Posts

Showing posts from March, 2013

"धुळवड भगव्याची"

Image
"धुळवड भगव्याची" आज दि.२७/३/२०१३ रोजी दुर्गवीर ची एकदम अचानक ठरलेली सुरगड मोहीम ख-या अर्थाने "धुळवड भगव्याची" ठरली.  मुंबईत सर्वजण "बुरा ना मानो होली है" म्हणत रंगांची धुळवड खेळत होते तेव्हा आम्ही ९ दुर्गवीर सूरगडावर भगव्याची धुळवड खेळत होतो.  अगोदर सूरगडाच्या बुरुजावर भगवे निशाण फडकवून आणि नंतर सूरगडवरून खाली उतरताना संपूर्ण जंगलाच्या वाटेवर लाल मातीची धुळवड खेळत आम्ही आजची मोहीम पूर्ण केली.   प्रथम अचानक ठरलेली मोहीमइतर दुर्गवीरांना न सांगता आम्ही ठरवली त्याबद्दल आम्ही ९ जण क्षमस्व.  खर तर मला रात्री ९:३० ला संतोष दादाचा फोन आला सूरगड ला जायचं फार विचार न करता मी किती वाजता येउन आणि कुठे येउन हे विचारलं.  मग ठरलं सायन ला रात्री ११ ला भेटायचं मी ५ -६ जणांना SMS केला प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार ८ जणांना तयार करायचं होत.  सचिन रेडेकर -सुरज कोकितकर हि कोल्हापुरी जोडी लगेच तयार झाली.  प्रशांत वाघरे, संतोष दादा, अनिकेत तमुचे दादा तर अगोदरच तयार होते. ६ जण असेच तयार झाले. मी जेवून निघालो प्रशांत दादांना सायन ला भेटायचं होत तिथे महेश द

किल्ले पेब (विकटगड ) माथेरान चे खर सौदर्य

Image
  किल्ले पेब (विकटगड ) माथेरान चे खर सौदर्य   आज दि.२४ / ३ / २०१३ रोजी दुर्गवीर च्या वीर आणि वीरांगनांनी दिलेल्या वचनाची पुर्ती करून अजून एक शिवकार्य निर्विघ्नपणे पार पाडले. शिवाय दुर्गवीरांनी अनुभवले पेब किल्यावर माथेरान चे अनोखे भारतीय सौदर्य मी व नितीन पाटोळे दि. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी पेब किल्ला (विकटगड) येथे दुर्गदर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तेथील जोशी गुरुजी यांना आम्ही दुर्गवीर च्या कार्याची माहिती दिली ते दुर्गवीर च्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी तिथे चालू असलेल्या श्रमदान कार्यात मदत करण्याचे आवाहन केले. नितीन दादांनी दुर्गवीर च्या वतीने गुरुजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत या कार्यात मदत करण्याचा शब्द दिला.आज दुर्गवीर च्या ८ दुर्गवीर व २ वीरांगनांनी तो शब्द आज पूर्ण केला.  नेहमी प्रमाणे आजची मोहीम ठीक वेळवर नव्हती नेहमी रात्री ८ ची दिवा रोहा असते पण आज रविवारी सकाळी दादर वरून ५:०२ ची ट्रेन पकडायची होती. त्यानुसार ४ वाजल्यापासून आमची तयारी चालू झाली होती एकमेकांना फोन करून उठवत होतो. पण दादर ला थोडा Flatform No. च्या बाबतीत थोडा घोळ झाल्यामुळे दादर वरून ६:३० ची ट्रेन म

भीमरूपी महारुद्रा….

