Friday, 31 May 2013

स्वप्न शिवरायांच :- "तरुणांनो संघटीत व्हा!!!!"
काल सहजच विचार आला खरच किती बर झाला असत माझ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधता आला असता तर सर्व मनात साचलेल राजेंच्यापाशी मांडल असत ……… 
अन खरच राजे आले 
समोर काळा  कुट्ट अंधार अचानक त्या अंधारात एक तेजोमय आकृती इतकी तेजोमय कि मी पाहू शकत नाही (तसही या कलियुगात कुणाची कुवत नाहीय ते तेज पाहण्याची). डोळ्यांना त्रास होतो म्हनून मी मान झुकवून तसाच उभा राहिलो तेव्हा जाणवलं ते तेज होत माझ्या शिवरायांच………
राजे तुम्ही तुमच्या या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आलात? 
मी म्हटलं….  मुजरा राजे….
राजे थेट बोलले "बोल तुला काय बोलायचे आहे ते!! "
मी म्हटलं राजे तुम्ही आलात बर झाल सगळीकडे जो बाजार चाललाय तो थांबवा… 
पहा राजे हा चाललेला गलिच्छ कारभार!! कुणी ब्राम्हण - मराठा वाद घालतंय तर कुणी दादोजी कोंडदेव यांच्यावर नको नको ते बरळतय… कुणी जाती पातीवर राजकारण करून आपल्या पोटाची खळगी भरतय तर कुणी स्वताला हिंदूचा तारणहार म्हणवून मोठ होतंय…. कुणी सावरकरांची टिंगल करत तर कुणी थेट राजे तुमची जात काढतय ….
कुणी भ्रष्ट्राचार करताय तर कुणी देशच विकायला चाललाय.  पैसा खाउन खाउन यांची भूक भागतच नाही…  भस्म्या रोग  झालेला यांना बघून लाजवा इतकी यांची भूक. आता काय म्हणावं यांना…. 
कुणी म्हणत आम्ही शिवाजी महराजांच स्मारक अरबी समुद्रात बांधूनच राहणार अहो पण किती महिने / वर्ष झाली ते बांधतातच आहेत एव्हाना आपल्या मावळ्यांनी एक गड बांधून काढला असता…मी म्हणतो स्मारक बांधाल तेव्हा बांधाल अगोदर स्वराज्याच खर धन आपले "गडकोट" कोण वाचवणार?????
इकडे जो तो स्वताचा स्वार्थ बघतोय कुणाला देशाची, स्वराज्याची, समाजाची काही पडलेली नाही दिसतंय ते फक्त "मी आणि माझ" बस काय करायचं तरी काय याला…. 
राजे आता तुम्हीच काहीतरी करू शकता तुमची भवानी जी इतिहासात तळपली तीच आता काहीतरी करू शकते!!! 
मी मोठ्या अपेक्षेने राजें कडे पाहिले…. 
राजे उद्गारले या भवानी ला काहीच अशक्य नाही पण हि  इतिहासात चालली ती परकियांवर…… ती आपल्याच लोकांच्या / स्वराज्याच्या रक्षणासाठी तीच भवानी कशी चालेल आपल्याच लोकांवर???? आज यांची माथी स्वार्थामुळे फिरलीत आणि म्हणून हि स्वार्थी लोक बेईमान झालीत पण म्हणून हि भवानी नाही होणार बेईमान……नाही करणार स्वकीयांवर वार……. मी म्हटलं मग कस थांबणार हे सगळ जर हे नाही  थांबल तर तर नष्ट होईल आपली संपत्ती……. आपल स्वराज्य क्षणभर राजेही शांत झाले आणि कदाचित अनुत्तरीत…. मनात एक विचार येउन गेला….  