Monday, 28 December 2015

अंधश्रद्धा आणि नास्तिकता
अंधश्रद्धा आणि नास्तिकता


"अंधश्रद्धा आणि नास्तिकता" या दोन शब्दांमध्ये एक पुसटशी रेषा आहे ! ह्या रेषेचे गणित चुकल की सुरु होतो प्रवास, एक तर "फसवणुकीकडे किंवा अराजकतेकडे"...


जर तुम्ही सरसकट सर्व धार्मिक गोष्टि "भोळ्या भाबडेपणाने" किंबहुना "भक्तीभावाने" सहन करत गेलात तर एक वेळ अशी येते की हाच तुमचा "भोळा भाबडा भक्तीभाव" तुम्हाला "फसवणुकीकडे" नेतो.


दुस-या बाजुने सर्व संस्कृती, देव, धर्म, सरसकट "थोतांड" आहे अस म्हणुन त्याला दोष देवु लागलात की तुम्ही "नास्तिक" म्हणुन तुमची हेटाळणी केली जाते.


कुणी तुम्हाला तुमच्या "भक्तीभावाचा" आधार घेवुन फसवतोय हे माहित नसलेला एक समाजिक वर्ग आहे तर


दुस-या बाजुला स्वत:ला "नास्तिक" म्हणवुन घेण्यात धन्यता माननारा एक वर्ग आहे.


तस पाहता हे दोन्ही वर्ग धोकादायक ! दोघेही संस्कृतीची विटंबना करतात एक अविचाराने आणि एक अतीविचाराणे !


काही धार्मिक स्थळांना नुकतीच भेट दिली असता आलेले अनुभव ! इथे कोणत्याही धार्मिक स्थळाचा उल्लेख करुन वाद निर्माण करायची मुळीच इच्छा नाहि पण माझ हे मत एका भेटितुन आलेले नाही अनेकदा या धार्मिक स्थळांना भेट दिल्यावर आलेला हा अनुभव !! पटल तर घ्या नाहीतर सोडुन द्या !

Thursday, 3 December 2015

मूक साक्षीदार....होय !! मी तोच साक्षीदार आहे ज्याने लढाया लढताना पाहिलय ! पण दुर्दैवाने आज मी स्वत:च लढतोय माझ्या अस्तित्वासाठी...
ओळख पटतेय का काही ?? तोच ज्याची अनेक रुपे आहेत ! कधी मी वीरांच्या पराक्रमाची गाथा सांगत "विरगळी" रुपात असतो तर कधी पतीप्रेमाची साक्ष देत "सतिशिळा" च्या रुपात असतो !! तर कधी वचनाचा मान राखत "गद्देगळ" असा विविध रुपात असतो ! 
पण माझी "अजरामर" रुपे आज "मरणासक्त" अवस्थेत आहेत. जे वीर स्वत:च्या जीवाचा विचार न करता या मातीसाठी लढले आणि आज त्यांचा पराक्रम मातीमोल झालाय.माझ्या शेवटाला सुरुवात केव्हाच झालीय... कुणीतरी या सुरुवातीचा शेवट करा नाहितर माझी ही विविध रुपे एक आख्यायीका बनुन राहतील!
माझी आर्त हाक तुमच्या कानात गुंजण्यापेक्षा काळजाचा ठाव घेईल अशी आशा करतो ! हा "पाषाणह्रदयीपणा" सोडुन या "पाषाणाच्या" हाकेला "ओ" द्याल हीच प्रार्थना.... _/\_
http://dhiruloke.blogspot.in/
9833458151/8097519700/8655823748
www.durgveer.com

Saturday, 28 November 2015

सुरमयी कट्यार....
"वा !! हे तर सुंदर गाणं आहे... या पेक्षा सुंदर गाणं या चित्रपटात असुच शकत नाही".... अस वाटत न वाटत तोच दुसर एक अप्रतिम गाणं कानांना सुखावुन जात !! अशीच काहिशी अवस्था "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहताना होते. एक गाणं कानात गुंजत असत तोवर अजुन एक सुरमयी गाणं कानावर पडत. चित्रपटाच्या सुरुवातीला गणेशास्तुती नंतर प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध करणारा होता. चित्रपटाच्या शेवटी काय होणार हे अगोदरच माहिती होत तरीही प्रत्येक क्षणाला खिळवुन ठेवणारा हा चित्रपट खरच खुप अप्रतिम... शंकर महादेवनची अभिनयातील entry तर अप्रतिमच होती. त्यांच गाण तर सुरमयी असतच यात शंका नाही. सचिन पिळगांवर खुप शायनिंग मारत भुमिका करतात अस अनेकांकडुन मी ऐकल होत पण मला तर खांसाहेबांच्या भुमिकेत ते अगदी Perfect वाटले. कदाचित खांसाहेब हे पात्र "अहंकारी" असावं म्हणुन त्या भुमीकेत ते योग्य वाटले. सुबोध भावे तर माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अमृता आणि मृण्मयी  दोघीही आपापल्या जागी "Perfect" वाटल्या चित्रपट पाहताना सर्वात जास्त भाव खावुन गेल ते चित्रपटाचे संगीत !! गाण्याचे शब्द असो की आवाज दोन्ही मनात जागा करुन राहतात!! ज्याला संगीतातल काहीही कळत नाही तो सुद्धा गाण्यातल्या एखाद्या जागेला नकळत हात उचलुन दाद देईल इतक अप्रतिम संगीत होत !! मुळात मराठी चित्रपट हे टॅाकिज मध्येच जावुन पहावेत यासाठी मी नेहमी आग्रही असतो ! याच आग्रहाखातर हा चित्रपट पाहिला आणि मलाच माझ्या निर्णयाच कौतुक वाटल. चित्रपट पाहायला माझ्या वयाचे फारसे प्रेक्षक नव्हते हे थोडे खटकले पण चित्रपट संपल्यानंतर "मराठिला चांगले दिवस आलेत आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांनाही चांगले दिवस आलेत" हे वाक्य अगदी सुखावुन जात !!!

