Wednesday, 7 November 2012

सिंधुदुर्गाची महती....जर पहायचा असेल स्वर्ग, तर गाठायचा सिंधुदुर्ग
हिरवळीतील निसर्ग, हा सिंधुदुर्गाचा गर्व....


मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग,अख्या सिंधुदुर्गाचा गर्व
शेकडो वर्षापूर्वी संपले राजेशाही पर्व, तरी समुद्र्मध्यात आहे हा दुर्ग....

सावंतवाडीची लाकडी खेळणी, यंत्रयुगातही आहे मुलांसाठी पर्वणी
खेळणी हवी आहेत लाकडी तर ताबडतोप गाठा सावंतवाडी...

देवगडचा "हापूस",आज बनलाय सर्व फळांचा "बापूस"
तुम्ही आंबा एकदा खाल्ला पाहून,चार पाच पेटी मागवाल मागाहून....

सिंधुदुर्गातील मालवणी भाषा,हि ऐकताच सर्वत्र पिकतो हशा
सिनेमातून गेला तमाशा,आणि नाटकात आली मालवणी भाषा...

सिंधुदुर्गातील पोखरबावचा गणपती, पांडवांची होती येथे एक रात्र वस्ती
बारा मास वाहते येथे पाणी धबा धबा,फुलल्यात येथे त-हेत-हेच्या बागा...

असेच एक शिरोडा ठिकाण,आहे येथे मिठाची खाण
अख्या सिंधुदुर्गाला मीठ पुरवते शिरोडा,जणू मिठाचा राजवाडा...

आच-याचा रामेश्वर, नवसाचा परमेश्वर
बडे बडे श्रीमंत,मानतात यालाच आपला भगवंत...

असा हा सिंधुदुर्ग अजून काय काय सांगू याची महती
अजून काय काय सांगू याची महती 
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke 

Thursday, 1 November 2012

पहा... पहा... शिवरायांचे स्वराज्य जाहले......


शिवरायां चरणी ज्यांनी मस्तक ठेविले,
शिवकार्यासाठी जीवन अर्पीले,
असे मावळे या मातीत जन्मले, 
शिवरायांसी असे हिरे लाभले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

रक्त या मावळ्यांचे  सळसळे,
जणू म्यानातून तलवार उसळे, 
मावळ्यांचा हा रोष पाहुनी, 
अवघे सारे गनीम भ्याले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

म्लेछांच्या या हल्यास थोपविण्या,
भवानीने समशेरीचे रूप घेतले, 
स्वराज्याकडे जे पाहती वक्रदृष्टीने,
न जाणो किती असे गनीम संपविले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

बाल शिवाजीस जिजाऊ नी घडविले,
त्या शिवरायांनी गुलामीस लाथाडीले, 
मोजक्या कट्टर मावळ्यांसी घेउनी
शिवरायांनी गडकोट जिंकले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

सुस्त निद्रिस्त जनतेस जागविले,
बाजी तानाजी असे माणिक निवडले, 
भल्या भल्यांनी प्राण वेचुनी,
या लाखाच्या पोशिंद्यास जगविले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke 

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...