शिवजयंती..... तिथी नुसार कि तारखेनुसार...


काल १९ फेब्रुवारी!! "तारखेप्रमाणे" शिवजयंती साजरा करण्याचा दिवस ! दिवसभर मेसेज, फोटो चा नुसता पाऊस पडत होता ! दर वर्षीपेक्षा या वर्षीच्या शिवजयंतीला "ठळकपणे" जाणवत होत सर्वांच "शिवप्रेम"...

यात तिन प्रकारचे शिवभक्त असल्याचे मला जाणवलं.

एक जे शिवजयंती "तारखेप्रमाणेच" साजरी करा असा आग्रह करणारे आणि त्यासाठी तिथिप्रमाणे शिवजयंती करणा-यांना तिव्र विरोध करणारे !

दुसरे जे शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असे मानणारे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती करणा-यांचा तिव्र विरोध करणारे !

तिसरे ज्यांना तारिख आणि तिथी यात नेमका वाद काय आहे ! हा वाद कोण आणि का करतय याचा मागमुस नसताना फक्त शिवरायांच्या विषयीच्या "आंधळ्या प्रेमापोटि"(हो ! आंधळ्याच) समोर आलेला मेसेज पुढे पाठवून आपले "भाबडे" शिवप्रेम व्यक्त करणारे

यात तारखेप्रमाणे शिवजयंती करणारे चुक की तिथी प्रमाणे चुक हा मुद्दाच नाहिय !
मुद्दा हा आहे की ज्यांना नेमका हा वाद काय आहे आणि कोण करतय याची माहिती नाहि त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतोय "त्यांची काय चुक" ???

जर काहि लोक या वादात स्वताच पारड जड ठेवण्यासाठि जाती पातीं मध्ये भांडण लावत असतील व त्यासाठी दुस-या जातीतील एखाद्या व्यक्तिच्या वैयक्तिक पातळीवर घसरुन टिका करत असतील तर नविन शिवप्रेमिंनी काय समजाव आणि काय आत्मसात कराव !

जे शिवप्रेमी "भाबडेपणाने" छत्रपती शिवाजी महाराज या नावाला मानतात त्यांना आपण कोणते शिवराय शिकवतोय !

कोणी ब्राम्हणांवर टिका करतय तर कोणी बहुजनांवर कोणी हिंदुंच खच्चीकरण करतय तर कुणी मुस्लिमांच उदात्तीकरण !!

मुळात शिवराय कुठल्या जाती किंवा धर्मासाठी लढलेच नाहीत. ते लढले ते स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या जनतेसाठी ! पण…… म्हणुन त्यांनी स्वताची जात किंवा धर्म सोडला नाही की दुस-या जाती धर्मावर टिका केली नाही !

आज जो तो उठतो तो सांगतो "शिवराय माझे" , "शिवराय माझे" अरे पण तुम्ही शिवरायांचे किती आहात याचा विचार केलाय का ?

माझ वैयक्तिक मत विचारल तर मी म्हणेन शिवजयंती तर मी प्रत्येक महिण्यात प्रत्येक दिवशी साजरी करतो ! !  कारण शिवरायांच्या बारा गुणांचे मी अनुकरण करतो !
१ संयम
२ बुद्धिमत्ता
३ विश्वासाहर्ता
४ धैर्य
५ हजरजबाबीपणा
६ समयसुचकता
७ आत्मविश्वास
८ संघटन कौशल्य
९ चिकाटी
१० दुरदृष्टि
११ कल्पकता
१२ अमोघ वाणी
रोज सकाळी उठल्यावर मी देवपुजा करून झाल्यावर शिवरायांच्या मुर्तीचे दर्शन घेवुन या बारा गुणांचे पुजन करतो !
यामुळे काय होत तर मी या "तारिख" "तिथीच्या" वादात पडत नाहि आणि जे शिवराय आपण आचरणात आणायला हवेत ते आचरणात आणता येतात !
जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….