जमल तर....


जमल तर.... 


असेल खर प्रेम तीच तर बदलेल स्वतास ती, 
टिकवायच असेल तुला प्रेम तर तुही माघार घेउन बघ...

भेटन बोलन म्हणजे प्रेम नाही मित्रा,
तुही थोडा पुरुषी अहंकार बाजुला ठेवून बघ....

असेल घ्यायची परीक्षा तिच्या प्रेमाची,
तर तुही तुझ्या प्रेमाची परीक्षा देऊन बघ......

तू कितीही चुकलास तरी तुझ्या वर प्रेम करण,
हा स्त्रित्वाचा पैलू आहे....

काही झाल तरी तिने दुसर प्रेम करू नये,
हे खर पुरुषी अहंकाराच लक्षण आहे.....

असेल चुकत ती तर एकदा समजावून बघ,
जमल तर माफ़ करून बघ...

तरीही होत असतील तिच्या चूका,
तर मात्र प्रेमाची परीक्षा घेउन बघ.....

जमल तर हे अस करून बघ,
नाहीतर विसर मागच आणि पुढे चालुन बघ...
@[328759653887659:0] 
धिरज लोके (दुर्गवीर चा धीरू)

http://dhiruloke.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

तीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अनुभव.....

"स्वार्थ" आणि "परमार्थ"