Thursday, 26 November 2015

"असहिष्णू" 'हिंदुस्थानातील' "गरीब" 'अमीर'ज्या अमिर खानच्या पत्निला देश असुरक्षित वाटतो त्या दोघांसाठी एक पत्र

..... अमीर
खर तर तुला इतर वेळी पत्र लिहिल असत तर माझे अंतरंगातुन तुला "प्रिय अमीर" अस लिहिल असत पण तुझ्या "देश सोडण्याच्या " वक्तव्यानंतर तुला प्रिय म्हणायची अजिबात इच्छा नाही.
तुझा राजा हिंदुस्तानी (हिंदुस्तानी बर का!) असो वा तारे जमीन तुझा प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहिला. राजा हिंदुस्तानी मधील तुझा "कम कम मॅडम" जोक अजुनही मारावास वाटतो! मी स्वतः शिक्षक असताना तुझा तारे जमीन पर पाहिला आणि Every Child is Special अस म्हणत मुलांना शिकवताना मारणं सोडुन दिल!! तुझा रंग दे बसंती पाहिला की अंगावर आजही शहारे येतात ! तुझ्या थ्री इडियट मधल्या मैत्रीला आजही मानतो ! तुझा भुवन तर भेजे से निकलताही नही! सत्यमेव जयते आणि Increditable India असणारा हिंदुस्तान तुला आज परका असहिष्णु कसा काय वाटायला लागला ! तोही गेल्या ८-१० महिण्यात !! अनेक लेखकांनी,कवींनी पुरस्कार वापसी केली मी काहिच बोललो नाही कारण मी त्यांची पुस्तक किंवा लिखान पैसे देवुन वाचल नव्हत पण तुझे चित्रपट मी पैसे मोजुन पाहिले ते फक्त तुझ्या प्रेमापोटी !! तु देशातल्या समस्यांना वाचा फोडतोस म्हणुन... पण "देश असहिष्णु आहे मला देश सोडावासा वाटतोय" हे तुझ वाक्य "समस्या निर्माण करणार" वाटल मला ! सरफरोश मध्ये तर तु असही बोलला होतास.."मै ये इसलिये नही बोल रहा हु की ये मेरे घर का मामला है... नही ये मेरे मुल्क का मामला है" तसच "मी यासाठी नाही बोलत नाहिय की हा तुझ्या घरचा मामला नाही माझ्या देशाचा मामला आहे !"
आता तु उद्या उठुन स्पष्टीकरण देशील ये स्टेटमेंट मेरा नही मेरे पत्नी का है ! मग तीला समजव की या देशात ज्या बाईला हिंदू असुन एका मुसलमानाची दुसरी पत्नि व्हायचा हक्क दिला जातो तो देश असहिष्णु कसा काय असेल ???
बर देश सोडुन जाणार कुठे ती... पाकिस्थानात तर हिला बुरखा घालावा लागेल इतर ठिकाणी तु केलेले पिक्चर तुला हिंदित डब करुन इकडे पाठवावे लागतील. बर देश असहिष्णु असल्याने तु केलेला चित्रपट इकडे प्रदर्शित होईल कि नाही याबाबत शंकाच आहे !
कालपर्यंत मी Mr Prefect म्हणुन तुझा खुप आदर करायचो. अनेक जण सांगायचे तु मुस्लिम संघटनांना पैसा पुरवतोस,दोन हिंदू मुलींशी लग्न करुन लव जिहाद चा आदर्श ठेवतोस वगैरे वगैरे पण मी याकडे लक्ष दिल नाही पण तु तर माझा देश असहिष्णु आहे तुझ्या बायकांमुलांसाठी धोकादायक आहे अस म्हटल्यावर तुझा आदर करायचा की नाही हाच विचार करतोय. मी असही ऐकलय की तुझ्या "दंगल" या चित्रपटासाठी तुझा हा पब्लिसिटी स्टंट आहे अस असेल तर तुझा हा चित्रपट पाहु की नको हा प्रश्न माझे अंतरंग ला पडलाय !!
तुझा एक (माजी) फॅन

Wednesday, 18 November 2015

तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…
तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

छायचित्रातील जोडप्याच्या संसाराला ऐन "दिवाळीत" "प्रकाशमान" करणारी भेट मिळाल्यावर हे भाव त्यांच्या चेह-यावर तरळत होते.... तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

नेमके हेच भाव टिपण्याचे भाग्य आम्हाला लाभले ते नंदू चव्हाण यांच्या Joy Of Happiness च्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून साकारलेल्या उपक्रमातून… नंदू चव्हाण यांच्या सहकार्याने दुर्गवीर च्या माध्यमातून साल्हेर परिसरातील आदिवासी पाड्यात "सौर दिवे" म्हणजे Solar Lamp चे वाटप करण्यात आले.

संतोष दादा प्रत्येकाला नावानिशी बोलवून ह्या वस्तू द्यायला सांगत होते. अस करण्यामागे त्यांचा हेतू एकाच होता प्रत्येकाला ते समाधान लाभाव की मी "थोडस" तरी चांगल करू शकतो… यात प्रसिद्धी चा हव्यास कधीच कुणाला नव्हता. दोन संस्था दोन वेगवेगळे मार्ग असले तरी, धेय्य एकच म्हणून अनेक समविचारी माणसे एकत्र येउन हे कार्य करतात. यात कुणाला माझ नाव हव, माझा फोटो हवा हा हव्यास मुळीच नव्हता…. खर तर हा हव्यास नसावाच कारण तो हव्यास असेल तर हे कार्य कधीच पूर्णत्वास जाणार नाही.

ही मदत करण्याने ते आदिवासी " अपंग" होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. "कुणालाही "बोटांचा आधार" देताना त्याच्या "कुबड्या" होणार नाहीत याच भान असावं लागत" . हि मदत म्हणजे त्यांना "बोटांचा आधार" असतो त्या "कुबड्या" नक्कीच नसतात. मदत इतकीच करावी कि त्याचा "आधार" होईल ती इतकी असू नये कि त्याची "सवय" होईल…

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी चांगल करायचं असत पण त्यासाठी काही छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालाव लागत. ऐन दिवाळीत घरच्यांसोबत दिवाळी साजरी करावी अस प्रत्येकाला वाटत आणि ते स्वाभाविक आहे पण त्यातला थोडा वेळ या कार्यासाठी देण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली तर किती बर होईल ना !!!