राजे "अनुत्तरीत" म्हणजे सगळंच संपल पण हार मानणा-यातील राजे नव्हते. राजे शांतपणे म्हणाले अरे मर्द मावळ्या (मन सुखाऊन गेल राजेंची ती हाक ऐकून) हा मराठी माणूस हार मानना-यातील नाही. उठ ताठ कण्याने तू उभा राहा.  स्वराज्य आम्ही कमावल, वाढवलं आता तुम्हाला ते टिकवायचे आहे. तुझ्या सारखे शिवभक्त एकत्र कर पण हा ते  फक्त माझा जयजयकार करणारे नकोत. जेवढ्या ताकदीने त्वेषाने माझा जयजयकार करतात तेवढ्याच ताकदीने हे स्वराज्य राखणारेहि हवेत. तुम्ही तरुण  हे स्वराज्य सांभाळण्याच शिवधनुष्य जेव्हा एकत्र येउन पेलाल तेव्हा मला खरा आनंद होईल. जात पात काय त्याकाळीही  होती पण त्याच राजकारण आम्ही होऊ दिले नाही आणि असे राजकारण करू इच्छीना-यांना आम्ही वेळीच ठेचून टाकले तुम्हालाही तेच करायचंय हे अस जातीचे राजकारण करणा-यांना ओळखून वेळीच ठेचून टाका.  तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवय स्वातंत्र्य कि स्वातंत्र्याच्या आडून मरण यातना देणारे पारतंत्र्य.
भ्रष्ट्राचार काय पुराणकाळापासून होतोय पण त्याला वेळीच ओळखून भ्रष्ट्राचा-यांना योग्य शासन करणं हे राज्यकर्त्यांच काम आहे आणि असे राज्यकर्ते निवडणे तुमचे काम आहे.  नसतील असे कोणी त्या लायकीचे तर तुम्ही व्हा पुढे उतरा या अग्निकुंडात थोडा दाह होईल पण भविष्य उज्वल करायचं तर हे दाह सोसायलाच हवे.   आम्हीही हि स्वराज्यसंग्रामात झेप घेतली तेव्हा आम्हाला जाणीव होती कि आम्ही आगीशी खेळतोय पण आम्हास जाणीव होती कि आम्ही या आगीशी नाही खेळलो तर भविष्याची राख होणार हे नक्की…. 
तेव्हा वेळीच ओळखा…  तुम्ही तरुण आहात या स्वराज्याच खरी ताकद… तुम्ही संघटीत व्हा आणि या स्वराज्यावरच्या संकटाना धीराने तोंड द्या!! हा हा म्हणता आमच्या स्वप्नातील "सुराज्य" असे "स्वराज्य" घडायला वेळ लागणार नाही…. 
हर हर………
महादेव(मी जोरात ओरडलो) ……पण तितक्यात जाग आली जाणीव झाली जे पाहिले ते स्वप्न होत ते जे ऐकल ते सत्य होत महाराजांचा सल्ला "तरुणांनो संघटीत व्हा!!!!" 
बघू आता माझा हा लेख वाचून किती तरुण संघटीत होतायत ते … 
जय शिवराय 
जय शंभूराजे 
जय जिजाऊ 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 15 May 2013

