Thursday, 28 February 2013

आई शक्ती दे!!आई शक्ती दे!! आई शक्ती दे !!
अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!धृ!!

हर शिळा शिळा वेचुनी,
हर चिरा चिरा रचुनि
मंदिर तुझे बांधण्या,
आई शक्ती दे!! आई शक्ती दे !!
अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!१!!

ढासळते बुरुज हे सावरण्या,
कोसळता इतिहास हा वाचविण्या,
वाचवूनी हा इतिहास, घडविन्या नवा इतिहास
आई शक्ती दे!! आई शक्ती दे !!
अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे!!२!!

हरवत्या वाटा या शोधण्या,
या वाटेवर दगडी पाय-या रचविन्या
शिवप्रेमींना या वाटेवर साद देण्या
आई शक्ती दे!! आई शक्ती दे !!
अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!३!!
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Monday, 25 February 2013

निशब्द.... प्रवास अफाट पद्मदुर्गाचा…निशब्द.... प्रवास अफाट  पद्मदुर्गाचा… 

दुर्गवीर ची  अजून एक मोहिम फत्ते..  निशब्द करून जाणारी (तसा मी निशब्द च असतो म्हणा… ).  याअगोदर मी पद्मदुर्ग दर्शन केल होत पण पण तरीही यावेळी काही वेगळच वाटत होत.  वाटत होत पुन्हा पुन्हा इथे येउन ह्या अफाट जलदुर्गाचे दर्शन घेत राहावे. 
   दि. २३/२/२०१३ ला स्वामी नारायण मंदिर, दादर इथून बसने निघालो. मुंबईहून २७  दुर्गवीर ७ दुर्गवीरांगना  पुण्याहून १० दुर्गवीर असे तब्बल ४४ दुर्गवीर या मोहिमेसाठी हजर राहणार होते. यात अगदी ८-१० वर्षाच्या लहान मुलांपासून ५० - ६० वर्षापर्यंतच्या आई - बाबांचाही सहभाग होता.  यात काही तर सहकुटुंबच आले होते.   आजच्या मोहिमेच खास वैशिष्ट म्हणजे आमचे दोन महत्वाचे दादा अजित दादा, आणि संतोष दादा याची अनुपस्थिती.  त्यामुळे मोहिमेवर निघाल्यापासून सर्व जबाबदारी प्रामुख्याने  मोनिश दादा, नितीन दादा यांच्यावर होती. आणि मोहिमेचा जमाखर्च बघायचा आणि इतर काम आमचे दुर्गवीर बंधू संदीप दादा, आणि सुरज दादा यांच्या वर होती.  तसा प्रत्येक दुर्गवीर आपल काम समजून जबाबदारीने वागणार होता हे नक्की होत.    प्रत्येकाला संपूर्ण मोहिमेची आखणी समजावून सांगून आमचा प्रवास सुरु झाला पद्मदुर्ग च्या दिशेने.  सकाळी ४ च्या दरम्यान मुरुड ला पोचलो तिथे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. ६:३० पर्यंत तिथे आराम करणार होते.  त्यानुसार आम्ही तिथे आराम केला.  सर्व चहा नाष्टा आटोपल्यावर आम्ही पद्मदुर्ग च्या दिशने निघालो.  आता प्रवास होता बोटीने पद्मदुर्ग ला जायचा. दोन बोटीमध्ये आम्ही दुर्गवीर विभागले गेलो. आणि त्या उसळत्या दर्याची साथ घेत आम्ही अफाट पद्मदुर्गाच्या दिशेने निघालो. दुरूनच जंजिरा चे दर्शन झाले पण आम्हाला आस होती ती जंजी-याच्या छाताडावर वसलेल्या पद्मदुर्गाची… जस जसे पद्मदुर्ग च्या दिशेने जात होतो तशी उत्सुकता वाढत होती. समोर पद्मदुर्ग दिसत होता. खवळलेल्या या समुद्रात अगदी ताठ मानेने उभा असलेला पद्मदुर्ग.  