मी तर तो आनंद मिळविला तुम्ही कधी मिळविणार????
दुर्गवीर चा धीरु

Tuesday, 17 November 2015

फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते

फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते......


या दिवाळीची स्पेशल मोहिम (सगळ्यात स्पेशल २०१३ ची राजगड- तोरणा मोहिम होती  नाशिक मोहिम पार पाडायची होती. मुंबईहुन निघालो सोलार लॅंप च वाटप केल आणि उरर्वरीत वेळेत काय करायचे हा गहण प्रश्न निर्माण झाला वेळ फार कमी होता आणि "अंतर्गत सुत्रांच्या" माहितीनुसार गड सर करण्यासाठी लागणारा वेळ जास्त होता. कमी वेळात संपुर्ण गड पाहता येईल पाहता येईल अस ठिकाण ठरत नव्हत. एक मारुतीरायाची मुर्ती पाहायच ठरल पण काही "अंतर्गत" आणि "बाह्य सुत्रांनी" सांगितले ते अंतर ५-७ कि. मी. चालुन जावे लागेल. त्यामुळे "प्लान A" जवळपास फिस्कटला होता. मग ठरल मांगी-तुंगी ला जायच पण त्याला तब्बल चार तास लागतात हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल्याने किंचीतसा ठरलेला "प्लान B" पण फिस्कटत चालला होता. त्यामुळे मांगी तुंगीच्या बाजुच्या डोंगरावरील जैन मुर्ती पाहुन परतीला निघायचे असा "प्लान C" ठरला. पण दुर्गवीर चे Engineers Choice प्रशांत बंधुंनी प्रवाहाच्या विरोधात जावुन "खात्रीलायक सुत्रांना" डावलुन एक "भयानक" प्लान रचला तो म्हणजे फिस्कटलेला "प्लान B" सत्यात उतरावयचा त्याला अजित दादा, नितीन दादांनी खतपाणी घातले. मग काय मी पण अफवा, अंधश्रद्धा झुगारुन त्यांच्या कटात सामील झालो. सुरुवातीला प्रशांत बंधु, अजित दादा यांनी ५:०५ मिनिटांनी गड चढायला सुरुवात केली मी आणि नितीन बंधुनी ५:१० मिनिटांनी त्यांच्या पावलावर पाउल ठेवले. आमच्या मागुन अमीत शिंदे नावाचा "चित्ता" येतच होता. मग मजल दरमजल करीत मी अजित दादा, प्रशांत बंधु, प्रफुल्ल बंधु, अमित बंधु, आणि नाशिकचे एक शिलेदार(राव नाव आठवत नाही तुमच समजुन घ्या) आम्ही एकदम "फ्रंट फुट" वर बॅटिंग करत निघालो मध्येच विवेक दादांची आणि स्नेहा ताईंची भेट घेवुन निघालो. जिकडे मांगी तुंगी ही मॅच पुर्ण करायला चार तास लागणार हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल त्याचा पहिला पॅावर प्ले आम्ही अवघ्या ५० मिनिटात पुर्ण केला. आम्ही सर्व (फक्त अमित नावाचा चित्ता सोडुन) ५० व्या मिनिटाला तुंगीला पोचलो. तोवर अमित नावाचा "चित्ता" तुंगीचा तो घेरा पुर्ण करुन पण आला म्हणजे आम्ही तुंगी ला ५० मिनिटात पोचलो तर तो ५ -१० मिनिट अगोदरच पोचला होता.पहिला "पॅावर प्ले" जोरात खेळल्यामुळे थोडासा आरामात मांगीच्या दिशेने निघालो आणि पुढच्या पंधरा मिनिटात तुंगी उतरुन मांगीच्या चढाईला सुरुवात केली. आणि दोन्हि गड मिळुन अवघ्या दोन तास चोवीस मिनिटात मोहिम संपवीली.मागुन आलेल्या शिलेदारांनी तुंगी पुर्ण केला(काहिंनी पुंगी पण वाजवली अस ऐकल)
गडावर गड अस्तित्वात नव्हताच त्याच एक "जैन तिर्थक्षेत्र" झाल्याच प्रकर्षाने जाणवलं. सगळीकडे लोखंडी जाळ्यांत बांधुन ठेवलेल्या मुर्त्या नजरेत येत होत्या. त्यात अजुन भर म्हणुन बाजुचा डोंगर "पोखरुन" त्यात अजुन एक मुर्ती कोरली जात होती. असो तो धार्मिक वाद नको !

पण या मोहिमेतुन एक मात्र शिकलो.....
अफवांवर विश्वास ठेवु नये 

Monday, 26 October 2015

"हुशार" आणि "लाचार"

आज काल तुम्ही किती "हुशार" आहात,
यापेक्षा
तुम्ही किती "लाचार" आहात,
यावर तुमच "पद" ठरते…

Wednesday, 7 October 2015

तुम्ही कोण ?? "भोळे कि चांगले"???


तुमचा कुणीतरी "उपयोग करतय"
म्हणजे तुम्ही "भोळे" आहात….
तुम्ही कुणाच्यातरी "उपयोगी पडताय"….
म्हणजे तुम्ही "चांगले" आहात…

Friday, 25 September 2015

बाप्पा आले अन गेले.....बाप्पा आले अन गेले.....
आगमनाअगोदर केलेली धडपड अन
प्रतिष्ठापना झाल्यावरचे सुखद क्षण
हे सारे खूप काही शिकवून गेले
बाप्पा आले अन गेले.....

बाप्पा आले अन गेले.....
कुणी सेल्फित रंगले तर कुणी जुगारात
कुणी आरती म्हणण्यात दंगले तर कुणी राजकारणात
पण हे सारे खूप काही शिकवून गेले
बाप्पा आले अन गेले.....