सर तुम्ही कायम स्मरणात रहाल… (खर तर हि पोस्ट फेसबुक वर टाकावी कि टाकू नये याचा मी विचार करत होतो. पण मोनीश दादाशी बोलल्यानंतर मी हि पोस्ट टाकायची ठरवलं. धन्यवाद मोनीश दादा…  
माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारा गुरु पवनपुत्र जिम चे सर चंद्रकांत चाळके आज याचं आज निधन झाल. त्यांच्या बद्दल मला लिहावास वाटल म्हणून हे लिखाण करतोय जेणेकरून मनाचा भार थोडा हलका होईल) 

सर तुम्ही कायम स्मरणात रहाल… 
आज माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस म्हणावा लागेल आमच्या डोंबिवली येथील पवनपुत्र जिम चे सर आमच्यात नाहीत. खर तर दोन वर्षापासून आमची ओळख दोन वर्षापूर्वी मी माझा मित्र सचिन सोबत जिम सुरु करायचं  ठरवल तेव्हा वेगळ वाटत होत.  माझी शरीरयष्टी तर अगदीच काटक होती.  अगदी सुकडा होतो म्हटल तरी चालेल किमान वजन ४८ - ४९. मी जिम करणार म्हटल्यावर लगेच हसू येईल अशी शरीयष्टी. पण सरांनी आपलेपणाने खांद्यावर हात टाकला आणि म्हटले काय नाय रे लोके भल्या भल्या ची होते बॉडी.  तू फक्त रेगुलर येत जा, खान-पिण व्यवस्थित ठेव. त्यांचा तो विश्वास मला खूप काही सांगून जायचा… 
संध्याकाळी जेव्हा कामावरून घरी जाताना सरांची हि बातमी समजली तेव्हा एक क्षण धक्काच बसला. सगळे जुने दिवस आठवले. अगदीच बारीक असा मी आणि आज….  निदान चार चौघात उठून  दिसेल अशी माझी तब्येत खरच त्यांच प्रत्येक मुलावर खास लक्ष असायचं. रोज जिम झाली कि निघताना चला सर निघतो अस म्हणत हात हातात मिळवताना सर दुस-या हाताने दंड थोपटून बघायचे आणि पडतोय पडतोय थोडा फरक पडतोय हे त्याचं वाक्य दुस-या दिवशी जिम ला येण्यासाठी प्रवृत्त करायचं. जिम साठी अगदी सकाळी ५ वाजता आणि कधी कधी तर रात्री १० - १० : ३० पर्यंत जायचो. प्रत्येक वेळी सरांची एक हाक नक्की असायची "काय लोके"  कधी कधी कामाच्या धावपळीत जिम ला Gap झाला कि सरांची हाक असायची "काय लोके आहेस कुठे" हटली बॉडी रेगुलर येत जा रे…. त्याचं नेहमी एकच वाक्य होत रेगुलर येत जा कधी एकदाही त्यांनी मला विचारल नाही "फी कधी देतोस"   मधले काही महिने मला जिम ला जाताच आल नाही.  कधी सहज भेट झाली कि बोलायचे व्यायाम सोडू नको  डिप्स, नमस्कार मारत जा… म्हणजे त्यांना फक्त इतक माहित होत कि मी जिम ला नाही आलो तरी व्यायाम सोडू नये २ वर्षात कमावलेली शरीयष्टी टिकवावी वाढवावी…. हल्ली माझी जिम वेळेच्या कमतरतेमुळे बंद होती.  तरी मी ७ -८ दिवसांपूर्वी सहज त्यांना भेटायला गेलो ते २ -३ दिवसात गावी जाणार होते. तेव्हाही त्याचं एकच सांगण घरी डिप्स नमस्कार मारत जा. खात जा भरपूर नेहमी प्रमाणे गावच्या गप्पा मारून मी त्यांचा निरोप घेतला पण त्यावेळी मला कल्पना नव्हती कि तो शेवटचा निरोप असेल… 
आमच्या पवनपुत्र जिम मध्ये प्रत्येकजण सरांच्या जाण्याने हळहळेल कारण सर कधी सर म्हणून वागले नाहीत नेहमी एका मित्रासारखे खांद्यावर हात टाकून हसत हसत बोलणारे सर. मध्येच एखादा टोमणा मारणारे, असे विलक्षण वेगवेगळ्या रूपातल सर आम्ही सर्वांनी पाहिलेत. आज हा लेख लिहिताना मला शब्द इतके सुचतायत कि माझा टायपिंग स्पीड कमी पडतोय टाईप  करता करता डोळ्यातील अश्रुनी काय शब्द टाईप करतोय ते पण दिसत नाहीय. फक्त इतक माहित आहे कि माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी गोष्ट गमावून बसलोय. सर किती लिहू आणि काय लिहू उगाच मोठमोठ्या उपमा नाही वापरणार मी.  कारण तुम्ही माझ्या आयुष्याला वेगळ वळण दिलात पण मध्येच का गेलात काही समजल नाही. माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात एक आदर्श ठेवला होता आणि जिम च्या क्षेत्रात सर माझे आदर्श होते.  आता काय!  देवाने ठरवलच  आहे चांगली माणस अगोदर न्यायची त्याला आपण तरी काय करणार… 
एक खंत आहे सर्व मुल जातान सरांच्या पाया पडून जायची पण मला सुरुवातीपासून सरांशी हात मिळवायची सवय असल्याने मला पाया पडायची कधी संधीच आली आली नाही…. 
सर खरच या पुढे कधी जिम चा विषय निघेल तेव्हा तुमची आठवण पहिल्यांदा येईल…रोज व्यायाम करताना तुमचा चेहरा आठवून तुम्हाला पाया पडूनच व्यायामाला  सुरुवात करेन 
खूप मोठ नाही पण छोटस काव्य सर फक्त तुमच्यासाठी… 

तुमच्या प्रत्येक शब्दाची आठवण येईल आम्हास 
तुमच्या प्रत्येक वाक्याची उणीव भासेल आम्हास 
तुमच्या प्रत्येक विनोदाचा भास होईल आम्हास 
तुमच्या प्रत्येक क्षणाची आस असेल आम्हास
तुमच्या मित्ररुपी गुरूची हाक नसेल आता आम्हास
तुमच्या अवखळ वागण्याची झलक दिसणार नाही आम्हास
तुमच्या आपलेपणातील राग दिसणार नाही आम्हास
सर फक्त एकदा या आणि दंड थोपटून फक्त लढ म्हणा या शिष्यास….
फक्त लढ म्हणा या शिष्यास…. 
फक्त लढ म्हणा या शिष्यास….  


   

Tuesday, 14 May 2013

शिवकृपा…


शिवकृपा…


आज दि. १२ / ५ / २०१३ रोजी  परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते तसे आम्हा शिवप्रेमीना वर्षाचे ३६५ दिवस शिवमय असतात त्यानिमित्त आम्ही मानगड येथे मोहिमेचे आयोजन केले.  हो नाही हो नाही करता करता मी आशिष पवार,  गौरव, सुरज कोकितकर असे चार जण जाणार हे पक्क झाल. ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्ला स्टेशन ला भेटलो रात्री २:३० वाजताची एस. टी. होती खूप वेळ वाट पहिल्यानंतर एकदाची ST आली पण ST ला एवढी गर्दी होती आमच्या अगोदर चा माणूस त्या ST च्या दरवाजांच्या काचेवर होता त्यापुढे फारशी रिस्क न घेत बस मध्ये न बसण्याचा निर्णय घेतला तरी आशिष च्या योजनेनुसार आम्ही टपावरून प्रवास करायचा विचार केला पण नशीब तो सत्यात नाही उतरला. नंतर आम्ही मिळेल ते वाहन पकडून पुढचा प्रवास करायचा अस ठरवलं मग रिक्षा ने पुढे  गेलो तिथून पुढे मानगड - निजामपूरपर्यंत जायचं होत त्यासाठी येणा-या प्रत्येक गाडी ला हात दाखवून लिफ्ट मागत होतो.  काय पण आमचा उत्साह  रात्रीच्या २:३० वाजता आम्ही हाय वे वर उभे राहून लिफ्ट मागतोय का तर मानगड ला जायचाच…. (गडावर जायला काय पण, कधी पण, कस पण ) नंतर एक Maxima ची गाडी थांबली त्याने प्रत्येकी  रु. १५०/-  सांगितली पण आम्ही त्याच्याशी उच्चस्तरीय चर्चा विनिमय करून रु.१३०/- पर्यंत आणल (चक्क रु.२० /- प्रत्येकी वाचवले) पण नंतर तिथल्या गाड्या सोडण्यासाठी असलेला एजंट आला आणि रु. १५० /- द्या नाहीतर खाली उतारा अशी सरळ उद्धट भाषा वापरू लागला आम्ही पण कमी नाही होतो (शेवटी दुर्गवीर आम्ही "आला अंगावर घेतला शिंगावर") झाल तर रात्रभर इथेच राहू पण रु.१३० /- पेक्षा एकही रु. जास्त देणार नाही या अविर्भावात आम्ही खाली उतरलो गम्मत अशी कि त्याच्या ३ - ४ सीट  खाली राहत होत्या त्यामुळे त्याने आम्हाला स्वताहून बोलावून घेतले(शेवटी आमचा विजय झाला) नंतर मी मागच्या बाजूला छानशी जागा बघून "चिंतन" करायला सुरुवात केली.  नंतर गाडी ४ चाकांवर चालत होती कि २ याची खबरबात न ठेवता मी माझ चिंतन सुरु ठेवले. आशिष दादाच्या बोलण्यावरून तो ड्रायव्हर गाडी खूपच स्पीड मध्ये चालवत होता (मला नाही जाणवल बुवा…. ) शेवटी आम्ही पोचलो निजामपूर येथे तिथून १० किमी चालत जायचं होत. मग मी एक साधा सरळ हिशोब केला १ किमी चालायला १५ मिनिट लागतात मग १० किमी चालायला किती वेळ लागेल (सोप्प आहे  गणित) १५० मिनीट म्हणजे २ तास ५० मिनिट  वेळेचा आकडा जरा जास्त वाटला म्हणून आम्ही मग पुन्हा मिळेल ते वाहन पकडून जायचं ठरवल. आणि तिथे अजून एक आच्छर्याचा धक्का बसला जी ST आम्ही गर्दी आहे म्हणून सोडली होती तीच मागून येत होती आणि महत्वाच म्हणजे त्या ST मध्ये अजून तेवढीच गर्दी होती जेवढी रात्री आम्ही कुर्ला स्थानकात असताना बघितली होती.  आता मात्र आम्ही सुटकेचा निश्वास टाकला कारण बसमधून आलो असतो तर उभे राहून पायाची लाकड झाली असती आमच्या. बर झाल आम्ही ती ST सोडली. तिथे पण एका टमटम ने रु.१५०/- सांगितले दुस-याने २५० सांगितले मग काय पुन्हा लिफ्ट मागत मागत पुढे चालत राहिलो. नंतर कस काय कुणास ठावूक आमच्या वयाची मुल एका क्वालीस मधून जात होती. त्यांनी गाडी थांबवून आम्हाला फुकट लिफ्ट दिली ती रामजींच्या घरापर्यंत… त्या मुलांना आम्ही कुठून आलोय? काय काम करतो? दुर्गवीर कोण आहे? दुर्गवीर चा कार्य काय आहे हि सर्व माहिती दिली त्या मुलांनी आम्हाला फुकट मध्ये रामजींच्या घरापर्यंत सोडलं
