सिंहगड चोरीला गेलाय....


सिंहगड चोरीला गेलाय.... 

सर्व शिवभक्त, दुर्गप्रेमी,इतिहास प्रेमीं व "इतर प्रेमींना" कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की मुंबई पासुन जवळ पुणे येथील ऐतिहासिक "सिंहगड" अज्ञातांकडुन चोरीला गेलाय. प्राचीन काळापासुन अस्तित्वात असलेला व उपलब्ध कागदपत्रानुसार "सिंहगड" नावाने प्रसिद्ध असलेला "सिंहगड" आज सदर ठिकाणि अस्तित्वात नाही. 

तानाजी मालुसरेंनी जेथे स्वताचे प्राण अर्पुन गड राखला तो गड आज आपण गमावलाय. काही शिवप्रेमिंच्या म्हणन्यानुसार "अतिरेकी पर्यटक", "अश्लिल प्रेमी" यांनिच हा गड चोरुन गडाच्या जागेवर एका गार्डन ची उभरणी केली असावी. सदर किल्ल्याला(गार्डनला) भेट दिल्यावर गडसंवर्धनाच्या नावावर चाललेला बाजार, अश्लिल प्रेमिंचा सुळसुळाट दिसुन येतो. मुळात या ठिकाणी एखादा गड होता ह्याबद्दलच साशंकता वाटते. परंतु इतिहासात सदर गडाच्या नोंदि आढळल्याने त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही.
सदर जागेवर तानाजी मालुसरे, व राजाराम महाराज यांची समाधी, लोकमान्य टिळक यांचा वाडा, दोन तिन पाण्याची खोदिव व बांधिव टाकी आढळल्याने सिंहगड हा एक गड किंवा किल्ला होता व तो राखण्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडल्याचे स्पष्ट होतेय. राजाराम महाराजांनी शेवटचा श्वास याच गडावर घेतल्याने सदर जागेचे पावित्र्य लक्षात न येण्याइतके बिनडोक कोणि नसेल...

सदर गड खरच चोरिला गेलाय की आपल्या "खुशालचेंडु जनता व सरकारने" या "सिंहगडाचे" रुपांतर "गार्डन" मध्ये केलय का ? हा विचार करण्याचा मुद्दा आहे !
दुर्गवीर चा धीरु

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)