आमचे सगळे जुने नवे फोटोग्राफर  त्या पद्मदुर्गाचे ते अफाट आणि रौद्र रूप टिपण्यासाठी धडपडत होते.शेवटी बोट किना-याला लागली आमचे पाउल त्या पावन भूमीत पडले.  पुढे जाण्याअगोदर मोनीश दादांनि पद्मदुर्गच्या बुरुजांचे वैशिष्ट्य सांगितले ते म्हणजे इतक्या वर्षांनंतर या बुरुजांचे दगड झिजले आहेत तरीही त्यात वापरलेला चुना आणि काही तत्सम पदार्थ ते अजूनही शाबूत आहे.  नंतर पुढे सर्वांची ओळख झाली व नंतर सर्व पद्मदुर्गच्या दर्शनाला निघाले.  तिथे सध्या पुरातत्व खात्याने काम करायला सुरुवात केली आहे अशी बातमी आम्हाला मिळाली होती ते काम केलेलं  आम्हाला दिसत होत.   
    संपूर्ण गड फिरताना मन भरून यायचं.  अभिमान वाटायचा त्या राजांचा ज्यांच्याकडे एवढी दूरदृष्टी होती कि त्यांनी भर समुद्रात हे गड उभारला.  अभिमान वाटायचा त्या मावळ्यांचा ज्यांनी हा गड उभारायला आणि सांभाळायला  आपल रक्त सांडलं होत.  आमचे मोनीश दादाच एक वाक्य खूप काही सांगून जात "हा गड अजूनही   सुस्थितीत आहे कारण इथे दगड चुन्यासोबत मावळ्यांच रक्त मिसळल आहे."  खरच इथे हा गड उभारताना सिद्धीला  आपल्या अस्तित्वावर घाला घातला जाणार हे माहित होत म्हणून त्याने गडाच बांधकाम थांबावन्यासाठी खूप प्रयत्न केले.  या गडावर आम्हाला तब्बल ३० - ३५ तोफा  दिसल्या अजूनही तोफा तिथे  असतील.   या तोफांच्या संख्येवरून लक्षात येते कि इथे किती युद्धजन्य परीस्थितिला मावळ्यांनी तोंड दिले असेल. या गडाल रोज रक्ताचा अभिषेक होत असेल. पण तरीही आम्हा महाराष्टाच्या जनतेला या पद्मदुर्गाचे महानपण दिसत नाही.  महाराजांना जंजिरा जिंकता आला नाही हे आपण "कोडगे" होऊन ऐकतो पण एक कोणी उसळून सांगत नाही तुमच्या त्या "सिद्धी" च्या तोफांना न जुमानता "आमच्या मावळ्यांनी" हा गड उभारून दाखवला.  संभाजी राजांनी तर दगडी रस्ताच बनवला होता भर समुद्रात पण कल्याण वर आक्रमण झाले म्हणून शंभू राजेना ती मोहीम अर्धवट सोडावी लागली. अरे सांगा त्या उर्मट सिद्धीला तू तर उंदरासारखा आमच्यावर वार करत होता आम्ही वाघासारखे लढून  तुला शह देत होतो.  वाघ शिकार हि मोकळ्या रानात करतो आणि ती संपवतो हि तिथेच. उंदीर शिकारही कुरतडून, चोरून आणि खातोही लपूनच.  अरे असेल तुझा जंजिरा अजिंक्य  पण आमचा पद्मदुर्ग हि आहे अभेद्य.  यावर काही ओळी सुचतायत
असलास जरी अजिंक्य तू 
आहे पद्मदुर्ग हा अभेद्य रे 
झुकून उभा राहशील तू 
एक दिस या पद्मदुर्गाच्या समोर रे….
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …

पुसतील तुला मृतात्मे 
ज्यांसी  स्वार्थासाठी तू फसविले
झाले जीवन सार्थ मावळ्यांचे
ज्यांनी पद्मदुर्गावरी  बलिदान दिले
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …

शान आहे हा पद्मदुर्ग अमुचा 
फडकतोय यावरी भगवा रे 
आन आम्हास ह्या भगव्याची 
ठेवू यास सतत मानाने फडकत रे 
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …
  
   संपूर्ण गड फिरून झाल्यावर दुर्गवीर एकत्र आले आणि श्रमदान नाही अस कस होईल प्रत्येकाने १ - १ गोनी घेत प्लास्टिक कचरा गोळा करायला सुरुवात केली.  यात ८ वर्षाच्या मुलापासून अगदी ५० - ६० वर्षांच्या आई - बाबां  पर्यंत सर्वांनी हातभार लावला. आम्ही सर्वांनी मिळून तब्बल ६ - ७ गोणी कचरा जमा केला.  बघत बघता निघायची वेळ झाली. गीतू ताई, नितीन दादा, मोनीश दादा यांनी पद्मदुर्ग चा इतिहास,  दुर्गवीर चे गड संवर्धन कार्य याबाबत सर्वांना माहिती दिली.  नंतर आमच्यात सर्वात  वयाने  मोठे असलेल्या आई- बाबां कडून शिवरायांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. शिवरायांची आरती व नंतर  शिवराय, संभाजी राजे, हर हर महादेव च्या जयघोषात आम्ही पद्मदुर्गाचा निरोप घेतला. पण आम्ही प्रत्येकाने एक शब्द दिला त्या पद्मदुर्गाला " शेकडो वर्ष तू स्वराज्य राखलेस आता आमची वेळ आहे, तुझे अस्तित्व राखण्यासाठी आम्ही दुर्गवीर जिवाचे रान करू"  एक दिवस असा  येईल एक पद्मदुर्ग ला येण्यासाठी लोकांची रांग लागेल.  त्याच्या मनात एकाच विचार असेल,  "कसा असेल तो मावळा ज्याने राज्याच्या एक शब्दाखातीर आपले बलिदान दिले",  "अन कसा असेल तो राजा ज्याच्यासाठी मावळे आपले रक्त सांडत होते."  
त्या काळात  शिवाजी महाराजांना, शंभू महाराजांना या गडाचे महत्व समजले पण आपली एवढी उदासीनता कशासाठी……    

Friday, 22 February 2013

भगवं वादळ...


भगवं वादळ...
 दि.१९/२/२०१३ रोजी  शिवराज्याभिषेक सोहळा समिती, उस्मानाबाद आयोजित 383व्या शिवजयंती कार्यक्रमात दुर्गवीर प्रतिष्ठान ला खास आमंत्रण देण्यात आले होते. ते निमंत्रण स्वीकारून आम्ही दुर्गवीर मी, संतोष हासुरकर, अजित राणे  अमित शिंदे, उमेश पारब, मनोज मोरे, सुरज कोकितकर, अनिकेत तमुचे, महेश सावंत असे ९ दुर्गवीर आम्ही ४००-४५० कि.मी. चे अंतर पार करून या 383व्या शिवजयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेलो.  सोमवारी रात्री उस्मानाबाद च्या दिशेने निघताना मनात  उत्सुकता होती. ती उत्सुकता जसजसे ते उस्मानाबाद च्या जवळ जात होतो तशी वाढत होती.  पण पुढे जाउन एक भगवं वादळ आम्ही अनुभवणार होतो याची आम्हाला कल्पना नव्हती.  

  जसजसे आम्ही उस्मानाबाद शहरात प्रवेश करू लागलो तसे ओमकार नायगावकर, अविनाश निंबाळकर यांच्याशी फोन वर बातचीत चालू झाली.  त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे पुढे जात होतो.  जाताना रस्त्यात आम्हाला जाणवत  होत कि आम्ही "भारत" किंवा "इंडिया" त नाही तर आमच्या हिंदुस्थानात आहोत.  गल्लोगल्ली शिवजयंतीची लगबग, दोन्ही बाजूना भगवे झेंडे आणि फक्त  भगवेच  झेंडे.  मन अक्षरशा अभिमानाने भरून येत होते.  जाणीव होत होती महाराजांनी निर्माण केले ते हेच हिंदवी स्वराज्य!!!  उस्मानाबादकरांचा हा भगवा नजराणा आम्ही डोळे भरून पाहत जिजाऊ चौक च्या दिशने चाललो. तिथे पोचताच आमच्यासाठी ओमकार नायगावकर, अविनाश निंबाळकर हे तिथे तयारच होते.  आम्हाला तिथे पाहून त्यांना  झालेला आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.  तो आनंद होता तो एक शिवप्रेमी दुस-या शिप्रेमींना भेटल्याचा.  जय शिवराय जय शिवराय करीत गळाभेट करीत  आम्ही त्यांची भेट घेतली.  त्यांनी लगेचच आमची रहायची व्यवस्था केली होती तिथे आम्ही पोचलो.  स्वताच्या व्यस्त कार्यक्रमातून आमची योग्य व्यवस्था त्यांनी केली होती. नंतर आम्ही मुख्य कार्यक्रम जिथे महाराजांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक होणार होता तिथे गेलो.  तिथे असलेला शिवरायांचा गजर, जय शिवराय च्या घोषणा आसमंत अगदी दुमदुमून टाकत होते.  इतक शिवमय वातावरण मी आयुष्यात पहिल्यांदा बघितल होत.  आमचे ओमकार बंधू तर अक्षरशा पेटून उठले होते. त्यांच्या घोषणा काही थांबत नव्हत्या.  आम्ही सर्व दुर्गवीर तिथला  तो उत्साह निरखून पाहत होतो.  अक्षरशा एक "भगवं वादळ" तिथे घोंगावत होते आणि त्या वादळाच्या तडाख्याने "हिरवा पालापाचोळा" कुठच्या कुठे उडून गेला होता.  नंतर काही वेळातच शिवरायांचे १३ वे वंशज "मा. संभाजी राजे (कोल्हापूर)"   आगमन झाले त्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक व पूजन झाले. ठरल्याप्रमाणे नंतर Bike Rally ला सुरवात झाली हजारो बाईक स्वार Rally साठी हजर होते. ते सर्व पाहून शिवरायांचे स्वराज्यातील मावळे शत्रूवर तुटून पडण्यासाठी चालले आहेत असाच भास होत होता.  सर्वांच्या Bike वर भगवे निशाण डौलाने फडकत होते. आणि प्रत्येकजन एका स्वयंशीस्ती ने तिथे वावरत होता.  आम्ही काही काळ हे शिवमय वातावरण अनुभवले नंतर आमच्या निवासस्थानी निघालो.  थोडा आराम केला तोवर पुन्हा आमची भेट घेण्यासाठी अविनाश निंबाळकर आले त्यांच्या सोबत आम्ही  काही वेळ चर्चा केली. तस प्रथम दर्शनी पाहता निसर्गात दणकट शरीरयष्टी लाभलेले अविनाश दादा बोलताना अक्षरशा आग ओकत होते.  त्यांच्या बोलण्यातून शिवरायांविषयी आत्मीयता, इतिहासाबद्दल तळमळ स्पष्ट दिसत होती.  काही वेळात आम्ही जेवणाला सुरुवात केली तिथे आम्ही अविनाश दादा, आणि ओमकार दादा याचे विचार एकत होतो.  त्यांच्या बोलणं अंगावर रोमांच उभ करत होत.  आजच्या घडीला शिवरायांचे चाललेले बाजारीकरन या मुद्द्यावर  दणकट शरीरयष्टीचे अविनाश  दादा भावनाविवश झाले, ते अश्रू  कमजोरीचे नव्हते ते अश्रू  आजच्या आपल्या इतिहासाबद्दल, शिवरायांबद्दल असलेल्या उदासीनतेबद्दल असलेलि चीड व्यक्त करत होते.  नंतर संतोष दादांनी त्यांच्या कार्यात आपले पूर्ण सहकार्य असल्याचा त्यांना शब्द दिला.  जेवण होईपर्यंत आम्ही दुर्गविरांनी त्यांचे काठोकाठ भरलेले शिवप्रेम अनुभवले.  त्यांना हि "दुर्गवीर" आणि "दुर्गवीर चे कार्य" याबद्दल प्रचंड आदर होता तो त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. एका शिवप्रेमीने दुस-या शिप्रेमीला त्याच्या शिवकार्याची दिलेली ती पावती होती.  नंतर आमची परतीची वेळ झाली होती त्यावेळी  शिवराज्याभिषेक सोहळा समिती, उस्मानाबाद चे अध्यक्ष आणी त्याचे सहकारी आमच्या सदिच्छा भेटीसाठी आले.  एका संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्हाला भेटायला आले होते ते पाहून आमचा उर अक्षरशा भरून आला. तेव्हा आम्हाला समजल कि दुर्गवीर च्या कार्याला लोक किती मान देतात. ते आम्हाला भेटायला आले आमच कौतुक केल हीच आमच्या कार्याची पावती होती.  नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो… 
पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला "हिंदुस्थानातून" "इंडिया" कडे… पण जाण्या अगोदर आम्ही अनुभवल ते एक "भगवं वादळ" जे पाहताना आमच्या मनात एकच इच्छा होती हे  वादळ आपल्या मुंबईत याव आणि इथे वाढलेले हिरव रान भूईसपाट करून जाव… 
जय शिवराय

Monday, 18 February 2013

आज समजल "थरार" कशाशी खातात.....


