कसला रे हा तुझा पुरषार्थ..






कसला रे हा तुझा पुरषार्थ 
पुरुष म्हणून जगलास तर त्याला अर्थ
पूर्ण करण्यास तुझ्या वासनेचा स्वार्थ
हिरावतोयस तू स्त्रीच्या जीवनाचा अर्थ

वासना हि तुझी सोडतेय पातळी 
कुणा स्त्रीचे आयुष्य पडतेय त्यास बळी 
पडताच तुझी हि नजर काळी  
भयंकर शिक्षा थोपतोस तिच्या कपाळी

संत महात्म्यांच्या या पवित्र भूमीत
काय हे घडतेय विपरीत
पुरुष म्हणोनी मिरवतोयस या जगात
पण राक्षसीपणा का तुझ्या कर्मात

स्त्रीचे रक्षण असे तुझ्या हाती 
पण का विसरलास तू सारी नाती
निर्मळ मनाने बघ तू सभोवती
अन जप हि सारी आयां  बहिणीची नाती 

पुराणात हि स्त्री असे देवीसमान
का करतोय या दैवत्वाचा अपमान
ठेवतोय तू तुझी बुद्धी गहाण
अन करतोयस तू या स्त्री शक्तीस आव्हान 

विसरू नको रे ती कालीमाता 
जी संपवे राक्षसांसी स्वत: 
पापाचा तुझ्या घडा हा भरता
संपवेल हि तुला ती रणरागिणी आता





   

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)