बाप्पा आले अन गेले.....
"काहींनी" दिली अनपेक्षीत "साथ"
तर "काहींनी" फिरवली "पाठ"
हे सारे खूप काही शिकवून गेले
बाप्पा आले अन गेले.....

बाप्पा आले अन गेले…
पण खूप काही शिकवून गेले…
पण खूप काही शिकवून गेले…

दुर्गवीर चा धीरु

Wednesday, 9 September 2015

जिंकण आणि लढणमी "जिंकण्यापेक्षा" "लढण" जाणतो…. 
कारण,
मी "अलेक्झांडरपेक्षा" "बाजीप्रभूंना" मानतो… 

Wednesday, 19 August 2015

तपस्वी...

तपस्वी...

चेहरा निर्वीकार...
उर्जा "प्रचंड" या शब्दा पलिकडची !!
धेय्य "इतिहासाचा प्रचार आणि प्रसार" !!
छायचित्रातील या व्यक्तिच्या नावातच इतिहास दडलाय ! ! "किरण शेलार"
श्री किरण शेलार दादांशी पहिली भेट आजच(१६ /८/२०१५) झाली !! वेळ उंबरखिंड दर्शन मोहिम खंडाळा पासुन डोंगर द-यातुन उंबरखिंडिच्या या परिसरातील प्रतिकात्माक स्मारकापर्यंतचा प्रवास... संपुर्ण प्रवासात किरण दादांनी त्यांच्या बोलण्यातुन इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत केला ! दुतर्फा पसरलेल्या सह्याद्रिकडे पाहिले की जणु खानाला घेरण्यासाठी शिवरायांनी नेमलेल्या ४ तुकड्यांमधील मी एक मावळा असल्याचा सतत भास होत होता. सभोवतालचा सह्याद्रि सतत साद देत होता !! या सुवर्णक्षणांची भेट दिली ती किरण दादांनी !!!

गेली १५ वर्ष उंबरखिंड मोहिमेचे आयोजन किरण दादा करतात. कोणतेही व्यावसायीकीकरण वा गाजावाजा न करता या मोहिमेचे आयोजन केले जाते! !

ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणा-या उंबरखिंडीचा इतिहास सर्वसामान्यांपर्यत पोचावा हा एकमेक भाबडा आशावाद डोळ्यासमोर ठेवुन दादा या मोहिमेचे आयोजन करतात ! माझ्यासोबत आलेल्याने दुस-या १०-२० जणांना घेवुन या मोहिमेत सहभागी व्हाव किंवा अशा मोहिमांचे आयोजन कराव ही हा त्यांचा उद्देश

विस हजार सैन्यांना व प्रचंड शस्त्रसाठा सोबत घेवुन कारतलब खान शिवरायांवर चाल करुन येत होता त्या कारतलब खानाला अवघ्या दोन हजार सैन्यानिशी नेस्तनाबुत करण्याचा भिमपराक्रम शिवरायांनी केला होता ! इतिहासात अत्यंत कमी वेळात प्रचंड सैन्याला नेस्तनाबुत करुन प्रचंड संपत्ती व शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेल्या लढाईचा आदर्श आजही जगभरात घेतला जातो !! या लढाईतुन शिवरायांचे संयम, वेळेचे व्यवस्थापन, आक्रमकता, क्षमाशीलता, मुत्सदीपणा हे गुण शिकण्यासारखे आहेत आणि म्हणुनच त्याच सह्याद्रित प्रत्येक पावलागणीक त्या युद्धाच्या पुर्वतयारीचे व युद्धाचे वर्णन किरण दादांच्या मुखातुन ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहत होते !!

प्रत्येकाने या संपुर्ण परिसरात एकदा फिरुन ती लढाई अनुभवावी !! तो क्षण अनुभवायला हवा ज्या क्षणाला महाराज स्वत: धनुष्यबाण घेवुन लढाईत उतरले होते ! तो क्षण अनुभवायला हवा ज्या क्षणाला कारतलब खान आणि रायबागन यांनी शिवरायांसमोर शरणागती पत्करली आणि शिवरायांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केल ! त्या बद्दल एकाही मोघल सरदाराचे प्राण न घेता स्वराज्यासाठी खुप सारे धन मिळवले!!

मी प्रथमच उंबरखिंडीत अशातला भाग नव्हता पण आज किरण दादांच्या मुखातुन तो इतिहास ऐकत ऐकत ह्या सह्याद्रित भटकण्याचे भाग्य मला लाभले !! धन्यवाद किरण दादा !!
जय शिवराय !

दुर्गवीर चा धीरु

उंबरखिंड लढाईचे विस्तृत वर्णन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Wednesday, 22 July 2015

संघर्षाताले जीवन….


खुप काही असणा-याकडे सगळेच बघतात हो !! पण खु काही सोसणा-याला कधीतरी जवळुन पाहील तर जाणवतो  संघर्ष काय आहे !  !!

आम्ही कंटाळतो ते "एसी" शिवाय होणा-या गर्मीला पण तिच गर्मी उब समजुन सुखावणारे पाहिले की कळत खरा संघर्ष काय आहे !

आम्ही हार मानतो ते आयुष्यातल्या छोट्या छोट्या संकटांना घाबरुन पण रोज नविन संकटांना तोंड देत जगणा-यांना पाहिल की जाणवत ते संघर्ष म्हणजे काय ?

या मुलांच्या चेह-यावर आनंद दिसतोय तो यासाठी नाहिय की त्यांना "काहितरी" मिळालय तो आनंद यासाठी आहे की त्यांना "खुप काहीतरी" मिळालय !

अगदि मोठ मोठ्या "सुखदायक" गोष्टिंना आपण "अपेक्षांच ग्रहण" लावतो तिथे ही मुले "छोट्याश्या गोष्टित" आयुष्याचे "सार्थक" मानतात !

आम्ही त्यांना शालेय दप्तर दिले ही खुप मोठी गोष्ट नाहिय पण त्यांच्यासाठी त्यांना शिक्षणाची अजुन एक संधी मिळाली आहे म्हणुन ते खुष आहेत !

