Friday, 8 December 2017

गरजकुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय"
कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय" 

दुर्गवीर चा धीरु

Wednesday, 29 November 2017


होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल…..
#JoyOfHappiness
माझे अंतरंग
https://mazeantrang.wordpress.com/

Monday, 11 September 2017

उजेडाचे डोळे ओलेजगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “उमेश जाधव“.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत.
दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील विजय बेंद्रे जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि मेघांत प्रेम मांडत असेल तर उमेश दादा दुःख, व्यथा मांडतात किंबहुना तुम्हाला तुमच्या एखाद्या व्यथेशी, दुःखाशी समरस करून व्यक्त करायला भाग पाडतात. सूत्रसंचालक सौरभ नाईक यांनी आजच्या कार्यक्रमात उमेश दादांच्या माळीण दुर्घटनेबाबतच्या कवितेची एक आठवण सांगितली. माळीण दुर्घटनेबाबत उमेश दादांची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती त्यावेळी पुण्याच्या एका व्यक्तीचा उमेश दादांना फोन आला.  त्या व्यक्तीच्या नात्यातील ८-१० माणसं या दुर्घटनेत जागीच गेली. कामाच्या निमित्ताने ती व्यक्ती पुण्याला आल्याने या अपघातातून वाचली.  या दुर्घटनेनंतर ह्या व्यक्तीच्या जणू संवेदना नष्ट झाल्या होत्या की काय म्हणून तो मोकळेपणाने रडू शकला नाही.  पण उमेश दादांची कविता वाचल्यावर तो मोकळेपणाने रडला. यावरून उमेश दादांच्या कवितेचा दर्जा लक्षात येतो. बरं इतकं दर्जेदार असूनही साधं भोळं राहणं कसं जमत कुणास ठावूक ?? Social दुनियेतल्या Like, Comment च्या बाजारापासून अगदी दूर कुठेतरी हा “उमेश वामन जाधव” नावाचा तारा चमकतोय.  तुम्हाला Whatsapp, Facebook वर सामाजिक विषयावरील एखादी अनामिक कविता जर आली तर ती कदाचित उमेश दादांची असू शकते आणि “कवितेखाली माझे नाव का नाही” याचा दोन ओळींचा साधा निषेधही दादा कधी व्यक्त करीत नाहीत.कार्यक्रमात त्यांच्या मित्रानी सांगितल्याप्रमाणे दादा मैत्रीखातीर अश्या कितीतरी रचना विनामूल्य स्वतःच नाव न लावता देतात आणि आम्ही आमचा फेसबुकचा चार ओळींचा स्टेटस चोरला तर दोन पानांचा निषेधाचा लेख लिहितो.  खरंच दादा जमलं तर तुमच्यातला नम्रपणा थोडासा… अगदी एक टक्का जरी आम्हाला दिलात तर खूप बरं होईल.
आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात चंद्रशेखर सानेकर, संदीप माळवी, प्रशांत मोरे, उंच माझा झोका या गीताचे गीतकार आणि जेष्ठ कवी  अरुण म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांच्या सोबत उमेश दादांच्या आईवडिलांचा सत्कार होणं मला वाटतं उमेश दादांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असावा. दादांनी कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतच लिहिलंय की, “ज्यांच्या उजेडाच्या कष्टात, मी माझ्या आयुष्याची कविता वाचतो आहे त्या माझ्या आईवडिलांना सविनय अर्पण”….खरंच त्या माता पित्याला अभिमान वाटावा असं लेकरू आहे त्यांचं…..
उमेश दादांच्या पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना अमोल शिंदे बोलले की मला आनंद यासाठी वाटतोय की आमच्या पिढीच एक पुस्तक आलंय… खरंच आमच्या पिढीचं कवितेचं एक पुस्तक आलय याचा आम्हाला अभिमान वाटतोय. प्रत्येकाने कवितेचे नेमके काय प्रकार असतात नुसतं हे जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलं तरी डोक्यात प्रकाश पडेल.
याअगोदर ज्या माळीण दुर्घटनेवरील कवितेचा उल्लेख केला त्या कवितेतील मला भावलेल्या ओळी…..
निष्पाप गेले जीव,
काय त्यांचा गुन्हा,
वाचलेला बाळ आता,
आई म्हणेल कुणा…..
काव्यसंग्रहाचे नाव :- उजेडाचे डोळे ओले
कवी :- उमेश वामन जाधव (8879803162)
प्रकाशक:- सई प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ :- विष्णू थोरे
पृष्ठसंख्या :- ६७
मूल्य :- रु.८०/-

Friday, 8 September 2017

सामानगड दुर्गसंवर्धन.....


तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो सक्रिय सहभाग आणि सहकार्य ..... महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे. साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती. याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा..... संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले. आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत. वन विभागाचे अधिकारी काटकर सर आणि पुरातत्व विभाग आणि स्थानिक शासकीय अधिकारी अगदी आपलेपणाने दुर्गवीर च सहकार्य करू लागले. आपल्याकडे एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब अशी काहीशी पण या सर्व अधिकाऱ्यांनी मात्र ते या म्हणीला अपवाद असल्याचे दाखवून दिले. अगदी मोठ्या भावाने लहान भावाला समजावून सांगावे इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य केले. मी कोणी मोठा सरकारी अधिकारी आहे मग मी का या गोष्टी सांगू??? असा कोणताही उद्धेश त्यांचा नव्हता. स्थानिक तरुण तरुणी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने आज समानगडाचे काम नियमितपणे सुरु आहे. मूळ गाव जवळ असले तरी स्वतःच्या गावी जितक्या फेऱ्या होत नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा सामानगड परिसरात ये जा करून संतोष हसूरकर तिथल्या कामाचा आढावा घेत असतात. दुर्गवीर प्रतिष्ठान हे कार्य वाढत असताना त्यात अजून एक दुग्धशर्करा योग्य जुळून आला. गेल्या काही महिन्यांपूर्वी "छत्रपती संभाजी महाराज"(कोल्हापूर) यांनी दुर्गवीर च्या कार्याची माहिती घेतली आणि राज्यभिषेकाप्रसंगी सामानगडावर काम करणाऱ्या प्रत्येक दुर्गवीराचा सत्कार करण्यात आला. गेल्या महिन्यात "छत्रपती संभाजी महाराज" यांनी समानगडाला प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि कामाची पाहणी केली. सामानगडाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. "छत्रपती संभाजी महाराज" यांची साथ हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.


स्थानिक दुर्गवीर, स्थानिक लोक, सरकारी अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने सामानगडाला शिवकालीन वैभव परत मिळवून देण्यात दुर्गवीर प्रतिष्ठान नक्कीच यशस्वी ठरेल हा मला विश्वास आहे......

Friday, 18 August 2017

Joy Of Happiness


#JoyOfHappiness
माझ्या एका परिचयाच्या व्यक्ती ने मला विचारल “तुम्ही लातुर ला जे सोलार दिवे, भांड्यांचे किट, वाचनालय, शाळेची इमारत देणार, या एवढ्या मोठ्या उपक्रमात माझ्या २००-५०० रुपयाने काय फरक पडणार ?? पण निट विचार केला तर फरक पडतो एक सोलार दिवा रु.७००/-, एक भांड्यांच किट रु.२५०/-, एक वाचनालय रु.५०००/-(अंदाजे). यातुन स्वेच्छेने किती सोलार लॅंप किंवा भांड्यांच्या सेट ची किंमत तुम्ही देवु शकता हे तुम्ही ठरवा. तुमच्या छोट्यातली छोटी मदत एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश देवु शकतो. तुमच्या सहकार्यानेच उभ्या राहणा-या शाळा आणि वाचनालयातुन एक सुशिक्षीत पिढि घडणार आहे.
फरक पडतो फक्त तुमचा मदतीचा एक हात सर्व परिस्थिति सुधारु शकतो. लोकसहभागात एक ताकद असते जी एक पिढि घडवु शकते. तुम्ही सहकार्य तर कराच शिवाय तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंना नक्की आवाहन करा.
संपर्क:-
टीम : दुर्गवीर प्रतिष्ठान
संतोष हसुरकर 9833458151 अजित राणे 8097519700 नितीन पाटोळे 8655823748
टीम MSA
नितेश जाधव 9967070987 / प्रशांत टक्कर 9967500889 / नंदू चव्हाण 9892042704
मदत रोख स्वरुपात द्या किंवा चेक स्वरुपात किंवा बॅंक ट्रान्सफर करा.
बँक तपशील :-
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )
www.durgveer.com