गंमतीचा भाग सोडला तर या प्रवासात आमच्यावर शिवरायांची कृपा होती  हे नक्की कारण ST ला गर्दी आहे म्हणून आम्ही ST सोडन आणि तितक्याच खर्चात आम्हाला दुसर आणि आरामदायक वाहन मिळण,आम्ही तितक्यात वेळेत किंबहुना काही मिनिट अगोदर इच्छित स्थळी पोचण,  पुढेच १० किमी अंतरासाठी ती तरुण मुलांनी मदत करणं खरच योगायोग असला तरी आमच्यासाठी ती महाराजांची कृपाच होती.या शिवकार्यात मी गेली दीड वर्ष आहे पण कधी कोणाला दुखापत झाली नाही कि अजून काही!!  काय असेल त्याच कारण?? कारण एकाच छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांवर असलेला आशीर्वाद!!! 
पुढे आम्ही वेळेत रामजींच्या घरी पोचलो फ्रेश होऊन आडव्या हाताने चहा नाश्ता हाणला("हाणला") आणि मग आम्ही निघणार होतो मानगड च्या दिशेन आवश्यक वस्तू घेऊन मी आणि रामजी कदम पुढे निघालो मागून सुरज, आशिष, गौरव आले आमच आजच्या मोहिमेच  पाहिलं ध्येय्य होत राज सदर साफ करण तिथले दगड उचलून व्यवस्थित ठेवण. प्रथम रामाजींनि  आणलेला धान्यकोठारसाठीचा गेट ठेवून आम्ही कामाला सुरुवात केली.  आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली पण उष्णता खूप असल्यामुळे आम्ही फार वेळ काम करू असे वाटत नव्हत तरी आम्ही बरचस काम पूर्ण केल मग पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरलो मग मुख्य दरवाजापाशी गेलो तिथे आम्हाला शिवप्रतिमेचे पूजन करायचं होत  थोड खाउन घेत आम्ही दुस-या टप्प्यातील काम सुरु केल.  दरवाजात पताके लावले आणि मग रामजिंच्या हस्ते पूजन केल आरती आणि  घोषणा  देऊन हा छोटेखानी कार्यक्रम आम्ही आटोपता घेतला. अजून आजच्या मोहिमेचा तिसरा टप्पा बाकी होता. 
खाली मंदिराजवळ एक अज्ञात वीराची समाधी आहे ती जमिनीत गाडली गेली आहे ती बाहेर काढण्याच ठरल रामाजींच्या पुस्तकातहि या समाधीचा उल्लेख आहे. ती जमिनीत किती खोल गाडली गेलीय याचा अंदाज येत नव्हता पण ती आज बाहेर काढायची या त्वेषाने आम्ही काम करून लागलो  सगळ्यांची थोडी थोडी ताकद लावून सरते शेवटी आम्ही समाधी बाहेर काढली तब्बल एक ते दीड फुट खाली ती गाडली गेली होती. खरच जेव्हा ती समाधी पूर्णपणे बाहेर काढली तेव्हा मन अक्षरशा भरून आल.  आजच्या मोहिमेत एका अज्ञात वीराच्या समाधीला आम्ही पुर्नजन्म दिला याच आम्ही  मानसिक सुख अनुभवलं. शेकडो वर्ष ती समाधी पाऊस / वारा झेलत त्या अज्ञात व्यक्तीच्या पराक्रमाची साक्ष देत तटस्थपणे उभी होती. ती समाधी जमिनीतून काढतान हाताला लागत होत पण त्याकडे आमच्या कुणाचे लक्ष नव्हते आमच धेय्य होत ते फक्त ती "समाधी".  आणि आम्ही आमच्या आयुष्यातील अजून एक पुण्य कर्म पार पाडल होत सर्वांच्या चेह-यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद होता.  
समाधी बाहेर काढल्यानंतर त्यावर काही लिहिले आहे का आम्ही पाहू लागलो. पण  आम्हाला फारस काही सापडलं नाही.  आशिष दादाला त्यावर "श्री" दिसला कसा ते त्यालाच ठावूक (होतात असे भास कधी कधी ) नंतर आम्ही परतीचा प्रवास करायला सुरु केला. या वेळी आम्ही तसे लवकरच निघालो (लग्नसराई चालू आहे ना ). बाहेर येउन मग थोड (थोडच बर का!!)खमंग जेवण जेवलो.  पुढे आमचा ST - ST चा प्रवास सुरु होणार होता आणि तो सुरूही झाला आता आम्हाला बसायला चांगली जागा मिळाली आणि पुन्हा सुरु झाला माझ चिंतन…. 