आज समजल "थरार" कशाशी खातात.....
दुर्गवीर सोबत अनेक गडदर्शन मोहिमा केल्या खूप डोंगर चढलो या सह्याद्रीच्या कुशीत खूप वेळा झेप घेतली पण आजची "झेप" जरा जास्तच "थरारक" होती. मानगड पासून काही अंतरावर एक डोंगर आहे तिथे जावळीचे खोरे आहे. तेथुंनच जवळ असलेल्या डोंगरावर एक दगडी सिंहासन आहे व तिथे एक बालेकिल्ला असल्याचे आम्हा दुर्गवीरांना समजले होते. जवळच एक घळ आहे. हे सर्व पाहावे म्हणून आम्ही काही दुर्गवीर चढाईला निघालो. रामजी कदम, संतोष दादा, सचिन जगताप, शैलेश कंधारे, अमित शिंदे, संदीप काप, अजित दादा, नितीन पाटोळे, मनोज पवार, महेश सावंत असे आम्ही दुर्गवीर सकाळी ८:३० च्या दरम्यान चढाई ला सुरवात केली. तेथील स्थानिक आमच्या मदतीला येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यामुळे आही स्वताच जायचे ठरविले.त्यानंतर आमचे सरसेनापती संतोष दादा नि आदेश दिले सरळ डोंगर दिसतो तस चालत जायचं. उभा डोंगर चढायचा तोही कोणत्याही "दोरी" आणि काय काय वापरतात ते त्याशिवाय. थोडक्यात काय ROCK CLIMBING तेही कोणत्याही साधनाशिवाय. सोबत होता तो शिवरायावरचा विश्वास बस त्याबळावर तो डोंगर चढायचा होता. आज माझी तब्येत फारशी ठीक नव्हती त्यामुळे मी सगळ्यात शेवटी असणार हे नक्की होत तसच झाल. माझ्या पायात Office Shoes आणि Trouser असल्यावर माझा पहिला नंबर येण्याची तीळमात्रही शंका नव्हती. मी सरपटत सरपटत वर चढत होतो. तेव्हा मला उगाचच Spider Man झाल्यासारखं वाटत होत. दगड पकडत, झाडाचा बुंधा पकडत तो उभा डोंगर आम्ही चढत होतो. इतिहासात मावळे कसे या द-या खो-यातून लढत असतील हा विचार करून अंगावर शहारे येत होते. उभा डोंगर त्यात पाय घसरवणारे ते गवत यावर मात करत आम्ही डोंगराच्या टोकाशी पोचलो. डोंगराच्या टोकाशी टाकी व काही वाडे अस्तित्वात आहेत. अजून थोड वरती गेल्यावर रायगड च दर्शन झाल आणि मन भरून आल. पुढे एकच घर त्या डोंगरावर होत. त्या घरात ना लाईट होती न पाणी. तिथल्याच एका टाक्यातून ते पाणी वापरात. काही वर्ष अगोदर तिथे एक वाडी होती पण तेथील सर्व लोक ती जागा सोडून गेले. आता त्या डोंगरावर फक्त एकच घर होत. आमच्या पैकी मनोज दादा, संदीप काप, महेश सावंत हे आमच्या थोड पुढे गेले आणि त्या एका घरात जाऊन त्यांनी चौकशी केली कि पुढे काही आहे का? पण त्यांना फारशी माहिती नसल्याने ते आम्हला मदत करू शकले नाहीत. पण त्यांनी आमच्या साठी ३-४ भाक-या आणि चटणी दिली त्यावर आम्ही सर्वांनी यतेच्छ ताव मारला. नंतर दुस-या एका ठिकाणी भेट द्यायची म्हणून आम्ही थोड लावकर निघायचं ठरवल. त्यानुसार आम्ही एक मळलेल्या पायवाटेने जाणार होतो कारण येताना "काय" झालेलं ते आमच आम्हालाच माहित होत. मग आम्ही वळणावळणाचा रस्ता पार करत खाली उतरत होतो. शाळेत असताना एक प्रश्न असायचा घाटातील रस्ते वळणावळणाचे का असतात????? त्याचउतार आज मिळाल तेही प्रात्यक्षीका सहित. घाटातील रस्ते वळणावळणाचे असतात कारण सगळेच "दुर्गवीर चे मावळे" नसतात ना !!!! कुठल्याही साधनाशीवाय गुरुत्वकर्षनाच्या च्या विरोधात जाउन डोंगर चढायला. आम्ही खाली उतरलो आणि त्या सरळ उभ्या डोंगराकडे बघितल तेव्हा समजल आम्ही काय केलय. खूप मेहनत करून न्युटन ने गुरुत्वकर्षणाचा शोध लावला आणि आम्ही दुर्गवीरां नि त्यालाच बगल देऊन डोंगर पार केला.
खरच माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग मी आज अनुभवला...थोडक्यात काय आज मला समजल "थरार" कशाशी खातात"
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

मातृ-पितृ देवो भव....


