"धुळवड भगव्याची"



"धुळवड भगव्याची"

आज दि.२७/३/२०१३ रोजी दुर्गवीर ची एकदम अचानक ठरलेली सुरगड मोहीम ख-या अर्थाने "धुळवड भगव्याची" ठरली.  मुंबईत सर्वजण "बुरा ना मानो होली है" म्हणत रंगांची धुळवड खेळत होते तेव्हा आम्ही ९ दुर्गवीर सूरगडावर भगव्याची धुळवड खेळत होतो.  अगोदर सूरगडाच्या बुरुजावर भगवे निशाण फडकवून आणि नंतर सूरगडवरून खाली उतरताना संपूर्ण जंगलाच्या वाटेवर लाल मातीची धुळवड खेळत आम्ही आजची मोहीम पूर्ण केली.  
प्रथम अचानक ठरलेली मोहीमइतर दुर्गवीरांना न सांगता आम्ही ठरवली त्याबद्दल आम्ही ९ जण क्षमस्व.  खर तर मला रात्री ९:३० ला संतोष दादाचा फोन आला सूरगड ला जायचं फार विचार न करता मी किती वाजता येउन आणि कुठे येउन हे विचारलं.  मग ठरलं सायन ला रात्री ११ ला भेटायचं मी ५ -६ जणांना SMS केला प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार ८ जणांना तयार करायचं होत.  सचिन रेडेकर -सुरज कोकितकर हि कोल्हापुरी जोडी लगेच तयार झाली.  प्रशांत वाघरे, संतोष दादा, अनिकेत तमुचे दादा तर अगोदरच तयार होते. ६ जण असेच तयार झाले. मी जेवून निघालो प्रशांत दादांना सायन ला भेटायचं होत तिथे महेश दादा गाडी घेऊन येणार होते. रात्री ११ ला घरातून निघालो सायन पोचलो आणि १:१५ पर्यंत सांताक्रुजवरून ६ जण गाडीतून आले.  राजेश सावंत दादा, आणि सचिन सुर्वे दादा यांच येण मला अनपेक्षित होत. महेश दादा च लग्न ठरल्यामुळे त्याच्या चेह-यावर आणि कपड्यावर तेज तर दिसतच होत पण गाडी चालवताना पण तेच तेज दिसत होत. तो गाडी चालवताना माझ्या मनात एक विचार नेहमी येतो RTO ऑफिस ला जाऊन महेश दादाच्या लायसन्स ची खातर जमा करून घ्यावी नक्की फोर व्हीलरचच आहे विमान चालवायला पण परवानगी आहे. पुढे त्याच वेगात आम्ही अमित शिंदे बंधूना भेटलो होळी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी पुरणपोळी दिली ती घेऊन त्यांचा निरोप घेऊन आम्ही त्याच भन्नाट वेगात पुढे जाऊन लागलो.  पण हा वेग मी जास्त वेळ अनुभवू शकलो नाही कारण नंतर मी डोळे झाकून विचार करीत होतो (सर्वान वाटत मी झोपतो कि काय?) साधारण ४ च्या दरम्यान आम्ही खांब मध्ये पार्टे च्या घरी पोचलो पण आम्ही पोचताच कोंबडा आवरू लागला. (त्याला माहित नव्हते ना  हे दुर्गवीर चे "निशाचर" आलेत ते) पण त्याच्या आवरण्याला कोंबडी भाव देईल आम्ही नाही अश्या अविर्भावात आम्ही झोपी गेलो ते थेट ६:३०  ते ७:०० च्या दरम्यान उठलो कारण गडावर जायचं होत भगवा ध्वज लावण्यासाठी ध्वजस्तंभ उभारायचा होता.  चहा करून आम्ही निघालो सूरगडच्या ह्या भगव्या मोहिमेसाठी। 
ध्वजस्तंभाचा पाइप घेऊन आम्ही गडावर जायला निघालो मध्येच विहिरीवर थांबून पुरणपोळिवर पण ताव मारला आणि पुढे निघालो माझ्या पायाला थोडी दुखापत झालेली असल्यामुळे आज सचिन रेडेकर ला सुरज, प्रशांत, अनिकेत दादा नि साथ दिली. सचिन सुर्वे बंधू सर्व आठवणी कॅमेरा मध्ये कैद करत होते.  दरमजल करत एकमेकांना साथ देत आम्ही पाइप घेऊन गडावर पोचलो.  अगोदर केलेली टाकीच काम बघून पुढे शेवटच्या बुरुजावर पोचलो तिथे तो पाइप उभारायचा होता.  