पहा... पहा... शिवरायांचे स्वराज्य जाहले......

शिवरायां चरणी ज्यांनी मस्तक ठेविले,
शिवकार्यासाठी जीवन अर्पीले,
असे मावळे या मातीत जन्मले, 
शिवरायांसी असे हिरे लाभले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

रक्त या मावळ्यांचे  सळसळे,
जणू म्यानातून तलवार उसळे, 
मावळ्यांचा हा रोष पाहुनी, 
अवघे सारे गनीम भ्याले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

म्लेछांच्या या हल्यास थोपविण्या,
भवानीने समशेरीचे रूप घेतले, 
स्वराज्याकडे जे पाहती वक्रदृष्टीने,
न जाणो किती असे गनीम संपविले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

बाल शिवाजीस जिजाऊ नी घडविले,
त्या शिवरायांनी गुलामीस लाथाडीले, 
मोजक्या कट्टर मावळ्यांसी घेउनी
शिवरायांनी गडकोट जिंकले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

सुस्त निद्रिस्त जनतेस जागविले,
बाजी तानाजी असे माणिक निवडले, 
भल्या भल्यांनी प्राण वेचुनी,
या लाखाच्या पोशिंद्यास जगविले
म्हणोनी, पहा... पहा...  शिवरायांचे स्वराज्य जाहले.......

धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke 

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

शेवया आणि नारळाचा रस