देवी अन्साई ची पूजा...



देवी अन्साई ची पूजा...
आज दि. १०/२/२०१३ रोजी माझ्या दुर्गवीर परिवारासोबत माझ "दुसर घर" (गडकिल्ले) "सुरगड" वर गेलो. नाहीतर आठवड्यातील एक दिवस या माझ्या दुस-या घरी नाही गेलो तर मन बेचैन होत. आज कामावरून निघतानाच थोड प्रसन्न वाटत होत का माहित नाही. नेहमी प्रमाणे दिवा-रोहा ट्रेन ने निघालो. आमचे प्रशांत बंधू नि नवीन कोंगो आणला त्याच उद्घाटन झाल आमच्या शिवरायांच्या काव्याच्या गायनाने. शिवरायांवरील स्फूर्तीपार गीते गात गात आम्ही मजल दर मजल करीत नागोठणे स्टेशन गाठले आमच्या अजीत दादांच्या अनुपस्थिथित एकट्याने मोहिमेची जबाबदारी सांभाळणारे नितीन दादा नि आमची नागोठणे ते खांब पर्यंतची प्रवासाची व्यवस्था अगदी चोख पार पाडली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरातील हनुमानाचे बाहेरून दर्शन घेऊन आंम्ही पार्टे यांच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर कळल दुर्गवीरां ची अगोदर आलेली तुकडी त्या मध्ये संतोष दादा, अनिकेत दादा, महेश दादा, देवेश दादा हे सर्व अगोदरच गडावर पोहोचले होते. मग माझीही इच्छा झाली गडावर जायची पण रात्र थोडी जास्त झाल्यामुळे ती इच्छा बारगळली. मग आम्ही मोर्चा जेवणा कडे वळविला. आम्ही सर्व दुर्गविरांनि सामुहिक भोजन केल. एकट जेवण्यापेक्षा सर्व मिळून एकमेकांच्या डब्यातील थोड थोड (थोड थोड हा!!!) खाण्यात मजा ती काही औरच..पोठभर जेवण आटोपल आणि मग झाली झोपायची तयारी कारण सकाळी ५:३० उठायाच होत. मस्त गुलाबी थंडीत झोपी गेलो ती पण स्वत:ची चादर स्वतःच घेवून (इथे सामुहिक हा प्रकार सर्रास आढळतो खास करून थंडी च्या दिवसात आणि एखाद्याने चादर आणली नसेल तर रात्रभर त्या एका चादरीसाठी खेचा खेची चालू असते). सगळी आमचा अलार्म वाजला आमाचे सुरज कोकितकर दादा पण आम्ही तो अलार्म बंद केला आणि चादर तोंडावरून घेतली आणि पुन्हा झोपलो. नंतर लक्षात आल पुन्हा उशीर झालाय (जसा रोज कामावर जायला होतो तसा). सगळ पटापट आटोपून आम्ही गड चढायला सुरुवाती केली. ज्या पायवाटेच काम करायचं होत तिथे गेलो आणि तिथेच ओळख परेड झाली ती मी अगदी लक्ष देऊन ऐकली पण मला आता एकाचही नाव आठवत नाही त्याबद्दल त्या नवीन दुर्गवीरांची माफी मागतो. नंतर फार वेळ न दवडता कामाला सुरुवात केली नेहमी प्रमाणे मी मोठ हत्यार शोधत होत पण मी टिकाव, खोर एवढच हाती लागल. मिळाल ते घेत मी उत्साहात कामाला लागलो. दादांनी आम्हाला दोन तुकड्यांमध्ये विभागाल होत अर्धे पायवाटेच्या कामासाठी आणि बाकीचे अन्साई देवीच्या मंदिराजवळ असे आम्ही पायवाटेच्या कामाला लागलो. संतोष दादा दुस-या तुकडीसोबत मंदिराच्या कामासाठी गेला. इकडे पायवाटेवर आम्ही पाय-या बनवत होतो तेही आजूबाजूचे दगड उचुलून आणून तिथे टाकत होतो. आमच्या अनिकेत दादाना रायगडच्या पाया-या जश्या आहेत तश्या पाय-या बनवायच्या होत्या. मग तसे मोठे दगड आम्ही शोधून शोधून आणून ठेवत होतो. आमचे पैलवान सचिन दादा फक्त विचारायचे कुठला दगड पाहिजे पुढची क्षणाला तो दगड जिथे पाहिजे तिथे हजर. पाय-यांच पहिल्या टप्प्यातल काम जवळपास तर पूर्ण झाल होत. तेव्हा आमचे सेनापती संतोष दादा चा आदेश आला सर्वांनी मंदिराच्या कामाला लागायचं मग आम्ही सर्व मंदिराच्या कामाला निघालो. तिथे आम्ही पोचन्याअगोदर पहिल्या तुकडीने बरचस काम केल होत. मग आम्ही लागलो आजूबाजूची माती बाजूला करून मंदिराचा बाहेरील भाग स्वच्छ केला. तोपर्यंत इतर मावळे मंदिराचा आतला भाग साफ करून मूर्तीचा भाग स्वच्छ केला होता. आता अर्धी अधिक जमिनीत गाडली गेलेली मूर्ती स्पष्ट पणे दिसत होती. नंतर आम्ही मंदिराला दगडी भिंत उभाण्याचे काम सुरु केले. त्यासाठी उभ्या चौकोणी शिळा (दगड) शोधन गरजेच होत. मग आम्ही काही मावळे मोठमोठ्या शीळा शोधायला निघालो जो आपापल्या ताकदी प्रमाणे शिळा आणून टाकत होता. मी, सचिन दादा, प्रशांत दादा, मनोज दादा, मोठ्यात मोठ्या शीळा आणायचा प्रयत्न करत होतो. अगदी मोठमोठे खडक बघून आम्हाला वाटायचा आम्हाला कुठली तरी दैवी शक्ती असती तर असे मोठे मोठे दगड नेउन एका दिवसात मंदिर उभ केल असत. पण नंतर विचार यायचा कि नाही आपल्यात अशी काही शक्ती असती तर आपली बुद्धी नक्कीच फिरली असती आणि आपण त्या शक्ती चा वाईट कामासाठी वापर केला असता. त्यापेक्षा देवाने आपल्याला दिली आहे तेवढी शारीरिक ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पुरेशी आहे. असो पण शेवटी वेळेचे बंधन असतच मंदिर आणि पायवाटेच पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून आम्ही जेवणासाठी निघालो खर तर अजून काम करायची इच्छा होती. पण निघालो जेवायला आमचे उमेश दादा, श्वेता ताई, आणि नवीन दुर्ग वीरांगणा ओजस्विनी ताई या सर्वांनी मिळून केलेल्या जेवणावर ताव मारायला निघालो. पण त्या अगोदर सर्वांसाठी पाणी आणायचं होत मग मी, उमेश दादा, अमित दादा, प्रशांत दादा, मनोज दादा असे सर्व जण गडाच्या वरच्या दिशेने गेलो तिथल्या एका टाक्यातून पाणी आणायचं होत. दोन मोठे Can घेऊन आम्ही पाणी आणायला गेलो. मग समजल रिकामे Can आणि भरलेले Can काय फरक असतो. आम्ही अक्षरश: सरपटतच ते Can घेऊन खाली आलो. Can आणि Can't मधला फरक मला ब-यापैकी समजला होता. ते सरपटून झाल्यावर सपाटून भूक लागली होती त्यामुळे झपाटून जेवलो. मग सगळे दुर्गवीर गड उतरायला लागले इथे पण मिळेल ते समान घेऊन आम्ही निघालो. विहिरीवर थोड फ्रेश होऊन परतीच्या तयारीला निघालो. जाता जाता नवीन दुर्गवीरांची ओळख, प्रतिक्रिया हे सोपस्कार ब-यापैकी पार पडले. नंतर संतोष दादांनी सर्व दुर्गवीरां उद्देशून छोटेखानी भाषण दिले आणि त्यांनतर दुर्गवीर नितीन सक्रे यांचे शिवकालीन नाण्यांचा संग्रह बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मोठमोठे दगड उचलल्याने येताना चा प्रवास झोपून झाला. या मोहिमेत आम्हाला अजित दादा, मोनीश दादा, राज दादा, मोनिका ताई, सागर दादा, अभी दादा, मनोज पवार दादा, यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.
पण या मोहिमेत ख-या अर्थाने अन्साई देवीची पूजा सर्व दुर्गवीरांनि केली ते मंदिर उभारुन. खरच यावेळी त्या मंदीराच काम करताना अंगात एक वेगळ चैतन्य संचारल होत. काळाच्या ओघात मूर्तीची झीज झाली असली तरी तीचं तेज स्पष्टपणे दिसत होत. कदाचित दुर्गवीरांच हे निस्वार्थी कार्य पाहून प्रसन्न झाली असेल आणि आम्हा दुर्गवीरां ना भरभरून आशीर्वाद दिले असतील. आज काम करतान अस वाटत होत इथेच राहावं मोठे मोठे दगड आणून ते मंदिर आज पूर्णपणे बांधून काढाव. मला श्रमदान करताना समजल कि आज या मोहिमेवर येण्यागोदर मला प्रसन्न का वाटत होत कारण माझ्या आणि सर्व दुर्गवीरांच्या हातून देवीची पूजा होणार होती. आणि खरच आज ख-या अर्थाने आम्ही सर्व दुर्गवीरांनी अन्साई देवीची पूजा केली
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….