पार्टे चे बंधू हि आमच्या सोबत होते तेहि एका लहान मुलाला (साधारण ५ - ६वीतील असावा) खड्डा खणायला सुरुवात केली बांधकाम इतक मजबूत होत कि  २ -३ फुटाचा खड्डा खणताना नाकी तोंडी ९ -१० -११-१२ आले. एकदाचा खड्डा तयार झाला तो होईपर्यंत कोणाच्या हाताला लागला कोणाच्या हाताला फोड आले आणि काय काय!!  पण त्याकडे कुणाच लक्ष नव्हत,  लक्ष होत ते भगवा कसा फडकणार याकडे. तोपर्यंत सुरज दादा ने भगवा पाईप ला बांधून घेतला होता आता फक्त त्या खड्ड्यात उभारायचा होता.  हर महादेव च्या गजरात तो पाईप उभा केला भगवा हळू हळू फडकत होता तास अंगात चैतन्य येत होत अक्षरश: रक्त उसळून येत होत तो भगवा फडकताना.  आमच्या वयाची इतर तरुण(जे आम्हाला वेडे समजतात) होली है होली है करत होते तेव्हा आम्ही दुर्गवीर सुरगडावर भगव्याची धुळवड खेळत होतो.  फरक एवढाच आम्ही आमच कर्तव्य पूर्ण करत होतो आणि ते त्यांचा आनंद.  शेवटी पाईप पूर्ण उभा झाला तसा दगडी भर घालून माती टाकून तो व्यवस्थित बसविला.  बाजूला दोन मोठे दगड ठेवून त्याला व्यवस्थित उभा केला आणि आमचा भगवा डौलाने फडकू लागला.  खरच सांगतो धुळवडीच्या रंग-बेरंगी रंगात रंगण्यापेक्षा हि भगवी धुळवड पाहून छाती अक्षरश: भरून येत होती.  भगवा फडकला मग आम्ही ध्वजस्तंभा ची व शिवराई ची पूजा केली.  आता परतीच्या प्रवासाला निघायचं होत पण भगवा फडकताना बघून मन निघत नव्हत.  अस वाटत होत तो डौलाने फडकणारा भगवा पाहतच राहावं. पण शेवटी निघालो पण निघताना माहित नव्हत या हि भगव्या पताक्याची धुळवड अनुभवल्यानंतर पुढे "भगव्या मातीची" धुळवड अनुभवायची आहे. 
आम्ही गड उतरायला सुरुवात केली ती गडाच्या दुस-या वाटेने!  सुरुवातीलाच सचिन रेडेकर बंधूनी शंका उपस्थीत केली आपण य वाटेने का उतरतोय(त्या वाटेने जास्त वेळ लागणार होता आणि सचिन बंधूना भूक लागली होती म्हणून हि शंका आली) मी म्हटलं आपल्याला आज काहीतरी नवीन अनुभवायचंय ना म्हणून आपण दुस-या वाटेने उतरतोय.पुढे एक सरळ कातळ होत त्यात घळी सारख किंवा टाकीसारख काहीतरी दिसत होत काय आहे म्हणून हे बघावं म्हणून मी आणि सुरज दादा तो उभा डोंगर चढू लागलो पुन्हा तेच पाय टाकताना तरा व्हयला लागला म्हणून मी माघार पत्करली तो पर्यंत आमचे राजेश सावंत दादा तयार झाले आणि मग सुरज दादा आणि राजेश दादा ते कातळ चढून वर गेले चढताना अधून मधून त्यांचा धक्का लागून दगड खाली येत होते त्यांना चुकवून सुरक्षित उभ राहून ते दोघ कसे जातात हे पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. ते वरती चढून तर गेले आता खरी परीक्षा उतरताना होती सुरज दादा आपले लांबलचक पाय टाकत उतरत होते पण राजेश दादांचा झोका घेण्याचा मूड असावा बहुतेक ते अक्षरश: लटकतच येत होते.  त्या गरम दगडावरून राजेश दादा झोके घेत आणि सुरज दादा सरपटत येते होते. पुढे जाउन आम्ही उतरायला सुरुवात केली अर्ध्या वाटेपर्यंत बरोबर आलो आता हि वाट २ दिशेने जात होती १ दिशेला आमचा नेहमीचा मार्ग होता आणि दुस-या दिशेला काय होत "माहित नाही"? पण सरळ वाटेने जाणार तर मग मग मजा कसली आम्ही निवडलि दुसरी वाट (जिकडे काय आहे आम्हाला माहित नव्हत). निघालो निसर्गाशी गप्पा मारत लाल-भगव्या मातीची धुळवड करत... हर्पूर वेळ झाला पण जंगल संपत नव्हत कितीतरी वेळ आम्ही फिरतोय.  