Saturday, 11 May 2013

आठवण


आठवण

आयुष्याच्या या रम्य पहाटे 
आठवणींचा सूर्य उगवे हा 
बेधुंध होई मन माझे 
तुझ्याशिवाय करमे ना… 

कुणासाठी मी झुरणे,
हे मला पटले नसते
तुझ्या आठवणीच्या शिवाय जगणे
हेच मला खटकले असते

राविकीरनाच्या आगमनाने
दवबिंदूही विरून जातो
थोड्याश्या या सुखागमनाने
जुना दुख ओघ सरुन जातो

तुझ्या आठवणीत रमणे
हेच आता माझे जिणे
जणू पावसाच्या आगमनाची
चातकाची वाट पाहणे

आज अस कस काय घडल
जुन्या आठवणीनित मन रडल
सुखाच्या या राखीव क्षणी
परतीसाठी हे मन सरसावले
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Friday, 10 May 2013

खळखळाट सांगे या दर्याचा


खळखळाट सांगे या दर्याचा 
वेढेन मी चहोबाजुने 
बेधडक सांगे त्यासी पद्मदुर्ग
खबरदार जर सरसावशील इंचाने

शिवरायांनी पद्मदुर्गास उभारले 
हिंदवी स्वराज्य रक्षिण्या 
धडाडती या अजस्त्र तोफा 
गनीम जिंजीस थोपविण्या

लढले बहोत मावळे 
या पद्मदुर्गास रक्षिण्या 
अजूनही लढती दगड बुरुजांचे 
अस्तित्व पद्मदुर्गाचे टिकविण्या


Thursday, 9 May 2013

आज तुला पाहुनी

हि गुलाबी थंडी 

त्यात मखमली धुके दाटले 
आज तुला पाहुनी 
पुन्हा प्रेमात पडावेसे वाटले 

य गुलाबी थंडित 
सारे जणू गोरठून गेले 
पण आज तुला पाहुनी 
माझे प्रेम पुन्हा बहरून आले

त्या दूर डोंगरावर 
जणू हिरवे गालीछे अंथरले 
पण आज तुला पाहुनी 
मन माझे त्यात हरवून गेले

Wednesday, 8 May 2013

काय ग आज तुला प्रेम करावस वाटतंय


काय ग आज तुला प्रेम करावस वाटतंय
मी किती तडफडलो तुझ्यासाठी 
हे आता कुठे तुला उमगतंय
तुझ्या आयुष्यातील माझी किंमत 
आता कुठे तुला जाणवतेय 
काय ग आज तुला प्रेम करावस वाटतंय 

काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 
मी जागविल्या किती रात्री 
त्याचा हिशेब आज कुठे  तुला लागतोय 
मी किती बरसलो या अश्रुनी 
याचा अंदाज आज कुठे तुला येतोय 
काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 

काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 
जीतेपणे मरण कस जगलो मी 
ह्याचा अनुभव आज तुला येतोय 
मरणयातना भोगल्यात तुझ्या आठवणीच्या
ते आज कुठे तुला भोगायला लागतंय
काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 

काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 
तुझ्या प्रत्येक शब्दासाठी मी आसुसलेलो 
हे आज तुला कुठे जाणवतंय 
तुझ्या जहरी शब्दाचा वार काय होता 
तो आज कुठे तुझ्या जखमातून झळकतोय
काय ग आज तुला प्रेम कारावस वाटतंय 

    

Monday, 6 May 2013

ती त्याच्याकडे चोरून बघतेय....


