अनोखी भेट.....


दादा तुम्ही छान लिहिता..... मनाला भावत अगदी.... माझ्यासारख्या "तळातल्या मध्यमवर्गीय" लेखक (?) (लेखक कसला ?? काहीतरी खरडतो लोक त्याला "लेख" म्हणतात म्हणून लेखक) बर तर माझ्या सारख्या "तळातल्या" "मध्यमवर्गीय" लेखकाला इतकं बक्षीस पुरेस असत. भले माझा लेख कुठल्याश्या पेपरात किंवा मासिकात छापून न येवो, पण एवढं कौतुक पुरेस असत. पण या वेळी माझं कौतुक करताना "समीर शिंदे" यांनी एक वाक्य बोलून दाखवलं "मला अरविंद जगताप यांच्या नंतर जर कुणाचं लिखाण आवडत असेल तर तुमचं"...... आणि तेव्हाच डोक्यात भुंगा सुरु झाला कोण "अरविंद जगताप" मग समजलं झी मराठीच्या चला हवा येउद्या साठी लेखन करणारे "अरविंद जगताप" मग फेसबुक वर शोधलं तर त्यांच फेसबुक पेज  https://www.facebook.com/ArvindJagtapfansclub/ आणि वेबसाईट http://www.arvindjagtap.com/ मिळाली  मग समजलं कित्येक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यातल "राजकारणाचं भूत" उतरवणा-या "झेंडा" या चित्रपटातील "कोणता झेंडा घेऊ हाती" हे गाणं "अरविंद जगताप" यांचच आहे..... आणि मग "समीर शिंदे" यांनी माझी त्यांच्याशी केलेली तुलना म्हणजे एक "अतिशयोक्ती" होती याची पूर्ण "खात्री" झाली.... बर एवढी "अतिशयोक्ती" करून ते थांबले नाहीत तर त्यांनी एक गिफ्ट दिल "एक पेन आणि घड्याळ" ... त्यांच्या गिफ्ट मधून एक संदेश मात्र माझ्यापर्यंत पोहोचला तो म्हणजे "लिखाण वेळेवर द्या"  ब-याचदा माझ्या बाबतीत हे होत... दुर्गवीर साठी लिखाण करणं असो वा "माझे अंतरंग" साठी किंवा इतर वेळी समोरच्याने दिलेल्या वेळेच्या अगदी १-२ मिनिट अगोदर किंवा मग १-२ तास नंतरच मी लिखाण देतो कधी कधी तर हे १-२ तास १-२ दिवसात पण परावर्तित होऊ शकतात. मुळात वही आणि पेन (मोबाईल draft) घेऊन बसलं आणि फटाफट लिहून काढलं हा "Professionalism" मला कधी जमलाच नाही कदाचित म्हणूनच माझं लिखाण बाहेर कुठे प्रकशित होत नसावं मला सुचेपर्यंत त्या मासिकाचा दुसरा अंक "प्रकाशित" होत असावा 

तर असं ह्या "तळातल्या मध्यमवर्गीय" लेखकाला एक मोठंसं आणि छानसा "संदेश" देणार गिफ्ट दिल त्यासाठी समीर बंधू तुमचे खूप आभार बर

ता. क.:- हा लेख सुद्धा गिफ्ट दिल्यापासून तब्बल २० दिवसांनंतर लिहून पूर्ण केलाय... 


Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी