Posts

Showing posts from January, 2015

PROUD TO BE AN INDIAN

Image
काय रे हे दुर्दैव ...
आजची आमची मुल गणतंत्र दिवस म्हणजे Independence Day अस सांगतात
आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पोकळ गप्पा मारतात !
काय रे हे दुर्दैव ...
आजची आमची मुल एखाद ऐतिहासिक चॅनल "कंटाळवाण" म्हणुन बदलतात
पण "कार्टून नेटवर्क" मात्र न चुकता लावतात!
रे हे दुर्दैव ...
आजची आमची मुल "LOC Kargil" चित्रपट पहायला कंटाळतात
पण "वीर-झारा" अगदि मन लावुन पाहतात !
काय रे हे दुर्दैव ...
आजची आमची मुल "ये मेरे वतन के लोगो" ला रडव म्हणुन चिडवतात
पण "पोरी जरा जपुन दांडा धर" या गाण्यावर बिभित्सपणे नाचतात !
काय रे हे दुर्दैव ...
काय रे हे दुर्दैव ...
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र

सम्राट अशोका नंतरच्या काळातील मौर्य राजा बृहद्रथ हा मिन्यांडर च्या आक्रमणाचा फारसा प्रतिकार करीत नसल्याचे शल्य अनेकांच्या मनात होते कदाचीत याच कारणास्तव बृहद्रथ मौर्याचा भर सभेत शिरच्छेद करण्याचा एक कट रचण्यात आला. या कार्याची पुर्तता केली ती बृहद्रथ मौर्य च्या सेनापतीने. ई.स.पु.१८४ च्या आसपास हि घटना घडली. शुंग वंशाच्या पुष्यमित्रने भर सभेत बृहद्रथ मौर्य चा शिरच्छेद करुन मौर्य साम्राज्याचा अंत केला. कदाचित जनतेच्या व सैनिकांच्या मनात बृहद्रथ मौर्य बद्दल रोष असल्याने पुष्यमित्राच्या या कृत्याचा विरोध झाला नाहि उलट पुष्यमित्रला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला.तब्बल ३६ वर्ष राज्य केल्यावर ई.स.पु.१४९ व्या वर्षी आपला देह ठेवला !!

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर
छायचित्र स्त्रोत :- Internet
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

लोकमान्य.....

Image
लोकमान्य!!

अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय, अप्रतिम नेपथ्य,अप्रतिम साऊंड अश्या विशेषनांनी गौरविला असाच हा चित्रपट..

आजच्या पिढिने आजच्या युगात लोकमान्यांचे विचार कसे आचरणात आणावे हे सुबोध भावे व चिन्मय मांडलेकर ह्या दोन उत्कृष्ट कलाकारांनी दाखवुन दिले!!

गांधी हम पच्चीस साल से ब्रिटिशोंसो लढ रहे है ! जिस स्वराज्य कि लढाई मे खुन ना बहे उस स्वराज्य की कोई किंमत नहि होती !! या सारखे संवाद अंगावर रोमांच उभे करतात आणि मनात खंतहि निर्माण होते इतक्या दुरदृष्टिच्या नेत्याला आपण विसरतोय !!

"आजकाल चला आपण देश घडवुया या वाक्यावर लोक संता-बंताचा जोक सांगितल्याप्रमाणे हसतात" हा संवाद मी इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा माझ्या काहि निवडक मित्र मंडळिंची प्रतिक्रिया अशीच असल्याचे जाणवते !!

संपूर्ण इंग्रज राजवटिला टिळकांना संपविणे जमले नाहि त्या टिळकांचे विचार संपविण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न आपल्या देशात होतोय !

प्रत्येक तरुण-तरुणी ने हा चित्रपट एकदा नक्कि पहावा टिळकांचे विचार समजुन घेण्यासाठि आणि टॅाकिज मध्ये जावुन पहावा माय-मराठिच्या उद्धारासाठि !!दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.…