Posts

Showing posts from 2012

उठ हो जागी तू रणरागिनी

Image

कसला रे हा तुझा पुरषार्थ..

Image
कसला रे हा तुझा पुरषार्थ  पुरुष म्हणून जगलास तर त्याला अर्थ पूर्ण करण्यास तुझ्या वासनेचा स्वार्थ हिरावतोयस तू स्त्रीच्या जीवनाचा अर्थ
वासना हि तुझी सोडतेय पातळी  कुणा स्त्रीचे आयुष्य पडतेय त्यास बळी  पडताच तुझी हि नजर काळी   भयंकर शिक्षा थोपतोस तिच्या कपाळी
संत महात्म्यांच्या या पवित्र भूमीत काय हे घडतेय विपरीत पुरुष म्हणोनी मिरवतोयस या जगात पण राक्षसीपणा का तुझ्या कर्मात
स्त्रीचे रक्षण असे तुझ्या हाती  पण का विसरलास तू सारी नाती निर्मळ मनाने बघ तू सभोवती अन जप हि सारी आयां  बहिणीची नाती 
पुराणात हि स्त्री असे देवीसमान का करतोय या दैवत्वाचा अपमान ठेवतोय तू तुझी बुद्धी गहाण अन करतोयस तू या स्त्री शक्तीस आव्हान 
विसरू नको रे ती कालीमाता  जी संपवे राक्षसांसी स्वत:  पापाचा तुझ्या घडा हा भरता संपवेल हि तुला ती रणरागिणी आता
दुर्गवीर चा धीरु  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/का असा स्वार्थ पाहिला....

Image
का असा स्वार्थ पाहिला....
हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... माणुसकी आज ना राहिली नावाला जो येई तो सावरे स्वतःला  जन्मभर स्वार्थाने बरबटलेला  मरणोत्तर कोण रडे कशाला
हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... दया माया करण्यासी तू हुकला  जीवनाच्या वाटेवर आज तू चुकला  मोह मायेत कसा तू झुकला  झुकत झुकत कसा तू प्राणास मुकला 
हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... वासनेतूनी विसरलास तू माणुसकी  अखेर ना काही राहिले बाकी  सरताच संपत्तीची लकाकी  येते उपयोगास माणुसकी 
हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... मोह माया असे क्षणभंगुर  माणुसकीपुढे होते जणू लंगुर  जेथे उगवे माणुसकीचा अंकुर  स्वार्थ मोह माया होई इथे क्षणभंगुर दुर्गवीर  चा धीरु  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

दुर्गवीर....

Image
धन्य धन्य जाहले जीवन माझे
मी जन्मलो मराठी...
त्या उपरी कळस म्हणोनी,
मी वाढलो मराठी...
सोनियाचा कळस जणू तो
कि मी भेटलो दुर्गवीरांसी..
दुर्गवीर चा धीरु

खूप दिवसांनी

Image
खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
मनातल्या भावनांना प्रस्थान करावसं वाटत
ती ऐकेल म्हणून,
खूप खूप बोलावसं वाटत
ती वाचेल म्हणून,
खूप खूप लिहावसं वाटत 

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
कुणाच्यातरी आठवणीत रमावसं वाटत
सहजच ती आठवल्यावर गालात हसावस वाटत
छानस लाल गुलाब तिला द्यावस वाटत
त्यावेळच तीच हास्य पहावस वाटत

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
सर्व काही विसरून तिला आठवावं अस वाटत 
तिच्या आठवणी मध्ये बावळट व्हावस वाटत
तिची वाट पाहत उभ राहावसं वाटत
तिला येताना पाहून तिच्याकडे पहावस वाटत 

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
तिने माझी आठवण काढावी अस वाटत
याच विचाराने बहरलेल मन पहावस वाटत 
सहजच ती समोर आली तर 
तिला ते मन दाखवावसं वाटत
धीरु माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

हे बंध रेशमाचे...................

Image

जमल तर....

जमल तर....