Image
भीमरूपी महारुद्रा….  आजच्या दि. १७/ ३ / २०१३ च्या मोहिमेत सर्व दुर्गवीरांनी "भीमरूपी" असा "रौद्र अवतार" दाखवून दिला. आजच्या मोहिमेची सुरुवात नेहमी प्रमाणेच होती. कोण Cancel कोण नवीन येतय अश्या पद्धतीत सर्व चालू होत. मी, मोनीश दादा जुईनगर ला पोचलो तेव्हा तिथे संतोष दादा, ओजास्विनी पावशे, सचिन रेडेकर, संदीप काप, राज मेस्त्री, चंद्रशेखर पिलाने, नितीन पाटोळे हे सर्व पोचले होते पण सर्वात मोठी परीक्षा होती ती आमच्या अनिकेत दादा ची(नेहमी प्रमाणे) वाट पाहायची. तो पर्यंत आमचे अमित शिंदे बंधू यांचा फोन आला कि त्यांना पण यायचय. खर तर मानगड ला येणा-यांमध्ये अमित बंधुंच नाव नव्हत आणि एका गाडीत अगोदरच आम्ही १० जण झालो होतो आता ११ वा कुठे बसवायचा हा प्रश्न उभा ठाकला होता. हा प्रश्न तर देशाची महागाई कशी रोखायची यापेक्षा मोठा होता. पण आमचे पंतप्रधान संतोष दादानि आम्हा सर्वाशी चर्चा करून निर्णय घेतला कि अमितला बोलवायचे कारण तिकडे जाउन जड विरगळ उचलण्यासाठी ताकदवर मावळे पाहिजे होते. शेवटी इकडे अनिकेत बंधूंचे आगमन झाले तसे आम्ही प्रयाण केले. तिकडे अमित शिंदे पनवेल ला हजार झाले. तिकड

फेसबुकवरची ती….

Image
फेसबुकवरची ती….  फेसबुकवरची ती… हा नेहमी तिला Request पाठवतो  याला ती दाद काही देइना  हा नेहमी तिला मेसेज करतो  पण ती रिप्लाय काही देइना  फेसबुकवरची ती……  हा रोज तिची Profile बघतो  पण ती ढूकुणहि ह्याकडे बघेन  हा नेहमीच तिचे फोटो Share करतो  पण ती साध Like सुद्धा करेना  फेसबुकवरची ती……  हा रोज तिच्यासाठी नवीन शेअर करतो  पण ती त्याकडे एकदाही बघेना हा तिच्यासाठी कविता करेन म्हणतो  पण तेहि त्याला जमेना फेसबुकवरची ती……  तिचा Relationship Status सिंगल च असतो  म्हणून हा रोज तिच्यासाठी झुरतो  असेल Interest दुस-या कुणात  तर Status तरी चेंज कर तो….  फेसबुकवरची ती……  फेसबुकवरची ती……  फेसबुकवरची ती……  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग

चीड येते.....

Image
चीड येते  जेव्हा वास येतो हिरवळीचा  या हिंदुत्वाच्या भगव्या मातील  या मातीतच उगवून मातीसाठी जगणे ना जमले या हिरव्या जातीला  चीड येते  जेव्हा बबुवा म्हणे कोणी  मायमराठीच्या सुताला  साथ देऊन आपण त्यास तुटकी  नकळत झुकवी मराठी भाषेला  चीड येते  जेव्हा शिवरायांचे नाव वापरे कोणी  क्षणिक स्वार्थ पूर्ण करण्याला  अर्थ नसे त्यांच्या लेखी  शिवरायांच्या नावाला  चीड येते  जेव्हा झुकतो कोणी  किंमत देऊन त्या हिरव्या मताला  भगव्या फेट्यास लाथाडूनि डोक्यावर घेई गोल टोपीला चीड येते…... चीड येते…... चीड येते…... दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग

मुजरा राजे मुजरा….

Image
मुजरा राजे मुजरा  मरण सोसलात पण शरण ना गेलात  निर्घुण या मृत्यूलाही जिंकलात  आयुष्यभर स्वराज्यासाठी जगलात  मरणहि त्यासाठीच हसत स्वीकारलात  मुजरा राजे मुजरा….  ११ मार्च… हाच तो आमच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आमच्या धाकल्या धन्याचा आज निर्घुण खून त्या औरंग्याने केला. माणुसकीला काळिमा फासणारे हे त्याचे कृत्य पण या स्वराज्याने एक न्यायप्रिय राजा गमविला. ज्या राजाच्या समोर मृत्यूही थरथर कापत होता त्याला हे अस दुखद मरण…या माझ्या राजाचा पराक्रम इतका अतुलनीय होता कि त्या औरंग्याचे साखळदंड माझ्या राजाचा पराक्रम कैद करू शकले नाहीत म्हणूनच कि काय शंभूराजेंच्या बलिदानानंतर स्वराज्याचा प्रत्येक व्यक्ती युद्धात उतरला आणि त्या औरंग्याला याच मातीत गाडला. ज्या शंभू राजेंनी मृत्यूवर विजय मिळवला ते आत्पेष्टा कडून मात्र फसले गेले. आज ३२४ वर्षे उलटून गेली राजे तुमच्या बलिदानाला अजूनही आग भडकते आहे या मनात. कस सोसलत राजे तुम्ही राजे…. मरण पत्करलात पण शरण कधी गेला नाहीत. शिवरायांनी शिकवले राजाने स्वराज्यासाठी कस जगावं अन तुम्ही शिकवलात स्वराज्यासाठी कस मराव…. मुजरा राजे मुजरा… जय शिवशंभ