कालच एक चित्रपट पाहण्यात आला चित्रपटाच नाव होत "मान सन्मान" तो हि आपण दुर्लक्षित केलेल्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नाहीतर या सह्याद्री च्यानल कडे जायला वेळ कुणाकडे आहे. झी, सोनि, स्टार या वाहिन्यांवरील फालतू डेली सोप मधून आपण मुक्त झालो तर सह्याद्री वाहिनीकडे जाऊ ना. असो "मान सन्मान" हा चित्रपट रीमा लागू, शिवाजी साटम यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत अनेक नवे जुने कलाकार होते. चित्रपटाचा विषय थोडा भावनिकच होता. एक मध्यमवर्गीय कुटुंब २ मुलगे एक शिकून मोठा कलेक्टर होतो आणि आई वडिलांना जुन्या चाळीत सोडून बंगल्यात निघून जातो. २ रा चांगल्या नोकरीवर नसतो त्यामुळे नाइलाजास्तव आईवडिलां सोबत त्या चाळीत राहतो. काही वर्षानंतर २ मुलगे मिळून निर्णय घेतात आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं. आईवडिलांना हे मान्य नसत. ते वर्तमानपत्रात जाहिरात देतात कुणाला आईवडील दत्तक हवे असतील तर या संदर्भात. ८ दिवसात त्यांच्या साठी एक अतिशय श्रीमंत व्यक्ती चालून येतो. ते त्याच्याकडे राहायला जातात. आई वडील अगदी सुखात असतात कारण त्यांना श्रीमंत मुलाने दत्तक घेतलेलं असत. इकडे कलेक्टर मुलगा लाचखोरी प्रकरणात पकडला जातो. २ रा मुलाच पण काही ठीक नसत. पण आई वडील पुन्हा त्यांच्या मदतीला जाण शक्य नसत. आई आजारपणाने जाते पण तिच्या २ मुलांना तिच्या चितेला अग्नी देन हि नशिबी नसत.
सारांश काय तर आईवडीलांना वा-यावर सोडणा-या मुलांना फारस यश मिळत नाहि. हा चित्रपट होता म्हणून कथेनुसार त्या आईवडीलाना श्रीमंत मुलाने दत्तक घेतले पण वास्तवात अस कोणी दत्तक नाही घेणार तुमच्या आईवडीलाना. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडीलांना त्रास देताना थोडा विचार करा त्यांनी तुमच्यासाठी किती त्रास सहन केलाय. वृद्धाश्रम हे कितीही मोठ, पंचतारांकित असल तरी ते तुमच्या आईवडीलांसाठी रस्त्यासारखेच भासते. तुमच एखाद छोटस झोपड जरी असल तरी ते त्यांच्यासाठी महालाप्रमाणे असते. त्यांना पैसा, वैभव याची गरज नसते गरज असते ती तुमच्या प्रेमाची. तुम्ही किती पैसा कमविता याला महत्व नसते तर तुम्ही किती आशीर्वाद कमवता याला महत्व असते. आईवडीलांसाठी जगातील कोणतीही गोष्ट सोडावी लागली तरी चालेल पण आई वडिलांना कधी गमावू नका. आई वडिलांची किंमत काय असते हे ज्यांना आईवडील नाहीत त्यांना विचारा. ज्यांच्या जगण्याचा अर्थ फक्त तुम्ही होता त्यांच्या जगण्याची झालेली वाताहत तुम्ही कशी पाहू शकता. आज दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हे कशाचे लक्षण आहे. आपण आपले आईवडील USE & THROW समजतो का आयुष्यभर त्यांनी आपल्यासाठी खस्ता खायच्या आणि ज्यावेळी त्यांनी आराम करायला हवा तेव्हा आपण वा-यावर कस काय सोडू शकतो. .....
माझ्यासाठी तर माझे आई वडील दैवत आहेत आणि मला आशा आहे तुमचहि मत हेच असेल
मातृ-पितृ देवो भव....
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 13 February 2013

लाजून तुझे जाणे
लाजून तुझे जाणे,
स्पर्शून मनास जाते,
हासणे या माझ्या चंद्राचे,
त्या चंद्रास लाजवून जाते...
दुर्गवीर चा धीरु