Thursday, 6 July 2017

ईशान्य वार्ता दखल.....
ईशान्य वार्ता या त्रैमासिकातून संपादक "उत्तम रानडे काका"(Uttam Ranade) यांनी माझे अंतरंग (भटकंती विशेष) या पुस्तकाबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया.....
धन्यवाद काका... आपले आशीर्वाद असेच कायम राहूदे..._/\_

Wednesday, 5 July 2017

माझे अंतरंग....
माझे अंतरंग(भटकंती विशेष) हे पुस्तक आता Book Ganga या वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध.......
पुस्तक Cash On Delivery, Credit / Debit Card / Online Banking अश्या कोणत्याही माध्यमातून घेऊ शकता.....
पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक :- http://www.bookganga.com/R/7JF00

Saturday, 1 July 2017

हसु...मळकटलेल्या चेह-यावरती,
हसु असे मी खुलवीतो
मनमौजी मी दिलखुलास जगतो
अन् हसुन दुःखास थोपवितो

चित्र:- omkar bhoir
शब्द:- Dhiraj Vijay Loke

Monday, 22 May 2017

स्वप्नांना मिळे बळआज सकाळी WhatsApp चालू केलं बरेच मेसेज होते त्यातील दोन मेसेज वाचून छान वाटलं. दुर्गवीर बंधू Ravindra Raorane आणि Preeti Mukadam 

यांचे मेसेज होते. त्यांनी कुठूनतरी आज दि. २२/०५/२०१७ "महाराष्ट्र टाइम्स" च्या "मुंबई टाईम्स" पुरवणी मध्ये "माझी जागा" या सदरातील "स्वप्नांना बळ मिळे" हा माझा लेख वाचला.... लगेच त्यांनी मला फोटो काठून पाठवला....

यावेळी गावी गेलो तेव्हा अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्यातील ही एक जागा. ज्या जागेशी गेली वीस एक वर्ष अतूट असं नातं निर्माण झालंय त्याच्यावर गेल्या १५ दिवसांपूर्वी अचानक असं काही सुचलं आणि म.टा. ला पाठवलं.

धन्यवाद म. टा. प्रतिनिधी आणि रवींद्र रावराणे आणि प्रीती मुकादम

दुर्गवीर चा धीरु

Thursday, 18 May 2017एक रम्य संध्याकाळ....
स्थळ :- तांबाळडेग(मिठबाव), ता.:- देवगड, जि.:- सिंधुदुर्ग


छायाचित्रकार :- Dhiraj Vijay Loke (दुर्गवीरचा धीरु)
Device :- Microsoft Lumia 640 XL
#Loadingकोकण
#कोकण
#मिठबाव
#देवगड

Thursday, 11 May 2017

परतीचे किरण


परतीचे हे किरण 
दर्याकिनारी झेपावते....
बाप-बेट्याच्या नात्याला
हळुवार सुखावते....

छायचित्रकार :- Malandkar Vishnu
स्थळ :- मिठबाव(तांबळडेग समुद्रकिनारा), ता.:- देवगड, जि. :- सिंधुदुर्ग

Tuesday, 9 May 2017

दोन टोकंमानवी स्वभाव वेगवेगळे असतात. अशा भिन्न स्वभावाची मानस एकत्र येण्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावेत. अशांच भिन्न स्वभावाच्या आदित्य आणि संयुक्ता ची सुंदर प्रेमकथा.
संपूर्ण कथा वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा....