"स्वत: सुखी" आहोत म्हणुन आपण नेहमीच "हसतो" पण "दुसरा हसतोय" म्हणुन "आपण सुखी" होण्यात खरा "आनंद" आहे ! !

जिवनात संघर्ष तर सगळेच करतात पण संघर्षातच जिवण जगणा-या या मुलांना माझा मानाचा मुजरा !!
जय शिवराय !!
स्थळ :- नाशिक - बागलान
शालेय वस्तु वाटप मोहिम शनिवार १८/७/२०१५

Tuesday, 7 July 2015

सिंहगड चोरीला गेलाय....


सिंहगड चोरीला गेलाय.... 

सर्व शिवभक्त, दुर्गप्रेमी,इतिहास प्रेमीं व "इतर प्रेमींना" कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की मुंबई पासुन जवळ पुणे येथील ऐतिहासिक "सिंहगड" अज्ञातांकडुन चोरीला गेलाय. प्राचीन काळापासुन अस्तित्वात असलेला व उपलब्ध कागदपत्रानुसार "सिंहगड" नावाने प्रसिद्ध असलेला "सिंहगड" आज सदर ठिकाणि अस्तित्वात नाही. 

तानाजी मालुसरेंनी जेथे स्वताचे प्राण अर्पुन गड राखला तो गड आज आपण गमावलाय. काही शिवप्रेमिंच्या म्हणन्यानुसार "अतिरेकी पर्यटक", "अश्लिल प्रेमी" यांनिच हा गड चोरुन गडाच्या जागेवर एका गार्डन ची उभरणी केली असावी. सदर किल्ल्याला(गार्डनला) भेट दिल्यावर गडसंवर्धनाच्या नावावर चाललेला बाजार, अश्लिल प्रेमिंचा सुळसुळाट दिसुन येतो. मुळात या ठिकाणी एखादा गड होता ह्याबद्दलच साशंकता वाटते. परंतु इतिहासात सदर गडाच्या नोंदि आढळल्याने त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही.
सदर जागेवर तानाजी मालुसरे, व राजाराम महाराज यांची समाधी, लोकमान्य टिळक यांचा वाडा, दोन तिन पाण्याची खोदिव व बांधिव टाकी आढळल्याने सिंहगड हा एक गड किंवा किल्ला होता व तो राखण्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडल्याचे स्पष्ट होतेय. राजाराम महाराजांनी शेवटचा श्वास याच गडावर घेतल्याने सदर जागेचे पावित्र्य लक्षात न येण्याइतके बिनडोक कोणि नसेल...

सदर गड खरच चोरिला गेलाय की आपल्या "खुशालचेंडु जनता व सरकारने" या "सिंहगडाचे" रुपांतर "गार्डन" मध्ये केलय का ? हा विचार करण्याचा मुद्दा आहे !
दुर्गवीर चा धीरु

Monday, 22 June 2015

हे खरे समाधान…हे खरे समाधान…

अरे व्वा !!! पुन्हा नविन वर्ष!! पुन्हा नविन पुस्तके !! पुन्हा नविन कपडे !! मज्जाच मज्जा !। हे सर्व दिवस आपल्यातल्या ब-याच जणांनी अनुभवले आहेत पण अनेकजण या अनुभवापासुन वंचीत होते आणि आजहि असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना दरवर्षी नविन पुस्तक,वह्या,दप्तर क्वचितच मिळत असतील. काहींची अवस्था इतकी दयनिय आहे की त्यांना पुस्तक,वह्या दप्तर या वस्तु मिळतात की नाही अशी परिस्थिती असते. या अशा विद्यार्थांच्या मनात मात्र शिक्षणाची ओढ किंबहुना जिद्ध असते. अशा या गरिब व गरजु विद्यार्थ्यांच्या जिद्धिला सलाम करत सेवा सहयोग व दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे कोल्हापुर > गडहिंग्लज मधील नूल या गावात शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्या मुलांना हे वाटप करुन खुप काही मोठ कार्य करतोय असे अजिबात नव्हते पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न!!

यातुन आम्हाला काय मिळाले तर, मानसिक समाधान !! त्या मुलांना जेव्हा ते शालेय दप्तर मिळाले तेव्हा ती उघडुन पाहण्यासाठिची लगबग, दुस-याला आपल्या वस्तु दाखवताना त्यांच्या चेह-यावरचे कौतुक पाहताना जाणिव होते की चला कुणाच्यातरी चेह-यावर हसु फुलविण्यात आपण यशस्वी झालो ! !

सर्वसामाण्यपणे माणसाच्या "समाधानाची व्याख्या" असते ती "मी स्वत: सुखी आहे म्हणजे मी समाधानी आहे" !!! पण "दुस-याच्या समाधानाने आपण समाधानी व्हाव" ही माझ्या "समाधानाची व्याख्या" आहे !! बघा तुम्ही सुध्दा तुमच्या समाधानाची व्याख्या बदलुन पहा ! दुस-याच्या समाधानात तुमच सुख मिसळुन पहा !!
जय शिवराय

Wednesday, 17 June 2015

आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो...


आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो...

शाळेतल्या "त्या" "जुन्या बाकांवर" जुने दिवस अनुभवून आलो..
बाकांवरच्या "त्या" "जुन्या आठवणी" पुन्हा उजळवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II १ II

न झेपणा-या दप्तराच ओझ लिलया पेलवुन आलो.
परतताना त्या दप्तरात "दुनियादारीचे" संस्कार घेवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II २ II


कंटाळवाण्या तासाची एखादि डुलकी अनुभवुन आलो.
"शहरातल्या क्षणिक झोपेपेक्षा" परिक्षेच्या काळातील "गाढ झोप" अनुभवुन आलो.
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II३ II


"Not Reachable वर्गात" आज पुन्हा सुख अनुभवून आलो
नोकरीतल्या ताण-तणावाला हळूच टपली मारून आलो
आज मी पुन्हा शाळेत जावुन आलो... II४ II

Monday, 8 June 2015

उलगडा… नऊ पुस्तकांचा…


उलगडा… नऊ पुस्तकांचा… 

आज Books & U या ग्रुप च्या सभासदांना भेटलो (आजच नाव बदललं श SSSS वाचतोय आम्ही ) रोहिणीजीं च्या म्हणण्यानुसार खरच नऊ ववेगवेगळ्या पुस्तकांची भेट झाली काहि पुस्तक आज प्रथमच पाहिली व थोडी फार वाचली तर काही पुस्तक अगोदर पहिली होती आणि वाचली सुद्धा होती.

पाहिलं पुस्तक जे मी या अगोदर वाचलंय ते म्हणजे "विजय बेंद्रे" एक असा अवलिया ज्याने फक्त वाचन आणि लेखन यासाठी स्वताला वाहून घेतलय. कधीही पुस्तक, वाचन, कविता यावर भरभरून कार्य करणारी व्यक्ती. माझ्यासारख्या "चोच" मारून वाचन करणा-या वाचकाला (जसे पक्षी "चोच" मारतात तशी) या "मदारी" सारख वाचन साठवून ठेवणा-या (उंट जसा मादारीत पाणी साठवून ठेवतो तसं) वाचकाची भेट होण हेच माझ सौभाग्य

दुसर पुस्तक पंकज बांदकर उर्फ "छुपे रुस्तम" गेल्या काही दिवसांपासून कोकणी त्यात तळकोकणातील (म्हणजे देवगडचा) त्यामुळे संपर्कात होतो आज भेट झाली. "मला काहीही येत नाही" अस वाक्य पुन्हा पुन्हा बोलून आणि खूप काही करून जाणारा माणूस. त्यात कोकणातला असल्यामुळे जन्मताच हुशार . पंकज बंधूंच्या (दादा नाही हा ) पुस्तकांची लिस्ट बनविण्याच्या आणि शालेय मुलांसाठी काम करण्याच्या उपक्रमाशी सहमत आहे. त्यांच्या शाळेच्या उपक्रमात मी सोबत आहे. आणि पुस्तकांची लिस्ट सुद्धा लिस्ट मी लवकरच ग्रुपवर टाकेन (कपाट उलट करायला लागणार बहुतेक)

तिसर पुस्तक प्रवीण माझ्या बाजूला बसून त्यांनी कविता सादर केली कविता ऐकतान तर त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक चित्र डोळ्यासमोर दिसत होत. पहिल्यांदा भेटल्यावर विजय बंधूनी ओळख करून दिली "हे दुर्गवीर" तेव्हा प्रवीण बंधुंच वाक्य "हो ते लगेच समजल हे शिवाजी महाराजांचे भक्त" प्रवीण बंधुंच भाषेवर असो वा कवितेवर वर्चस्व वाखाणन्याजोग आहे. प्रवीणराव तुमच्या कवितांच्या मैफिली ऐकायची इच्छा आहे. आशा आहे आपण असेच सतत भेटत राहू.

चौथ पुस्तक आहे मनोज "गजलकार मनोज" गझल असो वा इतर विषय बोलताना अगदी कडक इस्री केल्यासारखं यांच बोलण. मुळात गझल हा माझ्यासाठी फक्त वाचून वाह !! वाह !! करण्याचा विषय आहे. त्यात हे राव थेट "काळजाला भिडणार" किंबहुना "काळजाला चिरणार" लिखाण करतात. आजवर मी गझल करायचा प्रयत्न केला पण त्याची चारोळीच झाली त्यामुळे माझ्याकडून मनोजरावांना मानाचा मुजरा…

पाचवं पुस्तक जयेश पवार काय माहित या बंधूना पाहिलं तेव्हा प्रथम दर्शनी मला ते "गुजराती" वाटले. मी एक क्षण विचार करत होतो "च्यायला गुजराती मा कविता करेछु (जाउंदे नाही जमत गुजराती) जयेश बंधू नुसत बोलले कि कविता व्हायची. त्यांच्या बोलण्यातच कविता होती (कविता म्हणजे काव्य हा !! उगाच गैरसमज नको") पण त्यांनी तीस दिवस घेऊन केलेलं काव्य तर बाहेर कडाडणा-या विजांपेक्षा जबरदस्त होत. काय अर्थ होता त्या एक एक शब्दांना ! ! या अश्या कविता ऐकल्या कि वाटत कि यार मी जाम उड्या मारतो या "माझे अंतरंग" या पेज वरून आणि ब्लॉग वरून. इथे तर माझे बाप लोक (कवितेतले) बसलेत…

सहावं पुस्तक रोहिणी ढवळे यांना फार पूर्वीपासून ओळखतो म्हणजे विजय बेन्द्रेंच्या "आरंभ काव्यगंगा" याच्या स्पर्धेच्या वेळेपासून. . आरंभ ची E-काव्य स्पर्धा होती त्यात मी सहभाग घेतला. माझा पहिला, दुसरा आणि उत्तेजनार्थ नंबर येईल अशी अपेक्षा नव्हती पण निदान एक सहभागाच प्रशस्तीपत्रक मिळाल होत त्यात खाली यांच नाव व स्वाक्षरी होती (फार कमी Certificate मिळालेत त्यात एक वाढल बर वाटलं) त्यामुळे माझ्यासाठी या कोणीतरी मोठ्या कवियत्री वगैरे आहेत. आज त्यांनी एक कथा सांगितली पण आजूबाजूच्या आवाजामुळे माझ्यापर्यंत पोचलीच नाही. तर रोहिणी यांना विनंती आहे कि ती कथा मला मेल करा किंवा WhatsApp वर पाठवा मी नक्की वाचेन शांतपणे… आणि मगच प्रतिक्रिया देईन कथा नक्की पाठवा.

सातव पुस्तक पूजा भडांगे यांच्याबद्दल मी काय बोलणार यांचा तर काव्यसंग्रह प्रकाशित झालाय मला तर माझ्या Blog वर पोस्ट केलेल्या कविता प्रिंट करतान "नाकी नऊ" आलेत. पण बेळगाव च्या असल्याने कट्टर मराठी बाणा यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. मागे येळ्ळूर गावात झालेल्या लाठीहल्ल्याच्यावेळी तिथल्या मराठी बांधवांची कट्टरता अवघ्या देशाने पाहिली होती. त्यात आमचे दुर्गवीर प्रतिष्ठान चे प्रमुख "संतोष हसुरकर" हे पण बेळगाव चे त्यामुळे बेळगाव बद्दल खास आकर्षण. बोलण्याच्या नादात त्याचं कवितेच पुस्तक घेण विसरूनच गेलो असो पण पूजाजी तुमच पुस्तक विजय बंधुंपर्यंत पोहोचवता आल तर बघा मला अस एक पुस्तक संग्रही ठेवायचंय.

