Tuesday, 22 November 2016

रानभुली ची राणी....
रानभुली ची राणी....


कधी कधी खुप “महान” असलेल व्यक्तिमत्व अगदि “साधेपणाने” तुमच्या समोर येत आणि आपल्यातला बडेजावपण, अहंकार नष्ट होवुन त्या व्यकतीच्या चरणांवर डोक ठेवावस वाटत..... छायचित्रात दिसणा-या आज्जी या कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाहिय. या आहेत "मनू आज्जी" म्हणजे गो. नि. दांडेकर यांना रायगड दाखवणारी याच त्या "रानभुली च्या नायिका" या आज्जींवर गो. नि. दांडेकरांनी "रानभुली" सारखी कादंबरी लिहिली.


दि.२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुर्गवीर रामजी कदम यांनी या आज्जींच घर दाखवल लागलीच आम्ही त्यांच्याकडे गेलो पण काहि कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरच्यांशी बोलतोय इतक्यात आजी तिथे आल्या. झपझप पडणारी पावलं आणि अंधारात चमकणारे तेजस्वी डोळे असं हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि क्षणभराचा विलंब न लावता आम्ही एक एक करुन आज्जींच्या पाया पडलो. अक्षरशः मन शहारुन आल एखाद्या पिक्चर च्या हिरोला पाहिल्यावर एक वेळ काहिच वाटणार नाही पण त्या क्षणाला त्या आज्जींना पाहिल आणि नकळतच पायावर डोक ठेवायची इच्छा झाली. जी पावल अगदि १० एक वर्षाची असताना गो. नि. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत रायगड फिरली त्या पावलांच्या सुरकुत्यांवर डोक ठेवायच भााग्य आम्हाला लाभल...... खरच एक क्षण मन भरुन आल जेव्हा आज्जींना पाय पडलो..... त्यांनी कौतुकाने डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा तर माझे डोळे पाणावले. रामजी कदम आज्जींबद्दल सांगत होते त्यावेळी आज्जींच्या डोळ्यात त्या जुन्या आठवणी स्पष्टपणे दिसत होत्या आज्जी जमिनिकडे एकटक बघत त्या आठवणींना उजाळा देत होत्या हे आम्ही सर्वांनी पाहिलय.


सध्या वयोमानानुसार तब्येतीची कुरबुर असली तरी रामजी कदम बोलले त्याप्रमाणे आज्जींच्या डोळ्यातले “तेज” त्या तिन्ही सांजेच्या अंधारात लख्खपणे दिसत होते. वेळेच्या कमरततेमुळे आम्ही जायला निघालो तर आज्जी आम्हाला “चहा” चा आग्रह करु लागल्या पण पाणी पिवुनच आम्ही आज्जींचा निरोप घेवुन निघालो. भल्या भल्या विभुतींना गडावर पोहोचायला मदत करणा-या आज्जी आम्ही निघतोय म्हटल्यावर अगदि नातवंड परत चााललीत या प्रेमाने गाडिपर्यंत सोडायला आल्या तेव्हा त्या निस्वार्थी “राणी” कडे पहात रहावस वाटल.... अगदि गाडि नजरेआड होईपर्यंत आज्जी आम्हाला पाहत राहिल्या पण माझ्या नजरसमोरुन तो करारी, निस्वार्थी, आपुलकिचा चेहरा काही केल्या अजुनही जात नाहिय....Wednesday, 16 November 2016

सहानभूती नको सहाय्य....


सहानभूती नको सहाय्य.....

कुणी नोटा बदलण्यासाठी धडपडतंय तर कुणी काळा पैसा गोरा करण्यात पण फक्त एकदा या गरिबांच्या आयुष्यात डोकावुन पाहिल की स्वतःचीच किव येते. ज्यांनी आयुष्यात कधी ५००-१००० ची नोट पाहिलीच नसेल त्यांना काय करायच काळा पैसा आणि गोरा पैसा... इकडे आम्ही नोटा मिळवायला रांगा लावतोय तर तिकडे “काहीतरी” मिळेल या अपेक्षेने हे सर्व घोळका करुन आले होते. पण यांना जे काही दिल ते इतक “अपुर” होत की काहितरी दिल्याच सुख मिळण्याऐवजी मन नुसत "चरफडत" होत आपण किती “स्वार्थी” आहोत.


