शिवजयंती साजरी होणारच…


शिवजयंती साजरी होणारच…

तुम्ही तारीख आणि तिथी चे कितीही वाद घाला आणि आम्हा शिवभक्तांमध्ये कितीही फुट पडायचा प्रयत्न करा शिवजयंती हि साजरी होणारच… असा आक्रमक पवित्रा आज महाराष्ट्रातील शिवभक्तांनी घेतला जो उत्साह तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताना होता तोच तिथीला…. मुळात सच्चा शिवभक्त तारीख / तिथी या वादात पडतच नाही त्याला फक्त शिवरायांच्या नावाचा जयजयकार करायला कारणच हव असत… मग तुम्ही ३६५ दिवस शिवजयंती करायची ठरवलीत तरी तोच उत्साह असेल या शिवभक्तांचा…. आज मुंबईभर चाललेल्या शिवजयंती कार्यक्रमांची बातम्या कानावर येत होत्या तेव्हा कान सुखावत होते. अनेक मंडळांच्या कार्यक्रमांना वेळे अभावी भेट देता आली नाही पण जिथे भेट दिली तिथले कार्यक्रम पाहून मन भरून आल. पहिल्यांदा कोपर येथील शास्त्र प्रदर्शनास काही दुर्गवीर सभासदांनी भेट दिली. त्याचवेळी सांताक्रूझ व बोरीवली येथे एकाच वेळी शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईतील गोरेगांव येथे शिवजयंती कार्क्रमास सदिच्छा भेट दिली. दुपारनंतर लालबाग येथील राजुद्रा ट्रेकर्स च्या पोवाडा, मर्दानी खेळ, शस्त्र व नाणी प्रदर्शन ला भेट दिली. या कार्यक्रमात दोन - तीन रशियन नागरिकांनी हजेरी लावली होती त्यांना मर्दानी खेळ म्हणजे काय याच प्रात्यक्षिक दाखवील. जे. एन. स्पोर्ट्स क्लब काळाचौकी येथे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.

या सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे मां जिजाऊ प्रतिष्ठान चा मदत उपक्रम फेसबुक / Whats App वरून माझ्या परिचयाच्या असलेल्या विशाल गवळी व रुपेश सावंत यांच्या घाटकोपर येथील मां जिजाऊ प्रतिष्ठान ने शिवजयंती निमीत्त संत गाडगेबाबा धर्मशाळेतील कॅन्सरग्रस्त गरिबांना चादर, धान्य वाटप, घाटकोपर येथील मतीमंद मुलांना मेडिकल बॉल वाटप, विभागातील ३ गरिबांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेणे. असे उपक्रम राबवून ख-या अर्थाने शिवजयंती साजरी करणा-या जिजाऊ प्रतिष्ठान चे खास अभिनंदन….


आता हि झाली चांगली बाजू याला वाईट बाजूपण आहे. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणा-या मंडळांना यावर्षी परवानगी नाकारणे, मिरवणूक काढणा-या शिवभक्तांना अटक करणे, शिवजयंती साजरी करायची पण कोणत्याही घोषणा / आवाज करायचा नाही. हे आणि असे अनेक निर्बंध लादून प्रशासन काय साध्य करत होत कुणास ठावूक. मुळात अस करून शिवभक्तांच्या भावना भडकावत होते एवढ मात्र नक्की. मुळात सरकार कुणा एका धर्माच्या बाजूने नसते हे मान्य पण ते हिंदूंच्या विरोधात असते याची प्रचीती काल आली. प्रत्येक मंडळाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवून यांनी काय साध्य केल. जर ते शिवभक्तांना संरक्षण देत होते तर शिवरायांच्या मावळ्यांना तुमच्या संरक्षणाची अजिबात गरज नाही आणि शिवभक्त काही अनुचित प्रकार करतील अशी भीती असेल तर अंगावर आला तर शिंगावर घ्यायची जात आमची उगाच कुणावरहि भुंकणारी जात नाही आमची… मुळात तारीख / तिथी वाद उकरून शिवभक्तांमध्ये फुट पाडणारे राहिले बाजूला आणि मनापासून शिवरायांवर प्रेम करणारे शिवभक्त मधल्या मध्ये होरपळले जातात काय बोलायचं आता !!

कालच्या दिवसात एका बाजूला चाललेले राजकारण पाहून मन सुन्न होत होते तर दुस-या बाजूला कितीही अडचणी आल्या (निर्माण केल्या ) तरी मागे न हटणारे शिवभक्त पाहून मन सुखावले…....
या संपूर्ण प्रकारात सर्व शिवभक्तांचा एकच पवित्रा होता…"शिवजयंती होणारच"….

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….