http://marathi.pratilipi.com/dhiraj-loke/don-tok

Monday, 30 January 2017

शेवया आणि नारळाचा रस


शेवया आणि नारळाचा रस

कोकण म्हटल की विविध खायचे पदार्थ समोर येतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे "शेवया आणि नारळी रस". "तांदुळ" किंवा "नाचणी" याच्या पिठापासून या शेवया बनवील्या जातातकोकणात तांदुळ मुबलक असल्याने मुख्यता तांदळाच्या पिठापासुनच या शेवया बनतात. प्रथम तांदळाच पिठ उखळत्या पाण्यात टाकुन त्याच्या गुठळ्या फोडुन थोडस मिठ टाकुन, ते पिठ मळुन त्याचे छोटे छोटे गोळे बनवुन घेवुन पुन्हा ते गरम पाण्यात टाकुन तसेच गरम गरम गोळे शेवया काढायच भांड(जस चकलीच असत तस) घेवुन शेवया काढाव्यातसोबत असणारा नारळाचा रस बनविण्यासाठी ओल खोबर किसुन घेवुन ते पिळुन त्याचा रस एका भांड्यात घ्यावा (जसा रस सोलकडीसाठी काढतात) या रसात चवीनुसार गुळ वेलची टाकावी जेणेकरुन एक गोडवा आणि चव येतेयातील वेलची थोडिफार पचनासाठीही मदत करते.  या नारळी रसात शेवया टाकुन खाव्यातया शेवया पचनासाठी थोड्या जड असतात त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळीच खाव्यात
माहिती व छायाचित्रासाठी खास आभार :- Shweta Sawant


Friday, 27 January 2017

लोकलच्या गजाली

ट्रेन मध्ये "हेडफोन" लावण्याचे दोन फायदे......


१)गाणी ऐकता येतात


२)गेट वरच्या "टग्यांच्या" शिव्या ऐकू येत नाहीत


#लोकलच्या_गजाली

Saturday, 21 January 2017

देव्या चा Birthदिवसदेवेश अरविंद सावंत उर्फ देव्या उर्फ AK47, अजून बरेच उर्फ असावेत. याच्याकडे चर्चा, प्रतिचर्चा, उपचर्चा, महाचर्चा अशी गुऱ्हाळ केली जात नाहीत. देव्या स्वतःच पोलीस आणि स्वतःच न्यायाधीश. एक घाव ५-५० तुकडे...... शरीर काटक दिसलं म्हणून त्यावर जाऊ नका "Confidence" पुरेसा आहे समोरच्याची बोलती बंद करायला. "धीरु भाय" म्हणून मला हाक मारणारा देव्या स्वतःच एक "भाई" म्हणून प्रसिद्ध आहे. असा हा ब्रिगेडींचा कर्दनकाळ देव्या भाई....... ह्या झाल्या देव्याच्या स्वभावातील "ओबड-धोबड" बाजू पण उत्तम फोटोग्राफर आणि Editor सुद्धा... संतोष दादांनी काही सांगितलं की दादा तू फक्त बोल म्हणून हाकेला ओ देणारा आणि "कट्टर शिवसैनिक" देवेशचा आज "तारखेनुसार" जन्मदिवस तेव्हा तिथी नुसार पुन्हा शुभेच्छा देऊ तोवर ह्या "गॉड" मानून घ्या

ता.क. :- भाईंचे "गुण" थोडेफार या छोट्याने घेतलेत हे त्याच्या चेह-यावरून स्पष्ट दिसतय....


#लोकलच्या_गजालीलोकलच्या गेटवर उभे राहून तीन चतुर्थांश शरीर आत ठेवून "मुंडी" बाहेर काढणारे..... "आकाश पाळण्यात" बसायला हवं पण, "आकाश पाळणा" वर गेला की "टरकते" या "Catagory" मधले वाटतात....☺☺☺
#लोकलच्या_गजाली

Friday, 20 January 2017

अनोखी भेट.....


