Monday, 30 March 2015

काय रे हे दुर्दैव…. (इतिहासाची अवहेलना)
काय रे हे दुर्दैव….  
गुढिपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभु राजांनी मृत्युला कवटाळले, मुळात जो मृत्यु कुणासाठिही थांबत नाही त्या मृत्युला शंभु राजांनी अक्षरश: रोखुन धरल. स्वत:स बादशहा समजणा-या औरंगजेबाची किव करत आणि संपुर्ण स्वराज्यात संघर्षाची मशाल पेटवत शंभु राजे नावाचा एक वणवा शांत झाला. शंभु राजे आयुष्यभर स्वराज्यासाठि वणव्याप्रमाणे अक्षरश: जळत राहिले ज्याची उब अख्या हिंदुस्थानाने पुढची अनेक वर्ष अनुभवली पण या ज्वलंत योध्याची जाणिव मात्र फार कमी लोकांनी ठेवली. आज वढु सारख्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणारे महाभाग पाहिले की शंभु राजेंची हात जोडुन माफी मागाविशी वाटते. संभाजी महाराजांच्या नावाने ३० पानांत इतिहास शिकविणा-यांना उलट लटकवुन फटके द्यावेसे वाटतात!

रत्नागिरी > संगमेश्वर येथे शंभु राजांसारख्या सिंहाच्या छाव्याला दगा करुन पकडलं . आज त्या ठिकाणी एक पडका वाडा आहे. बाजुला अत्यंत प्राचीन अशी मंदिर आहेत स्थानिकांच्या आख्यायिकेनुसार अशी ३६० मंदिर सभोवतालच्या परिसरात आहेत, सध्यस्थितीत फक्त ४ मंदिर शिल्लक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हि मंदिर कुणी "सरदेसाई" नावाच्या व्यक्तिच्या मालकीच्या जागेत आहेत. सदर व्यक्ति त्या मंदिरांचे संवर्धन करु देत नाहि. मुळात इतकी प्राचिन मंदिर कुणाच्या मालकीची कशी काय असु शकतात. जरी हि मंदिरे कुणाच्या खाजगी जागेत असतीलही पण मंदिरांच किमान संवर्धन सुद्धा होवु शकत याबाबत एवढी उदासिनता का ? स्थानिकांची इच्छा असुनही सदर जमिनमालक त्या मंदिरांच संवर्धन करु देत हा अतिरेक नाहि तर काय आहे?

आमच्यासारख्या अनेक इतिहासप्रेमिंची / शिवशंभुप्रेमिंची हिच इच्छा आहे की ती जमिन त्याच्याच मालकीची राहो पण त्या जमिनीवरील पुरातन मंदिरांच किमान जतन व्हाव !! एका बाजुला भुमी अधिग्रहण च्या चर्चांना उत आलाय ! गड किल्ले संर्वधनाचे ढोल वाजतायत पण या "इतिहासाच्या मन की बात" कोणी करणार का?

Friday, 27 March 2015

कोकण सफर :- भाग १ :- इच्छा तेथे मार्गकोकण सफर :- भाग १

गुढी पाडवा आणि जोडून रविवार म्हटल्यावर दुर्गवीर गप्प बसतील काय ??/ निघाले कोकण वारीला नंतर मोर्चा कोल्हापुरात वळविला पण तिथे मी नव्हतो त्यांमुळे त्याचे अनुभव कथन मी करणार नाही तोवर या कोकण सफरीचा आनंद घ्या…

तर प्रवासाची सुरुवात झाली. पुढे लक्षात आले एक जागा गाडित शिल्लक आहे आणि कल्याणचे आकाश खोराटे बंधु यांची या मोहिमेवर यायची प्रबळ इच्छा आहे. शेवटी त्यांची इच्छा पुर्ण झाली रात्री २ वाजता त्यांना फोन केला. ते सकाळची ट्रेन पकडुन शुक्रवारी दुपारी रत्नागिरी ला भेटणार होते. आकाश बंधु शिवरायांनी तुमची इच्छा पुर्ण केली कारण तुमच निस्वार्थ शिवप्रेम !! फक्त तुमचा हा निस्वार्थीपणा कायम असाच राहुदे !! याच इच्छा तेथे मार्ग च दुसर उदाहरण म्हणजे नुकतेच दुर्गवीर मध्ये सहभागी झालेले चंदन गावकर मुंबईहुन मॅंगलोर एक्सप्रेस पकडुन थेट रत्नागिरी ला रवाना झाले रामगडवर गुढिपाडवा साजरा केला आणि शनिवारीच परतीचे तिकीट काढुन मुंबईला पुन्हा रवाना अवघ्या काहि तासांच्या कार्यक्रमासाठि एवढा लांबचा प्रवास करुन आलेल्या चंदन गावकर यांच ही दुर्गवीर च्या कार्याबाबतीतील प्रेम वाखाण्याजोगे...

