स्वप्न शिवरायांच :- "तरुणांनो संघटीत व्हा!!!!"




काल सहजच विचार आला खरच किती बर झाला असत माझ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधता आला असता तर सर्व मनात साचलेल राजेंच्यापाशी मांडल असत ……… 
अन खरच राजे आले 
समोर काळा  कुट्ट अंधार अचानक त्या अंधारात एक तेजोमय आकृती इतकी तेजोमय कि मी पाहू शकत नाही (तसही या कलियुगात कुणाची कुवत नाहीय ते तेज पाहण्याची). डोळ्यांना त्रास होतो म्हनून मी मान झुकवून तसाच उभा राहिलो तेव्हा जाणवलं ते तेज होत माझ्या शिवरायांच………
राजे तुम्ही तुमच्या या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आलात? 
मी म्हटलं….  मुजरा राजे….
राजे थेट बोलले "बोल तुला काय बोलायचे आहे ते!! "
मी म्हटलं राजे तुम्ही आलात बर झाल सगळीकडे जो बाजार चाललाय तो थांबवा… 
पहा राजे हा चाललेला गलिच्छ कारभार!! कुणी ब्राम्हण - मराठा वाद घालतंय तर कुणी दादोजी कोंडदेव यांच्यावर नको नको ते बरळतय… कुणी जाती पातीवर राजकारण करून आपल्या पोटाची खळगी भरतय तर कुणी स्वताला हिंदूचा तारणहार म्हणवून मोठ होतंय…. कुणी सावरकरांची टिंगल करत तर कुणी थेट राजे तुमची जात काढतय ….
कुणी भ्रष्ट्राचार करताय तर कुणी देशच विकायला चाललाय.  पैसा खाउन खाउन यांची भूक भागतच नाही…  भस्म्या रोग  झालेला यांना बघून लाजवा इतकी यांची भूक. आता काय म्हणावं यांना…. 
कुणी म्हणत आम्ही शिवाजी महराजांच स्मारक अरबी समुद्रात बांधूनच राहणार अहो पण किती महिने / वर्ष झाली ते बांधतातच आहेत एव्हाना आपल्या मावळ्यांनी एक गड बांधून काढला असता…मी म्हणतो स्मारक बांधाल तेव्हा बांधाल अगोदर स्वराज्याच खर धन आपले "गडकोट" कोण वाचवणार?????
इकडे जो तो स्वताचा स्वार्थ बघतोय कुणाला देशाची, स्वराज्याची, समाजाची काही पडलेली नाही दिसतंय ते फक्त "मी आणि माझ" बस काय करायचं तरी काय याला…. 
राजे आता तुम्हीच काहीतरी करू शकता तुमची भवानी जी इतिहासात तळपली तीच आता काहीतरी करू शकते!!! 
मी मोठ्या अपेक्षेने राजें कडे पाहिले…. 
राजे उद्गारले या भवानी ला काहीच अशक्य नाही पण हि  इतिहासात चालली ती परकियांवर…… ती आपल्याच लोकांच्या / स्वराज्याच्या रक्षणासाठी तीच भवानी कशी चालेल आपल्याच लोकांवर???? आज यांची माथी स्वार्थामुळे फिरलीत आणि म्हणून हि स्वार्थी लोक बेईमान झालीत पण म्हणून हि भवानी नाही होणार बेईमान……नाही करणार स्वकीयांवर वार……. मी म्हटलं मग कस थांबणार हे सगळ जर हे नाही  थांबल तर तर नष्ट होईल आपली संपत्ती……. आपल स्वराज्य क्षणभर राजेही शांत झाले आणि कदाचित अनुत्तरीत…. मनात एक विचार येउन गेला….  राजे "अनुत्तरीत" म्हणजे सगळंच संपल पण हार मानणा-यातील राजे नव्हते. राजे शांतपणे म्हणाले अरे मर्द मावळ्या (मन सुखाऊन गेल राजेंची ती हाक ऐकून) हा मराठी माणूस हार मानना-यातील नाही. उठ ताठ कण्याने तू उभा राहा.  स्वराज्य आम्ही कमावल, वाढवलं आता तुम्हाला ते टिकवायचे आहे. तुझ्या सारखे शिवभक्त एकत्र कर पण हा ते  फक्त माझा जयजयकार करणारे नकोत. जेवढ्या ताकदीने त्वेषाने माझा जयजयकार करतात तेवढ्याच ताकदीने हे स्वराज्य राखणारेहि हवेत. तुम्ही तरुण  हे स्वराज्य सांभाळण्याच शिवधनुष्य जेव्हा एकत्र येउन पेलाल तेव्हा मला खरा आनंद होईल. जात पात काय त्याकाळीही  होती पण त्याच राजकारण आम्ही होऊ दिले नाही आणि असे राजकारण करू इच्छीना-यांना आम्ही वेळीच ठेचून टाकले तुम्हालाही तेच करायचंय हे अस जातीचे राजकारण करणा-यांना ओळखून वेळीच ठेचून टाका.  तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवय स्वातंत्र्य कि स्वातंत्र्याच्या आडून मरण यातना देणारे पारतंत्र्य.
भ्रष्ट्राचार काय पुराणकाळापासून होतोय पण त्याला वेळीच ओळखून भ्रष्ट्राचा-यांना योग्य शासन करणं हे राज्यकर्त्यांच काम आहे आणि असे राज्यकर्ते निवडणे तुमचे काम आहे.  नसतील असे कोणी त्या लायकीचे तर तुम्ही व्हा पुढे उतरा या अग्निकुंडात थोडा दाह होईल पण भविष्य उज्वल करायचं तर हे दाह सोसायलाच हवे.   आम्हीही हि स्वराज्यसंग्रामात झेप घेतली तेव्हा आम्हाला जाणीव होती कि आम्ही आगीशी खेळतोय पण आम्हास जाणीव होती कि आम्ही या आगीशी नाही खेळलो तर भविष्याची राख होणार हे नक्की…. 
तेव्हा वेळीच ओळखा…  तुम्ही तरुण आहात या स्वराज्याच खरी ताकद… तुम्ही संघटीत व्हा आणि या स्वराज्यावरच्या संकटाना धीराने तोंड द्या!! हा हा म्हणता आमच्या स्वप्नातील "सुराज्य" असे "स्वराज्य" घडायला वेळ लागणार नाही…. 
हर हर………
महादेव(मी जोरात ओरडलो) ……पण तितक्यात जाग आली जाणीव झाली जे पाहिले ते स्वप्न होत ते जे ऐकल ते सत्य होत महाराजांचा सल्ला "तरुणांनो संघटीत व्हा!!!!" 
बघू आता माझा हा लेख वाचून किती तरुण संघटीत होतायत ते … 
जय शिवराय 
जय शंभूराजे 
जय जिजाऊ 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….