दादा तुम्ही छान लिहिता..... मनाला भावत अगदी.... माझ्यासारख्या "तळातल्या मध्यमवर्गीय" लेखक (?) (लेखक कसला ?? काहीतरी खरडतो लोक त्याला "लेख" म्हणतात म्हणून लेखक) बर तर माझ्या सारख्या "तळातल्या" "मध्यमवर्गीय" लेखकाला इतकं बक्षीस पुरेस असत. भले माझा लेख कुठल्याश्या पेपरात किंवा मासिकात छापून न येवो, पण एवढं कौतुक पुरेस असत. पण या वेळी माझं कौतुक करताना "समीर शिंदे" यांनी एक वाक्य बोलून दाखवलं "मला अरविंद जगताप यांच्या नंतर जर कुणाचं लिखाण आवडत असेल तर तुमचं"...... आणि तेव्हाच डोक्यात भुंगा सुरु झाला कोण "अरविंद जगताप" मग समजलं झी मराठीच्या चला हवा येउद्या साठी लेखन करणारे "अरविंद जगताप" मग फेसबुक वर शोधलं तर त्यांच फेसबुक पेज  https://www.facebook.com/ArvindJagtapfansclub/ आणि वेबसाईट http://www.arvindjagtap.com/ मिळाली  मग समजलं कित्येक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यातल "राजकारणाचं भूत" उतरवणा-या "झेंडा" या चित्रपटातील "कोणता झेंडा घेऊ हाती" हे गाणं "अरविंद जगताप" यांचच आहे..... आणि मग "समीर शिंदे" यांनी माझी त्यांच्याशी केलेली तुलना म्हणजे एक "अतिशयोक्ती" होती याची पूर्ण "खात्री" झाली.... बर एवढी "अतिशयोक्ती" करून ते थांबले नाहीत तर त्यांनी एक गिफ्ट दिल "एक पेन आणि घड्याळ" ... त्यांच्या गिफ्ट मधून एक संदेश मात्र माझ्यापर्यंत पोहोचला तो म्हणजे "लिखाण वेळेवर द्या"  ब-याचदा माझ्या बाबतीत हे होत... दुर्गवीर साठी लिखाण करणं असो वा "माझे अंतरंग" साठी किंवा इतर वेळी समोरच्याने दिलेल्या वेळेच्या अगदी १-२ मिनिट अगोदर किंवा मग १-२ तास नंतरच मी लिखाण देतो कधी कधी तर हे १-२ तास १-२ दिवसात पण परावर्तित होऊ शकतात. मुळात वही आणि पेन (मोबाईल draft) घेऊन बसलं आणि फटाफट लिहून काढलं हा "Professionalism" मला कधी जमलाच नाही कदाचित म्हणूनच माझं लिखाण बाहेर कुठे प्रकशित होत नसावं मला सुचेपर्यंत त्या मासिकाचा दुसरा अंक "प्रकाशित" होत असावा 

तर असं ह्या "तळातल्या मध्यमवर्गीय" लेखकाला एक मोठंसं आणि छानसा "संदेश" देणार गिफ्ट दिल त्यासाठी समीर बंधू तुमचे खूप आभार बर

ता. क.:- हा लेख सुद्धा गिफ्ट दिल्यापासून तब्बल २० दिवसांनंतर लिहून पूर्ण केलाय... 


Tuesday, 10 January 2017

समजून घ्या....

मला समजुन घेताना एक समजुन घ्या की मला समजुन घेण हे न समजणार आहे.....

ती सध्या काय करते?

"ती सध्या काय करते?"
हा प्रश्न "पंचविशी-तिशीतल्या तरुणाला" पडणं समजू शकतो....


पण


"इयत्ता ८ वीतल्या" मुलाला हा प्रश्न पडलेला पाहून आम्ही ८ वी मध्ये किती "अशिक्षीत-अडाणी" होतो हे जाणवतं

Monday, 2 January 2017

व्यर्थ जीवन

अरे यार क्या बतावू तेरे को, दो दिन से इतना दारू पिया... इतना दारू पिया कि पूछ मत......
ट्रेन मध्ये एक तरुण ३१ डिसेंबर कशी साजरी केली ते "अभिमानाने" सांगत होता..... हे सांगताना त्याच्या चेह-यावरती एखादी "लढाई" जिंकल्याचे "भाव" होते......
.
.
.
.
.
.
.
.
त्याच्याकडे पाहून "दारू न पिल्यामुळे" माझं "आयुष्य" "व्यर्थ" असल्याचा भास झाला....
.
.
.
.
.
.
.
मग मी विचार केला.....
.
.
.
.
.
.
.
.
.
जाऊदे "व्यर्थ तर व्यर्थ".......
तळटीप :- तुम्ही पण तुमच आयुष्य असंच "व्यर्थ" घालवा......
#मी_दारू_पित_नाही :P :P :P :P
दुर्गवीर चा धीरु

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...