Posts

Showing posts from August, 2013

दर्शन शिवजन्मभूमीचे

Image
दर्शन शिवजन्मभूमीचे… 
दि. ११/८/२०१३ रोजी  आम्ही दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो.  तसे आम्ही वेळेत   निघालो, पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही साधारण ११ ते १२ पर्यंत जुइनगर रेल्वे स्टेशन ला बसून गप्पा मारत होतो ("मह्या" चा "महिमा" बाकी काय).  अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा "मह्या" प्रकट झाला.  आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पटकावली ("व्याकि" ची रिस्क नको म्हणून मी खिडकी पटकावली ) पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधूंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपून एक गडदर्शन.  तोवर सचिन बंधु फोन करून आम्ही कुठे आहोत याची खात्री करून घेत होतो.  पण आम्ही पहाटे पुण्यात पोचणार होतो त्यामुळे त्यांना आम्ही झोपायचा सल्ला दिला त्यानंतर आम्ही जवळपास सर्वच चिंतनात मग्न झालो. मध्येच एके ठिकाणी काळोखातील फ्राईड राइस खाउन पुढचा प्रवास सुरु झाला. शेवटी एकदाचे पहाटे पहाटे सचिन बंधूंच्या घरी पोचलो.  त्यांच्या एका खोलीत आम्ही सर्व जागा मिळेल तसे आडवे तिडवे झोपी गेलो.  सकाळी ७च्या दरम्यान झोपेतून उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली.  श्रमदान मोही…

शंभू राजे

Image
नुकत्याच वाचनात आलेल्या छावा कादंबरीतील शंभू राजेंच्या आयुष्यातील स्वकीयांकडून फसविल्या जाण्याच्या भावनेवर आधारित हे काव्य…(चूक भूल माफ असावी)


आयुष्याच्या धनुष्यातून बाण केव्हाच सुटलाय,
शब्दांच्या भात्यात फक्त एकटेपणा उरलाय,

सुटलेल्या बाणाने लक्ष्याचा वेध केव्हाच घेतलाय,
आता परिणामांचा फक्त पर्याय उरलाय.

स्वकीयांनी फसविण्याचा मला घाटच घातलाय,
गनिमांवरचा वार आज आप्तांवर उगारलाय.

आजवर प्रत्येक वार संयमाने घेतलाय,
आत्ता मात्र संयमाचा बांध फुटलाय.

विश्वासाच्या बळावर नात्यांचा डोंगर रचलाय,
विश्वासघाताच्या कंपनाने सारा डोंगर खचलाय

दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

हसू आणि आसू @ मोहीम मानगड - भाग १

Image
हसू आणि आसू -  भाग १

दुर्गवीर सोबतची माझी मानगड, खुर्डूगड मोहीम दोन वेगवेगळे अनुभव देणारी ठरली.  संपूर्ण प्रवासात मनमुराद हसविणारे हसरे असे आणि खुर्डूगड च्या जवळ असलेल्या प्राचीन मंदिर व वीरघळीची अवस्था बघून मन पिळवटून टाकणारे असे दुहेरी अनुभव आले . या  लेखात मी मनमुराद हसविणारे अनुभव मांडणार आहे.   खर तर मी ट्रेन ने जाणार होतो पण ऐनवेळी प्रशांत बंधूनी जास्त रिस्क नको म्हणून मला कामावरून थेट दादरला येण्याचे आवाहन केले.  गाववाला असल्याने आवाहनाला प्रतिसाद देत मी दादर ला पोचलो.  तिथे  संतोष दादा, राज दादा, नितीन दादा अगोदर हजर होते. थोड्यावेळात गाडी आली ह्या वेळी गाडी जरा हाय-फाय होती (दिसायलाच हाय-फाय  बर का?). गाडीतून आशिष बंधू, प्रशांत बंधू, निहार बंधू आले.सोबत शिवरायांची सुबक मूर्ती होती.   पुढे प्लान थोडा चेंज झाला आणि प्रशांत बंधू ट्रेन ने जायला निघाले तेव्हा मला हि गाडीत करमत नसल्याने मीहि सोबत गेलो.(इथे गाववाला हा Criteria लागू होत नाही हा!!).   पनवेल ला दिवा रोहा आली तेव्हा अजून एक धक्का बसला. माझ्या माहितीनुसार ट्रेन मधून फक्त अजित दादा येणार होता. पण पाहतो काय!!  सचिन रेडेकर,…

किल्ले सुरगड

Image
किल्ले सुरगड तालुका रोहा, गाव खांब येथे वसलेला एक गड घेरा सुरगड या नावाने ओळखला जातो. रोहा - कोलाड - खांब - वैजनाथ (एस. टी. / सहा आसनी रिक्षा) २० कि.मी. अंतर. पायथ्यापासून अंतर २५० मीटर. मध्यम चढाई श्रेणीचा हा गड. या गडावर चढाई करण्यासाठी खांब गावातून दोन मार्ग आहेत पहिला मार्ग चढताना मध्येच एक दगडी घळ चढून जावे लागते. हि घळ पार करणे थोड कठीण आहे परंतु दोरीच्या साहाय्याने हि घळ पार करता येते. दुसरा मार्ग या घळीच्या सभोवती फेरा मारून गेल्यावर आहे. घळ येण्यापूर्वी डाव्या बाजूला इंजाई देवीचे मंदिर आहे. सध्या इथे मंदिराचे अवशेष व मूर्ती बाकी आहे. घळ पार केल्यावर म्हणजेच दक्षिणेकडून पुढे गेल्यावर गडावर जाण्यापूर्वी वाटेत एक मारुती शिल्प आहे या मारुतीच्या कमरेला खंजीर लावलेला आहे. सध्या या शिल्पाची अवस्था थोडी वाईट आहे. पुढे एक धन्य कोठार आहे. माथ्यावरून उत्तरेकडे गेल्यावर हेमांडपंथी मंदिराचे अवशेष आहेत तिथे पूर्वी तिथे शिवमंदिर होते असे मानले जाते. गडावर किमान १४ टाक्या आहेत संशोधन केल्यास अजूनही टाक्या मिळण्याची शक्यता आहे. वरती एक बुरुज आहे व अरबी व फारसी भाषेतील एक शिलालेख आहे. या शिला…