“मदत तुमची आनंद त्यांचा” या आवाहनाला प्रतिसाद देत जमा केलेले जुने कपडे वाटप यांना करताना मन स्वतःलाच दोष देत होत. “बस इतकच” स्वतः रोज मॅचिंग कपड्याचा अट्टाहास करणारे आपण काय देवु शकलो यांना फक्त जुने कपडे. माझी तब्येत ठिक नाहीय म्हणुन दोन दिवस अंगावर स्वेटर घालुन फिरत होतो गडावर जात नव्हतो म्हणुन मला “सहानभुती”(?) मिळत होती मग आयुष्यभर फाटके कपडे अंगावर घेवुन वावणा-यांच काय त्यांना कोण “सहानभुती” देणार ?? बर नुसती "सहानभुती" नकोय त्यांना त्यापुढेही "सहाय्य" हवय !! नाहितर आजकाल “सोशल देशभक्ती” प्रमाणे “सोशल सहानभुती” ब-याच प्रमाणात व्यक्त होते...


सुरुवात तर केलीय ही परिस्थिती सुधारण्यासाठी बघु कितपत यश येतय!! एक मात्र नक्की प्रत्येक वेळी मदत करताना “स्वतःचीच किव” करावीशी वाटेल कारण आपण उघड्या डोळ्यांनी ति-हाईतासारखी अशी परिस्थिति पाहतोय जिथे एकाच महाराष्ट्रात आपण एकीकडे सुखचैनीत जगतोय आणि दुसरीकडे “सुखाचा” लवलेशच नाहिय चैनीच्या गोष्टी तर दुरच राहिल्या...


स्थळ:- बागलान(नाशिक)
#JoyOfHappiness व दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित वॅाटर फिल्टर व कपडे वाटप कार्यक्रमादरम्यान आलेला अनुभव....Tuesday, 15 November 2016

खरा श्रीमंत....खरा श्रीमंत....

छायचित्रातला मुलगा तुम्हाला अगदि "सामान्य" वाटेल पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा आहे “खरा श्रीमंत”..... होय खरच हा मुलगा सर्वात “श्रीमंत” आहे. मु. पो. वडाखेल, ता. बागलान, जिल्हा:- नाशिक. दुर्गवीर तर्फे या गावात कपडे वाटप व Joy Of Happiness तर्फे वॅाटर फिल्टर वाटप करताना प्रशांत वाघरे बंधुंनी जवळच्या दुकानात जावुन बिस्किट पुडे आणि चॅाकलेट आणले.  वाटता वाटता एका क्षणाला आईच्या कडेवर असलेल्या छोट्या मुलाने बिस्किट मिळवायचा हट्ट केला पण त्याच्यापर्यंत पोचेस्तोवर प्रशांत बंधुंकडील सर्व बिस्किड पुडे संपले आणि तो छोटा मुलगा रडु लागला. आता काय करायच सुचत नव्हत जवळपास दुकानही नव्हत आणि गाडिकडे जाण शक्य नव्हत मग प्रशांत बंधुनी या छायचित्रात दिसणा-या मुलाला विनंती केली की त्याला दिलेला बिस्किट पुडा त्या लहान मुलाला द्यावा वाटल्यास तुला दुसरा पुडा गाडिजवळ पोचल्यावर देतो. आणि या मुलाने अजिबात विचार न करता स्वतः कडचा बिस्किट पुडा त्या लहान मुलाला दिला.

आपण आपल्याकडच्या चलनात "नसलेली" एखादि नोट दुस-याला देताना शंभर वेळा विचार करु पण सर्व काही गमावलेल्या या मुलाने स्वतःकडची "वस्तु" दुस-याला देण्यात "मनाचा जो मोठेपणा" दाखवला त्यासाठी मला तरी हा "खरा श्रीमंत" वाटतो....

Tuesday, 8 November 2016

व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……


बाप आणि मुलांच्या नात्यात ब-याच गोष्टी बोलायच्या राहुन जातात कदाचित त्या कधीच बोलल्या जात नाहीत पण असा एक क्षण असतो जिथे हे बोलायला एक संधी मिळते आणि त्या क्षणात सर्व व्यक्त व्हाव लागत अन्यथा ती संधी पुन्हा येत नाही.चित्रपटात वडिलांचा "व्हेंटिलेटर" का काढु नये याची जाणीव शेवटच्या क्षणाला मुलाला होते आणि लिफ्ट नाहीय म्हणून मुलगा पाय-यांनी धावत जातो तो क्षण डोळ्यात आसवं आणतो. आणि तिथेच जाणीव होते, आपण एकदातरी आपल्या आई वडिलांशी मोकळेपणाने बोलायल हव…..


दुस-या बाजूला "प्रेम" आणि "सवय" या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा समतोल साधला नाही तर गफलत होते आणि तुमच अतीप्रेम एखाद्याची सवय बनते आणि तिथेच घात होतो…….एका "व्यक्तीला" लावलेला "व्हेंटिलेटर" हा त्याच्या संबंधित सर्व "नात्यांना" असतो याची जाणीव करून देणारा सुरेख चित्रपट.....

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...