Posts

Showing posts from February, 2015

शिवजयंती..... तिथी नुसार कि तारखेनुसार...

Image
काल १९ फेब्रुवारी!! "तारखेप्रमाणे" शिवजयंती साजरा करण्याचा दिवस ! दिवसभर मेसेज, फोटो चा नुसता पाऊस पडत होता ! दर वर्षीपेक्षा या वर्षीच्या शिवजयंतीला "ठळकपणे" जाणवत होत सर्वांच "शिवप्रेम"...

यात तिन प्रकारचे शिवभक्त असल्याचे मला जाणवलं.

एक जे शिवजयंती "तारखेप्रमाणेच" साजरी करा असा आग्रह करणारे आणि त्यासाठी तिथिप्रमाणे शिवजयंती करणा-यांना तिव्र विरोध करणारे !

दुसरे जे शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असे मानणारे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती करणा-यांचा तिव्र विरोध करणारे !

तिसरे ज्यांना तारिख आणि तिथी यात नेमका वाद काय आहे ! हा वाद कोण आणि का करतय याचा मागमुस नसताना फक्त शिवरायांच्या विषयीच्या "आंधळ्या प्रेमापोटि"(हो ! आंधळ्याच) समोर आलेला मेसेज पुढे पाठवून आपले "भाबडे" शिवप्रेम व्यक्त करणारे

यात तारखेप्रमाणे शिवजयंती करणारे चुक की तिथी प्रमाणे चुक हा मुद्दाच नाहिय !
मुद्दा हा आहे की ज्यांना नेमका हा वाद काय आहे आणि कोण करतय याची माहिती नाहि त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतोय "त्यांची काय चुक" ???

जर काहि लोक या वादात स्…

आरसा संस्कृतीचा

Image
आरसा संस्कृतीचा
डोक्यावर भरगच्च कुंकू (कुंकू बर का ! टिकली नाही) हातभर हिरव्या बांगड्या ! नाकात नथ ! नऊवारीत नटलेल्या ह्या आजींचे वर्णन. राहणी जेवढि सांस्कृतिक तेवढि वाणीहि सुमधुर !
वेळ होती बदलापुर येथील दुर्गवीर गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शन ! तिथल्या इतर लोकांना संस्कृती, धर्म, संस्कार याच्याशी काही देण घेण होत का याच मोजमाप करण्यात मी वेळ घालवलाच नाही. यां आजींच्या वागण्या बोलण्यातुन आपली संस्कृती का व कशी जपावी हे स्पष्ट जाणवत होते.
आम्ही दुर्गवीर ज्या ठिकाणी जातो तिथे आपली संस्कृती,इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळि मात्र आम्हि या आजींच्या बोलण्याने अक्षरश: भारावुन गेलो! आजकालच्या मुलामूलींना इतिहास, संस्कृती हे कंटाळवाण वाटत कारण पाश्चात्य संस्कृति त्यांना जवळची वाटते
इतरांनी कस वागाव हे तर आपण ठरवु शकत नाही पण मी कस वागाव मी ठरवलंय. तुम्ही कस वागायचं हे तुम्ही ठरवाल आणि ते योग्यच असेल अशी आशा करतो.
जय शिवरायदुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/