Monday, 11 February 2013

देवी अन्साई ची पूजा...देवी अन्साई ची पूजा...
आज दि. १०/२/२०१३ रोजी माझ्या दुर्गवीर परिवारासोबत माझ "दुसर घर" (गडकिल्ले) "सुरगड" वर गेलो. नाहीतर आठवड्यातील एक दिवस या माझ्या दुस-या घरी नाही गेलो तर मन बेचैन होत. आज कामावरून निघतानाच थोड प्रसन्न वाटत होत का माहित नाही. नेहमी प्रमाणे दिवा-रोहा ट्रेन ने निघालो. आमचे प्रशांत बंधू नि नवीन कोंगो आणला त्याच उद्घाटन झाल आमच्या शिवरायांच्या काव्याच्या गायनाने. शिवरायांवरील स्फूर्तीपार गीते गात गात आम्ही मजल दर मजल करीत नागोठणे स्टेशन गाठले आमच्या अजीत दादांच्या अनुपस्थिथित एकट्याने मोहिमेची जबाबदारी सांभाळणारे नितीन दादा नि आमची नागोठणे ते खांब पर्यंतची प्रवासाची व्यवस्था अगदी चोख पार पाडली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरातील हनुमानाचे बाहेरून दर्शन घेऊन आंम्ही पार्टे यांच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर कळल दुर्गवीरां ची अगोदर आलेली तुकडी त्या मध्ये संतोष दादा, अनिकेत दादा, महेश दादा, देवेश दादा हे सर्व अगोदरच गडावर पोहोचले होते. मग माझीही इच्छा झाली गडावर जायची पण रात्र थोडी जास्त झाल्यामुळे ती इच्छा बारगळली. मग आम्ही मोर्चा जेवणा कडे वळविला. आम्ही सर्व दुर्गविरांनि सामुहिक भोजन केल. एकट जेवण्यापेक्षा सर्व मिळून एकमेकांच्या डब्यातील थोड थोड (थोड थोड हा!!!) खाण्यात मजा ती काही औरच..पोठभर जेवण आटोपल आणि मग झाली झोपायची तयारी कारण सकाळी ५:३० उठायाच होत. मस्त गुलाबी थंडीत झोपी गेलो ती पण स्वत:ची चादर स्वतःच घेवून (इथे सामुहिक हा प्रकार सर्रास आढळतो खास करून थंडी च्या दिवसात आणि एखाद्याने चादर आणली नसेल तर रात्रभर त्या एका चादरीसाठी खेचा खेची चालू असते). सगळी आमचा अलार्म वाजला आमाचे सुरज कोकितकर दादा पण आम्ही तो अलार्म बंद केला आणि चादर तोंडावरून घेतली आणि पुन्हा झोपलो. नंतर लक्षात आल पुन्हा उशीर झालाय (जसा रोज कामावर जायला होतो तसा). सगळ पटापट आटोपून आम्ही गड चढायला सुरुवाती केली. ज्या पायवाटेच काम करायचं होत तिथे गेलो आणि तिथेच ओळख परेड झाली ती मी अगदी लक्ष देऊन ऐकली पण मला आता एकाचही नाव आठवत नाही त्याबद्दल त्या नवीन दुर्गवीरांची माफी मागतो. नंतर फार वेळ न दवडता कामाला सुरुवात केली नेहमी प्रमाणे मी मोठ हत्यार शोधत होत पण मी टिकाव, खोर एवढच हाती लागल. मिळाल ते घेत मी उत्साहात कामाला लागलो. दादांनी आम्हाला दोन तुकड्यांमध्ये विभागाल होत अर्धे पायवाटेच्या कामासाठी आणि बाकीचे अन्साई देवीच्या मंदिराजवळ असे आम्ही पायवाटेच्या कामाला लागलो. संतोष दादा दुस-या तुकडीसोबत मंदिराच्या कामासाठी गेला. इकडे पायवाटेवर आम्ही पाय-या बनवत होतो तेही आजूबाजूचे दगड उचुलून आणून तिथे टाकत होतो. आमच्या अनिकेत दादाना रायगडच्या पाया-या जश्या आहेत तश्या पाय-या बनवायच्या होत्या. मग तसे मोठे दगड आम्ही शोधून शोधून आणून ठेवत होतो. आमचे पैलवान सचिन दादा फक्त विचारायचे कुठला दगड पाहिजे पुढची क्षणाला तो दगड जिथे पाहिजे तिथे हजर. पाय-यांच पहिल्या टप्प्यातल काम जवळपास तर पूर्ण झाल होत. तेव्हा आमचे सेनापती संतोष दादा चा आदेश आला सर्वांनी मंदिराच्या कामाला लागायचं मग आम्ही सर्व मंदिराच्या कामाला निघालो. तिथे आम्ही पोचन्याअगोदर पहिल्या तुकडीने बरचस काम केल होत. मग आम्ही लागलो आजूबाजूची माती बाजूला करून मंदिराचा बाहेरील भाग स्वच्छ केला. तोपर्यंत इतर मावळे मंदिराचा आतला भाग साफ करून मूर्तीचा भाग स्वच्छ केला होता. आता अर्धी अधिक जमिनीत गाडली गेलेली मूर्ती स्पष्ट पणे दिसत होती. नंतर आम्ही मंदिराला दगडी भिंत उभाण्याचे काम सुरु केले. त्यासाठी उभ्या चौकोणी शिळा (दगड) शोधन गरजेच होत. मग आम्ही काही मावळे मोठमोठ्या शीळा शोधायला निघालो जो आपापल्या ताकदी प्रमाणे शिळा