ती त्याच्याकडे चोरून बघतेय 
पण तो का तिला नजरेआड करतोय 
ती फक्त त्याच्याच आठवणीत जगतेय 
पण तो का तिला विसरतोय 

ती त्याच्याच हसण्यावर भाळतेय
पण तो का तिला हसण्यावरी नेतोय 
ती त्याच्या अश्रुनी हळहळतेय 
पण तो का तिच्या अश्रुंच कारण बनतोय 

ती देवाकडे फक्त त्याचेच सुख मागतेय 
पण तो का तिच्या भावनांना दुखावतोय
ती का तिच्यावर पुन्हा प्रेम करतेय   
जर तो पुन्हा पुन्हा तिला झिडकरतोय…. 

उत्तर मी आज देतोयएका व्यक्तीने मी दुर्गवीर सोबत असलेल्या कार्याला नाव ठेवण्याची चूक केली…  उत्तर मी आज देतोय… मी बरोबर असेन असेन तर मला नक्की पाठींबा द्या.   हि व्यक्ती माझ्या खूप जवळची असल्याने मी त्याच नाव इथे घेत नाही…. पण दुर्गवीर च्या शिवकार्याला नाव ठेवणारा आपला असला तरी तो चुकीचाच…
खाली त्या व्यक्तीने मला पाठविलेला मेसेज जसाच्या तसा COPY - PASTE आहे… 
Jay Shivray 
tumhe gadhe..kiley...vachvanyachi mohim hati ghetali ahet...thik ahe...tya borober maharajani je shikvan...je sunskruti...te aaj lop pavet chale le ahe...aaj prtek jun fakt ani fakt swatcha vichar kerto...koni maharajanche adershencha vichar kerat nahe...maja mate tumhe swatache photo apload kernya peksha....photography dwara ghad...kileya chi reaility...gambhiryeta...maharastrachi lop pavet chal le le sunskruti...tya badel che vichar manda...aaj pretek gharat kuthe lya na kuthe lya devachi murti kiva pratima aste pn konchya he gharat maharajench sadha passport size photo sapedane mushkil.....jya shivrayani shatru shi ladhun swata...swarjyacha..marathi mulukacha swabhman jepala..aaj toch marathi manus...swatchya raja la viser la...te neste ter aaj he bharet gulamgirit asta...
To swabhman marathi mansat jaga kera...marathi manus mage ahe to tyacha ati hushari...swarth vrti...ani fakt me ..ani maze...aaj ghera...gherat..kargil chalu ahe...apen ethihas madhun kadhi shiknar...tyachi aaj khari geraj ahe...nahi ter khup ushir hoil...shivaji maharaj fakt ata rajkarenaca vishye uerla ahe.....
marathi mansachi ekki...jithe peryente hote nahe....herle le ladhi lednya peksh dokyan ladha....social site..communication che jevadhe medeum astil tyach vichar kera...mavele tyar kera...ter maathi mulukh...tyachi shaan...vadheva..
kuthli he mothi mohim jeva samor aste tevaha...pahli geraj aste ti finance...tyachi kalji karu naka...fekt mehanati...ani kahi gamvenyache tyari thev...me swatache ek community.tyer keli ahe.tyatun financial help milu shakete...teseche sheram dan...he....vel ali ter jiv he...amhala fakt guide che geraj ahe....i hope durgveer prathishtan amhla tyanchyat shamil kerun gheil...aju 2 mahinyani amhiapelya sobat asu....
Jay Shivray...
ane ya pude petek ghosthe marathi..madhun che....

