खूप दिवसांनी




खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
मनातल्या भावनांना प्रस्थान करावसं वाटत
ती ऐकेल म्हणून,
खूप खूप बोलावसं वाटत
ती वाचेल म्हणून,
खूप खूप लिहावसं वाटत 

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
कुणाच्यातरी आठवणीत रमावसं वाटत
सहजच ती आठवल्यावर गालात हसावस वाटत
छानस लाल गुलाब तिला द्यावस वाटत
त्यावेळच तीच हास्य पहावस वाटत

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
सर्व काही विसरून तिला आठवावं अस वाटत 
तिच्या आठवणी मध्ये बावळट व्हावस वाटत
तिची वाट पाहत उभ राहावसं वाटत
तिला येताना पाहून तिच्याकडे पहावस वाटत 

खूप दिवसांनी आज कुणाशी बोलावस वाटत
तिने माझी आठवण काढावी अस वाटत
याच विचाराने बहरलेल मन पहावस वाटत 
सहजच ती समोर आली तर 
तिला ते मन दाखवावसं वाटत
धीरु माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)