आठव पुस्तक शुभांगी वीरकर हे पुस्तक जरा कमीच बोललं (पण माझ्यापेक्षा थोड जास्त) त्यांची कविता कुठे शोधू तुला मस्तच…. आजची तरुणाई हे शीर्षक वेगळ्याच कारणासाठी वापरते पण शुभांगीजीनि देवावर काव्य केल यातच सर्व आल. मला बुवा आजवर गणपतीची आरती, स्तोत्र, आणि हनुमान चालीसा हे सोडलं तर पद्य विभागात देव दिसलाच नाही… ह्या तर देव शोधायलाच निघाल्या होत्या…

अशी हि नऊ पुस्तक अरेच्च्या नववं पुस्तक राहील ते म्हणजे "मी"… काही नाही हो हे "पुस्तक" वगैरे काही नाही हि "अंकलिपी" आहे सध्या अ, आ, इ, ई शिकतोय…

अश्या ह्या Books & U च्या सर्व सभासदांना अर्थात पुस्तकांना आज चाळल बर वाटला ह्या अंकलिपीला…. विजय बंधू शतश: धन्यवाद।
जय शिवराय
  

Friday, 5 June 2015

माझो कोकण मी "Miss" करतय हो...
माझो कोकण मी "Miss" करतय हो...

कौलांच्या घरट्यात "थंडावणारो" कोकण,
आज स्लॅपच्या घरात "तापताना" बघुन
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।१।।

हिरव्यागर्द झाडित "फुलणारो" कोकण
आज बोडक्या डोंगरात "सुकलेलो" बघुन
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।२।। 

गाई-गुरांच्या "घोळक्यात रमलेलो" कोकण
आज गाव गुंडांच्या "टोळक्यात फसलेलो" बघुन,
माझो कोकण मी "Miss"करतय हो....।।३।।

अखंड काताळात "विस्तारलेलो" कोकण
आज चिरे खाणिन "बोडको" केल्याचो बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।४।।

गगनचुंबी नारळ फोपळीन "नटलेलो" कोकण
आज सिंगापुरी माडात "खुंटलेलो" बघुन,
माझो कोकण मी मिस करतय हो....।।५।।

जुन्या "पुरातन मंदिरांनी" पावन झालेलो कोकण
आज "जीर्णोद्धाराच्या" फटक्यात गावलेलो बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो....।।६।।

टाळ मृदुंगावर सणवार सजवणारो कोकण
आज डिजे च्या आवाजात गाजवताना बघुन,
माझो कोकण मी "Miss" करतय हो... ।।७।।

दुर्गवीर चा धीरु

Monday, 1 June 2015

रुजवलेले शिवप्रेम…


रुजवलेले शिवप्रेम… 
भगवं रक्त सळसळत ते मुळात कट्टर हिद्दुत्वाच्या धमन्यात…. आज आमच्या या चिमुकलीला सांगाव लागल नाही बाळ हि रायगडाची पायरी आहे यावर नतमस्तक हो… ज्या पित्याच्या खांद्यावर बसून भगकी पताका अभिमानाने मिरवीत आणली त्या पित्याच्या पावलावर पाउल ठेवून या चिमुकल्या रणरागिणीने रायगडाच्या पायरीवर येताच मस्तक टेकविले. आज काल शिवप्रेम मनात "भरवावे" लागते पण या पेक्षा लहानपणापासूनच जर शिवप्रेम मनात "रुजवले" तर पुढे ते "भरवावे" लागणार नाही. आज "सेल्फी" चा बाजार मांडणा-यांनी जरा या फोटोकडे पाहिले तर "फोटोत जीव ओतणे" म्हणजे काय ते कळेल.
स्थळ:- किल्ले रायगड
वेळ:- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (३१ मे २०१५) ३४२ वा राजाभिषेकची पूर्व संध्या
छायाचित्रकार :- प्रशांत वाघरे
अजित राणे व त्याची कन्या "पौर्णिमा"

Tuesday, 26 May 2015

हरवलेलं कोकण…हरवलेलं कोकण…

येवा कोकण आपलोच असा अस अभिमानान आम्ही सांगतो पण मुळात "माझो कोकण" माझो रवलोच नाय हा…. ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत.

आज माझ्या कोकणात आंब्याच्या बागेत राखणदार कोण ? "नेपाळी" रखवालदार !! अरे माझे कोकणी बांधव खय गेले मुंबईक आणि मुंबईत येवन करतत काय ? ३०००-४००० ची लाचा-याची नोकरी… अरे पण मुळात तो नेपाळी कोकणात आणतात कोण आमचे पैशेवाले बागायतदार… का तर म्हणे गावातली पोर एकतर चोरी-मारी करतात नाहीतर दादागिरी करतात… ह्या नेपाळ्यांना दादागिरी काय ते माहितच नाही आणि भुरटी चोरी ते करतच नाहीत डायरेक्ट मर्डर करून दरोडा टाकून कायमचे नेपाळ ला पळून जातात.

आज माझ्या कोकणातल्या घरांची Contract कोण घेता खयचो तरी शहा, ठाकूर नायतर अजून कोण ?? आता हे लोक Contract घेतात याला माझा विरोध नाही पण… मग माझो मालवणी भाव काय करता त्या Contractor कडे गवंडीकाम करता रोजनदारीवर…

आज माझ्या कोकणातील बेकरी व्यवसाय कोणाच्या "दाढीत" आहे हे सांगायला नको। जर हे "दाढीवाले" जर एवढा मोठा व्यवसाय टाकू शकतात तर माझो "कोकणी भाव" काय फक्त त्या "दाढि" वाल्याचे पाव आणि वडे खावन जगतलो…

आज माझ्या कोकणात Tourism चा व्यवसाय जोरात होऊ शकतो पण त्यासाठी आम्ही कुठल्या मालवणी किंवा कोकणी माणसाशी संपर्क केलाच नाही कारण तो संपर्क लगेच होईल इतका कोणी मोठा झालाच नाही !! बाहेरचे लोक येउन व्यवसाय करतात याला माझा अजिबात विरोध नाही पण माझो "कोकणी भाव" करता तर त्याच Travel कंपनीत ड्रायवर म्हणून नोकरी करता.

