Posts

Showing posts from October, 2016

दुस-याला देण्यातल सुख...

Image
दुस-याला देण्यातल सुख... कधी कधी दुस-याला देण्यात जास्त सुख असं म्हणतात ते उगाच नाही.... ह्या छायाचित्रातील मुलगा अगदीच गरीब घरातील "मृगगड" परिसरातील अगदी छोट्याश्या गावातील. Joy Of Happiness या Nandu Chavan​  यांच्या उपक्रमाअंतर्गत दुर्गवीर तर्फे यांच्या शाळेला Water Purifier चे वाटप करण्यात आले म्हणून या पट्ठ्याने "स्वत:" बनविलेले "दिवाळी ग्रीटिंग कार्ड" दुर्गवीरांना भेट दिले. ते देताना त्याच्या चेह-यावरच "आनंदच" सर्व काही सांगून जात होता. साध्या कागदावर पेन्सिल आणि स्केच पेन ने "रेघा" ओढून बनविलेल्या या ग्रीटिंग कार्ड ने आणि या शाळेच्या "पापभिरू" मुलांनी सर्व दुर्गवीरांच्या "मनात घर केलय" एवढं नक्की !! दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

सुरगड.....Nothing Is Impossible

Image
सुरगड.....Nothing Is Impossible सुरगडाने आजवर खुप वेगवेगळे अनुभव दिले.. २०१२ साली दुर्गवीर मधला माझा प्रवास सुरु झाला तो याच सुरगडाच्या साथीने... गडावर भर पावसात रात्र काढण्याचा अनुभव याच सुरगडाने दिला.... गडावर अनवानी चालायच म्हणजे काय हा अनुभव तर मला सुरगडावर तब्बल ६ वेळा आलाय....... याच सुरगडाने आज पुन्हा एक अनुभव दिला “Nothing Is Impossible” हा अनुभव मलाच नाहि आजच्या मोहिमेला असलेल्या प्रत्येकाला आला असेल. सुरगड चढायला अत्यंत कठिन आहे अशा “अफवांना”   “जवळपास” बळी पडलेल्या “कल्पना निगडे”   यांना ही अनुभव आला असेल “Nothing Is Impossible” . पायाच दुखन घेवुनसुद्धा गड चढुन आणि वर जावुन काम करणा-या “ गितु ताईने ” सुद्धा हा अनुभव घेतला असेल “Nothing Is Impossible”. २-३ वर्षानंतर गडदर्शन करणा-या हिमगौरी कुर्वे असो किंवा रसिका म्हानगोरे असो तुमची सुरगडची अवघड (?) घळ पार करुन वर जावुन काम करुन पुन्हा त्याच निसरड्या वाटेने गड उतरायची यांची जिद्ध आणि इच्छाशक्ती पाहुन मला हि आज अनुभव आला “Nothing Is Impossible”. ... रायन डिसोजा आणि पंछी ह्या महाराष्ट्रीयन नसुन सुद्ध

पुस्तक काय करत ???

Image
पुस्तक काय करत ??? पुस्तक माणसाला शिकवत तुम्हाला काय करायचय! ! एखादा व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने मार्गक्रमण असेल तर तो एकतर "गौतम बुद्धांचे" विचार वाचेल पण कोणतीही गोष्ट लाढाईने साध्य होणारच ह्या विचारांचा एखादा व्यक्ती अर्थातच "अडॅाल्फ हिटलर" वाचेल !! या दोन व्यक्तींची तुलना करण अशक्यच आहे पण माझे कवी मित्र "विजय बेंद्रे" यांनी मार्च मधल्या माझ्या जन्मदिनाची भेट आज तब्बल आठ महिन्यानंतर माझ्याकडे सुपुर्द केली!! आता सामान्यपणे विचार केला तर जर "गौतम बुद्धांच्या विचारांचे" अनुकरण केले तर "हिटलरचे विचार" "अडगळीत" पडतील आणि "हिटलरच्या विचारांवर चालायच" म्हटल तर "गौतम बुद्धांच्या अहिंसवादाच्या" छायेतुन बाहेर पडाव लागेल पण............ "विजय बेंद्रे" नावाच्या “अवलीयाच्या” डोक्याने विचार करायच म्हटल तर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथले एकतर "गौतम बुद्ध" व्हा किंवा "हिटलर" व्हा पण जे कराल ते मुळापर्यंत जाऊन !! जस गौतम बुद्धांनी अटितटिच्या काळातही अहिंसावाद सोडला नाहि आणि हिटलर ने

सीमारेषा....

Image
सकाळपासून WhatsApp ग्रुप, फेसबुकवर तुमच्यावॉर शुभेच्छचा वर्षाव होताना पाहतोय... लिहायला वेळ मिळत नव्हता मिळून इतक्या उशिरा काहीतरी खरडतोय.... संतोष दादा कुणासाठी देव, कुणासाठी दादा, प्रेरणास्थान, कुणासाठी वटवृक्ष, कुणासाठी मार्गदर्शक आहेत पण माझ्यासाठी माझ्या दुर्गवीर मधील "सीमारेषा" आहे हि मी कधी ओलांडू शकत नाही.... मी माझ्या आयुष्यात कुणालाच जुमानत नाही (असे माझे जवळचे लोक म्हणतात) मलाही तसच वाटत, कारण जॉबवर असो वा नात्यांमध्ये माझ्याबाबत कुणी "कुरापती" करायला लागलं कि मी त्याला आपटतो.... पण प्रत्येक क्षेत्रात मी अशी एक "सीमारेषा" ठेवलीय जी मला आवरू शकते ती पार केली तर मी "बाद" हा अलिखित करार मी स्वताशीच केलाय. दुर्गवीर मध्ये न बोलता अनेकांशी माझे "मतभेद" झाले असतील नंतर ते निवळले असतीलही. पण ते कितीवेळा आणि कुणाशी नीटसं आठवत नाही. पण संतोष दादांनी दिलेलं कुठलं काम मी "पूर्ण करू शकलो नाही" आणि त्यांना कधी मी "मला हे जमणार नाही" असं वाक्य नाईलाजास्तव बोलून दाखवलं तो प्रत्येक प्रसंग माझ्या लक्षात आहे. अ