असेल खर प्रेम तीच तर बदलेल स्वतास ती,  टिकवायच असेल तुला प्रेम तर तुही माघार घेउन बघ...
भेटन बोलन म्हणजे प्रेम नाही मित्रा, तुही थोडा पुरुषी अहंकार बाजुला ठेवून बघ....
असेल घ्यायची परीक्षा तिच्या प्रेमाची, तर तुही तुझ्या प्रेमाची परीक्षा देऊन बघ......
तू कितीही चुकलास तरी तुझ्या वर प्रेम करण, हा स्त्रित्वाचा पैलू आहे....
काही झाल तरी तिने दुसर प्रेम करू नये, हे खर पुरुषी अहंकाराच लक्षण आहे.....
असेल चुकत ती तर एकदा समजावून बघ, जमल तर माफ़ करून बघ...
तरीही होत असतील तिच्या चूका, तर मात्र प्रेमाची परीक्षा घेउन बघ.....
जमल तर हे अस करून बघ, नाहीतर विसर मागच आणि पुढे चालुन बघ... @[328759653887659:0]  धिरज लोके (दुर्गवीर चा धीरू)
http://dhiruloke.blogspot.in

अभेद्य अन अफाट मी

Image

कळी

Image

Marathi Graffiti 2

Image

Marathi Graffiti

Image

सिंधुदुर्गाची महती....

सिंधुदुर्गाची महती....
जर पहायचा असेल स्वर्ग, तर गाठायचा सिंधुदुर्ग हिरवळीतील निसर्ग, हा सिंधुदुर्गाचा गर्व....
देवगडची कुणकेश्वर काशी, येथे महाशिवरात्रीला भेट होई शंकराशी म्हणतात याला कोकणची काशी, स्वर्गातून आणलीय जशीच्या तशी...
मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग,अख्या सिंधुदुर्गाचा गर्व शेकडो वर्षापूर्वी संपले राजेशाही पर्व, तरी समुद्र्मध्यात आहे हा दुर्ग....
सावंतवाडीची लाकडी खेळणी, यंत्रयुगातही आहे मुलांसाठी पर्वणी खेळणी हवी आहेत लाकडी तर ताबडतोप गाठा सावंतवाडी...
देवगडचा "हापूस",आज बनलाय सर्व फळांचा "बापूस" तुम्ही आंबा एकदा खाल्ला पाहून,चार पाच पेटी मागवाल मागाहून....
सिंधुदुर्गातील मालवणी भाषा,हि ऐकताच सर्वत्र पिकतो हशा सिनेमातून गेला तमाशा,आणि नाटकात आली मालवणी भाषा...
सिंधुदुर्गातील पोखरबावचा गणपती, पांडवांची होती येथे एक रात्र वस्ती बारा मास वाहते येथे पाणी धबा धबा,फुलल्यात येथे त-हेत-हेच्या बागा...
असेच एक शिरोडा ठिकाण,आहे येथे मिठाची खाण अख्या सिंधुदुर्गाला मीठ पुरवते शिरोडा,जणू मिठाचा राजवाडा...
आच-याचा रामेश्वर, नवसाचा परमेश्वर बडे बडे श्रीमंत,मानतात यालाच आपला भगवंत...
असा हा सि…

पहा... पहा... शिवरायांचे स्वराज्य जाहले......

शिवरायां चरणी ज्यांनी मस्तक ठेविले, शिवकार्यासाठी जीवन अर्पीले, असे मावळे या मातीत जन्मले,  शिवरायांसी असे हिरे लाभले म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......
रक्त या मावळ्यांचे  सळसळे, जणू म्यानातून तलवार उसळे,  मावळ्यांचा हा रोष पाहुनी,  अवघे सारे गनीम भ्याले म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......
म्लेछांच्या या हल्यास थोपविण्या, भवानीने समशेरीचे रूप घेतले,  स्वराज्याकडे जे पाहती वक्रदृष्टीने, न जाणो किती असे गनीम संपविले म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......
बाल शिवाजीस जिजाऊ नी घडविले, त्या शिवरायांनी गुलामीस लाथाडीले,  मोजक्या कट्टर मावळ्यांसी घेउनी शिवरायांनी गडकोट जिंकले म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......
सुस्त निद्रिस्त जनतेस जागविले, बाजी तानाजी असे माणिक निवडले,  भल्या भल्यांनी प्राण वेचुनी, या लाखाच्या पोशिंद्यास जगविले म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke  http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

"दुर्गवीर" मी

Image
स्वराज्यासाठी झटेन असा "दुर्गवीर" मी, गडकोटांसाठी मरेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांचा निष्ठावान असा "दुर्गवीर" मी हिंदवी स्वराज्याचा मावळा असा "दुर्गवीर" मी तन-मन-धन अर्पिणारा असा "दुर्गवीर" मी शिवकार्याने जीवन व्यापणारा असा "दुर्गवीर" मी स्वराज्याचा ध्यास मजसी असा "दुर्गवीर" मी पाषाणाहूनी कठीण असा "दुर्गवीर" मी मित्रांचा कोमल मित्र असा "दुर्गवीर" मी महाराष्ट्राचा अभिमान मजसी असा "दुर्गवीर" मी काट्या-कुट्या तुनी चालेन असा "दुर्गवीर" मी शिवशाहीचे गुलाब फुलवेन असा "दुर्गवीर" मी गडकोटां साठी छातीची ढाल करेन असा "दुर्गवीर" मी शिवकार्या साठी पोलादी मनगटे झिजवेन असा "दुर्गवीर" मी गनिमास ठेचेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांसी नेहमी पूजेन असा "दुर्गवीर" मी जगेन तर शिवभक्त असा "दुर्गवीर" मी मारतानाही मरेन शिवप्रेमी असा "दुर्गवीर" मी
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

विश्वास...

खरच...... जमेल का मला?

खरच...... जमेल का मला?
जुन्या वाईट आठवणी विसरून, पुन्हा नव्या उमेदीने जगण, पूर्वायूष्याच्या  विश्वासघाताला विसरुन, रागाला आवरण... खरच...... जमेल का मला 
पहिल्या प्रेमात फसलो म्हणुन, मैत्रिकडे संशयाने न पाहाणे, खरच कुणाची तरी निस्वार्थी मैत्री, त्याचा स्वार्थ म्हणुन न पाहाणे, खरच...... जमेल का मला 
जबाबदारीमूळे प्रेमात फसण, अनं त्या प्रेमात फसन्याने, स्वताला जबाबदारित गुंतवण,  आता तरी या चक्राला थांबवन, खरच...... जमेल का मला 
आठवन येते पहिल्या प्रेमाची, आशा आहे "ती" परतण्याची, राखून ठेवलीय मी जागा तिची, सहजा सहजी ना होणार ती "जागा" दुस-या कुणाची, खरच...... जमेल का मला
रात्री अपरात्री "ती"ला आठवण, प्रत्येक मुलीत "ती" ला शोधण, भले ती कुठेतरी कमी पडण, पण निदान तिला ख-या मैत्रीत टिकवण, खरच...... जमेल का मला धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

"तू" आणि "तो"

"तू" आणि "तो"तुझ्या आकाशरुपी जीवनात, "तो" ढगासारखा येउन गेला, "तू" हरवलिस "ज्या" च्या सुगंधात, "त्या" च्या येण्याचा कधी अर्थ जाणला?????
आजची तुमची प्रेमकळी, फुलेल ती एका गोड सकाळी, फुलान्यास ही गोड कळी, जावी लागेल रात्र काळी!!!!
आज तुझे जे मन जाळी, तेच लिहिले असावे तुझ्या भाळी, तुझ्या आठवणी ठेव जवळी, एक दिवस याच हलवतिल तुझ्या गालखळी!!!!!
तुझ्या आयुष्याच्या वाटेवर, तू फक्त "त्या" ची वाट पाहिलिस, "त्या" चे आयुष्य असेल कोणत्या काटयावर, याची कधी चाचपड़नी केलीस!!!!!
"त्या" च्या एका पावलावर, तू एकच पाउल ठेऊ नकोस, दडपण जरी असले मनावर, तरी मनामध्ये काही ठेऊ नकोस!!!!
प्रेम कर तू त्याच्यावर, पण मनापासून मनावर, विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर, जसा गुलाबचा काटयावर!!!!!!
जशी पावसाची ओढ़ चातकाला, जशी लाटाची ओढ़ किनारयाला, तशी प्रेमाची ओढ़ तुमच्या मनाला, ना उमजनार ते सहजा सहजी कुणाला!!!!
त्याच्या मदतीने मिळते तुझ्या जीवनाला दिशा, हीच असावी खरया प्रेमाची नशा, तूच ठरव तुझ्या प्रेमाची दिशा, सहजच संपेल ही काळ निशा,
प्रेमा…

नाराज व्ह्यायच तर.................................