आज ह्या कोकण आपल्या "कोकणी भावा" पासून दुरावलेला असा आणि ह्या "कोकण" कोकणात रवान हरावलेला असा…

Monday, 30 March 2015

काय रे हे दुर्दैव…. (इतिहासाची अवहेलना)
काय रे हे दुर्दैव….  
गुढिपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभु राजांनी मृत्युला कवटाळले, मुळात जो मृत्यु कुणासाठिही थांबत नाही त्या मृत्युला शंभु राजांनी अक्षरश: रोखुन धरल. स्वत:स बादशहा समजणा-या औरंगजेबाची किव करत आणि संपुर्ण स्वराज्यात संघर्षाची मशाल पेटवत शंभु राजे नावाचा एक वणवा शांत झाला. शंभु राजे आयुष्यभर स्वराज्यासाठि वणव्याप्रमाणे अक्षरश: जळत राहिले ज्याची उब अख्या हिंदुस्थानाने पुढची अनेक वर्ष अनुभवली पण या ज्वलंत योध्याची जाणिव मात्र फार कमी लोकांनी ठेवली. आज वढु सारख्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणारे महाभाग पाहिले की शंभु राजेंची हात जोडुन माफी मागाविशी वाटते. संभाजी महाराजांच्या नावाने ३० पानांत इतिहास शिकविणा-यांना उलट लटकवुन फटके द्यावेसे वाटतात!

रत्नागिरी > संगमेश्वर येथे शंभु राजांसारख्या सिंहाच्या छाव्याला दगा करुन पकडलं . आज त्या ठिकाणी एक पडका वाडा आहे. बाजुला अत्यंत प्राचीन अशी मंदिर आहेत स्थानिकांच्या आख्यायिकेनुसार अशी ३६० मंदिर सभोवतालच्या परिसरात आहेत, सध्यस्थितीत फक्त ४ मंदिर शिल्लक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हि मंदिर कुणी "सरदेसाई" नावाच्या व्यक्तिच्या मालकीच्या जागेत आहेत. सदर व्यक्ति त्या मंदिरांचे संवर्धन करु देत नाहि. मुळात इतकी प्राचिन मंदिर कुणाच्या मालकीची कशी काय असु शकतात. जरी हि मंदिरे कुणाच्या खाजगी जागेत असतीलही पण मंदिरांच किमान संवर्धन सुद्धा होवु शकत याबाबत एवढी उदासिनता का ? स्थानिकांची इच्छा असुनही सदर जमिनमालक त्या मंदिरांच संवर्धन करु देत हा अतिरेक नाहि तर काय आहे?

आमच्यासारख्या अनेक इतिहासप्रेमिंची / शिवशंभुप्रेमिंची हिच इच्छा आहे की ती जमिन त्याच्याच मालकीची राहो पण त्या जमिनीवरील पुरातन मंदिरांच किमान जतन व्हाव !! एका बाजुला भुमी अधिग्रहण च्या चर्चांना उत आलाय ! गड किल्ले संर्वधनाचे ढोल वाजतायत पण या "इतिहासाच्या मन की बात" कोणी करणार का?

Friday, 27 March 2015

कोकण सफर :- भाग १ :- इच्छा तेथे मार्गकोकण सफर :- भाग १

गुढी पाडवा आणि जोडून रविवार म्हटल्यावर दुर्गवीर गप्प बसतील काय ??/ निघाले कोकण वारीला नंतर मोर्चा कोल्हापुरात वळविला पण तिथे मी नव्हतो त्यांमुळे त्याचे अनुभव कथन मी करणार नाही तोवर या कोकण सफरीचा आनंद घ्या…

तर प्रवासाची सुरुवात झाली. पुढे लक्षात आले एक जागा गाडित शिल्लक आहे आणि कल्याणचे आकाश खोराटे बंधु यांची या मोहिमेवर यायची प्रबळ इच्छा आहे. शेवटी त्यांची इच्छा पुर्ण झाली रात्री २ वाजता त्यांना फोन केला. ते सकाळची ट्रेन पकडुन शुक्रवारी दुपारी रत्नागिरी ला भेटणार होते. आकाश बंधु शिवरायांनी तुमची इच्छा पुर्ण केली कारण तुमच निस्वार्थ शिवप्रेम !! फक्त तुमचा हा निस्वार्थीपणा कायम असाच राहुदे !! याच इच्छा तेथे मार्ग च दुसर उदाहरण म्हणजे नुकतेच दुर्गवीर मध्ये सहभागी झालेले चंदन गावकर मुंबईहुन मॅंगलोर एक्सप्रेस पकडुन थेट रत्नागिरी ला रवाना झाले रामगडवर गुढिपाडवा साजरा केला आणि शनिवारीच परतीचे तिकीट काढुन मुंबईला पुन्हा रवाना अवघ्या काहि तासांच्या कार्यक्रमासाठि एवढा लांबचा प्रवास करुन आलेल्या चंदन गावकर यांच ही दुर्गवीर च्या कार्याबाबतीतील प्रेम वाखाण्याजोगे...

मुळात इच्छा तेथे मार्ग हा अनुभव आम्हा दुर्गवीरांना गेली अनेक वर्ष येतोय आज तो अनुभव आकाश खोराटे व चंदन गावकर यांना आला. दुर्गवीर परिवारात येण्याची Entrance Exam पास झाल्याबद्दल आकाश व चंदन बंधुंचे खास अभिनंदन

ता. क. :- कोकण सफर :- भाग २ लवकरच…. 

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...