सीमारेषा....

सकाळपासून WhatsApp ग्रुप, फेसबुकवर तुमच्यावॉर शुभेच्छचा वर्षाव होताना पाहतोय... लिहायला वेळ मिळत नव्हता मिळून इतक्या उशिरा काहीतरी खरडतोय.... संतोष दादा कुणासाठी देव, कुणासाठी दादा, प्रेरणास्थान, कुणासाठी वटवृक्ष, कुणासाठी मार्गदर्शक आहेत पण माझ्यासाठी माझ्या दुर्गवीर मधील "सीमारेषा" आहे हि मी कधी ओलांडू शकत नाही.... मी माझ्या आयुष्यात कुणालाच जुमानत नाही (असे माझे जवळचे लोक म्हणतात) मलाही तसच वाटत, कारण जॉबवर असो वा नात्यांमध्ये माझ्याबाबत कुणी "कुरापती" करायला लागलं कि मी त्याला आपटतो.... पण प्रत्येक क्षेत्रात मी अशी एक "सीमारेषा" ठेवलीय जी मला आवरू शकते ती पार केली तर मी "बाद" हा अलिखित करार मी स्वताशीच केलाय. दुर्गवीर मध्ये न बोलता अनेकांशी माझे "मतभेद" झाले असतील नंतर ते निवळले असतीलही. पण ते कितीवेळा आणि कुणाशी नीटसं आठवत नाही. पण संतोष दादांनी दिलेलं कुठलं काम मी "पूर्ण करू शकलो नाही" आणि त्यांना कधी मी "मला हे जमणार नाही" असं वाक्य नाईलाजास्तव बोलून दाखवलं तो प्रत्येक प्रसंग माझ्या लक्षात आहे. अ...