आज समजल "थरार" कशाशी खातात.....






आज समजल "थरार" कशाशी खातात.....
दुर्गवीर सोबत अनेक गडदर्शन मोहिमा केल्या खूप डोंगर चढलो या सह्याद्रीच्या कुशीत खूप वेळा झेप घेतली पण आजची "झेप" जरा जास्तच "थरारक" होती. मानगड पासून काही अंतरावर एक डोंगर आहे तिथे जावळीचे खोरे आहे. तेथुंनच जवळ असलेल्या डोंगरावर एक दगडी सिंहासन आहे व तिथे एक बालेकिल्ला असल्याचे आम्हा दुर्गवीरांना समजले होते. जवळच एक घळ आहे. हे सर्व पाहावे म्हणून आम्ही काही दुर्गवीर चढाईला निघालो. रामजी कदम, संतोष दादा, सचिन जगताप, शैलेश कंधारे, अमित शिंदे, संदीप काप, अजित दादा, नितीन पाटोळे, मनोज पवार, महेश सावंत असे आम्ही दुर्गवीर सकाळी ८:३० च्या दरम्यान चढाई ला सुरवात केली. तेथील स्थानिक आमच्या मदतीला येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यामुळे आही स्वताच जायचे ठरविले.त्यानंतर आमचे सरसेनापती संतोष दादा नि आदेश दिले सरळ डोंगर दिसतो तस चालत जायचं. उभा डोंगर चढायचा तोही कोणत्याही "दोरी" आणि काय काय वापरतात ते त्याशिवाय. थोडक्यात काय ROCK CLIMBING तेही कोणत्याही साधनाशिवाय. सोबत होता तो शिवरायावरचा विश्वास बस त्याबळावर तो डोंगर चढायचा होता. आज माझी तब्येत फारशी ठीक नव्हती त्यामुळे मी सगळ्यात शेवटी असणार हे नक्की होत तसच झाल. माझ्या पायात Office Shoes आणि Trouser असल्यावर माझा पहिला नंबर येण्याची तीळमात्रही शंका नव्हती. मी सरपटत सरपटत वर चढत होतो. तेव्हा मला उगाचच Spider Man झाल्यासारखं वाटत होत. दगड पकडत, झाडाचा बुंधा पकडत तो उभा डोंगर आम्ही चढत होतो. इतिहासात मावळे कसे या द-या खो-यातून लढत असतील हा विचार करून अंगावर शहारे येत होते. उभा डोंगर त्यात पाय घसरवणारे ते गवत यावर मात करत आम्ही डोंगराच्या टोकाशी पोचलो. डोंगराच्या टोकाशी टाकी व काही वाडे अस्तित्वात आहेत. अजून थोड वरती गेल्यावर रायगड च दर्शन झाल आणि मन भरून आल. पुढे एकच घर त्या डोंगरावर होत. त्या घरात ना लाईट होती न पाणी. तिथल्याच एका टाक्यातून ते पाणी वापरात. काही वर्ष अगोदर तिथे एक वाडी होती पण तेथील सर्व लोक ती जागा सोडून गेले. आता त्या डोंगरावर फक्त एकच घर होत. आमच्या पैकी मनोज दादा, संदीप काप, महेश सावंत हे आमच्या थोड पुढे गेले आणि त्या एका घरात जाऊन त्यांनी चौकशी केली कि पुढे काही आहे का? पण त्यांना फारशी माहिती नसल्याने ते आम्हला मदत करू शकले नाहीत. पण त्यांनी आमच्या साठी ३-४ भाक-या आणि चटणी दिली त्यावर आम्ही सर्वांनी यतेच्छ ताव मारला. नंतर दुस-या एका ठिकाणी भेट द्यायची म्हणून आम्ही थोड लावकर निघायचं ठरवल. त्यानुसार आम्ही एक मळलेल्या पायवाटेने जाणार होतो कारण येताना "काय" झालेलं ते आमच आम्हालाच माहित होत. मग आम्ही वळणावळणाचा रस्ता पार करत खाली उतरत होतो. शाळेत असताना एक प्रश्न असायचा घाटातील रस्ते वळणावळणाचे का असतात????? त्याचउतार आज मिळाल तेही प्रात्यक्षीका सहित. घाटातील रस्ते वळणावळणाचे असतात कारण सगळेच "दुर्गवीर चे मावळे" नसतात ना !!!! कुठल्याही साधनाशीवाय गुरुत्वकर्षनाच्या च्या विरोधात जाउन डोंगर चढायला. आम्ही खाली उतरलो आणि त्या सरळ उभ्या डोंगराकडे बघितल तेव्हा समजल आम्ही काय केलय. खूप मेहनत करून न्युटन ने गुरुत्वकर्षणाचा शोध लावला आणि आम्ही दुर्गवीरां नि त्यालाच बगल देऊन डोंगर पार केला.
खरच माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग मी आज अनुभवला...थोडक्यात काय आज मला समजल "थरार" कशाशी खातात"
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….