मुळात इच्छा तेथे मार्ग हा अनुभव आम्हा दुर्गवीरांना गेली अनेक वर्ष येतोय आज तो अनुभव आकाश खोराटे व चंदन गावकर यांना आला. दुर्गवीर परिवारात येण्याची Entrance Exam पास झाल्याबद्दल आकाश व चंदन बंधुंचे खास अभिनंदन

ता. क. :- कोकण सफर :- भाग २ लवकरच…. 

Tuesday, 10 March 2015

शिवजयंती साजरी होणारच…


शिवजयंती साजरी होणारच…

तुम्ही तारीख आणि तिथी चे कितीही वाद घाला आणि आम्हा शिवभक्तांमध्ये कितीही फुट पडायचा प्रयत्न करा शिवजयंती हि साजरी होणारच… असा आक्रमक पवित्रा आज महाराष्ट्रातील शिवभक्तांनी घेतला जो उत्साह तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताना होता तोच तिथीला…. मुळात सच्चा शिवभक्त तारीख / तिथी या वादात पडतच नाही त्याला फक्त शिवरायांच्या नावाचा जयजयकार करायला कारणच हव असत… मग तुम्ही ३६५ दिवस शिवजयंती करायची ठरवलीत तरी तोच उत्साह असेल या शिवभक्तांचा…. आज मुंबईभर चाललेल्या शिवजयंती कार्यक्रमांची बातम्या कानावर येत होत्या तेव्हा कान सुखावत होते. अनेक मंडळांच्या कार्यक्रमांना वेळे अभावी भेट देता आली नाही पण जिथे भेट दिली तिथले कार्यक्रम पाहून मन भरून आल. पहिल्यांदा कोपर येथील शास्त्र प्रदर्शनास काही दुर्गवीर सभासदांनी भेट दिली. त्याचवेळी सांताक्रूझ व बोरीवली येथे एकाच वेळी शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईतील गोरेगांव येथे शिवजयंती कार्क्रमास सदिच्छा भेट दिली. दुपारनंतर लालबाग येथील राजुद्रा ट्रेकर्स च्या पोवाडा, मर्दानी खेळ, शस्त्र व नाणी प्रदर्शन ला भेट दिली. या कार्यक्रमात दोन - तीन रशियन नागरिकांनी हजेरी लावली होती त्यांना मर्दानी खेळ म्हणजे काय याच प्रात्यक्षिक दाखवील. जे. एन. स्पोर्ट्स क्लब काळाचौकी येथे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.

या सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे मां जिजाऊ प्रतिष्ठान चा मदत उपक्रम फेसबुक / Whats App वरून माझ्या परिचयाच्या असलेल्या विशाल गवळी व रुपेश सावंत यांच्या घाटकोपर येथील मां जिजाऊ प्रतिष्ठान ने शिवजयंती निमीत्त संत गाडगेबाबा धर्मशाळेतील कॅन्सरग्रस्त गरिबांना चादर, धान्य वाटप, घाटकोपर येथील मतीमंद मुलांना मेडिकल बॉल वाटप, विभागातील ३ गरिबांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेणे. असे उपक्रम राबवून ख-या अर्थाने शिवजयंती साजरी करणा-या जिजाऊ प्रतिष्ठान चे खास अभिनंदन….


आता हि झाली चांगली बाजू याला वाईट बाजूपण आहे. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणा-या मंडळांना यावर्षी परवानगी नाकारणे, मिरवणूक काढणा-या शिवभक्तांना अटक करणे, शिवजयंती साजरी करायची पण कोणत्याही घोषणा / आवाज करायचा नाही. हे आणि असे अनेक निर्बंध लादून प्रशासन काय साध्य करत होत कुणास ठावूक. मुळात अस करून शिवभक्तांच्या भावना भडकावत होते एवढ मात्र नक्की. मुळात सरकार कुणा एका धर्माच्या बाजूने नसते हे मान्य पण ते हिंदूंच्या विरोधात असते याची प्रचीती काल आली. प्रत्येक मंडळाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवून यांनी काय साध्य केल. जर ते शिवभक्तांना संरक्षण देत होते तर शिवरायांच्या मावळ्यांना तुमच्या संरक्षणाची अजिबात गरज नाही आणि शिवभक्त काही अनुचित प्रकार करतील अशी भीती असेल तर अंगावर आला तर शिंगावर घ्यायची जात आमची उगाच कुणावरहि भुंकणारी जात नाही आमची… मुळात तारीख / तिथी वाद उकरून शिवभक्तांमध्ये फुट पाडणारे राहिले बाजूला आणि मनापासून शिवरायांवर प्रेम करणारे शिवभक्त मधल्या मध्ये होरपळले जातात काय बोलायचं आता !!