पण कंटाळा अजिबात येत नव्हता जरा पाय दुखत होते आणि गळा सुखात होता बस एवढच! त्यात माझ्या एका पायाची Folding System बिघडली होती(ढोपराला लागल होत त्यामुळे पाय लगेच Fold करता येत नव्हता) त्यामुळे मी फार उड्या मारू शकत नव्हतो. मग तसेच पायाखालील वाट तुडवत आम्ही निघालो शेवटी एकदाचा रस्ता दिसला पण सुरगडाच्या पायथ्याशी असा पक्का डांबरी रस्ता आम्ही बघितला नव्हता याचाच अर्थ आम्ही चुकलो होतो.  तिथे एका रिक्षा वाल्याला विचरल तेव्हा समजल आम्ही सर्व डोंगरातून "गुल" झालो ते थेट "गुलवाडीत" येउन टपकलो होतो. आता चालून चालून "खांब" झालेले पाय "खांब" गावात कसे पोचवायचे याचा विचार करीत आम्ही पुढे चालू लागलो. पुढे गेल्यावर एका बागेच्या इथे पाणी पिउन आम्ही संतोष दादाच्या योजनेनुसार जवळच असलेल्या डोंगरावर जाऊन पुन्हा जुन्या वाटेवर जायचं ठरवल.  आणि खरच दादाने सांगितल्याप्रमाणे ती वाट बरोबर होती. सर्वजण तहान-भूक यावर कंट्रोल करत वाट मिळेल तिथे घुसत होते.  आणि एकदाची ती जुनी पायवाट लागली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  आम्ही जुन्या पायवाटेन पुन्हा चालायला सुरुवात केली आणि एकदाचे विहिरीपर्यंत पोचलो.  तिथे मस्त फ्रेश होऊन जेवायला गेलो. खाली येउन बघतो तर काय गावातील धुळवड संपली होती पण महेश दादाची पांढरी गाडी त्या रंगांनी कलरफुल झाली होती.   पार्टे  बांधून आम्ही कुठून कुठून वाट काढत आलो याची स्टोरी सांगत आम्ही जेवायला बसलो.  एवढी भूक लागली होती कि जेवढे चालून पाय दुखालेनासतील तेवढे पोठ दुखेपर्यंत जेवलो.  झणझणीत मटनाच जेवून सगळे बसले. तो पर्यंत आमचे सारथी महेश दादा आडवे झाले आता तेच आडवे झाल्यावर आम्ही पण काय गप्प बसतो काय पुढच्या १५ - २० मिनटात सगळे झोपले सुद्धा.(मी सोडून मी डोळे बंद करून विचार करतो!! लोकांना वाटत मी झोपलोय… ) नंतर ४:०० च्या दरम्यान आम्ही नाइलाजास्तव उठलो कारण परत मुंबई गाठायची होती ना!!! नंतर निघालो ते परतीच्या प्रवासाला. पण येताना धुळवड न खेळता रंग अंगाला/कपड्यांना कसे फासून घेत येतात ते अनुभवले. जो कलर गावक-यांनी महेश दादाच्या गाडीला फसला होता तो येता येता वा-याने उडून आमच्या अंगाला/कपड्यांना लागला होता. धुळवड न खेळता आमचे सर्वांचे चेहरे रंगबेरंगी झाले होते. शेवटी काय "बुरा न मानो होली(धुळवड) है". पण त्या रंगाचा faras  टेन्शन न घेता मी पुन्हा डोळे बंद करून विचार करू लागलो यांना वाटायचं मी झोपलोय कि काय?? 
पण या मोहिमेत खर सांगायचं तर आम्ही मिळवलं भगवी धुळवड खेळायचं भाग्य!  तसाही मी मुंबईत होळी, धुलीवंदन, रंगपंचमी, गरबा, दहीहंडी ह्या सणांना घराबाहेर जात नाही कारण "काही ठिकाणी" या सणांच्या नावाखाली जी फालतुगिरी चालले ती मला पटत नाही("काही ठिकाणी"सर्वांनी वाईट माणून घ्यायची गरज नाही) त्यापेक्षा तिथे जाउन वाद घालण्यापेक्षा न गेलेलच  योग्य.  पण खरच संतोष दादाचे आभार कारण या पुढच्या सगळ्या सणांना मी कुठल्यातरी गडावरच जाउन राहीन आणि अनुभवेन आजच्या प्रमाणे एक वेगळे आयुष्य…. 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….