मातृ-पितृ देवो भव....


कालच एक चित्रपट पाहण्यात आला चित्रपटाच नाव होत "मान सन्मान" तो हि आपण दुर्लक्षित केलेल्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नाहीतर या सह्याद्री च्यानल कडे जायला वेळ कुणाकडे आहे. झी, सोनि, स्टार या वाहिन्यांवरील फालतू डेली सोप मधून आपण मुक्त झालो तर सह्याद्री वाहिनीकडे जाऊ ना. असो "मान सन्मान" हा चित्रपट रीमा लागू, शिवाजी साटम यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत अनेक नवे जुने कलाकार होते. चित्रपटाचा विषय थोडा भावनिकच होता. एक मध्यमवर्गीय कुटुंब २ मुलगे एक शिकून मोठा कलेक्टर होतो आणि आई वडिलांना जुन्या चाळीत सोडून बंगल्यात निघून जातो. २ रा चांगल्या नोकरीवर नसतो त्यामुळे नाइलाजास्तव आईवडिलां सोबत त्या चाळीत राहतो. काही वर्षानंतर २ मुलगे मिळून निर्णय घेतात आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं. आईवडिलांना हे मान्य नसत. ते वर्तमानपत्रात जाहिरात देतात कुणाला आईवडील दत्तक हवे असतील तर या संदर्भात. ८ दिवसात त्यांच्या साठी एक अतिशय श्रीमंत व्यक्ती चालून येतो. ते त्याच्याकडे राहायला जातात. आई वडील अगदी सुखात असतात कारण त्यांना श्रीमंत मुलाने दत्तक घेतलेलं असत. इकडे कलेक्टर मुलगा लाचखोरी प्रकरणात पकडला जातो. २ रा मुलाच पण काही ठीक नसत. पण आई वडील पुन्हा त्यांच्या मदतीला जाण शक्य नसत. आई आजारपणाने जाते पण तिच्या २ मुलांना तिच्या चितेला अग्नी देन हि नशिबी नसत.
सारांश काय तर आईवडीलांना वा-यावर सोडणा-या मुलांना फारस यश मिळत नाहि. हा चित्रपट होता म्हणून कथेनुसार त्या आईवडीलाना श्रीमंत मुलाने दत्तक घेतले पण वास्तवात अस कोणी दत्तक नाही घेणार तुमच्या आईवडीलाना. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडीलांना त्रास देताना थोडा विचार करा त्यांनी तुमच्यासाठी किती त्रास सहन केलाय. वृद्धाश्रम हे कितीही मोठ, पंचतारांकित असल तरी ते तुमच्या आईवडीलांसाठी रस्त्यासारखेच भासते. तुमच एखाद छोटस झोपड जरी असल तरी ते त्यांच्यासाठी महालाप्रमाणे असते. त्यांना पैसा, वैभव याची गरज नसते गरज असते ती तुमच्या प्रेमाची. तुम्ही किती पैसा कमविता याला महत्व नसते तर तुम्ही किती आशीर्वाद कमवता याला महत्व असते. आईवडीलांसाठी जगातील कोणतीही गोष्ट सोडावी लागली तरी चालेल पण आई वडिलांना कधी गमावू नका. आई वडिलांची किंमत काय असते हे ज्यांना आईवडील नाहीत त्यांना विचारा. ज्यांच्या जगण्याचा अर्थ फक्त तुम्ही होता त्यांच्या जगण्याची झालेली वाताहत तुम्ही कशी पाहू शकता. आज दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हे कशाचे लक्षण आहे. आपण आपले आईवडील USE & THROW समजतो का आयुष्यभर त्यांनी आपल्यासाठी खस्ता खायच्या आणि ज्यावेळी त्यांनी आराम करायला हवा तेव्हा आपण वा-यावर कस काय सोडू शकतो. .....
माझ्यासाठी तर माझे आई वडील दैवत आहेत आणि मला आशा आहे तुमचहि मत हेच असेल
मातृ-पितृ देवो भव....
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….