त्याचा पहिला मुद्दा होता स्वताचे फोटो अपलोड करण्यापेक्षा गडाची माहिती देणा , गडांची आजची अवस्था दाखविणारे फोटो अपलोड करावेत मला वाटत त्याने दुर्गवीर चे पेज, वेबसाईट, ग्रुप  निट  पाहिलेली दिसत नाही यावरून कोणीही वैयक्तिक फोटो अपलोड करत नाही आणि तसे आढळलयास admin ते तत्काळ डिलीट  करतात.  हा स्वताच्या प्रोफाईल वरून कोणी काय शेअर करतात याला दुर्गवीर प्रतिष्ठान जबाबदार नाही.  कारण प्रत्येकाला तो अधिकार आहे. दुर्गवीर पेज, ग्रुप यावर प्रत्येक वेळी श्रमदान, गडांची, ऐतिहासिक वास्तूंची माहिती यावरिल पोस्ट शेअर करण्यात येते कुठलीही धार्मिक जातीयवादि पोस्ट admin द्वारा डिलीट करण्यात येते.  अजून काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे.  

दुसरा मुद्दा आज प्रत्येकजण स्वताचा विचार करतो. शिवराय आणि आपले गड किल्ले हे सर्व विसरून फक्त तो स्वार्थासाठीच धडपडत असतो, त्यांच्यात शिवरायां विषयी प्रेम निर्माण करावे……  दुर्गवीर चा प्रत्येक कार्यकर्ता नेहमी शिवराय आणि गडकिल्ले याबाबतीत चर्चा करत असतो मग ते फेसबुक असो वा अजून काही ट्रेन मध्ये असो रस्त्यावर चालणे असो. प्रत्येक सांस्कृतिक सण साजरे करण्यामागचा उद्देश हाच असतो प्रत्येकामध्ये हि भावना जागृत व्हावी. आणि काही अंशी आम्ही सफलहि होतो आमच्या ट्रेन मध्ये चाललेल्या चर्चा ऐकून काही आमच्यासोबत या कार्यात येतात काही जन आमच्या विविध सांस्कृतिक कार्यात सामील होऊन आमच्या कार्याची माहिती घेतात आणि मग आमच्या सोबत येतात काही फेसबुक चे फोटो पाहून आमच्या सोबत येतात. हा काही जणांच्या मनातच नसत हे कार्य कार्यच त्याचं मन वळविण्यात आम्ही का वेळ वाया घालवू.  शिवरायांना जीवाला जीव देणार, साथ देणारे जसे होते तसे विरोध करणारेहि होते शिवरायांनी जी नीती  अवलंबली तिची आम्ही अवलंबतो "साथीने आले तर सोबत घेऊन, पाठीकडे राहिले मागे सोडून, आणि आडवे आले तर छाताडावर पाय देऊन आम्ही पुढे जाउन आम्ही हे स्वराज्य ठीकवणार….(हे सर्वांना लागू होत स्वकीय असले तरीही) प्रत्येक दुर्गवीर स्वताच्या घराचा एखादा कार्यक्रम असेल तर तो चुकवितो पण दुर्गवीर ची मोहीम चुकवत नाही.  अजून काय कराव अशी अपेक्षा आहे तुमची…. 

तिसरा मुद्दा शिवराय हे राजकारणाचा मुद्दा बनला आहे प्रत्येकजण शिवरायांच्या नावाचा वापर करतोय. हा मुद्दा मात्र योग्य आहे हि आजची खरी परीस्थिती आहे आणि दुर्दैव आहे आणि म्हणूनच दुर्गवीर नेहमी राजकारणापासून चार हात लांब आहे.  धार्मिक, जातीयवादि तेढ निर्माण करणारे कुठलेही कार्य दुर्गवीर करत नाही. प्रत्येकजन फक्त आणि फक्त शिवकार्य करतो…. अजून काय कराव अशी तुमची अपेक्षा आहे.…. 

शेवटी त्या व्यक्तीने दुर्गवीर ला फक्त श्रमदान करा आर्थिक मदत मी मिळवून देतो हा शब्द दिला.  प्रसंगी या श्रमदान मोहिमेत दुर्गवीर सोबत आपला ग्रुप घेऊन येण्याचे वाचन दिले (आपण आपला शब्द पाळाल आणि खरा करून दाखवाल हि अपेक्षा करतो.) 
मला वाटत त्या वक्तीला सर्व प्रश्नाची समाधानकारक उत्तर मिळाली असती.  माझ दुर्गवीर चे वीर आणि वीरांगनाना आवाहन आहे कि तुमची प्रतिक्रिया द्या आणि प्रतिक्रिया सौम्य भाषेत असावी शिवीगाळ नसावी हि विनंती 
जय शिवराय 


गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...