नाराज व्ह्यायच तर................................. नाराज व्ह्यायच तर................................. नाराज व्ह्यायच तर कुणासाठी व्ह्यायच, ज्याला आपल मानल त्याच्यासाठी व्ह्यायच,
विसरायच असेल तर कुणाला विसरायच, ज्याला आपल म्हणुन लक्षात ठेवायच होत.
विचारायाच असेल तर कुणाला विचारायाच, ज्याला स्वताच्या मनातल कधी सांगितल होत,
रागावायाच असेल तर कुनावर रागावायाच, ज्याच्या रागाला कधी समजून घेतलेल असत,
मैत्रिची काळजी हेच त्याच्या रागाच कारण असत, आपलेपणा टिकवनं हेच त्याच्या विराहाच निमित्त असत,
विसरंन सोप नसत, ज्याला मनातल माहित असत,
नाराज होण्याची धमकी देऊन, नविसरण्यातच मैत्रीच बंधन असत, धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

आई.......

आई....... आठवणित रडतोय तुझ्या मी..... भेटायास मज येशील ना???? विरहात कोलमोड़तोय तुझ्या मी... सावरण्यासी तू येशील ना....
आई.................. स्वार्थाने बरबटलेल्या या जगात, गुरफटून गेलोय मी, सोडवून मजला या स्वार्थजालातुन, दूर कुठेतरी नेशील ना....
आई.............. या दुनयेशी लढीन मी, करीन मी घनघोर युद्ध, पण न जाणे तुझ्या आठवनिने  मन माझे का कमजोर होत.....
आई............... माझ्या मनातल तुझ पद, अढळ असेल तुझ्यासाठी, साथजन्म विसरणार नाही मी, तू जे केलेस माझ्यासाठी,
आई............... तुझ माझ्यासाठी धड़पडन, मलाही कळतय, थांबवू शकत नाही म्हणुन, मन माझ इथे जळतय... आई................... आई............... धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

शेवटचे पान....

शेवटचे पान.... शेवटचे पान.... वहितिल सर्वात महत्वाचे पान, यालाच मिळते हक्काचे मान पान, उगवातो विचार मनात, तो उमटतो शेवटच्या पानात......
तेच ते शेवटचे पान...... शोधून सापडनार नाही असे हक्काचे ठिकान, साधे दिसुनही असते मोत्याची खाण, किती विचार केला मनात, लगेच उतरे या पानात..
तेच ते शेवटचे पान...... मन झेलते किती मान अपमान, सगळे अनुभवते हे शेवटचे पान, सहजरीत्या खोटे बोलते हे मन, पण चुकुनही निघणार नाही खोटे हे पान....
तेच ते शेवटचे पान...... कोणाचा झाला जर प्रेमभंग, बाहेरून गायले जरी श्लोक अभंग, दाखविला नाही बाहेरून संबंध, पण शेवटच्या पानात येतो प्रेमाचा सुगंध......
तेच ते शेवटचे पान...... वहिसारखे असते जीवनाचे शेवटचे पान, खुप काही बोलते जरी नसली जबान, तन मन नसले जरी जवान, तरी साथ देते हे शेवटचे पान...
तेच ते शेवटचे पान...... तरुणपण जाते जेव्हा संपून, म्हातारपन येते जेव्हा सरून, नाही ठेवले असता काही देऊन घेउन, अलगदच जे जाते उलगडून.....
तेच ते शेवटचे पान...... जेव्हा सावरू शकत नाही जिवानाची कमान, डगमगू लागते हे शेवटचे पान, जरी फाडून दिले हे पान, तरी याची जागा घेते अगोदरचे पान.... तेच ते शेवटचे पान......
धिरज लोके (दुर्गवीर चा …