Posts

Showing posts from July, 2014

विरोधक = मरणारा मासा

Image
तुमचे  "विरोधक" तुम्हाला  "त्रास"  देण्यासाठी  "धडपडतायत" काळजी करू नका… "मरणारा मासा"  नेहमी जास्त धडपडतो….

बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल….

Image
बघा आपल्या(बेळगावातील) मराठी बांधवांचे हाल…. सोबतचे छायचित्र पाहून अस वाटेल कि एखाद्या कैद्याला थर्ड डिग्री दिलीय पण तसं नाहीय हे छायचित्र आपल्या ( आपल्याच ) बेळगावातील मराठी बांधवाच आहे… काल कर्नाटक पोलिसांनी "येळ्ळुर" गावातील निशस्त्र मराठी बांधवाना मारहाण केली. कारण फक्त इतकच कि या गावक-यांनी एक बोर्ड लावला त्यावर लिहील होत "महाराष्ट्र राज्य येळ्ळुर".   बेळगाव सीमा वाद गेली ५० वर्षाहून अधिक काळ धुमसतोय पण "तोडगा" मात्र शुन्य…. बेळगाव मधील कित्येक पिढ्या मी मराठी असल्याचे ठासून सांगतायत पण त्याबदल्यात त्यांना काय मिळतंय महाराष्ट्र सरकारची परकेपणाची वागणूक आणि कर्नाटक सरकारच्या लाठ्या…. तिथले आपले मराठी बांधव मराठी साठी भगव्या च्या रक्षणासाठी अक्षरश: हौताम्य पत्करत आहेत. देशातील असे एकमेव राज्य आहे जिथे सरकारी इमारतीवर तिरंग्या सोबत भगवा अभिमानाने फडकवला जातो. २००५ साली साली बेळगाव महाराष्ट्रात यावे असा ठराव करण्यात आली त्याचा राग म्हणून कर्नाटक सरकारने महापालिकाच बरखास्त केली. बघा हे आपल्या मराठी बांधवांची हि अवस्था पाहून स्वताचीच आणि आपल्या

आयुष्य...

Image
"तांदळातील" आणि "आयुष्यातील"  "खडे" बाजूला करताना "किती"  कमी होतात  याचा विचार करू नका "जे"  शिल्लक राहतात  त्यांना सांभाळा…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

संताप………….

Image
संताप…………. आजवर दुर्गवीर सोबतच्या प्रत्येक मोहिमेत चांगलेच अनुभव आले. प्रत्येक गडदर्शन मोहिमेनंतर मन बहरून जायचं… निसर्गाचा आणि त्या काळातील आपल्या राजांच्या बौद्धिक क्षमतेचा हेवा वाटायचा. पण आजची विसापूर आणि लोहगड ची मोहीम अक्षरशा संताप देऊन गेली.…. एक वेळ अस वाटल बस झाल ते करिअर आणि कुटुंबाची काळजी करणं… सोडून सगळ सरळ तलवार हातात घ्यावी आणि एकेकाला कापून काढावा…… आम्ही दुर्गवीर सकाळची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून लोणावळा व तिथून मरोळ येथे पोचलो तिथून चालत विसापूर च्या पायथ्याशी पोचलो तेव्हा लोहगड च्या दिशेने जाणा-या गाड्या दिसल्या पण त्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी टवाळ मुल (मुल कसली कार्टी) दिसली. डोक्यात संतापाची ठिणगी पडली. गावक-याना या बाबतीत विचारल तर "आम्ही काय करणार??" "आम्ही विचारल तर दम-दाटी करतात??" अशी मुळमुळीत उत्तर मिळाली. तो राग तसाच डोक्यात ठेवून आम्ही विसापूर ची चढाई सुरु केली. काही ओळखीचे दुर्गप्रेमी भेटले त्यांची भेट घेऊन गडाच्या माथ्यावर पोचलो तर तिथे पण हेच. कुठे जोडप आडोश्याला बसलय तर कुठे मुल-मुलि त्यात विवाहित जोडपी हि सामील होती.

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

Image
"श्रेय" मिळण्यासाठी  "काम" करणे  म्हणजे "स्वार्थ" "कामाचे" "चीज"  होण्यासाठी "झटणे"  म्हणजे "परमार्थ" दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

माझी एक शाळा होती……

Image
माझी एक शाळा होती…… जीच्या विषयी मनात हूरहूर होती, जिथे गुरु शिष्याची अतूट नाती होती, फटकळ असूनही आपुलकीची होती म्हणून अजोडपणाच्या गाठीत होती - १ माझी एक शाळा होती…… जिथे सकाळी दोघांची हातघाई होती तिथे दुपारला दिलजमाई होती मैत्री अतूट रहावी म्हणून मैत्रीत एक नरमाई होती - २ माझी एक शाळा होती…… जिथे बाईंच्या ओरडण्यावर, गप्प बसण्याची शिष्टाई होती जिथे गुरुजींच्या डोळे वटारण्यावर, मान झुकाविण्याची नरमाई होती - ३ माझी एक शाळा होती…… जिथे परीक्षा आली तोंडावर, कि अभ्यासाची घाई होती. अखेरच्या मिनटात अभ्यास उरकून, पास होण्याची कलाई होती. - ४ माझी एक शाळा होती…… जरी दूर असली घरापासून, मनाच्या गाभा-यातील होती संस्काराच्या कठोर घावांनी मूर्ती घडविण्याची "ती"ची किर्ती होती - ५ माझी एक शाळा होती…… हरवलीय ती आज कुठेतरी शोधून देईल का कुणीतरी पैश्याच्या या नादापायी, गमावून बसलोय तिला खरोखरी    - ६ माझी एक शाळा होती…… माझी एक शाळा होती…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ First Published in Uddan Annual Magazine of

"हिरा"

Image
"मी" एकटा आहे…………. कारण "हिरा" तोवर एकटा असतो जोवर त्याला साजेशी "अंगठी" मिळत नाही दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

चांगुलपणा....

Image
जोवर तुम्ही इतरांच वाईट करत नाही तोवर तुमच वाईट होणार नाही… याची जेव्हा प्रचीती येते तेव्हा "चांगुलपणावरचा" विश्वास वाढतो दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/