सर तुम्ही कायम स्मरणात रहाल…



 (खर तर हि पोस्ट फेसबुक वर टाकावी कि टाकू नये याचा मी विचार करत होतो. पण मोनीश दादाशी बोलल्यानंतर मी हि पोस्ट टाकायची ठरवलं. धन्यवाद मोनीश दादा…  
माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारा गुरु पवनपुत्र जिम चे सर चंद्रकांत चाळके आज याचं आज निधन झाल. त्यांच्या बद्दल मला लिहावास वाटल म्हणून हे लिखाण करतोय जेणेकरून मनाचा भार थोडा हलका होईल) 

सर तुम्ही कायम स्मरणात रहाल… 
आज माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस म्हणावा लागेल आमच्या डोंबिवली येथील पवनपुत्र जिम चे सर आमच्यात नाहीत. खर तर दोन वर्षापासून आमची ओळख दोन वर्षापूर्वी मी माझा मित्र सचिन सोबत जिम सुरु करायचं  ठरवल तेव्हा वेगळ वाटत होत.  माझी शरीरयष्टी तर अगदीच काटक होती.  अगदी सुकडा होतो म्हटल तरी चालेल किमान वजन ४८ - ४९. मी जिम करणार म्हटल्यावर लगेच हसू येईल अशी शरीयष्टी. पण सरांनी आपलेपणाने खांद्यावर हात टाकला आणि म्हटले काय नाय रे लोके भल्या भल्या ची होते बॉडी.  तू फक्त रेगुलर येत जा, खान-पिण व्यवस्थित ठेव. त्यांचा तो विश्वास मला खूप काही सांगून जायचा… 
संध्याकाळी जेव्हा कामावरून घरी जाताना सरांची हि बातमी समजली तेव्हा एक क्षण धक्काच बसला. सगळे जुने दिवस आठवले. अगदीच बारीक असा मी आणि आज….  निदान चार चौघात उठून  दिसेल अशी माझी तब्येत खरच त्यांच प्रत्येक मुलावर खास लक्ष असायचं. रोज जिम झाली कि निघताना चला सर निघतो अस म्हणत हात हातात मिळवताना सर दुस-या हाताने दंड थोपटून बघायचे आणि पडतोय पडतोय थोडा फरक पडतोय हे त्याचं वाक्य दुस-या दिवशी जिम ला येण्यासाठी प्रवृत्त करायचं. जिम साठी अगदी सकाळी ५ वाजता आणि कधी कधी तर रात्री १० - १० : ३० पर्यंत जायचो. प्रत्येक वेळी सरांची एक हाक नक्की असायची "काय लोके"  कधी कधी कामाच्या धावपळीत जिम ला Gap झाला कि सरांची हाक असायची "काय लोके आहेस कुठे" हटली बॉडी रेगुलर येत जा रे…. त्याचं नेहमी एकच वाक्य होत रेगुलर येत जा कधी एकदाही त्यांनी मला विचारल नाही "फी कधी देतोस"   मधले काही महिने मला जिम ला जाताच आल नाही.  कधी सहज भेट झाली कि बोलायचे व्यायाम सोडू नको  डिप्स, नमस्कार मारत जा… म्हणजे त्यांना फक्त इतक माहित होत कि मी जिम ला नाही आलो तरी व्यायाम सोडू नये २ वर्षात कमावलेली शरीयष्टी टिकवावी वाढवावी…. हल्ली माझी जिम वेळेच्या कमतरतेमुळे बंद होती.  तरी मी ७ -८ दिवसांपूर्वी सहज त्यांना भेटायला गेलो ते २ -३ दिवसात गावी जाणार होते. तेव्हाही त्याचं एकच सांगण घरी डिप्स नमस्कार मारत जा. खात जा भरपूर नेहमी प्रमाणे गावच्या गप्पा मारून मी त्यांचा निरोप घेतला पण त्यावेळी मला कल्पना नव्हती कि तो शेवटचा निरोप असेल… 
आमच्या पवनपुत्र जिम मध्ये प्रत्येकजण सरांच्या जाण्याने हळहळेल कारण सर कधी सर म्हणून वागले नाहीत नेहमी एका मित्रासारखे खांद्यावर हात टाकून हसत हसत बोलणारे सर. मध्येच एखादा टोमणा मारणारे, असे विलक्षण वेगवेगळ्या रूपातल सर आम्ही सर्वांनी पाहिलेत. आज हा लेख लिहिताना मला शब्द इतके सुचतायत कि माझा टायपिंग स्पीड कमी पडतोय टाईप  करता करता डोळ्यातील अश्रुनी काय शब्द टाईप करतोय ते पण दिसत नाहीय. फक्त इतक माहित आहे कि माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी गोष्ट गमावून बसलोय. सर किती लिहू आणि काय लिहू उगाच मोठमोठ्या उपमा नाही वापरणार मी.  कारण तुम्ही माझ्या आयुष्याला वेगळ वळण दिलात पण मध्येच का गेलात काही समजल नाही. माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात एक आदर्श ठेवला होता आणि जिम च्या क्षेत्रात सर माझे आदर्श होते.  आता काय!  देवाने ठरवलच  आहे चांगली माणस अगोदर न्यायची त्याला आपण तरी काय करणार… 
एक खंत आहे सर्व मुल जातान सरांच्या पाया पडून जायची पण मला सुरुवातीपासून सरांशी हात मिळवायची सवय असल्याने मला पाया पडायची कधी संधीच आली आली नाही…. 
सर खरच या पुढे कधी जिम चा विषय निघेल तेव्हा तुमची आठवण पहिल्यांदा येईल…रोज व्यायाम करताना तुमचा चेहरा आठवून तुम्हाला पाया पडूनच व्यायामाला  सुरुवात करेन 
खूप मोठ नाही पण छोटस काव्य सर फक्त तुमच्यासाठी… 

तुमच्या प्रत्येक शब्दाची आठवण येईल आम्हास 
तुमच्या प्रत्येक वाक्याची उणीव भासेल आम्हास 
तुमच्या प्रत्येक विनोदाचा भास होईल आम्हास 
तुमच्या प्रत्येक क्षणाची आस असेल आम्हास
तुमच्या मित्ररुपी गुरूची हाक नसेल आता आम्हास
तुमच्या अवखळ वागण्याची झलक दिसणार नाही आम्हास
तुमच्या आपलेपणातील राग दिसणार नाही आम्हास
सर फक्त एकदा या आणि दंड थोपटून फक्त लढ म्हणा या शिष्यास….
फक्त लढ म्हणा या शिष्यास…. 
फक्त लढ म्हणा या शिष्यास….  






   

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….