अत्यंत…. अचानक आणि अत्यंत…

Image
अत्यंत…. अचानक आणि अत्यंत… आजची दि. १०/३/२०१३ मोहीम खरच अत्यंत…अचानक आणि अत्यंत…. अशीच होती. काल शनिवार दुपारपर्यंत माझ्या लक्षात आल होत कि फार तर १० मावळे या मोहिमेस हजर राहणार होते. त्यामुळे खर सांगायचा तर "अत्यंत निरुत्साह" मनात होता. तसेच मी, सुरज कोकितकर, सचिन रेडेकर, किरणआपटे दिवा स्टेशनल भेटलो. दुर्गवीर वीरांगना ओजास्विनी पावशे यांनी धावती भेट दिली तोपर्यंत आमचे सुरज कोकितकर यांचे CALL सेंटर सुरु होते. थोड्या थोड्या वेळाने अजित दादा आणि संतोष दादा फोन करून आमच्या प्रत्येक पावलाची खबर घेत होते. तिकीट काढली का? गाडीत बसलात का? गाडी सुटली का? आणि खूप काही!!!! खरच जगाच्या कुठल्याही कोप-यात अजित दादा आणि संतोष दादा असुदे आपल्या दुर्गवीर च्या प्रत्येक सभासदावर त्यांच अगदी बारीक लक्ष असत. हीच आमच्या दुर्गवीर परिवाराची खासियत आहे. संतोष दादा ला फोन केला तर "अंड गुंड थंड पाणी" भाषेत एक बाई बोलायची नंतर लक्षात यायच दादा गावी आहे ना बेळगावच्या सीमेवर म्हणून "मराठी ऐवजी"(महाराष्ट्रात असून मराठी ऐवजी ) "अंड गुंड थंड पाणी" ची भाषा ऐकु यायची. आजच्या

दिसत नाहीस ग तू हल्ली....

Image
दिसत नाहीस ग तू हल्ली, रस्त्यावरून मी जाताना तुझ्या घराबाहेर उभी राहून  तू माझी वाट पाहताना  तुझ ते चोरून बघण, मी बघताच नजर फिरवण  रोजच हे नजरेने बघण  जणू झाल होत माझ जगण सवय झालीय तुझी मला  नजरेनेच पाहतोय रोज तुला जरी भेटता न आले कधी तुला  तरी नजरेनेच जागतोय आपल्या प्रेमाला बघ जमलच तर पुर्वीसारखी  घरासमोर तुझ्या उभी रहा मला हवहवस वाटणार नकळत मला निरखून पहा  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

सावध हो जंजी-या सावध रे …

Image
असलास जरी अजिंक्य तू  आहे पद्मदुर्ग हा अभेद्य रे  झुकून उभा राहशील तू  एक दिस या पद्मदुर्गाच्या समोर रे…. सावध हो जंजी-या सावध रे … सावध हो जंजी-या सावध रे … पुसतील तुला मृतात्मे  ज्यांसी स्वार्थासाठी तू फसविले झाले जीवन सार्थ मावळ्यांचे ज्यांनी पद्मदुर्गावरी बलिदान दिले सावध हो जंजी-या सावध रे … सावध हो जंजी-या सावध रे … शान आहे हा पद्मदुर्ग अमुचा  फडकतोय यावरी भगवा रे  आन आम्हास ह्या भगव्याची  ठेवू यास सतत मानाने फडकत रे  सावध हो जंजी-या सावध रे … सावध हो जंजी-या सावध रे … दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/