आणून टाकत होता. मी, सचिन दादा, प्रशांत दादा, मनोज दादा, मोठ्यात मोठ्या शीळा आणायचा प्रयत्न करत होतो. अगदी मोठमोठे खडक बघून आम्हाला वाटायचा आम्हाला कुठली तरी दैवी शक्ती असती तर असे मोठे मोठे दगड नेउन एका दिवसात मंदिर उभ केल असत. पण नंतर विचार यायचा कि नाही आपल्यात अशी काही शक्ती असती तर आपली बुद्धी नक्कीच फिरली असती आणि आपण त्या शक्ती चा वाईट कामासाठी वापर केला असता. त्यापेक्षा देवाने आपल्याला दिली आहे तेवढी शारीरिक ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पुरेशी आहे. असो पण शेवटी वेळेचे बंधन असतच मंदिर आणि पायवाटेच पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून आम्ही जेवणासाठी निघालो खर तर अजून काम करायची इच्छा होती. पण निघालो जेवायला आमचे उमेश दादा, श्वेता ताई, आणि नवीन दुर्ग वीरांगणा ओजस्विनी ताई या सर्वांनी मिळून केलेल्या जेवणावर ताव मारायला निघालो. पण त्या अगोदर सर्वांसाठी पाणी आणायचं होत मग मी, उमेश दादा, अमित दादा, प्रशांत दादा, मनोज दादा असे सर्व जण गडाच्या वरच्या दिशेने गेलो तिथल्या एका टाक्यातून पाणी आणायचं होत. दोन मोठे Can घेऊन आम्ही पाणी आणायला गेलो. मग समजल रिकामे Can आणि भरलेले Can काय फरक असतो. आम्ही अक्षरश: सरपटतच ते Can घेऊन खाली आलो. Can आणि Can't मधला फरक मला ब-यापैकी समजला होता. ते सरपटून झाल्यावर सपाटून भूक लागली होती त्यामुळे झपाटून जेवलो. मग सगळे दुर्गवीर गड उतरायला लागले इथे पण मिळेल ते समान घेऊन आम्ही निघालो. विहिरीवर थोड फ्रेश होऊन परतीच्या तयारीला निघालो. जाता जाता नवीन दुर्गवीरांची ओळख, प्रतिक्रिया हे सोपस्कार ब-यापैकी पार पडले. नंतर संतोष दादांनी सर्व दुर्गवीरां उद्देशून छोटेखानी भाषण दिले आणि त्यांनतर दुर्गवीर नितीन सक्रे यांचे शिवकालीन नाण्यांचा संग्रह बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मोठमोठे दगड उचलल्याने येताना चा प्रवास झोपून झाला. या मोहिमेत आम्हाला अजित दादा, मोनीश दादा, राज दादा, मोनिका ताई, सागर दादा, अभी दादा, मनोज पवार दादा, यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.
पण या मोहिमेत ख-या अर्थाने अन्साई देवीची पूजा सर्व दुर्गवीरांनि केली ते मंदिर उभारुन. खरच यावेळी त्या मंदीराच काम करताना अंगात एक वेगळ चैतन्य संचारल होत. काळाच्या ओघात मूर्तीची झीज झाली असली तरी तीचं तेज स्पष्टपणे दिसत होत. कदाचित दुर्गवीरांच हे निस्वार्थी कार्य पाहून प्रसन्न झाली असेल आणि आम्हा दुर्गवीरां ना भरभरून आशीर्वाद दिले असतील. आज काम करतान अस वाटत होत इथेच राहावं मोठे मोठे दगड आणून ते मंदिर आज पूर्णपणे बांधून काढाव. मला श्रमदान करताना समजल कि आज या मोहिमेवर येण्यागोदर मला प्रसन्न का वाटत होत कारण माझ्या आणि सर्व दुर्गवीरांच्या हातून देवीची पूजा होणार होती. आणि खरच आज ख-या अर्थाने आम्ही सर्व दुर्गवीरांनी अन्साई देवीची पूजा केली
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 6 February 2013

पण वाट तुझी मी खूप पहिली.......

शाळेत तुला रोज बघायचो ग 
पण बोलायची काही  हिम्मत नव्हती 
तुझ्या हसण्यावर मी हसायचो ग
पण तुझी नजर त्यावर खिळलीच नाही

वर्गात मुली ब-याच होत्या पण 
इतर मुलीत जरा तूच सभ्य होतीस
दिसायला जरी साधी होतीस पण 
पण मनात माझ्या बसली होतीस 

नाव तुझ घेतल्यावर 
मी पहिला तुझ्याकडे पाहायचो 
चोरटी नजर फिरवल्यावर 
मग स्वताशीच हसायचो

मित्र माझे हाक मारायचे 
तेव्हा माझी नजर तुलाच शोधायची 
निदान त्यांच्या तरी आवाजाने
तू माझ्याकडे बघतेस का ते पहायची 

बोललोच नाही तुझ्याशी कधी  
मग मैत्री तर खूप दूर राहिली 
तू थांबवलस नाही मला कधी 
पण वाट तुझी मी खूप पहिली.......

http://dhiruloke.blogspot.in/


गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...