कालच्या दिवसात एका बाजूला चाललेले राजकारण पाहून मन सुन्न होत होते तर दुस-या बाजूला कितीही अडचणी आल्या (निर्माण केल्या ) तरी मागे न हटणारे शिवभक्त पाहून मन सुखावले…....
या संपूर्ण प्रकारात सर्व शिवभक्तांचा एकच पवित्रा होता…"शिवजयंती होणारच"….

Monday, 9 March 2015

"देव्या"चा आवेश = देवेश……


"देव्या"चा आवेश = देवेश……

मुळात दुर्गवीर कुणी कधी एकमेकांना परकं करतच नाही. दुर्गवीर नेहमी कुटुंब म्हणून सोबत राहते. त्याच कुटुंबाचा एक "अवलिया" सदस्य म्हणजे "देव्याभाई" उर्फ "देवेशभाई सावंत" दुर्गवीर ची AK47 जी नेहमी धडधडतच असते… कधी कुणाला लहानमोठा मनातच नाही. लहानशी लहान आणि मोठ्यांशी मोठा होऊन वागण्याच्या त्याच्या कलेमुळे सगळ्यांमध्ये "फ़ेमस" आहे.

आज दुर्गवीर तर्फे शिवजयंती उत्सव "बोरीवली" येथे साजरा करण्यात येणार होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवेश आणि त्याचा भाऊ विशाल आणि संपूर्ण टीम(इतरांची नाव मला माहित नाहीत म्हणून त्यांची माफी मागून ) यांनी केली, अर्थातच एवढ मोठ नियोजन करताना त्यांना रात्रीची झोप सुद्धा मिळाली नसणार हे नक्की… पण दुस-या दिवशी आम्ही सर्व इतर ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात फारशी मदत केली नाही (निदान मी तरी काहीच मदत केली नाही…. कशी करणार पोचलोच सकाळी ११ वाजता) त्या सर्वांच आदरातिथ्य करण्यात हे सगळे तत्पर होते. कधी वाटत तरुण सळसळत रक्त आहे कुठेतरी अतिउत्साहाच्या भरात चुकतील पण कदाचित त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असावी त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात मला तरी ते कुठे अतिउत्साहीपणाच्या भरात कुठे चुकले अस वाटल नाही. या सर्व टीम ला एकत्र ठेवण्याच कार्य देवेश खरच उत्कृष्टपणे केलय. संतोष दादाची आणि देवेश ची भेट तो फक्त एक फोटोग्राफार म्हणून झाली नंतर फोटोग्राफर म्हणून तर राहिलाच पण एक शिवप्रेमी, गडप्रेमी सोबत एक कुशल संघटक म्हणून आज आमच्यासमोर उभा आहे. त्याच्यासोबत असलेल्या त्या ३०-३५ मुलांना तो एक चांगला मार्ग दाखवतोय आणि एक चांगल्या कार्यासाठी घडवतोय हे पाहून बर वाटत. दुर्गवीरमधील प्रत्येकजण आपल्या कलेचा उपयोग करून शिवकार्य इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय, त्यात देवेशच्या ह्या प्रयत्नांची खरच दाद द्यावीशी वाटते. आणि एवढ चांगल कार्य करीत असताना वागण्यात कुठलाही "Attitude" नाही. देवेश चा भाऊ विशाल तर "Stand Up Comedy" कोणालाही कितीही टेंशन असो याची Comedy सुरु ते सर्व टेंशन विसरलाच पाहिजे. असेच रहा रे कायम…

या शिवजयंतीचा कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पडणा-या देवेश आणि त्याच्या संपूर्ण टीमच दुर्गवीर परिवारातर्फे खास अभिनंदन… भावांनो हि साथ अशीच राहुदे रे…
जय शिवराय

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...