लोकमान्य.....



लोकमान्य!!

अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय, अप्रतिम नेपथ्य,अप्रतिम साऊंड अश्या विशेषनांनी गौरविला असाच हा चित्रपट..

आजच्या पिढिने आजच्या युगात लोकमान्यांचे विचार कसे आचरणात आणावे हे सुबोध भावे व चिन्मय मांडलेकर ह्या दोन उत्कृष्ट कलाकारांनी दाखवुन दिले!!

गांधी हम पच्चीस साल से ब्रिटिशोंसो लढ रहे है ! जिस स्वराज्य कि लढाई मे खुन ना बहे उस स्वराज्य की कोई किंमत नहि होती !! या सारखे संवाद अंगावर रोमांच उभे करतात आणि मनात खंतहि निर्माण होते इतक्या दुरदृष्टिच्या नेत्याला आपण विसरतोय !!

"आजकाल चला आपण देश घडवुया या वाक्यावर लोक संता-बंताचा जोक सांगितल्याप्रमाणे हसतात" हा संवाद मी इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा माझ्या काहि निवडक मित्र मंडळिंची प्रतिक्रिया अशीच असल्याचे जाणवते !!

संपूर्ण इंग्रज राजवटिला टिळकांना संपविणे जमले नाहि त्या टिळकांचे विचार संपविण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न आपल्या देशात होतोय !

प्रत्येक तरुण-तरुणी ने हा चित्रपट एकदा नक्कि पहावा टिळकांचे विचार समजुन घेण्यासाठि आणि टॅाकिज मध्ये जावुन पहावा माय-मराठिच्या उद्धारासाठि !!

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)