाप लोक (कवितेतले) बसलेत…

सहावं पुस्तक रोहिणी ढवळे यांना फार पूर्वीपासून ओळखतो म्हणजे विजय बेन्द्रेंच्या "आरंभ काव्यगंगा" याच्या स्पर्धेच्या वेळेपासून. . आरंभ ची E-काव्य स्पर्धा होती त्यात मी सहभाग घेतला. माझा पहिला, दुसरा आणि उत्तेजनार्थ नंबर येईल अशी अपेक्षा नव्हती पण निदान एक सहभागाच प्रशस्तीपत्रक मिळाल होत त्यात खाली यांच नाव व स्वाक्षरी होती (फार कमी Certificate मिळालेत त्यात एक वाढल बर वाटलं) त्यामुळे माझ्यासाठी या कोणीतरी मोठ्या कवियत्री वगैरे आहेत. आज त्यांनी एक कथा सांगितली पण आजूबाजूच्या आवाजामुळे माझ्यापर्यंत पोचलीच नाही. तर रोहिणी यांना विनंती आहे कि ती कथा मला मेल करा किंवा WhatsApp वर पाठवा मी नक्की वाचेन शांतपणे… आणि मगच प्रतिक्रिया देईन कथा नक्की पाठवा.

सातव पुस्तक पूजा भडांगे यांच्याबद्दल मी काय बोलणार यांचा तर काव्यसंग्रह प्रकाशित झालाय मला तर माझ्या Blog वर पोस्ट केलेल्या कविता प्रिंट करतान "नाकी नऊ" आलेत. पण बेळगाव च्या असल्याने कट्टर मराठी बाणा यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. मागे येळ्ळूर गावात झालेल्या लाठीहल्ल्याच्यावेळी तिथल्या मराठी बांधवांची कट्टरता अवघ्या देशाने पाहिली होती. त्यात आमचे दुर्गवीर प्रतिष्ठान चे प्रमुख "संतोष हसुरकर" हे पण बेळगाव चे त्यामुळे बेळगाव बद्दल खास आकर्षण. बोलण्याच्या नादात त्याचं कवितेच पुस्तक घेण विसरूनच गेलो असो पण पूजाजी तुमच पुस्तक विजय बंधुंपर्यंत पोहोचवता आल तर बघा मला अस एक पुस्तक संग्रही ठेवायचंय.

आठव पुस्तक शुभांगी वीरकर हे पुस्तक जरा कमीच बोललं (पण माझ्यापेक्षा थोड जास्त) त्यांची कविता कुठे शोधू तुला मस्तच…. आजची तरुणाई हे शीर्षक वेगळ्याच कारणासाठी वापरते पण शुभांगीजीनि देवावर काव्य केल यातच सर्व आल. मला बुवा आजवर गणपतीची आरती, स्तोत्र, आणि हनुमान चालीसा हे सोडलं तर पद्य विभागात देव दिसलाच नाही… ह्या तर देव शोधायलाच निघाल्या होत्या…

अशी हि नऊ पुस्तक अरेच्च्या नववं पुस्तक राहील ते म्हणजे "मी"… काही नाही हो हे "पुस्तक" वगैरे काही नाही हि "अंकलिपी" आहे सध्या अ, आ, इ, ई शिकतोय…

अश्या ह्या Books & U च्या सर्व सभासदांना अर्थात पुस्तकांना आज चाळल बर वाटला ह्या अंकलिपीला…. विजय बंधू शतश: धन्यवाद।
जय शिवराय
  

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….